माझे आवडते शीर्षकगीत

Submitted by निंबुडा on 5 July, 2011 - 03:36

काही काही मालिका पडद्याआड जाऊनही त्यांचे शीर्षक गीत गुणगुणावेसे वाटते. जुन्या काळात जेव्हा आतासारखे सतराशे साठ उपग्रह वाहिन्यांचे पेव फुटलेले नव्हते तेव्हा मोजक्याच मालिका, कार्यक्रम लागायचे व लोकही न चुकता प्रत्येक भाग सुरुवातीचे शीर्षकगीत न चुकविता बघायचे. महाभारत, रामायण, लहान मुलांचे दानासूर (डायनॉसोर), मोगली, मराठीत असे पाहुणे येती, बोक्या सातबंडे इ. इ.

मी इथे माझी आवडती शीर्षकगीते लिहितेय. तुम्हीही लिहा. Happy

मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधल्या जुन्या/नव्या मालिका, मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम इ. पैकी ज्या कशाचे शीर्षक गीत तुम्हाला आवडते ते इथे लिहा. पूर्ण लिहिल्यास दुधार साखर! त्या निमित्ताने विस्मृतीत गेलेल्या शीर्षक गीतांना उजाळा देऊ. Happy

युट्युब वर ही गीते available असतील तर इथे दुवा द्या (आणि दुवे घ्या) प्लीज. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झी मराठी वरील "घडलय-बिघडलय"आणी "हसा चकटफु"यांची गाणी पण छान होती.:)

वेळः सं ६.३० ते ७.००
चॅनलः सह्याद्री

ही काळी आई.... धनधान्य देई....
ही काळी आई.... धनधान्य देई....

जो रचे मनाची नाती (?).....
आमची माती.... आमची माणसं

Happy

तुम्हा सर्वाना मनापासुन सलाम.. मला एकही सिरीअल आठवत नाही आणी तुम्हाला त्याची टायटल साँग पाठ आहेत... धन्य आहे.. Happy

सुख आणिक दु:ख यांना सांधते आहे
जीवनाशी ती कधीची भांडते आहे
दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती
वेगळे काहीतरी बघ सांगते आहे
जीवनाचे एक गाणे गात जाताना
वेगळीशी चाल त्याची बांधते आहे
जीवनासाठी जणू ही अकस्मिता
सुख आणि दु:ख वेडी अवंतिका

उगवले आहे इथे हे झाड पाण्याचे
आसवांनी तीच वेडी सांडते आहे
जीवनासाठी जणू ही अकस्मिता
सुख आणि दु:ख वेडी अवंतिका

<<< जो रचे मनाची नाती (?).....

" जोडते मनाची नाती " असं हवंय >>> धन्यवाद!

Proud काहीच्या काही वाटायचं मला!

अरे लोक्स बाजपेयी सरकारच्या राज्यात खेड्यापाड्यात साक्षरता अभियान राबवताना त्यांनी एक गाण केल होत. आहे का लक्षात?

सवेरे सवेरे$$$$ यारोंसे मिलने बनठन के निकले हम
रोके से ना रुके हम मर्जीसे चले हम, बादलसा गरजे हम
सावन सा बरसे हम सुरज सा चमके हम स्कुल चले हम

बहुतेक याच्या पुढे पण आहे काहीतरी मला आठवत नाहीये. असल्यास लिहा.

जिन्दगी तूफान है, जहाँ है डक्टेल्स,
गाडियाँ, लेजर, हवई-जहाज, ये है डक्टेल्स..
रहस्यें सुलझाओ, इतिहास बनाओ.. डक्टेल्स उ उ उ ..
पुढे काय आहे?

डक्टेल्सच्या नंतर अलादिन लागायचं....

अरेबियन नाइट्स, अरब का ये देस,
अलग शोहरत, रंगी है बहुत, इसका हर एक खेल (चु.भू.द्या.घ्या.)

त्यातल्या जिनीचा आणि पोपटचा आवाज मस्त होता! Happy

डोरेमॉन सपंल्या वर लागणारं शीर्षक गीत.
जीने का सही ढंग,सीखे हम इसके संग,
सारे जमाने जाने पहचाने,ये है डोरेमॉन
चेहरों पर सभी के लेके हसी ये आये,
सबकी जिंदगी ये सवारे,ये है डोरेमॉन,
चाहे बच्चे या बडे,सबका ये दुलारा है,
है बडा ही प्यारा डोरेमॉन,
डोरेमॉन,डोरेमॉन,डोरेमॉन,डोरेमॉन,
है बडा प्यारा,दोस्त हमारा डोरेमॉन,
डोरेमॉन,डोरेमॉन,डोरेमॉन,डोरेमॉन,
ल्ला ल्ला ल्ला ल्ला ल्ला ल्ला ल्ला डोरेमॉन.:)

घडलंय बिघडलंय-----
मला पुर्न येत नाहि....पन एक कडव आथ्वताय.....
जाम हसु यायच......

थोरलि पोटुशि,,मधलि पोटुशि.
मावशि पोटुशि.,माय पोटुशि.
आजि पोटुशि.,पनजि पोटुशि.
घरदार बेभान वाधलय.....
घडलंय बिघडलंय
घडलंय बिघडलंय
हु हा...हु हा...हु हा....

सा रे गा मा पा धा नी सा ... सा नी धा पा मा ग रे सा
ये हे टर्रम टुर भैया ये हे टर्रम टुर
टर्रम टुर टर्रम टुर टर्रम टुर

कोणाला हे येते का?

दार उघड बये दार उघड

होम मिनिस्टर
होम मिनिस्टर
पाणी गेले वाटते..

शाळे ला उशीर होतोय..........

अय्या कुणीच कस टाकलं नाही हे गाण??
मला वाटलं एकाने तरी टाकलं असेल
(कस काय कुणास ठाऊक Uhoh )

घेऊन येशी कोवळे
ऋतु सुगंधी सात हे
नवीन भाषा कोणती
नजर काही बोलते
सार्‍या सरी या माझ्याच पाशी
चिंब तु होईना
माझिया प्रियाला प्रित कळेना
नविन का रे चंद्र नवा हा?
नविन आहे ऋतु नवासा
अनोळखी हा बहर घेऊन पुन्हा पुन्हा भेट ना
माझिया प्रियाला प्रित कळेनाSSSSSSSSSSSSS!

आजही माझी रींगटोन हीच आहे Happy

आणि कुणाला दुरदर्शन वरच्या महारथी कर्ण च टायटलसाँग आठवतय का?

दिव्य तेज.....है
परम शक्तीमान है
महारथी कर्ण तो महानोंसे महान है

अस काहीस होत

आणि शक्तीमान
अद्भूत अगम्य चाहत की परिभाषा है
ये मिटती मानवता की आशा है
ये आत्मशक्ती है
दुनिया बदल सकती है
_____________
_____________
होता है जब आदमी को खुदका ग्यान
केहलाये वो
शक्तीमान
Happy

आणि बॉब द बिल्डर

बॉब द बिल्डर करके दिखाएंगे
बॉब द बिल्डर हा भाई हा
स्कुप मग ऑर रॉली देझी क साथ
लॉक्टी और वेन्डी ने बढाया हाथ
बॉब और साथी मस्ती मे मगन
मिलजुलके करते है सब काम खतम
बॉब द बिल्डर करके दिखाएंगे
बॉब द बिल्डर हा भाई हा

निंबे खुप आठवायला लागलीत ग
Sad
आता काय करु?

कुणी हे टाकलंय का "भारत एक खोज"चं

सृष्टी से पहले सत्य नहीं था असत्य भी नही....

पुढचं सलग आठवत नाहीये....पण हे ऐकलं तर लिहिता येईल...

http://www.youtube.com/watch?v=vBbSbCczYeM

कीती ज्वलंत धागा आहे हा सध्या .. Wink

झिंग चिका झिंग चिका झिंगा
सुख घाली माझ्या दारी पिंगा ...
अगंणात बहरली माझ्या दारी माझी वेल
धुंद करी गंध तिचा जीवाची ही घालमेल
कशासाठी कुणीतरी सांगा
सुख घाली माझ्या दारी पिंगा ...

मस्त्च Lol

Pages