निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
ती बहुतेक बूचाची फूले आहेत.
ती बहुतेक बूचाची फूले आहेत. साधारण निशिगंधासारखी दिसतात ती पाच पाकळ्यांची पण त्यापैकी एक जोडपाकळी. सकाळी झाडाखाली सडा पण पडत असणार.>>>>>
कुणी आमची आठवण काढली????

आम्ही बुचाची फुले
मग कुंतीची असतील. आता फोटो बघितल्याशिवाय चैन नाही पडणार !>>>>आणि मी कुंती
बुचाची फुले खास साधनासाठी, थेट गोकाकहुन
दिनेशदा, आत्ताच मी वर तुम्ही
दिनेशदा, आत्ताच मी वर तुम्ही दिलेल्या (१६ नंबरवरच्या) लिंकवरचा लेख वाचून काढला. आणि माझे मन ३० वर्षे मागे गेले. काही काही तर मी शब्दसुद्धा विसररून गेले होते. ह्या धकाधकीच्या जीवनात आपण नक्की काय कमावतो आणि काय गमावतो हेच समजेनासे झालेय. साधना म्हणते त्याप्रमाणे कधीतरी वाटते की, खरंच आता बास झाले , ह्यापुढे मस्त निसर्गाच्या सान्निध्यात मस्त रमावे. परत एकदा ते लहानपण अनुभवावे.......................
ह्या रम्य विश्वात फिरवून आणल्याबद्द्ल धन्यवाद.
बुचाचे झाड नी कुंती/कामिनी -
बुचाचे झाड नी कुंती/कामिनी - दोन्ही माझी आवडती आहेत. दोन्ही झाडांकडे माझे लक्ष गेले ते त्यांचा वासामुळे. पार्ल्याला कॉलेजच्या रस्त्यावर एका संध्याकाळी मोहक धुंद सुवासाची प्रचंड मोठी लाट अंगावर आदळली. वास कुठुन येतोय ते पाहते तोच समोर कुंतीचा वृक्ष दिसला. एवढा मोठा कुंतीचा वृक्ष मी पहिला नी शेवटचा तिथे पाहिला. त्यानंतर केवळ झुडपे पाहिलीत. माझ्याकडे कुंडीत होती.
बुचाचे झाड हे नाव लहानपणापासुन ऐकलेले. बाटल्यांची बुचे झाडाला लागतात तर मग मापाप्रमाणे बुचे तोडतात की बुचे तोडल्यावर त्या मापाच्या बाटल्या बनवतात हा प्रश्न कायम मनात घोळायचा
एकदा सोलापुरला गाडीतुन फिरायला जाताना मंद सुगंध आला. जागा लक्षात ठेऊन येताना पाहिले. पण झाड कसले ते मात्र ओळखता आले नाही. नेटवर शोधाशोध केल्यावर इंडियन कॉर्क ट्री हे नाव आढळले. एवढ्या सुंदर फुलाला आणि ती फुले मिरवणा-या उंच, शिडशिडीत, कायम उंची, झुळझुळीत खटाव साड्या नेसणा-या तरुणीप्रमाणे दिसणा-या या सदाहरीत झाडाला बुच हे नाव कुठल्या इडीयटाने ठेवले असावे असा प्रश्न पडला.
जिप्स्या धन्यवाद... पर इतनेही फुलोंसे हमारा क्याहोगा?? पुर्ण झाड हवे
मला गेले दोन तीन दिवस माबोवर
मला गेले दोन तीन दिवस माबोवर यायला जमले नाही तर नि.ग.वाल्यांनी सगळ्या गप्पा मारून घेतल्या. किती वेळ वाचतेय तरी संपतच नाहीत. आणि ते पूर्ण वाचल्याशिवाय मी थांबू शकत नाही. आता सर्व वाचून झाले. खूप मजा आली.
शशांकजी, तुम्ही गरवारे कॉलेजमधे होता ? मी सुद्धा पण कॉमर्सची विद्दार्थिनी !
जिप्सी, बुचाचे आणि
जिप्सी, बुचाचे आणि कुंती/कामिनीचे फोटो मस्त!!!!
मागच्या आठवड्यात आम्हीपण कोकणात गेलो होतो. कुंभार्ली घाट उतरल्यावर चिपळूणच्या रस्त्यावर उजवीकडे आणि नंतर चिपळूण सोडल्यावर रत्नागिरीच्या वाटेवर हा दिसला......... टेटू.... याच्या शेंगा हत्तीच्या सुळ्यांसारख्या दिसतात.
कोकणात रिठा खूप बघायला मिळाला..........
हा भरभरून फुललेला किंजळ..............
आणि वेड्यावाकड्या शेंगा असलेली ही ऑस्ट्रेलियन बाभूळ.........
अप्रतिम हिरवाईने नटलेलं कोकण कुणीच विसरू शकणार नाही............
आंबोलीत काढलेले काही फोटो -
आंबोलीत काढलेले काही फोटो - फुले किती लहान आहेत ती पाहा -
साधना फोटो सुंदर...........
साधना फोटो सुंदर........... ही फुलं आम्ही पण कोकणात सगळीकडे बघितली. २ आणि ३ नं च्या फुलांना किलवर म्हणतात ना? त्या फुलाची पानांसकट रचना फारच सुंदर दिसते. चक्राकार मांडणी असते नाही?
रोझहिप्स.
रोझहिप्स.
साधना - एवढ्या सुंदर फुलाला
साधना - एवढ्या सुंदर फुलाला आणि ती फुले मिरवणा-या उंच, शिडशिडीत, कायम उंची, झुळझुळीत खटाव साड्या नेसणा-या तरुणीप्रमाणे दिसणा-या या सदाहरीत झाडाला बुच हे नाव कुठल्या इडीयटाने ठेवले असावे असा प्रश्न पडला.>>> याला "आकाशमोगरा" असेही नाव आहे - हे नाव आवडले तर हे लक्षात ठेव:)

बाकी तू काढलेले सर्व फोटो एकदम सुंदरच............
प्रज्ञा१२३ - हो मी आबासाहेब गरवारेचा विद्यार्थी -१९७७-८३ (सूक्ष्मजीवशास्त्र..... उगाचच व्हाईट एप्रन घालून शायनिंग करणारे....):स्मित:
"आकाशमोगरा" सुरेख आणि समर्पक
"आकाशमोगरा" सुरेख आणि समर्पक नाव. धन्स शशांक
साधना, सगळेच फोटो भन्नाट आले
साधना, सगळेच फोटो भन्नाट आले आहेत.
आज तर फुलांची मेजवानीच आहे
आज तर फुलांची मेजवानीच आहे इथे.
फुले आणि बायका, हि चर्चा थोडी पुढे नेतो.
आपल्याकडे केसात फुले माळायची पद्धत आता शहरात तरी खुप मागे पडलीय. पण कोकणात खास करुन गोव्यात ती अजूनही आहे.
कोकण सोडून वर पठारावर आले तर केसात फुले माळणे हे तितकेसे समाजमान्य नाही. देवावरची फुले केसात माळली जातात किंवा हळदीकुंकू सारख्या प्रसंगी. केवळ हौस म्हणून नाहीच.
दक्षिणेकडच्या चारही राज्यात त्याला समाजमान्यता आहे, पण उत्तरेकडे काय ?
पंजाब, हरयाना सोडाच गुजराथ राजस्थानमधेही ती पद्धत नाही. उत्तरप्रदेशात पण तिला फारसा सामाजिक दर्जा नाही. गजरा वगैरे हे कायम तवायफ. कोठेवाली यांच्याच संदर्भात. बंगाली स्त्रियांचे केस लांबसडक असले तरी केसात फुले माळताना कुणी दिसत नाही. बिहारमधेही नाही.
ओरिसा, मणीपूर मधे थोडीफार प्रथा आहे.
भारताबाहेर माझ्या बघण्यात श्रीलंका, थायलंड, फिलिपीन्स, बाली मधे ती प्रथा दिसली. मलेशियात थोडीफार.
मुस्लीम समाजात बायकांनी केस झाकणेच अपेक्षित असल्याने केसात फुले ती काय माळणार ? त्यामुळे गल्फ मधे ती प्रथा नाहीच. पण ते लोक सुगंधाचे भोक्ते. अंगावर भरपूर अत्तर शिंपडलेले असते. पुरुषांच्या पेहरावात गळ्याजवळ एक गोडा असतो, तो अत्तरात बुडवलेला असतो. त्यांच्या कपड्यातही फुलांची नक्षी आढळते.
पण आफ्रिकेत मात्र केसात फुले माळायची पद्धत नाही. एक तर त्यांचे केस अतिकुरळे असतात आणि काही धार्मिक बंधने असतीलही.
त्यांच्या कपड्यावरच्या डिझाईन्स मधेही फुले नसतात. चित्रात असली तरी शिल्पात नसतात. पारंपारीक नृत्यांच्या पेहरावात सजावत पक्ष्यांच्या पिसांची असते.
पण त्यांना फुलांची आवड नाही असे नाही. घराभोवती जितक्या आवडीने पालेभाज्या लावतात तितक्याच आवडीने फुलझाडेही असतात, शिवाय झाडांना त्यांच्या भावजीवनात मोठे स्थान आहे. बाओबाब सारखी झाडे त्याना पूजनीय आहेत. दुखवट्याच्या प्रसंगी हातात, गाडीवर कुठल्याही झाडाची फांदी ठेवणे आवश्यक असते.
खेळात, स्पर्धेत यश मिळाले तर आनंद साजरा करण्यापुर्वी झाडाला (किंवा जमिनीला) हात लावणे अनिवार्य असते, त्यामूळे यशाचा गर्व होत नाही, असा त्यांचा समज आहे...
आणखी सूचले तर लिहीनच.
मी काहीतरी वाचत असताना
मी काहीतरी वाचत असताना मुस्लिम समाजात फुले पक्षी इ. निसर्गचित्रे काढलेली चालत नाही असे वाचलेले. बहुतेक गालिच्यांबद्दल वाचतानाच.. गालिच्यांबद्दलच्या खास टिप्समध्ये 'फुले पक्षी इ. असलेले गालिचे खास टुरिस्ट लोकांसाठीच बनवलेले असतात, त्यांच्या किंमतीही तशाच अव्वाच्यासवा असतात पण दर्जा मात्र तितका खास नसतो. मुस्लिम धर्मात असले फुलवाले काहीच चालत नसल्याने ते लोक हे गालिचे विकत घेत नाहीत.' हे वाचलेले आठवतेय.
फोटोंबद्दल धन्यवाद मंडळी.
आकाशमोगरा हे नाव अगदी समर्पक आहे.
वा आज तर फुले व गुलाबाच्या
वा आज तर फुले व गुलाबाच्या फळाने बहार आली. मस्त
साधना, 'आकाशमोगरा' विषयीच
साधना, 'आकाशमोगरा' विषयीच लिहायला आले होते इथे ... शशांकनी हे सुंदर नाव सांगितलंच आहे ... शिवाय 'आकाशवृक्ष' पण ऐकलंय. कन्नडमध्ये याला `आकाशमल्लिगे' म्हणतात. 'मल्लिगे' म्हणजे कन्नडमध्ये मोगरा.
दिनेशदा, गुलाबाला फळं आली
दिनेशदा, गुलाबाला फळं आली म्हणजे फुलं कमी होतात ना?
मस्त फुले. मला ते आकाशमोगरा
मस्त फुले. मला ते आकाशमोगरा नाव आठवतच नव्हते. सारखे आकाशनीमच वाटत होते . धन्यवाद शशांक नावाबद्दल. बाकी गुलाब आणि कोकणातील फुले नेहमीप्रमाणेच मस्त.
नाही, गौरी तसे काही इथे
नाही, गौरी तसे काही इथे होताना दिसत नाही.
मी आल्प्स मधे अनेक ठिकाणी आपोआप उगवलेले गुलाब बघितले आहेत. त्यांचा प्रसार अशा बियांपासूनच झाला असेल. हे फळ तसे गोड लागत नाही. यात खाण्याजोगा भाग कमीच असतो. आत पेरुसारख्या बिया असतात.
बहुतेक पक्षी या बियांचा प्रसार करत असावेत.
इथे हि झाडे कशी उगवली असतील याची कल्पना नाही. कारण फळे झाडावर तशीच असतात. पक्षी खाताना दिसत नाहीत. शिवाय हि झाडे शहरात अगदी कुठेही उगवलेली दिसत असली तरी शहराबाहेर दिसली नाहीत.
बूच म्हणजे खरे तर इंडियन कॉर्क ट्री चे भाषांतर आहे. त्याचे खोड खरेच बाटलीची बूचे करण्यासाठी वापरत असावेत.
साधना, आंबोलीतले फुलांचे फोटो
साधना, आंबोलीतले फुलांचे फोटो मस्तच. यातली काही यंदा कासला भेटली होती. त्यापैकी जमेल तेवढ्या फुलांची नावं शोधायचा उद्योग केला होता:
https://picasaweb.google.com/114312740079059994228/Kaas?authkey=Gv1sRgCO...
दिनेशदा, फक्त शहरात दिसतात
दिनेशदा, फक्त शहरात दिसतात म्हणजे मुद्दाम लावलेली असावीत का?
बहुतेक मुद्दाम लावलेलीच
बहुतेक मुद्दाम लावलेलीच असावीत, पण ती खुपदा रस्त्याच्या कडेला वगैरे दिसतात. कदाचित फेकून दिलेल्या फांद्याही रुजल्या असाव्यात.
गुलाबाची फळे मीही
गुलाबाची फळे मीही पाहिलीत.
टेटु नी किंजळ पहिल्यांदा पाहिला
गौरी - कासचे फुलांचे सर्व
गौरी - कासचे फुलांचे सर्व फोटो अप्रतिम..... नावं आहेत त्यामुळेही लक्षात ठेवायला चांगले आहे.....मनापासून धन्स.......
दिनेशदा, एका माश्याचा इतका
दिनेशदा,

एका माश्याचा इतका सुक्ष्म अभ्यास कुणी करु शकतं,हे वाचुन (थक्क) छान वाटलं, नविन माहिती मिळाली.
मानुषी,शांकली,जिप्सी,साधना,

तुम्ही (आणि इतरांनी देखील) टाकलेल्या अशा नवनविन,सुंदर फोटो आणि त्याबद्दलच्या भन्नाट माहितीमुळे आमचे पाय इकडे आपसुकच वळतात..
अनिल मी नाही रे, अटेंबरो
अनिल मी नाही रे, अटेंबरो साहेबांचा अभ्यास... मि फक्त ते बघितले.
गौरी, मस्त फोटो.
बुझ मेरा क्या नाम रे....
बुझ मेरा क्या नाम रे....

आणि १
आणि १

साधना, दिनेशदा, जिप्सी,
साधना, दिनेशदा, जिप्सी, स्निग्धा, शांकली, सर्वाना फोटोसाठी आणि माहितीसाठी धन्यवाद.
साधना म्हणते त्याप्रमाणे कधीतरी वाटते की, खरंच आता बास झाले , ह्यापुढे मस्त निसर्गाच्या सान्निध्यात मस्त रमावे. परत एकदा ते लहानपण अनुभवावे.......................>>>>>चल जायच का? तू फक्त हो म्हण.
य़ोगेश, तुला न विचारताच मी गुलाबाच फुल ढापलं रे. आता सांगते. हाकानाका
स्निग्धा, २ नंबरचा फोटो -
स्निग्धा, २ नंबरचा फोटो - याला आम्ही हळद- कुंकू म्हणायचो.
http://www.flowersofindia.in/catalog/slides/Scarlet%20Milkweed.html
इथे पहा.
स्निग्धा तो पांढर्या फुलांचा
स्निग्धा तो पांढर्या फुलांचा गुच्छ सँम्बुकसचा असावा असे वाटतेय. याला बाराही महिने असे गुच्छ असतात; आणि पाने निर्गुडीसारखी असतात.
Pages