मक्याच्या कणसांची धिरडी

Submitted by आरती on 26 September, 2011 - 15:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सहा कणसांचा कीस,
अर्धी वाटी तांदुळाच पीठ,
चार चमचे हरबरा डाळीचे पीठ,
अर्धा इंच आल्याचा तुकडा,
चार लसणाच्या पाकळ्या,
सहा पाने पुदिना,
चार हिरव्या मिरच्या,
चवीपुरते मीठ,
चार चमचे तेल.

क्रमवार पाककृती: 

आलं, लसूण, पुदिना, मिरच्या, मीठ हे सगळे जाडसर वाटुन घ्यावे.
मक्याचा किस, दोन्ही पिठे आणि हे वाटण असे सगळे एकत्र करुन अर्धा तास झाकुन ठेवावे. पाणी घालु नये.
कणसांच्या कीसामुळे थोडे पाणी सुटते, अजुन थोडे पाणी घालुन हलवावे. साधारण धिरड्याच्या पिठाइतके पातळ झाले पाहीजे.
तव्याला थोडे तेल लावुन धिरडि घालावीत.
चटणी बरोबर खावीत.

dhirade.jpg

अधिक टिपा: 

घाई असल्यास, भिजवुन लगेच केली तरी चांगली होतात.
पाण्याचे प्रमाण हे मक्याच्या कीसाला सुटलेल्या पाण्यावर अवलंबुन असेल.
मक्याच्या पिठाची पण धिरडी करतात, पण या कणसाच्या कीसाची चव वेगळी आणि मस्त लागते.

माहितीचा स्रोत: 
कुठेतरी पुस्तकात वाचल्याचे आठवते, नंतर काही बदल होत गेले.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुनी, नवीन रेसीपी म्हणून दे. मक्याची थालीपीठं नावाने. बर्फीच्या नाही का वेगवेगळ्या रेसीपीज. तसच काहीसं. Happy

मी पण केली परवाच, स्वीटकॉर्न वापरुन केली. लसुण वगळला आणि पुदिना आणलेला नव्हता म्हणुन तो पण वगळला त्याऐवजी गोडलिंबाची पानं कॉर्न बरोबरच मिक्सर मधुन वाटुन घेतली. अप्रतिम झाली होती धिरडी. नवीन रेसपी शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद.

मी काल स्वीट्कॉर्न वापरून केली. फ्रोझन दाणे होते त्यामुळे जरा वेळ अर्थातच थॉ करून मग दाणे भरडून घेतले. हिरवी मिरची संपल्यामुळे लाल मिरची घातली आणि पुदिना नव्हता म्हणून तो नाही घातला. मला बेसन कमी आणि तांदूळ पीठ जास्त आवडतं, कुरकुरीत होण्यासाठी, म्हणून ते प्रमाण जर्रा बदललं. पण चव भारीच! अजिबात गोड झाली नाहीत. खमंग, खरपूस, खुसखुशीत इत्यादी इत्यादी इत्यादी....

मस्त रेस्पीसाठी पुण्हा एकदा ढण्यावाड! Happy

फोटो काढता आला नाही कारण करायचा आणि खायचा स्पीड...शर्यत चालू होती! Proud

मस्त, सोपी रेसिपी आरती. फ्रोजन कॉर्न धुवून त्यात बाकी जिन्नस मिसळून मिक्सीत भरड वाटले. अंदाजाने डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ घातलं. छान खुसखुशीत झाली. थॅन्क्यू.

आरती,मी पण तु दिलेल्या कृतीने रुनी सारखी 'थालीपीठं केली Proud
मस्त चविष्ट झाली. घरची मक्याची कणस संपवायला मस्त पदार्थ मिळाला. धन्यवाद!

धन्यवाद आरती, काल करून बघितल....सॉलिड पचका झाला Sad
परत करेल...अपयश ही यशाची पहिली पायरी आहे Happy
२ कंसाच्य धिरड्याला तर एकदम कमी मैदा आणि पिठ लागेल ना?

थोडे थोडे पिठ घालत कालवा, साधारण धिरड्याच्या पिठाइतके पातळ असताना बास करा. घट्ट झालेच तर मग पाणी घाला Happy

Pages