निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारीका, त्याचे झाड मोठे असते. पानेही सर्वात मोठी असतात. मुंबईत आहेत हि झाडे. हि फळे साधारण दक्षिण भारतीय लोक राहतात तिथल्या बाजारात मिळतात. (माटुंगा, चेंबूर )
माझ्या बघण्यात एक झाड चुनाभट्टीला फाटका जवळ आहे.

हल्ली ब्राउन पंखांचे बगळेही बरेच आले आहेत.
पाण कोंबड्या माझ्या घराजवळही आहेत. त्यांच वैशिष्ठ्य म्हणजे त्या इतक्या प्रकारचे आवाज काढतात, आणि कधी कधी रात्रीही ओरडत असतात.

माझ्या पिवळ्या सोनटक्कयाला अजून फुल येत आहेत, नाहीतर फक्त श्रावणात येत असत

दिनेशदा असा पक्षी नाही पाहीला.

सारीका, दिनेशदा माझ्या माहेरी होता पुर्वी तो सोनेरी सोनटक्का. पिवळी अबोलीही होती. हल्ली पांढर्‍या सोनचाफ्याची कलमे भरपूर विकायला येतात.

जो-एस मला त्या पिवळ्या सोनटक्याची मुळी हवी आहे.

या वर्गातला स्टोर्क पक्षी दिसतो का आपल्याकडे

मी राणी बाग सोडुन इतरत्र पाहिला नाहीय पण आपल्याकडे याला ढोक म्हणतात. आणि याचा आकार पाहता याला पाहताच लोक याची शिकार करुन खायचा प्रयत्न जास्त करतात. Sad

४) वेळणेश्वरला हे पक्षी भरपूर होते. पण पोझच देत नव्हते. कोणते आहेत हे ? >>>>

रत्नागिरीत यांना केकेटी म्हणतात - हे तसे थव्यानेच रहातात, घरांभोवती कोंबड्यां बरोबर धाण्य आणि किडे टिपतात, आवाज जास्तच आसतो यांचा म्हणुनच कदाचीत केकेटी नाव पडल असाव Happy

पारवा - याला कवडा म्हणतात ( पुर्वी यांची शिकार होत असे Sad आता शिकारीच प्रमाण कमी झाल आहे.) हे एकटे किंवा जोडीने आढळतात.

माझ्याकडे एक छोट्या पानांचे बेलाचे झाड आहे, इतके दिवस कुंडीत होते पण मोठे झाल्याने ते काढुन जमीनीत लावले पण ते सुकत चाललेय..:(
मम्मी म्हणतात दुखावल्यामुळे असं होतय.. Sad
त्याला वाचवायला काय करू..?

अगं खुप ठिकाणी आहेत ही झाडे. पण ती आपोआप येत नाहीत, लावावी लागतात. तुला सोसायट्यांच्या आवारात दिसतील. नीरफणस नारळाएवढे, ओबडधोबड नी फणसासारखे काटेरी असतात. आपल्यात जास्त वापरत नाहीत. कर्नाटकात नी साऊथमध्ये वापरतात.

नमस्कार लोक्स Happy

एकुण १३५ नविन पोस्ट Proud सावकाश वाचेन Happy
उत्तर कन्नडा ट्रिप बोल्ले तो एकदम झक्कास Happy
फोटो आणि वृतांत ल व क र च .......... Happy

हा सोनटक्का दुर्मीळ आहे का? अनेक जण मागतात. मला आमच्या शेजारच्या काकांनी दिला. त्याना टाकायचा होता मुंग्या फार होतात म्हणून.
साधना पुदीन्याला कोवळ उन लागेल अस ठेव, मी कडक उन्हात ठेवला तेव्हा पानं फारच बारीक यायची

हो साधना अगदी जो-एक म्हणतात तसच. पुदिन्याला जास्त उन नको कोवळ उन मिळून नंतर सावलीत राहीला की मस्त जोमाने वाढतो. माझ्याकडे फोटो होता तसा आता शोधावा लागेल.

नीरफणस सगळ्या नर्सरीत उपलब्ध आहे. पण तो वृक्ष आहे हे लक्षात ठेऊन लाव.. उगीच कुंडीत लावून बिचा-याला गुदमरवण्यात मजा नाही Happy

माझा पुदिना सावलीत होता आधी तेव्हा मस्त घुसघुशित झाला होता. सगळ्या कुंड्यांबरोबर त्यालाही उचलुन मी उन्हात ठेवले. आता एकदम हाडकलाय बिचारा, आणि पानेही वरुन पांढरी पडायला लागली. मला तेव्हाच शक आला की साहेबांना उन जरा जास्त होतंय...

आता त्याला मस्त टांगत्या कुंडीत टांगते Happy उनही मिळेल आणि सावलीही..

सारीका, ते झाड खुप मोठे होते आणि सावलीही दाट असते. मोठ्या नर्सरी मधे मिळू शकेल. पण ते मोकळ्या जागेवरच लावावे लागेल.

गोव्यात, खुप मोठा विस्तार असलेली झाडे आहेत.

यालाच विलायती फणस किंवा ब्रेड फ्रुट ही म्हणतात. हे फळ भाजल्यावर पावासारखे लागते.

मोठी जागा असेल तर हा वृक्ष तिथे असणे नेत्रसुखद आहे. ह्याची जुन पाने अगदी गडद हिरवी होतात, कोवळी पाने फिक्या हिरव्या रंगाची असतात आणि बोनस म्हणुन पिवळे हिरवे कोंबही आलेले असतात. आणि असे हे हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांनी रंगलेले झाड सदाहरीत राहते. डोळ्यांना सुखद गारवा देते. मोठ्या पानांमुळे लक्षही वेधुन घेते. ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी नक्की लावा.

ह्याच्या भाजीपेक्षा ह्याच्या वांग्यासारख्या चकत्या कापुन त्याची भजी जास्त फेमस आहेत. माझ्या एका कारवारी मैत्रिणीच्या तोंडातुन पाणीच गळायला लागायचे याचे नाव घेताच. तिच्या घरातच मी पहिल्यांदा नीरफणस ऐकला. नीर हा शब्द तिकडचाच. आपल्याकडे विलायती फणस असेही गोड नाव आहे.

(नंदन कलबागांना मी मुद्दाम विचारलेले की हे विलायतेहुन आलेय का?? ते म्हणाले की आपल्याकडे काहीही वेगळे दिसले की त्याला विलायती म्हणायची पद्धत पडलीय... विलायती चिंच, विलायती फणस... Happy )

नीर फणस मोकळ्या जागेत लावायचा तर, फॅक्टरीतच लावते, माळी काका काळजी घेतीलच.. Happy
पण इकडे ऊन जास्त असते, झाड टिकेल का..?

सारीका, कोकणातले झाड. उन्हाची काय पर्वा त्याला ?
याची कापं करुन किंचीत वाफवायची. मग तांदूळ आणि तुरीची डाळ भिजवून वाटायची आणि त्यात तिखट, मीठ, हिंग टाकायचे. त्यात हि कापे घोळवून तळायची. मस्त लागतात. याची रसभाजी पण मी लिहिली होती.
साधारणपणे समुद्रकिनारी छान वाढते. (जागू ऐकतेस ना ?)

हो ऐकतेय. मिळाल तर मी पण लावेनच. ह्या फळाचा कुणीतरी फोटो टाका. आमच्या बाजारात बहुतेक हे विकायला येतात.

Pages