Submitted by आरती on 26 September, 2011 - 15:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
सहा कणसांचा कीस,
अर्धी वाटी तांदुळाच पीठ,
चार चमचे हरबरा डाळीचे पीठ,
अर्धा इंच आल्याचा तुकडा,
चार लसणाच्या पाकळ्या,
सहा पाने पुदिना,
चार हिरव्या मिरच्या,
चवीपुरते मीठ,
चार चमचे तेल.
क्रमवार पाककृती:
आलं, लसूण, पुदिना, मिरच्या, मीठ हे सगळे जाडसर वाटुन घ्यावे.
मक्याचा किस, दोन्ही पिठे आणि हे वाटण असे सगळे एकत्र करुन अर्धा तास झाकुन ठेवावे. पाणी घालु नये.
कणसांच्या कीसामुळे थोडे पाणी सुटते, अजुन थोडे पाणी घालुन हलवावे. साधारण धिरड्याच्या पिठाइतके पातळ झाले पाहीजे.
तव्याला थोडे तेल लावुन धिरडि घालावीत.
चटणी बरोबर खावीत.
अधिक टिपा:
घाई असल्यास, भिजवुन लगेच केली तरी चांगली होतात.
पाण्याचे प्रमाण हे मक्याच्या कीसाला सुटलेल्या पाण्यावर अवलंबुन असेल.
मक्याच्या पिठाची पण धिरडी करतात, पण या कणसाच्या कीसाची चव वेगळी आणि मस्त लागते.
माहितीचा स्रोत:
कुठेतरी पुस्तकात वाचल्याचे आठवते, नंतर काही बदल होत गेले.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वीट कॉर्न वापरून करुन
स्वीट कॉर्न वापरून करुन बघितली. फुड प्रोसेसर मध्ये सगळ एकत्र करुन. मस्त झाली एकदम. थँक्स आरती. छानच रेसीपी आहे एकदम.
तेला ऐवजी बटर लावून बघा. जास्त क्रीस्पी होतात आणि चव पण जास्त छान येते.
पचका झाल्याचा root cause -
पचका झाल्याचा root cause - धिरड्याच पिठ किती पातळ असायला पहिजे?
मी करुन पाहिले. चव छान होती.
मी करुन पाहिले. चव छान होती. माझे फारसे क्रिस्पी झाले नाहीत. पण आवडले
मीपण आज केली. फ्रोझन कॉर्न
मीपण आज केली. फ्रोझन कॉर्न वापरलं आणि प्रोटिनसाठी मुठभर मोड आलेले मूगपण टाकले वाटताना. पुदिन्याचा स्वाद छान वाटला धिरड्यांना. आरती, छान आहे रेसिपी.
सीमा, ज्ञाती, आर्च धन्यवाद
सीमा, ज्ञाती, आर्च
धन्यवाद
पुन्हा धन्यवाद.
पुन्हा धन्यवाद.
आज हे सगळं मिश्रण जरा घट्टसर
आज हे सगळं मिश्रण जरा घट्टसर भिजवून अप्पमपात्रात अप्पम केले आहेत मुलाच्या डब्याकरता.कसे झाले आहेत हे आल्यावर कळेलच.:)
अरे वा सायो मस्त आयड्या आहे.
अरे वा सायो मस्त आयड्या आहे. त्याने खाल्ले तर सांग मग मी ट्राय करेन
सायो, सही आयडीया. मी परवाच
सायो, सही आयडीया. मी परवाच धिर्डी केली होती. लेकिंना आवडली आता हे आप्पे ट्राय मारते.
सिंडे, थोडं पीठ उरलेलं त्याचे
सिंडे, थोडं पीठ उरलेलं त्याचे केले. मस्तच लागले. एरवी ही हे मिश्रण मिक्सरला वाटताना एखादं गाजर घालते.
हा घ्या फोटो
मस्त च आहे रेसिपी.. नक्की
मस्त च आहे रेसिपी.. नक्की करुन बघीन
सायो, थोडं डिटेलमधे लिहिणार
सायो, थोडं डिटेलमधे लिहिणार का प्लीज्? सोडा घातला होता का?
सायो आप्पे म्हणायचंय होय.
सायो आप्पे म्हणायचंय होय. (बादवे आप्पे चं एकवचन काय ? ;))
मी उद्या करणार आहे. फ्रोजन चं. ते नुसतंच मिस्कर वर वाटायचंय ना.
अरे वा, एकाच पिठाचे वेगवेगळे
अरे वा, एकाच पिठाचे वेगवेगळे प्रकार. थालीपिठ झाली आता आप्पे
वर मूळ रेसिपीत जे आहे तेच
वर मूळ रेसिपीत जे आहे तेच सगळं, पण तरीही : फ्रोजन कॉर्न धुवून मिक्सरच्या भांड्यात घेतले. त्यात आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, एक गाजर बारीक तुकडे करुन घातलं आणि भरड वाटलं. वाटताना थोडं पाणी घातलं. एक भांड्यात मिश्रण काढून त्यात जास्त तांदुळाचं पीठ आणि कमी बेसन, मीठ घालून घट्ट भिजवलं. अप्पे/ अप्पम पात्रात तेल घालून गॅसवर ठेवलं. कडकडीत गरम झाल्यावर वरचं मिश्रण चमच्याने घातलं. वरुन झाकण घालून दोन्ही बाजूंनी परतून चांगलं शिजवलं.
धन्यवाद सायो..ते इतके छान
धन्यवाद सायो..ते इतके छान फुगले आहेत की सोडा असावा असं वाटलं..
फुगलेत कशावरुन? खालची बाजू
फुगलेत कशावरुन? खालची बाजू वर टाकली की तसे दिसतात.
सायो, कल्पना चांगली आहे हां..
(No subject)
मी केली धिरडी , मस्त झाली.
मी केली धिरडी , मस्त झाली. छान रेसिपी आरती.
मी त्यात मोड आलेले मूग, कोथिंबीर हे पण अॅड केले. मी जरा भरड वाटले त्यामुळे फार पातळ नाही झाली धिरडी.
गरमागरम धिरडी, त्यावर घरचे ताजे लोणी, शेजारी सिंडिची दाण्याची चटणी.
मी केले काल आप्पे..फक्त मी
मी केले काल आप्पे..फक्त मी फ्रोझन मटार पण घातले.छान रेसिपी.
मस्त होतात..लेकीने आवडीने
मस्त होतात..लेकीने आवडीने खाल्ले हे मिश्रण फ्रिजमधे किती काळ टिकेल? आदल्या संध्याकाळी करुन दुसर्या दिवशी दुपारी चांगले राहील का?
आरती, पाककृतीसाठी धन्यवाद!
आरती, पाककृतीसाठी धन्यवाद! सगळे घटक एकत्र वाटून धिरडी केली. आत्ता आणि गेल्या आठवड्यांत एकदा झाली. फार आवडली! सखुबत्त्याशी खाऊन 'मायबोली मेनू' केला.
सायोच्या कृतीनं आप्पे केले, पण फोटो काढण्याआधी संपले.
मवा, मस्त फोटो. सोनपरी, एक
मवा, मस्त फोटो.
सोनपरी, एक दिवस नक्कीच रहायला हवे. पाणी न घालता ठेव. करताना वेळेवर पाणी घाल.
मृण्मयी, फोटो एकदम मस्त,
मृण्मयी,
फोटो एकदम मस्त, खरपुस झाली आहेत अगदी.
हा सखुबत्ता काय प्रकार आहे ? मा.बो. वर आहे का, शोधायला हवा.
मृ तुझा धिरड्यांचा फोटो बघून
मृ तुझा धिरड्यांचा फोटो बघून मला मी ही कृती अगदी नीट वाचून (पण) थालीपीठं केली होती त्याची आठवण झाली.
आरती
कैरीचा सखुबत्ता अल्पनाने लिहीलाय. पुढच्या विकेन्डला विनयकडे येणार असलीस तर तुला खायलाही मिळेल.
मस्त रेसिपी.. आजच दुपारला
मस्त रेसिपी.. आजच दुपारला करते.
मृण्मयी, दोन धिरडी एकावेळी
मृण्मयी, दोन धिरडी एकावेळी होण्याइतका मोठा तवा आहे तो?? मस्त आहे.
धिरडी पण छान दिसताहेत
तो तवा जर गोल असेल तर नक्कीच
तो तवा जर गोल असेल तर नक्कीच एकावेळी चार झाली असतील [असे चित्रावरुन वाटते]
रुनी, पुढच्या विकेन्डाच काही जमत नाहीये. शोधुन करतेच आता ...
मृ, तुझ्याकडेही गॅसच्या
मृ, तुझ्याकडेही गॅसच्या मधल्या बर्नरवर फिट होणारी नॉनस्टिक ग्रिडल आहे का? मला गॅसबरोबर मिळालीये. डोसे एकावेळी दोन, पॅनकेक्स एकावेळी ३ होऊ शकतात.
छान आहे रेसिपी
छान आहे रेसिपी
Pages