मलई बर्फी

Submitted by सायो on 15 March, 2009 - 13:07
malai burfi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.

क्रमवार पाककृती: 

मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्‍या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२,१३ वड्या.
अधिक टिपा: 

इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके. इकडे पण साधारण तेवढंच घट्ट असतं. मग मिल्क पावडरमधे कन्डेन्स्ड मिल्क घातल्यावर ते मिश्रण पातळसर होतं का? वरच्या प्रमाणात कणकेसारखी (त्याच्यापेक्षाही घट्ट) कन्सिस्टन्सी आली म्हणून मी दूध घातलं.

इकडे कन्डेन्स्ड मिल्कमधे आधीच साखर घातलेली असते त्यामुळे काही फरक पडत असावा का?

सायो
प्रथम तुझे धन्यवाद !!!! अप्रतिम रेसेपी.

मी इंडिया मध्ये आहे. मी काल ह्यात अनेक variations करून अतिशय सुन्दर बर्फी झाली. मी वापरलेले प्रमाण

butter : मी चक्क अमूल litebutter ३ चमचे, आणि गाईचे तुप ४ चमचे घेतले. (साजुक घेतले तरी चालेल)
Condensed मिल्क : आमूल मिठाई मेट चा ४०० ग्राम चा डबा येतो तो पावून (३/४) वापरला
काजू पुड : १/२ कप
मिल्क पावडर (लो fats vijaya ची) : २ कप
वेलची पुड, बादाम, केशर

बाकि कृति सेम ठेवली. अप्रतिम चव आली. परत लो fat butter , लो fat तुप (गाईचे ), लो fat मिठाई मेट, आणि लो fat मिल्क पावडर, त्या मुले काजू पुड हिमतिने घातली. झकास वड्या पडल्या. आमच्या कड़े सगळे गोड खाण्यात दर्दी आहेत. त्यांची पसंतीची पावती लगेच मिळाली. पुढल्या वेळेस काजू पुडिचे प्रमाण जास्त करणार आहे. अमूल lite butter मुले अप्रतिम चव आली.
धन्स
मीरा

मंजुडी च्या भारतातल्या प्रमाणानुसार आजच केली...लय भारी झाली...
धन्स सायो आणि मंजुडी..

फोटो कसा टाकायचा इथे?

स्मिता, प्रतिसाद लिहायच्या बॉक्सच्या खाली इमेज आहे त्यावर क्लिक कर आणि फोटो साईझ वगैरे बदलून अपलोड कर. मग सेंड टू टेक्स्ट एरियावर क्लिक कर म्हणजे इथे दिसेल.

फाइल साइझ कमी करा. इमेज पेंटमध्ये ओपन करुन सेव्ह अ‍ॅज जेपेग करा आणि मग अपलोड करा.

सायो, अजुन एक व्हेरीएशन Happy
पाडवा स्पेशल गुलकंद बर्फी.
मायक्रोवेव्ह करुन झाल्यावर गुलाब फ्लेवरचं सरबत शिंपडलं, रंग आणि स्वादासाठी आणि वरतुन गुलकंद लावुन बर्फी थापली. छानच झालेली Happy
धन्यवाद!!

dsc_2173.jpg

ह्या दिवाळी मध्ये मी मिल्क पोवडर फक्त अर्धा कप घेतलि. बाकि सगळी काजु पावडर घेतलि. दुध घातले. सुन्दर बर्फि झालि. मी तो गोळा चक्क पोळपाटा वर लाटला. वरुन रोस्ट केलेले बदाम लावले. सोलिड चव आलि. आता परत करणार आहे. तेन्व्हा फोटो टाकेन. माझे प्रमाण

काजु पावडर २ कप
मिल्क पावडर १/२ कप
दुध १ कप
कन्डेन्सड मिल्क १ डबा (४०० ग्रा.)
बदाम, वेलचि पुड,

बाकि क्रुति सेम.

पाकृवरचे सगळ्यांचे प्रतिसाद, इथले मस्त मस्त फोटो आणि बेस्ट पाकृ म्हणून मी काल करून पाहीली.
साखर मिक्स केल्यानंतर मी परत १ मि मयक्रोवेव्ह मधे ठेवली त्यामुळे रंग बदलला जरा. बाहेर काढून न हलवता तशीच थंड होवू दिली.

malaiBarfi.jpg

चला ही बर्फी परत वर आणायचं पुण्यकर्म करते. Proud
आज डॅफोची काक बघून एकदम बर्फी खायचा मूड आला, पण काजू वगैरे नव्हते मउ नसलेले. पण हे साहीत्य होते तर हीच करुन टाकली.
सगळे फोटो इथे टाकतात म्हणून मी पण. Proud

आणि हो, सायो ला धन्यवाद. :). भरपूर केली आहे, किती दिवस राहील ? फ्रीज मधे ठेवू का ? हवा बर्‍यापैकी थंड आणी दमट आहे सध्या.

DSC04252.JPG

अत्ता पर्यन्त मी ही बर्फी अनेक तर्‍हेने करुन बघितली. एकदम डायेट वाल्यान्साठी आणि मधुमेही लोकान साठी हे असे प्रमाण घेतले.

१ कप लो फॅट गायीच्या दुधाची पावडर
१/२ कप दुध
४ चमचे कॉफी
३ टी स्पु. शुगर फ्री
वेलची, जायफळ
असे प्रमाण घेतले. बाकी क्रुती सेम. कॉफी ऐवजी एकदा बटरस्कॉच इसेन्स घातला होता. अप्रतीम स्वाद आला.

बर्फी वर आणतेय Happy
मी गेल्या आठवड्यात संत्राबर्फी ट्राय केली. संत्र्याची पेस्ट चांगली कडू लागत होती. तसंही गॅसवर वड्यांचं मिश्रण करायची हिंमत होत नव्हती ( माझ्या हातून हमखास बिघडतात ) म्हणून सायोची अजरामर मलाई बर्फी संत्र्याची पेस्ट घालून केली. पार्ल्याच्या फडके उद्योग मंदिरात मिळते तशी अफलातून चवीची संत्रा बर्फी झालीय. कंडेन्स्ड मिल्कच्या गोडपणात संत्र्याचा कडूपणा टोटल गायब, स्वाद मात्र अप्रतिम लागलाय. फक्त मी पेस्ट फारच कमी वापरली. पाववाटी. लिंबूरस वगैरे दुसरे काहीच वापरले नाही. पेस्ट कमी असल्यामुळे रंग पांढराच राहिलाय. थोडा खायचा केशरी रंग घातला तर दिसेलही परफेक्ट.
धन्यवाद मानुषी, मंजूडी ( संत्रा पेस्ट,बर्फीची आयडीया ) आणि सायो. मायबोली जिंदाबाद ! Happy

Pages