कैरी कांदा लोणचे

Submitted by Adm on 14 March, 2009 - 11:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मध्यम आकाराच्या कैर्‍या,
२ मध्यम आकाराचे कांदे,
१ चमचा तिखट,
१ लहान वाटी गुळ
चवी प्रमाणे मिठ

क्रमवार पाककृती: 

पार्ल्याक्वांच्या आग्रहामुळे आईला विचारून ही पाककृती यो.जा.टा. आहे. Happy
१. कैर्‍या आणि कांदे सालं काढून किसुन घ्यावे.
२. गुळ आणि दोन्हीचा कीस एका भांड्यात घालून ठेवून द्यावा.
३. थोड्यावेळाने गुळ विरघळून त्याला भरपूर पाणी सुटतं.
४. नंतर त्यात लाल तिखट आणि मीठ घालून नीट ढवळून घ्यावं.
लगेच खाललं तरी चालतं किंवा रात्रभर ठेवून दिलं की चांगल मुरतं.

वाढणी/प्रमाण: 
एक वाडगा भरून होतं
अधिक टिपा: 

१. तिखटाचा रंग एकदम लाल असला तर लोणच्याला मस्त रंग येतो.
२. हे लोणचं एकदम रसरशीत आणि आंबट-गोड लागतं, तिखटामुळे चांगली चव येते. शेवटी शेवटी सगळा रस संपून जातो आणि किंचित ओलसर चोथा उरतो. हा चोथा आमटीत घातला की आमटीला छान स्वाद येतो.
३. फ्रिज मधे १५ दिवस टिकतं. पण तेव्हडे दिवस उरतच नाही. Happy
४. मार्च एप्रिल मधल्या पहिल्या हंगामच्या ताज्या आणि कोवळ्या कैर्‍या वापरून केल्या तर एकदम मस्त चव येते.

माहितीचा स्रोत: 
आज्जी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>या कैरी-कांदा लोणच्यात कांदा अवश्य घालावा
हो ना, नाहीतर कसलं ते 'कैरी-कांदा' लोणचं!

>>>> ROFL lol

यात गूळाएवजी साखर घातली तर कशी लागेल? चव व रन्ग तशीच येणार नाही हे नक्कीच पण खाणेबल होईल का? माझ्याईथे गूळ मिळत नाही....
srk फोटो सह्हीच..
बाकी ते तक्कु पण मस्त लागते...आम्ही त्याला तोक म्हणतो...तेही टिकवायची वगैरे कधी वेळच याय्ची नाही....त्याआधीच गट्टम्म!!
फुलराणी.

मी करुन पाहिली हे लोणचे, दोन बदल केले, कैरी-कान्दा, मीट-तिखट-ब्राउन शुगर लावुन ठेवले जरा वेळ, मग मिक्सर मध्ये फिरवुन घेतले पाणी अजिबात न घालता. मस्त झाले होते. पिवळा कान्दा घातला की छान चव येत नाही, मग लाल कान्दा घालुन पुन्हा केली. लाल कान्द्याने रन्गही खूप छान आला.

Pages