निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला हे वरचे स्तोत्र माहित नाही. शशांक हे स्तोत्र तुम्ही स्तोत्रांच्या बाफवर चिकटवाल का प्लिज? Happy त्या स्तोत्रातील पृथ्वी म्हणजेच भूदेवी, महाविष्णूची द्वितीय पत्नी मानली जाते. पहिली पत्नी श्रीदेवी (हसू नका Proud )

जागू, अगं आदिमातेच्या महिषासुरमर्दिनी रुपाने शताक्षी/शाकंभरी/अन्नदा/नीलदुर्गा अवतार धारण केला होता. त्या ती अन्नजलदायिनी झाली होती. जरी त्या युगात ऋषीमुनी निसर्गाची निगराणी करणारे होते तरी जसजसा काळ पुढे जात राहिला तसतशी निसर्गाकडे दुर्लक्ष होऊ लागले आणि अवर्षणाला तोंड द्यावे लागले. तेव्हा त्या स्तोत्र बाफवर दिलेले 'सनातनदेवी सूक्त' अगस्त्यादि श्रेष्ठ ऋषींकडून ठराविक संख्येने पठण केलं गेल्यावर ती प्रगटली होती. तिच्या आठ हातांमध्ये नवपल्लव शाखा, पुष्प, फल, कंदमुळे, अक्षय्य जलपात्र, धनुष्य बाण व नांगर अशी साधने व आयुधे होती. तिने मित्र-वरुणांना त्यांचा क्रोध आवरण्याची आज्ञा करुन पृथ्वीवरील ऋतुचक्र सुरळीत सुरु करण्यास सांगितले.

नंतर तिने तिच्या लाडक्या कन्येस आल्हादिनीस परमशिवपत्नी पार्वतीच्या स्वरुपात पाचारण केले व तिला 'अन्नपुर्णा' हे नामाभिधान देऊन सृष्टीतील अन्ननिर्मितीचे कार्य पवित्र नियमांनुसार सांभाळण्याचे कार्य दिले.

आभार शशांक,
ज्या काळात मानव थेटपणे निसर्गावर अवलंबून होता, त्या काळात हि कृतज्ञतेची भावना होती. (समुद्र वसने..)
आजही आपण तसेच निसर्गावर अवलंबून आहोत. प्लॅस्टीक, पेट्रोल सगळे निसर्गातूनच तर येते. पण आता आपल्याला थेटपणे ते मिळवता येत नाही. म्हणून जाणीव राहिली नाही.

साम - व्रतानि (छांदोग्योपनिषत्) (संदर्भ - अष्टादशी -आचार्य विनोबा भावे)

महामना: स्यात् | तद् व्रतम् || (मोठ्या मनाचे व्हावे. हे व्रत आहे)
तपन्तं न निंदेत् | तद् व्रतम् || (तापणार्‍या आदित्याची निंदा करु नये. हे व्रत आहे)
वर्षन्तं न निंदेत् | तद् व्रतम् || (वर्षणार्‍या मेघांची निंदा करु नये. हे व्रत आहे)
ऋतून् न निंदेत् | तद् व्रतम् || (ऋतूंची निंदा करु नये. हे व्रत आहे)
लोकान् न निंदेत् | तद् व्रतम् || (लोकांची निंदा करु नये. हे व्रत आहे)
पशून् न निंदेत् | तद् व्रतम् || ( पशूंची निंदा करु नये. हे व्रत आहे)
सर्वमस्मीत्युपासीत | तद् व्रतम् , तद् व्रतम् || ("मी(च) सर्व आहे" अशी उपासना करावी. हे व्रत आहे. हे व्रत आहे.)

अश्विनी मस्त वाटल ग वाचताना अजुन येऊदेत निसर्गाशी निगडीत श्लोकांवरील विश्लेशण.

मारूती चितमपल्ली यांच्या चैत्रपालवी ह्या पुस्तकातील ही माहीती :

चितमपल्ली म्हणतात घुबड हे लक्ष्मिचं वाहन, मग त्याचं दर्शन अशुभ कसं ! त्याच्याविषयीच्या दंतकथेने त्यात आणखी गूढतेची भर पडलेली. घुबडाच्या घरट्यात परिस असतो. त्याला मदिरा पाजल्यावर तो गुप्त धनाचा पत्ता सांगतो. त्याला खडा मारल्यास तो अलगद झेलतो. आणि खडा जसजसा पायात धरून घसतो तसतसा खडा मारणारा माणुस झिजत जातो. म्हणून तर त्याच्या वाटेला कुणी जात नसावं. त्याची उपयुक्तता किती सांगावी. एका हेक्टर शेताचं उंदिर आणि कीटकांपासूनच एका घुबडाची जोडी संरक्षण करते. कृषी उत्पन्न म्हणजे धनच. ते धनाचं राखण करतात.

त्यांनी भारद्वाज पक्षाविषयी केलेले लिखाणः

सौराष्ट्र आणि कर्नाटक देशात भारद्वाज पक्ष्याच्या घरट्याविषयी गूढ लोककथा आहे. भारद्वाजाच्या घरातीत मुलायम अस्तरात संजीवनी काडी असते. त्या खोप्यातील कड्या जलप्रवाहात फेकल्या की इतर काड्याप्रमाणे प्रवाहाबरोबर वाहून जातात. मात्र संजीवनी काडी प्रवाहा विरुद्ध वाहु लागते. ह्या अलौकीक कथेचा उगम कसा झाला हे माहीत नाही पण होत काय दर वर्षी शेकडो घरट्यांचा संजीवनी काडीसाठी विध्वंस केला जातो.

हंस पक्षाबद्दल थोडक्यात :
सायणाचार्य तैत्तिरिय ब्राम्हणात हंसाच्या नीरक्षीर विवेक या लोकविलक्षण शक्तीवर प्रकाश टाकताना लिहीतात की, जलमिश्रीत क्षीराच्या भांड्यात हंस जेव्हा आपली चोंच घालतो तेंव्हा त्याच्या मुखात असणार्‍या आम्ल रसाशी संयोग होऊन क्षीर व पाणी वेगळे होते.

अजून हळू हळू वेळ मिळाल्यावर असे काही उतारे टाकण्याचा प्रयत्न करेन.

लेकाच्या फोटोबद्दल सर्वांचे आभार!
जागू कधी येतेस पुण्यात? कळव....मला शक्य असेल तर येईन.
शशांक स्तोत्र छान आहे. आणि अश्विनी के...किती इंटरेस्टिंग माहिती दिलीस!

मी पण आहे आहे Proud Happy

जिप्सी, साधना कुठेही असले तरी इथे डोकावल्याशिवाय रहात नाहीत.>>>>>दिनेशदा तुम्हाला १०० काजुकतली Happy

जागू,चकवाचांदण पुस्तकाची प्रस्तावना पण मस्त आहे. हे नाव त्यांनी का दिलं ते फार वाचनीय आहे.
आणि त्यातली सगळीच प्रकरणं वनविश्वाची एक अद्भुत सफर घडवतात. पण मला सर्वात आवडलेलं म्हणजे 'दस्तापूर' हे प्रकरण. त्यांचे सासरे लावलेल्या झाडांविषयी जे मत व्यक्त करतात ते वाचून आपण नि:शब्द होतो. खूप आनंददायी आहे हे पुस्तक.

हा आता निसर्ग फुलल्यासारखा वाटला. :स्मितः

शांकली आता त्या पुस्तकाबद्दल मला अजून उत्सुकता लागली आहे. आज चालू करतेच.

मानुषी,
त्या डेस्टीनेशन मासिकाचे संपादक B. Mathews आहेत.
संपर्कासाठी info@eadestination.com वर ईमेल
करता येईल. फ़ेसबुक वर पण त्यांचे अकाऊंट आहे
Destination Magazine या नावाने.

वाचनीय लेख आणि फ़ोटो असतात.

http://www.eadestination.com/

जिप्स्या_तू_पण्_बघ.

शांकली, दस्तापूरचं प्रकरण सुंदरच आहे.
मला तितकंच आवडलं म्हणजे ज्या प्रांजळपणाने त्यांनी आपलं सुरुवातीचं अपयश मांडलं आहे, ते खरंच ग्रेट आहे.

गौरी तो कोष आहे. अर्थात आतला किटक निघून गेलाय. असे आणखी असतील तर त्यांच्यावर नजर ठेवून, कोषातून बाहेर येण्याचा सोहळा बघता येईल.

दिनेशदा, हा एकच दिसला. पुन्हा एकदा नीट बघते अजून एखादा दिसतोय का म्हणून. ट्रेनिंगमुळे एवढं मोठं नाट्य बघायचं मिसलंय मी Sad
एवढा नाजुक आणि सुंदर कोष फुलपाखरांचा असतो का?

हा एखाद्या पतंगाचा असू शकेल. फुलपाखराचे साधारण बारिक फांदीला, उभे लटकत असतात.
कोषातून बाहेर यायच्या आधी काही काळ त्याचा रंग बदलतो. मग अगदी पहाटे, त्यात हालचाल दिसायला लागते. आधी मिशा, मग डोके आणि मग बाकिचे अंग बाहेर येते. त्यावेळी पंखांची घडी घातलेली असते, ते ओलेही असतात आणि आकाराने छोटेही.
मग तो किटक त्या फांदीच्या वरच्या टोकावर जाऊन, सूर्य उगवायची वाट बघतो. ऊन्हात पंख पसरुन ते वाळवतो. थोड्याच वेळात ते कोरडे होतात. मग किंचीत फडफड करतो आणि तो हवेत झेप घेतो.

हे नाट्य मी अनेकदा प्रत्यक्ष बघितलेय. त्यासाठी कोष गोळा करुन घरी काचेच्या बाटलीत ठेवायचो. (बाहेर ते पक्ष्यांच्या नजरेला पडले, तर त्यांचे अन्न बनतात.)
पण मी वर्णन केलेय त्यापेक्षाही ते फार सुंदर असते.

कोषातून बाहेर यायच्या आधी काही काळ त्याचा रंग बदलतो. मग अगदी पहाटे, त्यात हालचाल दिसायला लागते. आधी मिशा, मग डोके आणि मग बाकिचे अंग बाहेर येते. त्यावेळी पंखांची घडी घातलेली असते, ते ओलेही असतात आणि आकाराने छोटेही.
मग तो किटक त्या फांदीच्या वरच्या टोकावर जाऊन, सूर्य उगवायची वाट बघतो. ऊन्हात पंख पसरुन ते वाळवतो. थोड्याच वेळात ते कोरडे होतात. मग किंचीत फडफड करतो आणि तो हवेत झेप घेतो.

हे नाट्य मी अनेकदा प्रत्यक्ष बघितलेय. त्यासाठी कोष गोळा करुन घरी काचेच्या बाटलीत ठेवायचो. (बाहेर ते पक्ष्यांच्या नजरेला पडले, तर त्यांचे अन्न बनतात.>>> तुम्ही वर्णनही ईतके मस्त करता की चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. Happy

तुम्ही वर्णनही ईतके मस्त करता की चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. Happy >> अगदी हेच म्हणायचं होतं मला!
आता एक तरी न उघडलेला कोष शोधायलाच हवा बागेत.

दिनेशदा, तुम्ही कोषातून फुलपाखरू बाहेर येण्याचे वर्णन ईतके हळूवार केलेत की दॄश्य अगदी डोळ्यासमोर ऊभ राहीलं

धन्यवाद दिनेशदा..........लेकाकडे पाठवते!

असंच विलक्षण जीवन चतूर आणि टाचणी जगतात.
आपल्याला हे साधारण पाणथळ जागीच दिसतात. हे दोन्ही अंडी घालताना पाण्याच्या खाली घालतात. तेसुद्धा गवताची काडी किंचीत पोखरुन त्यात अंडी घालतात. त्यासाठी त्यांच्या शेपटीला एक टोक असते.

टाचणी आपली शेपुट फक्त पाण्यात बुडवते पण चतुराची मादी पाण्यात डुबकीच घेते. पाण्यातून बाहेर येण्यासाठी तिला खुपच प्रयास करावे लागतात. त्यात जर ती अयशस्वी ठरली तर बेडूक आणि मासे तिला खायला टपलेलेच असतात. एरवीही तिचे आयुष्य थोड्या दिवसांचेच असते.
चतुराच्या अळ्या मात्र खुपच खादाड असतात, अगदी छोटे बेडुकमासे पण खाऊ शकतात.

एखाद्या डबक्याच्या काठी बराच वेळ निवांत बसून राहिले तर हे नाट्य बघता येते. जिप्स्या कधी वेळ मिळाला तर चतुराचे मिलन, आणि पाण्यातून बाहेर येणे टिपता आले तर बघ.

Pages