मलई बर्फी

Submitted by सायो on 15 March, 2009 - 13:07
malai burfi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.

क्रमवार पाककृती: 

मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्‍या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२,१३ वड्या.
अधिक टिपा: 

इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करायला सोपी आणि झटपट होणारी कृती वाटते आहे. करुन बघावी लागेल बर्फी.

ही बर्फी मी नेहमी करते, मिलींदा खरच ही बर्फी करायला सोपी आणि झटपट होते. Happy

व्वा.. मिलिन्दा कधी करतोयस.... केल्यावरती बोलव हो.. बघू कशी होतेय.. Wink

आधी मी बघेन आणि उरली तर तुलाही दाखवेन बरं का Happy

तसंही हे प्रकार अजून २ आठवडे होणार नाहीत तेव्हा वेळ आहे.

पण सायोने तर वर लिहिले आहे की १५ मिन मधे होइल. तुला दोन आठवडे का लागणारेत ? (ए अत्यंत भा प्र)

सायो, सोपी आहे एकदम. मी करुन "खाइन" एकदा Proud

Lol आधी मी बघेन.. Wink चालेल. तसं कर.

दोन आठवडे... बापरे..

मस्त आहे चवीला. कालपासुन ८,१० खाऊन झाल्यात.

>>>>>>तसंही हे प्रकार अजून २ आठवडे होणार नाहीत तेव्हा वेळ आहे.
बायको माहेरी गेलेली दिसतेय..;)

मी नक्की करणार...
श्या सकाळी सकाळी मलई बर्फीची आठवण करून दिलीस म्हणजे टु मच.. Sad आता पटकनच करावी लागणार!

कसला भारी गेस.. Lol मला थोडं उलटं वाटतयं... Happy

अम्मी, तुझं बरोबर आहे, मीच बाहेर आहे देशाच्या.. Happy
सायो, अगं रेसिपी सोपी आहे म्हणूनच तर मी करेन (आणि बायकोला देईन) म्हणालो ना Happy

कुठे फिरतोयस सध्या?

व्हिएन्ना ला आहे. अजून २ आठवडे तरी किमान.
कसलं बक्वास हवामान आहे इथे...श्या....

इथे विषयाला धरून पोस्ट टाका .. :p

अर्थात हे विषयाला धरुन आहे. खराब हवामानामुळे मी इथे केलेली बर्फी खराब होऊ शकते, म्हणून २ आठवड्यांनी करणार आहे :p

सायो छान आहे कृति, करुन बघितली सुद्धा.
माझ्याकडे अनसॉल्टेड बटर नव्हते, म्हणून मी क्रीम वापरले. मऊसर झाली.

सशल, मिलिंदा Proud

कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क:- हि उसगावात कुठे मिळेल?.. मिल्क मावा पावडर वापरलि तर चालेल का?

उसगावात कुठल्याही ग्रोसरी स्टोअरला मिळेल. विचारुन पहा. मी इथे बघते. असेल तर कळवते तुला.

सायो,

मी मुंबईत राहते. मला खालील गोष्टींऐवजी इथल्या कुठल्या गोष्टी वापरायच्या ते सांग आणि गॅसवर कढईत ही बर्फी कशी करायची तेही कृपया सांग. माझ्या मुलीला मलई पेढे आणि बर्फी दोन्ही पदार्थ खुपच आवडतात. म्हणुन करायचेत.

१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

सायो सांगेलच, पण माझ्या मते:
१. कन्डेन्स्ड मिल्क- मिल्कमेड (जे सगळीकडे मिळते इकडे)
२. मिल्क पावडर कोणतीही (नेस्ले, एव्हरीडे इ)
३. अन्सॉल्टेड बटर- साजूक तूप
-----------------------------------
Its all in your mind!

साधना,
कंडेन्स्ड मिल्क आपल्याकडे मिळते. मिल्कमेड नावाने.
दूधाची पावडर मिळते. पण नॉन फॅट कदाचित नाही मिळणार. पण जी मिळेल ती वापरली तरी चालेल. शक्यतो लो फॅट मिळेलच.
अनसॉल्टेड बटर च्या जागी, सामंत / साळगावकर यांचे लोणी वापरु शकतो.

psg आणि दिनेश, धन्यवाद.. करुन पाहिन...

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

बरोबर पूनम. अ‍ॅशबेबी, पूनमने सांगितलेलं वापरु शकतेस. तसंच अगदी बारीक गॅसवर गरम कर. ढवळत रहा म्हणजे करपणार नाही. बाकी जसं सांगितलंय तसंच.

कलाकंद बर्फी अशीच करतात नं?
सोप्पी वाटतेय.. नक्की करुन/खाऊन बघणार! Happy

पन्ना, ह्या बर्फीला आट्वलेल्या दुधाचा खमंगपणा आहे. कलाकंदला तो नसतो.

कन्डेन्सड मिल्क unsweetened घेतलस का सायो? गोड कन्डेन्सड मिल्कने फार गोड होतील का वड्या / पेढे?

झेलम, गोड घेतलंस तरी चालेल.साखर घालण्यापूर्वी जरा चव घेऊन बघ आणि मग ठरव साखरेचं प्रमाण.

हं, वड्यांचा मुहूर्त लागला की सांगेन तुला पण छान वाटतोय प्रकार Happy

गोड कन्डेन्सड मिल्क वापरलं तर साखरेची जराहि गरज नाहि, वरच्या प्रमाणात छान होतात. प्राजक्ता मिल्क पावडर तुला walmart मध्ये हि मिळेल, केक मिक्स वगैरे ज्या सेक्शन मध्ये असते तिथेचं.

Pages