स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांद्याचे २-३ तुकडे, आलं, लसूण अन एखादी हिरवी मिरची असं एकत्रंच टाकते ग्रेव्हीचा मसाला बनवण्यासाठी. हे बारिक चिरुन झालं की मग टॉमॅटोचे ४ तुकडे. मसाला तयार. Happy

ब्राऊन हँड ब्लेंडरमधे कांदा बारीक चिरायचा असेल तर मी कांद्याचे ४-८ तुकडे करते ( इथे कधी कधी पाव किलो वजनाचा एक असे कांदे पण मिळतात ). चॉपर जार मधे १/२ ते ३/४ लेव्हलपर्यंत कांद्याचे तुकडे असतील ( किंवा इतर काही ) तर ते व्यवस्थित एकसारखं चिरलं जातं असा माझा अनुभव आहे.

इथे बिनतेलाची छोल्यांची रेस्पी आहे बहुतेक अल्पनाची. त्यासाठी , पावभाजी,मिसळ, राजमा इत्यादीसाठी अगदी मस्त कांदा चिरला जातो त्यातून.

माझी लेक पराठे , सॅडविच ई. चे वेगळे वेगळे आकार कापले तर छान खाते, हे आकार ठाणे/कल्याण किंवा डोंबिवली येथे मिळतात का?

मामे, उत्तम निष्कर्ष.
बाकी बिनतेलाचा (फुलक्याइतक्याच तेलाचा) खाकरा साध्या तव्यावरही करता येतो. फक्त नॉनस्टिकावर केल्याने तो सपाट होतो इतकंच.

प्रिती, फूडप्रोसेसरमधे चांगला कापला जातो कोबी.

साक्षी१, भांड्यांच्या दुकानामधे कटलेट किंवा तत्सम साचे आहेत का विचार. त्यांच्याकडे अस्तात.

मेधा आणि अल्पना धन्यवाद. ती छोले रेसिपी तर हिट्ट आहे आमच्याकडे.

वेगवेगळ्या आकाराच्या कुकी कटरचा सेट मिळतो. सँडवीच आणि पुर्‍यांना वापरता येतात ते कुकी कटर. पण त्याचा आकार लहान असल्याने पराठ्यांना नाही चालणार.

भांड्यांच्या दुकानामधे कटलेट किंवा तत्सम साचे आहेत का विचार. त्यांच्याकडे अस्तात>> एकच मोठा मिळाला कटलेटचा - बदामाचा- , किलवरचा पण आहे पण लहान आहे.
पराठुकले होतील >> हो ना आणि सकाळी खेळ करत बसावा लागतो.

बाकी काही दुकान काहीतरी परग्रहावरचं उपकरण मागत असल्या सारखा चेहरा करत होते.

डिशवॉशरविषयी शंका आहेत.
माझ्याकडे बॉश चा डिवॉ आहे. त्यात रोजच्या भांड्यासाठी एक ३७-३८ मि चालणारा प्रॉर्गॅम मी वापरते. पण बर्‍याचदा भांडी चिकट वाटतात. साबणाचा चिकटपणा जाणवतो. कदाचित एक वडी जास्त होत असेल म्हणुन साबण रहात असावा. ती वडी १/२ करुन एका सायकलसाठी वापरली तर चालते का?

तुम्ही कोणत्या टॅबलेटस्/पावडर्/लिक्विड वापरता?

मला फूड प्रोसेसर गिफ्ट मिळालाय केनमोरचा. माझ्याकडे आधीच मिक्सर नि चॉपर आहेत त्यामुळे त्याचा काय उपयोग होईल? इथल्या अमेरिकेतल्या फूड प्रोसेसर्स मधे कणीक मळून पाहिलीय का कोणी?

अजून काय काय करता येईल त्यात? प्लीज सुचवा कोणीतरी.

हो ना आणि सकाळी खेळ करत बसावा लागतो. <<
शंकरपाळ्यांची आयड्या वापरायची. पोळपाटभर लाटायचा पराठा आणि साच्यांनी आकार कापून पराठुकले काढायचे आणि तव्यावर चढवायचे. एकावेळेला ४-५ होतील. हा का ना का Happy
अर्थात सारणाचे पराठे नसतील तरच हे शक्य आहे अन्यथा नाही.

मामी, योग्य शब्द आहे की नाही सांग Happy

कुकी कटरने पराठ्याचा जाड उंडा हव्या त्या आकारात कापून नंतर हलक्या हाताने पराठा लाटला तर जमू शकेल ना? सारणाच्या पराठ्यांसाठी दोन पोळ्या (हव्या त्या आकारामध्ये कापलेल्या)लाटून मध्ये सारण भरून नंतर पराठा पसरवला तर चालू शकेल.
पराठूकले हा मस्त शब्द आहे. Happy तूला कॉपीराइट घे.

वत्सला आधी ट्रायल म्हणून लिक्विड किंवा पावडर वापरुन पहा ना. म्हणजे नक्की तोच प्रॉब आहे का ते कळेल. त्या जेल असलेल्या टॅबलेट अर्ध्या नाही करता येत असं मला वाटतं पण जेव्हा खूप भांडी अस्तील तेव्हा त्या वापरु शकाल.
भारतात डीशवॉशर वापरतं का कुणी? कुठचा घ्यायचा? काही टीप्स?

मधुरिमा, हो कणीक मळता येते पण नंतर स्वच्छ करणे जरा कटकटीचे आहे. त्याला बाकी अ‍ॅटॅचमेन्ट्स असतील चकत्या करणे, किसणे, भाजी चिरणे इ. च्या त्या वापरु शकतेस. बर्‍याच लोकांसाठी करायचे असेल तेव्हा उपयोग होतो.

मधुरिमा , मी फुड प्रोसेसर भरपुर वापरते.कणीक मळायला रोजच वापरते. भांड डिशवॉशर मध्ये जाते त्यामुळ हाताने धुवायची कटकट नाही.
पराठ्याच (कोबी ,मेथी,गाजर ,पालक ,दुधी इत्यादी) कणीक त्यातच भीजवते. मेथी वगैरे धुवून त्यात एकदा फिरवून छान बारीक चिरुन घेते. आणि मग पीठ,मसाला अ‍ॅड करत कणीक मळते. खुप फास्ट पराठे होतात या मेथडने. तसच टोमॅटोच्या पुर्‍या , टोमॅटो ऑमलेट इत्यादी करायला पण छान आहे .

आई, शेंगदाण्याची चटणी लोखंडी खलबत्त्यात करते. मला तीच आवडते. मिक्सर मधली नाही आवडत. आई इथे आल्यावर तिने मला , फुड प्रोसेसर मध्ये चटणी करुन दिली. बरेचशी खलबत्त्यातल्या चटणी सारखी होते. तेव्हापासून त्यातच करते.
घरगुती सालसा ,कोशिंबीर्,हलवा, फ्रेंच फ्राईज , बटाट्याच्या काचर्‍या वगैरे करायला पण फुड प्रोसेसरच वापरते.
शंकरपाळी ,करंजी वगैरेच पीठ तर एकदम मस्त मळलं जात.
जेवढे आठवले तेवढे लिहिले उपयोग.पण एकूणच फुड प्रोसेसर माझ्यासाठी मस्ट आहे किचन मध्ये. Happy

वत्सला, सीमानं मधे सांगितलं होतं बघ...लाइम शाइन म्हणून पावडर मिळते. त्यानं ब-यापैकी जातो चिकटपणा. ट्राय करून बघ. ती वडीबरोबर टाकायची. वडी अर्धी वापरून उपयोग नाही होणार असं मला तरी वाट्टय.

सीमाच्या अख्ख्या पोस्टला +१
अर्थात माझ्याकडे देशातला फुप्रो आहे. पण अगदी हरकाम्या आहे फुप्रो Proud

थॅंक्स वरदा, लोला, सीमा आणि बिल्वा.

आज पासून काढणार आहे वापरायला. हरकाम्या फुप्रो Happy एक हवाच होता स्वैपाकघरात.

वरदाची पोस्ट वाचून मी पण फूड प्रोसेसर घेतला.आणि कणिक मळायचे काम अधिक सोपे झाले.गाजर हलव्यासाठी गाजराचा कीस पण पटकन होतो.सीमा तुझी पराठ्यांची कृती सोपी आहे.करून पाहते.धन्यवाद!
देशातला फुप्रो आहे>> कोणता आहे ग बिल्वा?
आणि ग्रील शेगडी असेल तर तवा कोणता चांगला आहे,सांगाल का कोणी? सध्या एक पसरट pan वापरते.

कणीक मळण्याआधी फूडप्रोसेसरच्या भांड्याला तेलाचा हात लावून घेतला तर फार राडा होत नाही.
मी मोदकांची उकडही हल्ली (अशीच भांड्याला तेलाचा हात लावून) त्यातच मळून घेते.
फूप्रो घेतल्यास मी काकडी चोचवली नाही कधी कोशिंबिरीसाठी. तसंच सगळे कीस त्यातच काढते. (उरलेले मायबोलीवर काढते. :P)

कणीक मळण्यासाठी म्हणून फूप्रो घेऊ नका. अर्थात त्याचे बाकी उपयोग आहेत. पण हे घेतलेत तर कणीक मळायला पुन्हा फूप्रो ला हात लावणार नाही तुम्ही- Wink
http://www.maayboli.com/node/12777

मी Cupertino येथील अपार्टमेंट मध्ये ४ वर्ष राहते. २ महिने आधी पर्यंत dishwasher व्यवस्थित चालायचा. कुठलेही भांडे टाकले तर स्वच्छा निघायचे .आता वरील भागातील एकही भांड स्वच्छा होत नाही.सायकल चालू राहते. apartment maintenance म्हणण्यानुसार खालच्या भागात जिथून पाणी येत त्या जागेत भांडी लावायची नाहीत तेही करून झाले पण भांडी स्वच्छ निघत नाही अणि आधी कुठेही भांडी लावली तर स्वच्छ निघायची . काल परत त्या माणसाला बोलावले आणि न निघालेली भांडी दाखविली तर म्हणतो की इतकी मोठी भांडी लावायची नाही.साधारण आकाराचे pan होते.
Dishwasher is only for dishes and glasses. Maintenance माणूस कधीच काही मान्य करीत नाही. त्याला कसे पटवून द्यायचे हा प्रश्न आहे . भांडी हातानी घासावी लागतात त्यामुळे मनस्ताप तर रोज होतो आहे. नेमका प्रोब्लेम काय असेल .कृपया मदत करा

Pages