निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना, किती गोष्टी नव्याने शोधायच्या / अनुभवायच्या आहेत .. ती चव इतर कुणाला खास आवडणार हि नाही कदाचित, कारण त्याला जो आपल्या आठवांचा स्वाद असतो, तो काय कुणाला सांगून समजणार आहे ?

जो ती रानकेळी खातात, गोड पण पिठूळ लागतात. आत मोठ्या बिया असतात. पण सहसा ती कड्यावर वगैरे उगवतात, त्यामूळे माकडे, पक्षी यांनाच ती लाभतात सहसा.
याच्या केळफूलाची भाजी होतेच, शिवाय पाने मजबूत असल्याने पावसापासून संरक्षण करता येते.

दिनेशदांनी मागे लिहील होत रानकेळ्यांबद्दल.

खर सांगायच तर हवे तसे फोटो काढायला नाही मिळाले मला. डोंगरातून जाताना इथे उतराव आणि सरळ चालत चालत फोटो काढावेत असे विचार मनात येत होते. पण वेळ अपुरा होता.

असे अनुभव मला काही घाटात आलेत. एक म्हणजे तिलारी, दुसरा अनमोड आणि तिसरा चोर्ला.

हे तिन्ही घाट डोंगरात असल्याने, आजूबाजूला वस्ती, गाव दिसत नाही. (याउलट करुळ, खोपोली घाटातून कसे खालचे गाव दिसत राहते) इथे असे अनेकदा वाटायचे कि इथे उतरुन चालत जावे. त्यापैकी चोर्ला घाटात आम्ही तसे केलेही, पण अनमोड आणि तिलारी राहिलाच. अनमोड मधे फारच दाट जंगल आहे, आणि तिलारी तसाही धोकादायक आहे. विमा कंपन्याही त्याही हमी देत नाहीत.

पण चोर्ला घाटात आता टिपीकल धबधब्यातला अचकट विचकट नाच सुरु असतो. हे तिन्ही घाट कोल्हापूर्-गोवा मार्गावर आहेत (एकमेकांना पर्याय म्हणून) फोंडा घाट मात्र लहानपणापासून भिती दाखवत आलाय. सहसा तिथे एस टी गाड्या थांबवत नाहीत, सुसाट पळवत नेतात. आता काही थांबे आहेत. दुसरे म्हणजे त्या घाटात जिथे कोल्हापूर विभागाची हद्द संपते, तिथून खोल दरीतले तळकोकणाचे विराट दृष्य, छातीत धडकी भरवते. लहानपणी तर मी त्या जागी डोळे बंदच करायचो.

फोंडा घाट मात्र लहानपणापासून भिती दाखवत आलाय. << खरंय दिनेशजी , आत्ता पर्यंत जेव्हा त्या भागात गेलो तेव्हा तेव्हा तो रस्ता टाळला तो केवळ ऐकिव माहितीवर

मलाही आंबोलीच्या टोकावर पोहोचल्यावर भिती वाटली. खाली पाहवतच नव्हते. शिवाय मध्ये मध्ये दरडी कोसळल्याची चिन्हही होती.

सचिन,
एस टी चे ड्रायव्हर सांगतात तिथे, रानगवे बेधडकपणे भर रस्त्यावर उभे ठाकत असत.
रात्रीच्या वेळी ससे, अजगर, पांढर्‍या बाया (?!!!) असत.
त्यामूळे रातराणी एस्टीसाठी खास धाडसी चालक लागत. पण पुर्वी कोल्हापूरातून कोकणात जायला तोच घाट वापरात होता. करुळ घाट नंतर सुरु झाला. आता तर तोच जास्त वापरात आहे.

बाय द वे, मी परत एकदा आठवण करुन देतो कोल्हापूर गोवा मार्गावर सात पर्यायी घाट आहेत.

फोंडा, करुळ (गगनबावडा), भुईबावडा, चोर्ला, अंबोली, अनमोड आणि तिलारी.. सर्व घाटातून रहदारी चालू असते. अगदी अनुभव घ्यावाच असे हे घाट आहेत.

सचिन,
तिलारी च्या पायथ्याशीच धरण आहे, पण ते घाटातून दिसत नाही. (कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज, चंदगड. तिलारी -- गोवा)
आणि चोर्ला घाट, हणजुणे धरणाला वेढून वर जातो, त्याचा जलाशय मात्र दिसत राहतो. त्या घाटाने बेळगावात जाता येते. दोन्ही घाट आवर्जून भेट देण्यासारखे आहेत.

तिलारी घाटात मी दुर्मिळ सोनेरी सोनटक्का बघितला तर चोर्ला घाटात दुर्मिळ असा पिवळा करमळ, बघितला होता. चोर्ला घाटात प्रस्तरारोहणाच्या पण जागा आहेत. तिथे काहि हौशी गट प्रॅक्टीस करत असतात. कर्नाटक परिवहनाच्या बसेस त्या घाटातून जातात.

जागु, फोटो पाहून खूप छान वाटले. तरीही कोकणातले कितिही फोटो पाहिले तरिही समाधानच होत नाही गं !

अरे वा, बरेच जण कोकण -दौरा करुन आलेले दिसतात .......... जागूने काढलेले फोटो एकदम भन्नाटच.........
मी व अंजू (शांकली) देखील ४ दिवस कोकणात गेलो होतो, फोटो टाकीनच यथावकाश्.....तोपर्यंत हा कोण ओळखा पाहू - (वरंधा घाटात दिसला पठ्ठ्या)......फारच देखणा पक्षी.....

bj1.JPG

काल रात्री आमचे येथे तुलसी विवाह झाला.
घरी वरकाम करणारा "शरद" रांगोळी फार सुंदर घालतो. त्याची चित्रकलाही फार छान आहे.

DSCN1130.JPGDSCN1131.JPGDSCN1132.JPGDSCN1134.JPGDSCN1136.JPG

पक्षी सुंदरच आहे.

मानुषी आमच्या इथलाही झाला तुलसी विवाह. रांगोळी छानच काढली आहे. मी तुळशी भोवती चुन्याची रांगोळी काढली होती थोडी.

काल आमच्या बाजूच्या कमळाच्या डबक्यात हा पक्षी मासे पकडायसाठी आला होता. माझी चाहूल लागताच भुरकन उडून लांब असलेल्या एका सुबाभुळीच्या झाडावर जाऊन बसला. बगळ्याच्या जातीतला आहे का हा ? मला फ्लेमिंगोसारखा वाटला. जवळून तर खुपच मोठा दिसत होता.

हा पक्षी कोणता मध्ये ह्या पक्ष्याने दर्शन दिलेय. तो बीबी काढा वर आता Happy

शशांकने टाकलेला रोलरच आहे. हा उडताना याचे पंख अगदी गर्द निळे दिसतात. सकाळची वेळ असेल तर नजर ठरणार नाही इतके चमकतात.

शशांकने टाकलेला रोलरच आहे.>> बरोब्बर -Indian roller / blue Jay / Coracias benghalensis फारच छान दिसतो हा - काल वरंधा घाटातून येताना दर्शन दिले याने - आम्ही गाडीत अगदी शांत बसलो होतो तेव्हा शशांकने फोटो काढले याचे.
जो_एस - सूर्य किरणे छान टिपलीस अगदी.
मानुषी - शरदची रांगोळी खूप म्हणजे खूपच आवडली - त्याला जरुर सांग.
जागू - हा फ्लेमिंगो नाहीये - स्टॉर्क फॅमिलीतला आहे - एशियन ओपनबिल असावा.

.

जागू, कालच ऑफिसला येताना , नदीतील एका झाडावर हे बरेच पक्षी बसले होते. कापसाचे बोळे झाडावर लावल्या सारखे वाटत होते. नीट पाहिल्यावर ते पक्षी आहेत ह लक्षात आलं.

अग ते बगळे असतील. ते एकाच झाडावर बरेच बसलेले असतात. माझ्या माहेरी घराच्या बाजूला चिंचेचे झाड आहे. पुर्वी ते झाड बगळ्यांनी भरलेल असायच. कधी कधी बिचारी छोटी पिल्लही खाली पडायची. आणि त्यांचा आवाजही यायचा दिवसभर. संध्याकाळ झाली की जास्तच.
मी लिहीलेल खोप्याच लेखन आणि प्रकाशचित्र पहा माबोवर.

हल्ली माझ्या घराच्या भोवताली पाणकोंबड्या फिरत असतात भरपूर. त्यांची पिल्लेही झाली आहेत छोटी. हल्ली खुप पक्षी येतात. फोटो टाकेनच थोड्या दिवसांत.

बाप रे...! किती गप्पा झाल्या आहेत...
दिनेशदा, माझ्या मावस बहिणीकडे बुलढाण्याला हनुमान फळ म्हणून एक झाड आहे, फळ वरुन सीताफळासारखे हिरवे पण सीताफळासारख्या गाठी त्यावर नसतात, तर आतला गर सीताफळ आणि रामफळ यांची कॉमन टेस्ट आहे..
तिलारी माझे खुप आवडते ठिकाण, संध्याकाळी याच रस्त्यावर भेकर आडवे आले होते, खुप घाबरलो होतो आम्ही.. सोनेरी सोनटक्का मी लोणावळ्यातही पाहीला आहे, त्याच बरोबर पांढरा सोनचाफा पण होता तिथे..
जागू, तू प्रचि. टाकलेला तो पक्षी आहे ना, मी त्यांना भांडकुदळ म्हणते, इतके वचावचा भांडतात, आपल्यालाही जुमानत नाहीत.. सगळेच प्रचि. सुरेख..
शोभाचे जपानी फळ पण मस्तच आहे.. शशांक कडून खुप माहीतीचा खजिना गोळा करायचाय..

सारीका, त्याला काटेफणस म्हणतात (गोव्यात) झाड लहानसेच असते पण फळ मात्र ओंजळीएवढे होते.

जागू, या कूळातले पक्षी तसे वेंधळट असतात. ते दोनतीन पिल्ले जन्माला घालतात खरे पण त्या सर्वांचे संगोपन करायची क्षमता नसते त्यांची. मग त्या पिल्लातले सर्वात मोठे आणि धटिंगण पिल्लूच, कमकुवत पिल्लाला खाली ढकलून देते. निसर्गाचा नियम..

या वर्गातला स्टोर्क पक्षी दिसतो का आपल्याकडे ? हा पक्षी उडताना एक खास आवाज काढतो. अगदी लहान बाळाच्या रडण्यासारखा. पश्चिमेकडे लहान बाळे, तोच घेऊन येतो असा समज आहे तो त्यामुळेच.
(आमच्याकडे खुप दिसतो.)

दिनेशदा, मी कोकणात फणसासारखे एक फळ पाहीले होते, एका मित्राने ते नीर फणस आहे सांगितले होते, फणसाच्या आकाराचेच छोटे फळ, पण झाड अंजीराच्या झाडासारखे वाटले, त्याची भाजी व काचर्‍या खुप मस्त होतात म्हणे.. ते झाड कुठे मिळेल का..?

Pages