निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
जिप्स्या, आलास का रे? लवकर
जिप्स्या, आलास का रे? लवकर फ़ोटो डकव.

जागू, तुझे कोकणातले फ़ोटो कुठे आहेत ग?
काय शोभा, जिप्स्याला नुसते
काय शोभा, जिप्स्याला नुसते फोटोबद्दलच विचारतेस ?
काय केलं, कुणा(कुणा)ला भेटला, काय खाल्लं वगैरे विचारायची पद्धत असते.
दिनेशदा.... तुम्ही मायदेशी
दिनेशदा.... तुम्ही मायदेशी येऊन रहा ना..... एक मस्त हॉटेल (कोकण ते नागपूर अशा साखळ्या असलेले) चालवा , त्यात असे नवनवीन (आणि जुनेदेखील) खाद्य व पेयपदार्थ (शिकवणीसहित) सुरु करा.... म्हणजे सर्व खवय्यांची चंगळ तसेच ज्या सुगृहिणी आहेत त्या अजून सुगरणी होतील, नवेनवे पदार्थ शिकतील.. ...
एकदा हे सर्व सेट झाले की मग आपण सर्व (निसर्गप्रेमी) निसर्गात फिरायला मोकळे (तुमच्यासोबत जंगल - समुद्रकिनारे, इ. पहाण्याची खुमारी औरच ).... खाण्यापिण्याची तुमच्या हॉटेल साखळीने सोय केलेलीच असणार.....उरलेला वेळ तुमच्यासोबत निसर्गसान्निध्यात म्हटल्यावर पार गर्दी लोटेल असा अनुभव घ्यायला (मा बो वरील नि ग ओस पडतील किंवा फक्त निसर्गाच्या गप्पा (खाद्यपदार्थासहित) असे नवीन संकेतस्थळ जन्माला येईल...)- जोडीला जिप्सीसारखे निष्णात प्रचिवाले.... - अजून कोणी कोणी संगीतप्रेमी भेटतीलच या यात्रेत - जमलेच तर रात्री ग्रह-तारे, आकाशगंगा यांचे निरीक्षण, चर्चा......
या सर्वा पुढे स्वर्ग स्वर्ग तो काय ... (कल्पना करायची तर - ती तरी उत्तुंगच करु या ना ! - प्रत्यक्षात आली तर... मी तर दोन्ही पायावर केव्हाही तयार......) कसे वाटते ???
बघा, लवकरात लवकर असे काही (किंवा याहूनही अजून काही सुंदर) करता आले तर....
शशांक, हजारो ख्वाईशे ऐसी...
शशांक, हजारो ख्वाईशे ऐसी... असे आहे खरे.
साधनाचा पायलट प्रॉजेक्ट कसा होतोय ते बघू या. मग आपण सगळ्यांनीच सुरु करु.
माझा चुलतभाऊ, मेहुणे, मामेभाऊ सगळेच हॉटेल व्यवसायात आहेत. त्यापैकी काहींना मी देखील काही मदत केलीच आहे.
पण आता कोकणातही पदार्थांचे सपाटीकरण झालेय. म्हणजे तेच झणझणीत पदार्थ आणि दारु. (मूळ मालवणीच काय कोल्हापुरी पदार्थही तिखटजाळ नसतात.) गणपतीपुळ्याला तर लोक नमस्कार केल्याकेल्या, तीर्थप्राशनासाठी जातात.
मी ज्या पदार्थांच्या आठवणी काढतो, ते आता घरातही क्वचित केले जातात.
माझ्या लहानपणी सहज मिळाणारी फळे आता मिळतही नाहीत.
पण मी आल्यावर एखादी सहल काढूच.
पण मी आल्यावर एखादी सहल
पण मी आल्यावर एखादी सहल काढूच.
कधी येताय????
breadfruit म्हणुन गुगल कर.
breadfruit म्हणुन गुगल कर. मिळेल. बाजारात फ्रेश नसतात. सौदेंडियन दुकानात काळपट पडलेली विकायला असतात.
शशांकची योजना ऐकुन... माझ्या
शशांकची योजना ऐकुन... माझ्या मनाला पंख फुटले
काय केलं, कुणा(कुणा)ला भेटला,
काय केलं, कुणा(कुणा)ला भेटला, काय खाल्लं वगैरे विचारायची पद्धत असते.>>>>दिनेशदा, तो ’छुपा रुस्तूम’ आहे सांगणार आहे का आपल्याला
शशांक तुम्हाला
शशांक तुम्हाला १००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००मोदक.
खरच अस झाल तर काय धम्माल येईल ना? दिनेशदा, तुम्ही हे घ्याच मनावर. (आमच्यासाठी तरी.)
परवाच्या सप्तपर्णीच्या
परवाच्या सप्तपर्णीच्या चर्चेवरुन सहज आठवले.
वनस्पतिंच्या बाबतीत ज्या अनेक अनोख्या गोष्टी आहेत त्यापैकी एक परागकण. झाड एकाच जागी मुळे रोवून आयुष्यभर जरी ऊभे रहात असले तरी त्याच्या दिमतीला अनेक पगारी नोकर असतात.
या नोकरांना दोन महत्वाची कामे करायची असतात, एक म्हणजे बीज प्रसाराचे आणि दुसरे परागवहनाचे.
झाडाला या नोकरांची सेवा घ्यावीच लागते आणि झाड त्यांना योग्य तो मोबदला देतेच. परागकण हि एक निसर्गाची अदभूत किमया आहे.
परागकण म्हणजे वनस्पतिक्षेत्रातले पुंबीज. निसर्गाच्या नियमाप्रमाणे स्त्रीबीजांच्या तूलनेत त्यांची संख्या कितीतरी पटीने अधिक असते.
साधारणपणे ज्या वनस्पतिंना फुले येतात त्यात पुंकेसरासारखा जो अवयव असतो, त्याच्या टोकाशी हे परागकण तयार केले जातात. यांचे आकारमान नॅनोमीटर मधे मोजावे लागते. (नॅनोमीटर म्हणजे मिलीमीटरचा दहा लाखावा भाग) ते असते साधारण २० ते २५० नॅनोमीटर. पण यांची संख्या असते कोट्यावधी.
आपण सुदैवी आहोत कारण युरप मधे असतात तशी एकाच प्रकारच्या झाडांची वने आपल्याकडे नाहीत. आपल्याकडच्या जंगलात झाडांची विविधता असते. (अपवाद अर्थातच कृत्रिम लागवड केलेल्या साग, निलगिरी, सुबाभूळ यांच्या वनांचा) पण जिथे अशी वने असतात तिथे या परागकणांचा जमिनीवर थर बसतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात ते तयार केले जातात.
तरीही हवेत धुलिकणांबरोबर परागकणही असतात. त्यापैकी बहुसंख्य वाया जातात. पण झाडाला मात्र
ते निर्माण करण्यासाठी अर्थातच काही खास खनिजे मिळवावी लागतात. ती जर मिळाली नाहीत तर अर्थातच फुले येऊच दिली जात नाहीत.
ज्या झाडात परागीवहन किटक, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि मानव ( हो मानव, कापसाच्या शेतीत ते हाताने करतात ) यांच्यामार्फत होते, त्यांच्यामधे अपेक्षित त्या, म्हणजे आपल्याच प्रजातीतल्या झाडांच्या फुलापर्यंत ते पोहोचवणे शक्य असते.
बहुसंख्य झाडांच्या बाबतीत, जिथे परागीभवन वार्यामार्फत होते त्यांचे काय ? एखादे झाड आपल्याला अपेक्षित तो परागकण कसा मिळवते ? किंवा शोधते ?
इथे अर्थातच लक बाय चान्स असा प्रकार असतो. म्हणजे अपेक्षित असाच परागकण फुलावर पडेल याची शक्यता अगदी कमी असते. पण अपेक्षित नसलेला परागकण पडल्यावर तो नाकारण्याची किंवा हवा तोच स्वीकारण्याची मात्र चोख व्यवस्था असते.
प्रत्येक परागकण हा वेगळ्या असतो. त्याचा आकार खुपच क्लिष्ट असतो. आणि जिथे तो पडावा अशी अपेक्षा असते, तिथल्या स्त्रीकेसरांची रचना फक्त तोच परागकण चपखल बसेल अशी असते. जवळ जवळ कुलुप किल्ली अशी व्यवस्था असते म्हणा ना !
तो आल्यावरच पुढची म्हणजेच बीजनिर्मीतीची प्रक्रिया सुरु होते.
हा परागकण इतका सूक्ष्म असला तरी त्याची रचना मात्र मजबूत असते. म्हणजे तो परागीभवन जरी करु शकला नाही, तरी तो हवामानामुळे सहसा लवकर विघटीत होत नाही. अनेक वर्षांनी त्याची ओळख पटू शकेल, इतपत त्याचे बाह्यरुप शाबूत राहते. समजा एखाद्या जागी आपण खणत गेलो, तर त्या मातीच्या थरात ज्या झाडांचे परागकण सापडतील, त्यावरुन तो थर ज्याकाळात तयार झाला असेल, त्या काळात तिथे कुठल्या वनस्पति होत्या, याचे अनुमान काढता येते.
याचे आपल्या परिचयाचे उदाहरण म्हणजे मध. बाजारात मध घेताना तो कारवीचा, जांभळाचा असे लेबल लावलेला मिळतो. मधमाशीने नेमक्या त्याच फुलातून मधाचा कच्चा माल, म्हणजे साखरपाणी जमा केलेय याची खात्री, मधात असणारे परागकण तपासून करता येते. अर्थात मधमाशी एकाच प्रकारच्या फुलातून साखरपाणी घेते असे नाही, पण ज्या प्रकारचे परागकण जास्त, त्यावरुन हे ठरते.
दिनेशदा छान माहीती. लिंक मधली
दिनेशदा छान माहीती. लिंक मधली फळे पाहीली. बहुतेक ती आमच्याकडे येतात विकायला. आता आली की घेईन आणि पाककृ करुन बघेन. ते शशांकने हॉटेलच सांगितलेल मनावर घ्या.
शशांक, २००% अनुमोदन... भन्नाट
शशांक, २००% अनुमोदन... भन्नाट कल्पना खुप आवडली... चला दिनेशदा आता लवकर मनावर घ्या पाहू..

दिनेशदा, तुम्ही लिहीलेली सगळी माहीती माझ्या अहोंना वाचायला देते.
वा दिनेशदा - काय सुंदर /
वा दिनेशदा - काय सुंदर / सोप्या पद्धतीने तुम्ही हा - परागीवहनाचा विषय मांडलात.... "कुठलाही विषय अतिशय सोप्या पद्धतीने उलगडून सांगणे फार अवघड काम असते" या उक्तिचा अनुभव आला.
यावरुन आठवण झाली माझ्या महाविद्यालयीन काळातली (- १९७८-८३ -गरवारे महाविद्यालय) - डॉ. मिलिंद वाटवे सर यांची (सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक). सध्या ते आय. आय. एस. ई. आर. या पुण्यातील नामवंत संस्थेत कार्यरत आहेत.
इकॉलॉजी हा विषय शिकवताना - भक्ष्य / अन्न / निश यासंबंधात त्यांनी तैत्तिरीय उपनिषदातील ही ऋचा उधृत केली होती - अन्नाद् भूतानि जायन्ते । जातान्यन्नेन वर्धन्ते ।
अद्यतेऽत्ति च भूतानि । तस्मादन्नं तदुच्यत इति ।
"अन्नापासून भूते उत्पन्न होतात, उत्पन्न झालेली अन्नाने वाढतात. भूतांकडून खाल्ले जाते आणि भूतांना खाते, म्हणून त्याला "अन्न" म्हणतात" हे त्यांनी अशा सोप्या, सुंदर पद्धतीने विशद केले होते की अजून मला ते आठवते.
सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक या व्यतिरिक्त उपनिषदे, भारतीय शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत (कै. गजाननराव वाटव्यांचे हे सुपुत्र), मराठी साहित्य (विशेषतः कविता), कीटक शास्त्र, पक्षीशास्त्र, अरण्यशास्त्र, सर्पशास्त्र, इ. असा विविध विषयांचा गाढा अभ्यास आहे. पुस्तकीय ज्ञान आहेच पण अरण्यशास्त्र म्हणजे मदुमलाई जंगलात २-३ वर्षे राहिले आहेत. अनेक पक्षी, कीटक, सर्प हाताळले आहेत. संगीतदिग्दर्शन, गायन, कवितावाचन, आकाशवाणीवर अरण्यवाचन असे कितीतरी......
या व्यक्तिमत्वाविषयी जेवढे सांगीन तेवढे कमीच....
सरांविषयी मला माहित असलेले असे थोडेच आहे - प्रत्यक्षात ते अनेक ज्ञान शाखांचे महर्षिच आहेत.
असेच थोडे थोडे लिहित राहीन त्यांच्याविषयी...
शशांक, आम्हा सगळ्यांना डॉ.
शशांक, आम्हा सगळ्यांना डॉ. वाटवे यांच्याबद्दल वाचायला आवडेल.
मी याबाबतीत स्वतःला भागय्वान समजतो. शाळेत आणि कॉलेजातही मला अत्यंत कुशल शिक्षक लाभले. त्यांचे व्याख्यान ऐकल्यावर परत पुस्तक वाचायचीही गरज नसे.
शशांक छान माहीती सरांची.
शशांक छान माहीती सरांची. त्यांचे लेखन वगैरे असेल तर तेही सांगा.
दिनेशदा मेल चा रिप्लाय नाही आला.
डॉ. मिलिंद वाटवे सर - १९७८-८३
डॉ. मिलिंद वाटवे सर - १९७८-८३ या काळात त्यावेळच्या एका नामवंत बॅडमिंटन स्पर्धेत सलग ३ वर्षे (माझ्या स्मरणात आहे त्यानुसार) चँपियन.
१९८५ -१९९२ - या काळात त्यांचे एक मित्र कै. डॉ. विवेक परांजपे यांच्या मदतीने "आपली सृष्टी आपले धन (३ खंड) -मराठीतील ज्ञानकोश" निर्मिती - त्याकाळात उत्कृष्ट छपाईसाठी सिंगापूरला हा ग्रंथ छापला गेला. यातील बहुतेक सर्व मजकूर सरांनी स्वतः अभ्यास करुन तयार केला (काही रेखांकनासकट) व फोटो - कै. डॉ. विवेक परांजपे यांनी काढलेले.
गुगल सर्च इंजिनवर milind watve टाकले की त्यांचा पूर्ण बायोडाटा मिळेलच. अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समधे त्यांनी केलेल्या विविध संशोधनाला प्रसिद्धी मिळालेली आहे.
अरे वा हे खंड सगळीकडे आहेत की
अरे वा हे खंड सगळीकडे आहेत की पुण्यातच मिळतील ?
सध्याच्या काळात गुगल साथीला
सध्याच्या काळात गुगल साथीला असल्याने कुठल्याही गोष्टीची माहिती (सचित्र) तत्काळ मिळू शकते पण १९८५-९० काळ लक्षात घेता "आपली सृष्टी आपले धन" याचे महत्व अगदी आगळेच. पुस्तकांच्या दुकानात हे खंड मिळतील का सरांकडेच - मी त्यांना विचारुन इथे लिहिन.
चालेल नक्की विचारा.
चालेल नक्की विचारा.
अलिबाग ला माझ्या शेजार्यांनी
अलिबाग ला माझ्या शेजार्यांनी कुंडीमधे कोरफड लावली आहे. कोरफडीला https://picasaweb.google.com/lh/photo/qGsj2U0l1O3b0v-kdBbYDkvDfzheDaZ-Cy... अशी फुलेही येतात हे मला ठाउकच नव्हतं
शशांक माझ्या आईकडे आहेत हे
शशांक माझ्या आईकडे आहेत हे खंड ... त्या काळात इतक्या उत्तम छपाईची, भरपूर छायाचित्रं असणारी मराठी पुस्तकं हे एवढं मोठ्ठं अप्रूप होतं ... आईबाबांनी मुद्दाम पुण्याला येऊन अगाऊ रक्कम भरली होती त्यासाठी!
दिनेशदा, ती सूचना मनावर घ्याच
सप्तपर्णीविषयी - मला नेमका श्लोक आठवत नाहीये, पण सप्तपर्णीचं कौतुक वाल्मीकी रामायणात आहे.
मागच्या आठवड्यात सोलापूर
मागच्या आठवड्यात सोलापूर रोडला यवतजवळ `चोरडिया फार्म' मध्ये रुईसारखं मोठं (तीन - चार मीटर उंचीचं) झाड बघितलं. फुलं रुईसारखीच, पण त्यात जांभळा रंग नव्हता, आणि मंद वास होता. हा फुलांचा फोटो.
https://picasaweb.google.com/lh/photo/D_HWEYMYTWg8-Nm9VS6j1D_jRAUQnM_yRG...
हे झाड मंदाराचं ना? तिथल्या बाईंना विचारलं तर त्यांनी `देवरुई' म्हणून नाव सांगितलं.
श्रीकांत इथे त्याला पिवळी
श्रीकांत इथे त्याला पिवळी फुले पण येतात. मीपण ती फूले भारताबाहेरच बघितली.
यातले अनेक प्रकार इथे दिसतात. नामीबियाच्या वाळवंटातील काही मोठी झाडे
पण याच कूळातली.
गौरी, तो मंदारच. गणपतिला वाहतात तो.
कात्रज घाटात साधारणपणे मार्च
कात्रज घाटात साधारणपणे मार्च एप्रिलमधे एक पिवळ्या फुलांचे झाड बहरते, कांचनच्या फुलांसारखी फुले वाटतात, पाने पुर्णपणे गळतात त्याची.. मी ते झाड फक्त कात्रज घाटातच पाहीलेय, नंतर त्याला चॉकलेटी रंगाची छोट्या बोळक्यांच्या आकारची फळे येतात.. ते कोणते झाड आहे..? माझ्याकडे फोटो नाहीत, पण कोणाला माहीती आहे का..?
सोनसावर असणार तो. पिवळा
सोनसावर असणार तो. पिवळा कांचनही असतो, पण त्याला शेंगा लागतात.
सारीका हि ती फुले
सारीका हि ती फुले का?
दिनेशदांनी वर सांगितलेली "सोनसावर"
सारिका, त्याला गणेर किंवा
सारिका, त्याला गणेर किंवा सोनसावर म्हणतात. (सुवर्णपुष्प गणेर!).. फार सुंदर फूल आहे ते! अगदी सुवर्णकांत!! राजेशाही आणि तितकंच दिमाखदार! आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला (घाट चढताना) निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ते किती सुंदर दिसतं म्हणून सांगू? तो अनुभवच घ्यावा! Cochlospermum religiosum हे त्याचं Botanical name आहे.
अर्रे मस्त! जिप्सी ने तर फोटो
अर्रे मस्त! जिप्सी ने तर फोटो पण टाकलेत!
शांकली, सोनसावरीच्या
शांकली, सोनसावरीच्या माहितीबद्दल धन्स
पुरंदरे शशांक >>> +
पुरंदरे शशांक >>> + १.
दिनेशदा यासाठी मदत हवी असल्यास सांगा. नक्की करु
Pages