सहा कणसांचा कीस,
अर्धी वाटी तांदुळाच पीठ,
चार चमचे हरबरा डाळीचे पीठ,
अर्धा इंच आल्याचा तुकडा,
चार लसणाच्या पाकळ्या,
सहा पाने पुदिना,
चार हिरव्या मिरच्या,
चवीपुरते मीठ,
चार चमचे तेल.
आलं, लसूण, पुदिना, मिरच्या, मीठ हे सगळे जाडसर वाटुन घ्यावे.
मक्याचा किस, दोन्ही पिठे आणि हे वाटण असे सगळे एकत्र करुन अर्धा तास झाकुन ठेवावे. पाणी घालु नये.
कणसांच्या कीसामुळे थोडे पाणी सुटते, अजुन थोडे पाणी घालुन हलवावे. साधारण धिरड्याच्या पिठाइतके पातळ झाले पाहीजे.
तव्याला थोडे तेल लावुन धिरडि घालावीत.
चटणी बरोबर खावीत.
घाई असल्यास, भिजवुन लगेच केली तरी चांगली होतात.
पाण्याचे प्रमाण हे मक्याच्या कीसाला सुटलेल्या पाण्यावर अवलंबुन असेल.
मक्याच्या पिठाची पण धिरडी करतात, पण या कणसाच्या कीसाची चव वेगळी आणि मस्त लागते.
रुनी
रुनी
रुनी, नवीन रेसीपी म्हणून दे.
रुनी, नवीन रेसीपी म्हणून दे. मक्याची थालीपीठं नावाने. बर्फीच्या नाही का वेगवेगळ्या रेसीपीज. तसच काहीसं.
आता यायला लागतीलच कणसं. >>
आता यायला लागतीलच कणसं. >> म्हंणजे मी वेळेवर टाकली पा.कृ.
रुनी
मी पण केली परवाच, स्वीटकॉर्न
मी पण केली परवाच, स्वीटकॉर्न वापरुन केली. लसुण वगळला आणि पुदिना आणलेला नव्हता म्हणुन तो पण वगळला त्याऐवजी गोडलिंबाची पानं कॉर्न बरोबरच मिक्सर मधुन वाटुन घेतली. अप्रतिम झाली होती धिरडी. नवीन रेसपी शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद.
रुनी _/\_
रुनी _/\_
रुनी माझ्या कडे पण आहे स्वीट
रुनी माझ्या कडे पण आहे स्वीट कोर्न
कशी केलि थालपिठं...???
रुनी,
रुनी,
स्निग्धा, गोडसर नाही ना झाली
स्निग्धा, गोडसर नाही ना झाली स्वीटकॉर्न वापरल्याने, इथे बर्याच जणींनी विचारले आहे.
मी काल स्वीट्कॉर्न वापरून
मी काल स्वीट्कॉर्न वापरून केली. फ्रोझन दाणे होते त्यामुळे जरा वेळ अर्थातच थॉ करून मग दाणे भरडून घेतले. हिरवी मिरची संपल्यामुळे लाल मिरची घातली आणि पुदिना नव्हता म्हणून तो नाही घातला. मला बेसन कमी आणि तांदूळ पीठ जास्त आवडतं, कुरकुरीत होण्यासाठी, म्हणून ते प्रमाण जर्रा बदललं. पण चव भारीच! अजिबात गोड झाली नाहीत. खमंग, खरपूस, खुसखुशीत इत्यादी इत्यादी इत्यादी....
मस्त रेस्पीसाठी पुण्हा एकदा ढण्यावाड!
फोटो काढता आला नाही कारण करायचा आणि खायचा स्पीड...शर्यत चालू होती!
खमंग, खरपूस, खुसखुशीत इत्यादी
खमंग, खरपूस, खुसखुशीत इत्यादी इत्यादी इत्यादी.... >>
मस्त रेसिपी आहे. खास कणसं
मस्त रेसिपी आहे. खास कणसं आणून करणार.
रुनी आरती- खतरा फोटु. सही.
रुनी
आरती- खतरा फोटु. सही.
खरंच फोटो खतरनाक आहे, मला
खरंच फोटो खतरनाक आहे, मला प्रचंड आवडली रेसिपी.
नक्की करून पाहणार.
ज्ञाती, रैना, दक्षिणा -
ज्ञाती, रैना, दक्षिणा - धन्यवाद
मस्त, सोपी रेसिपी आरती.
मस्त, सोपी रेसिपी आरती. फ्रोजन कॉर्न धुवून त्यात बाकी जिन्नस मिसळून मिक्सीत भरड वाटले. अंदाजाने डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ घातलं. छान खुसखुशीत झाली. थॅन्क्यू.
धन्यवाद सायो. मी पण बरेचदा
धन्यवाद सायो.
मी पण बरेचदा अंदाजेच घालते, त्यामुळे इथे पा.कृ. लिहायची म्हंटली की प्रश्नच असतो
आरती,खाणार्याचा प्रतिसाद कधी
आरती,खाणार्याचा प्रतिसाद कधी येतोय्?त्यावरून ठरवता यिइल
मग तु काहीच ठरवु शकत नाहीस
मग तु काहीच ठरवु शकत नाहीस
आता केली होती,मस्त झाली होती
आता केली होती,मस्त झाली होती धिरडी, त्यात मी पत्ताकोबी,तिळ, ओवा टाकला होता.
धन्यवाद
पत्तकोबीची धिरडी केलीस की
पत्तकोबीची धिरडी केलीस की मक्याबरोबर कोबी घातला ?
आरती,मी पण तु दिलेल्या कृतीने
आरती,मी पण तु दिलेल्या कृतीने रुनी सारखी 'थालीपीठं केली
मस्त चविष्ट झाली. घरची मक्याची कणस संपवायला मस्त पदार्थ मिळाला. धन्यवाद!
मी पण थालीपीठ करुनच बघते आता
मी पण थालीपीठ करुनच बघते आता
यम्मी तोंपासु
यम्मी तोंपासु
रुनी खतरा फोटो..
रुनी
खतरा फोटो..
आजच करुन पहिली...मस्त झाली
आजच करुन पहिली...मस्त झाली होती..धन्स आरती
विभा, चिंगी, स्वप्ना धन्यवाद
विभा, चिंगी, स्वप्ना धन्यवाद
तांदळाच पीठ नसेल तर त्याला
तांदळाच पीठ नसेल तर त्याला पर्याय म्हणून कुठलं पीठ वापरता येईल?
मक्याचे किंवा ज्वारीचे वापरा,
मक्याचे किंवा ज्वारीचे वापरा, बारिक रवा भिजवुन घाला किंवा मैदा पण चालेल.
धन्यवाद आरती, काल करून
धन्यवाद आरती, काल करून बघितल....सॉलिड पचका झाला
परत करेल...अपयश ही यशाची पहिली पायरी आहे
२ कंसाच्य धिरड्याला तर एकदम कमी मैदा आणि पिठ लागेल ना?
थोडे थोडे पिठ घालत कालवा,
थोडे थोडे पिठ घालत कालवा, साधारण धिरड्याच्या पिठाइतके पातळ असताना बास करा. घट्ट झालेच तर मग पाणी घाला
Pages