Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खालील दुव्यावरचे mixers कोणी
खालील दुव्यावरचे mixers कोणी वापरले आहेत का? मी जास्त करून कणीक मळण्यासाठी वापरणार आहे. स्टेन्ड मिक्सर परवडणार नाही - फार फार तर up to $50.
http://www.amazon.com/Sunbeam-Heritage-6-Speed-250-Watt-Silver/dp/B001AO...
http://www.amazon.com/Sunbeam-FPSBHS0302-5-Speed-Stand-250-Watt/dp/B003V...
अमी
कोणीही मी विचारलेल्या
कोणीही मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही का? आणखी ही कसली माहिती असली तरी हरकत नाही.
अमी
अमी मी हॅमिल्टन बीच चा फुड
अमी मी हॅमिल्टन बीच चा फुड प्रोसेसर कणिक भिजवायला वापरते. त्यावर लिहिलय यात कणीक भिजवू नये म्हणून :)) पण ३ वर्ष वापरतेय काही प्रॉब्लेम नाही. $ २५-३० ला वॉलमार्ट ला घेतलाय.
वरदा, धन्यवाद! शक्य असले तर
वरदा, धन्यवाद! शक्य असले तर मला ह्या फूड प्रोसेसरचे मोडेल नम्बर द्याल का? म्हणजे मी त्या प्रमाणे वॉलमार्टमध्ये पाहिन.
अमी
मला modular kitchen बद्दल
मला modular kitchen बद्दल माहीती हवी आहे.
कुठ्ले म टे री य ल चान्ग्ले आहे
सल्ला हवाय..ठाण्यात गॅस रेन्ज
सल्ला हवाय..ठाण्यात गॅस रेन्ज घेण्यासाठी कोणत्या दुकानात जावे आणी भारतात रेन्ज घेण्याचे फायदे/तोटे, अनुभव काय आहेत? धन्यवाद.
ठाण्यात एकजण काचेचे निरांजन,
ठाण्यात एकजण काचेचे निरांजन, तांब्याभांडं, समई, लामणदिवा करतात, त्यांचा पत्ता कुणाला माहित आहे का ?
काचेचे निरांजन, तांब्याभांडं,
काचेचे निरांजन, तांब्याभांडं, समई, लामणदिवा करतात, त्यांचा पत्ता कुणाला माहित आहे का ?>>> दमाणी इस्टेट पोस्ट ऑफिससमोर जे जिंजा अपार्टमेंट आहे तिथे आतमध्ये विठ्ठल सायन्ना मंदिराच्या बाजूलाच एक छोटंसं ऑफिस बघितलंय हे सगळं मिळण्याचं.
अश्विनी , साधारण किंमत काय
अश्विनी , साधारण किंमत काय असते याची. गिफ्ट द्यायचे आहे.
मी आत जाऊन विचारलं नाही गं.
मी आत जाऊन विचारलं नाही गं. प्रदर्शनांमधूनही दिसतात या वस्तू विकायला ठेवलेल्या.
धन्यवाद अश्विनी...मी ही
धन्यवाद अश्विनी...मी ही प्रर्दशनात पाहिल्या होत्या बरयाच वर्षांपुर्वी.
मला ईलेक्ट्रिक ब्लेंडर
मला ईलेक्ट्रिक ब्लेंडर घ्यायचा आहे. रोजच्यारोज लेकीसाठी सूप बनवायला, अधेमधे चॉपिंगसाठी आणि अंडी फेटण्यासाठी असा उपयोग अपेक्षित आहे. माझ्याकडे फिलिप्सचा एक हँड ब्लेंडर आहे, पण त्यामधे चॉपिंग आणि अंडी फेटणे ही दोन कामे करता येत नाहीत. (चॉपिंगचे अॅटॅचमेंट नाही)
कुणाला या प्रकारच्या हँड मिक्सरचा अनुभव असेल तर सांगा.
http://www1.macys.com/shop/pr
http://www1.macys.com/shop/product/cuisinart-csb-77-hand-blender-smartst... मी ह्या प्रकारचा हँड ब्लेंडर घ्यायच्या विचारात आहे.
कुणाला अनुभव आहे का? ह्यात जे चॉपिंग साठी भांड आहे त्याचा किती उपयोग होतो?
अनु ३ ,मी ब्राऊन कंपनीचा
अनु ३ ,मी ब्राऊन कंपनीचा हॅण्ड ब्लेडंर वापरला आहे बरीच वर्ष !! मला आवडल. त्यातही चॉपिगचे भांडे वापरले आहे. जर कुटुंबात कमी मेम्बर असतील तर रोजचे मसाले वगैरे वाटायला खुप उपयोग होतो. मी क्युसिन आर्टच नाही वापरले पण नक्कीच चांगले असेल. फक्त हे जे बोटाने प्रेस करुन स्टार्ट करायचे ब्लेंडर्स आहेत ते एका वर्षापेक्षा चालत नाही असा माझातरी अनुभव आहे.. मी दर एक ते दिड वर्षाने नविन घेतले. त्यामुळे आता नाही वापरत!! सध्या मॅजिक बुलेट वापरते आहे.ते पण आवडलं आहे.
अमया धन्यवाद, इथे वापरायला
अमया धन्यवाद,
इथे वापरायला फुप्रो आणी ब्लेंडर कॉम्बो असलेला कुठला चांगला आहे माहिती आहे का?
मला फुप्रो कणिक मळण्यासाठीच हवा आहे.
इथे कुठला चांगला मिळत नसेल तर भारतवारीत रेनॉल्ड चा घेऊन येणार आहे. पण इथे घेतला तर काही प्रोब्लेम आला तर बदलायला किंवा पार्ट मिळायला बरे पडेल असे वाटते
अनु३, खालील दुव्यावर दिलेला
अनु३, खालील दुव्यावर दिलेला फू.प्रो. कणिक भिजवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. भाज्याही चान्गल्या चिरुन होतात. ब्लेन्डर मी ओस्टरचा वापरते - अगदी बेसिक - $४०वाला. ईडली-दोश्याची पीठे मस्त वाटली जातात. हा दुवा मला वरदा कानिटकर यान्नी दिला - मी एमेझोन्वरुन मागवला. माझा अनुभव खूप छान आहे.
http://www.amazon.com/Hamilton-Beach-70450-8-Cup-Processor/dp/B000M2FCWC...
अमी
ओके बघते
ओके बघते
अरे, इथल्या ब्लेंडरसाठी मला
अरे, इथल्या ब्लेंडरसाठी मला जरा मदत करा ना.
नंदिनी, मॉर्फी रिचर्डस््चा
नंदिनी, मॉर्फी रिचर्डस््चा हँड ब्लेंडर मस्त आहे. मी गेले ६-७ वर्षे वापरत आहे. त्यात चॉपिंग अॅटॅचमेंटही आहे.
त्यात एक-दोन्च कांदे वगैरे मस्त चिरले जातात.
प्राची, अंडी फेटण्यासाठी याचा
प्राची, अंडी फेटण्यासाठी याचा किती उपयोग होतो?
मी नेहमी हातानेच फेटते अंडी,
मी नेहमी हातानेच फेटते अंडी, पण माझी एक मैत्रीण केकसाठी अंडी फेटायची हे वापरून.
त्याच साइटवर इतरही मॉडेल्सची माहिती आहे. काही मॉडेल्समध्ये बीटर अॅटॅचमेंटही आहे. तेही बघ.
माझा स्टील चा हंडा बुडामध्ये
माझा स्टील चा हंडा बुडामध्ये बाहेरील बाजूने अगदी केसासारख्या बारक्या छिद्रातून गळत आहे.मी जेव्हा तो स्टीलच्या दुकान जाऊन हा मोडून दुसरा घेते म्हटले तर दुकानदाराने मला ह्या एकदम छोट्या होल साठी एम सील लावा कारण बाकी हंडा एकदम नवीन च दिसतो आहे असे म्हटला. तर असे स्टील च्या हंड्याला एम सील लावले तर आणि ह्या मध्ये पाणी साठवलेले पिले तर चालेल का? त्याचे काही दुष्परिणाम तर नाहीत ना?
प्लीज मला कोणी वर विचारलेल्या
प्लीज मला कोणी वर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या ना....
ho chaalel..
ho chaalel..
धन्यवाद सुलेखा .
धन्यवाद सुलेखा .
स्वैपाकासाठी लागणारे तेल
स्वैपाकासाठी लागणारे तेल ठेवण्यासाठी ओघळ न येणारे एखादे भांडे आहे का ? नविन नोझल वाले आले आहेत पण ते कलंडतील अशी भिती वाटते. कोणी वापरले आहे का ते?
रावी, ऑलिव्ह ऑईलच्या ज्या
रावी, ऑलिव्ह ऑईलच्या ज्या काचेच्या बाटल्या असतात ना त्यांना एक विशिष्ट प्रकारचं फिटिंग असतं. वरचं झाकण उघडल्यावर हे फिटिंग दिसतं. त्यातून तेलाचा अजिबात ओघळ येत नाही. आतापर्यंत मी पाहिलेल्यातलं तरी हे सगळ्यात इफेक्टिव्ह असं तेलओत्या.
टपरवेअरचं तेलाचं भांडं येतं
टपरवेअरचं तेलाचं भांडं येतं खास. मी सध्या तेच वापरत आहे. त्याला एक विशिष्ट प्रकारचं झाकण आहे. तेल अजिबात गळत नाही. मी पाहिलेल्या भांड्यांपैकी एकदम मस्त!!
इथे आहे तसलं भांडं मी अनेक
इथे आहे तसलं भांडं मी अनेक वर्षे वापरत आहे.
अगदी अगदी मामी.. मी तेच
अगदी अगदी मामी.. मी तेच वापरते.
Pages