श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण

Submitted by जागोमोहनप्यारे on 20 September, 2011 - 04:00

श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? जेवल्यास काय होते?

( एवढाच विषय लिहिल्याने सुरुवातीच्या काही प्रतिसादांमध्ये लोकांचा गैर्समज झाला आहे.. हा विषय खरे तर असा आहे.... >> श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण ब्राह्मण किंवा सवाष्ण म्हणून बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? जेवल्यास काय होते?

अर्थात इतर लोकही अशा जेवणाला टाळतातच, त्याबाबतही काही लिहिले तरी हरकत नाही.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> मी म्हणते आहे तो पर्यंत सेवा करा. नंतर श्राध्द-पित्र नाही केले तरी चालेल. <<<
अहो चार्वाकगिरि म्हणते, आहेत तोवर तरी त्यान्चे तरी कशाला करा? स्वतःपुरते करा फक्त! Proud

श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? >>>> तरूण माणूस/बाई गेला असेल तर लहान मुलांना/मुलींना पूर्वीच्या काळी दुस-यांच्या घरी पाठवत नसत. अतृप्त इच्छा असतील म्हणून. पण म्हातारं माणूस असेल तर जाऊ देत असत.

लिम्बोबा,
माझी पोस्ट वाचून थोडं तरी हसू आलं का? असेल तर पोस्ट चा उद्देश सफल. नसेल तर फेल. हाकाना़का.

अनघा, बरोबरे तुमचे, पण त्यापेक्षाही महत्वाचे कारण म्हणजे लहान मुलान्ना सुतकी गम्भिर वातावरणाची झळ बसू नये, वा त्यान्च्या उनाडक्यान्नी तेथिल वातावरण बिघडू नये हा देखिल महत्वाचा उद्देश असायचा/असतो.
स्म्शानात दाहसंस्कारानन्तर व दहाव्व्याला कावळा शिवुन झाल्यावर अश्म्यावर पाणी (तिलोदक) घालताना, जर आईबाप जिवन्त असतील तर पाणी सरळ हाताने घातले जाते, व ज्याचे आईबाप मेलेले असतील त्यान्नाच अन्गठ्यावरुन पाणी घालायला परवानगी आहे. वरील लहान मुलान्चे कारणात या कारणाची सुप्त भर पडलेली असू शकते.
मात्र प्रसन्गोपात, जवळच्या नात्यात, अगदी लहानग्यान्ना देखिल सर्व विधित समाविष्ट करुन घेतले जाते असेही पहाण्यात आहे.

वर्षा_म | 21 September, 2011 - 11:45 नवीन

चार्वाकगिरि म्हणजे काय Sad

<<<
ते थोडं गांधीगिरि सारखं असतं. फुकट जेवण आहे ना? आलोच ताबडतोब, शिवाय डब्बा (रिकामा) सोबत आणतो, जाताना संध्याकाळची सोय होईल तितकीच. असं.

>>>> लिम्बोबा,
माझी पोस्ट वाचून थोडं तरी हसू आलं का? असेल तर पोस्ट चा उद्देश सफल. नसेल तर फेल. हाकाना़का. <<<<<

नै बोवा, मी विनोद देखिल गम्भिरपणे घेतो, अन तसा घेतला तरच मला तो समजतो! Proud (अन समजला तरी हापिसात हसता येत नाही Wink )
बायदिवे
माझी पोस्ट वाचून थोडा तरी आस्तिक झालास का? असेल तर पोस्ट चा उद्देश सफल, नसेल तर मी पोस्टीन्चे घाव घालतच रहाणार! सौ सुनारकी उपयोगी नव्हेच (हे कळतयं मला) तर सौ लोहारकीच लागणार अस्तील घालणार (टाळक्यात)! हाकानाका. Proud

पण त्यापेक्षाही महत्वाचे कारण म्हणजे लहान मुलान्ना सुतकी गम्भिर वातावरणाची झळ बसू नये, वा त्यान्च्या उनाडक्यान्नी तेथिल वातावरण बिघडू नये हा देखिल महत्वाचा उद्देश असायचा/असतो.
>>>>> हो, असच असेल कारण.
मात्र प्रसन्गोपात, जवळच्या नात्यात, अगदी लहानग्यान्ना देखिल सर्व विधित समाविष्ट करुन घेतले जाते असेही पहाण्यात आहे. >> बरोबर आहे, म्हणूनच तर मी दुस-यांच्या घरी असा शब्दप्रयोग केलाय. Happy
अवांतर :
रच्याकाने, मी अस काही पाळतच नाही. पण जेव्हा माझ्या मुलीला शेजारीण दर अमावस्येला नारळ फोडून पहिल्यांदा तिला स्पेशली बोलावून प्रसाद देऊ लागली अन नंतर आम्हाला तेव्हा मी तिला ते आधी खाऊ द्यायची, पण नंतर मला ते आवडेनासे झाले अन तिला दिलेल्या तसेच आमचे खोबर्‍याचे तुकडे मी सरळ कागदी पुडी करून फेकून द्यायला सुरवात केली. तिला विचारले तर - बहिरोबा की काय अस देवाचे नाव सांगितले. नारळ घरीच फोडते अन प्रसाद देण्यासाठी तिला अंघोळ-बिंघोळ पण करायची जरूर नाहीये Uhoh ( हे कस कळले तर एकदा मी तिला म्हटले की ठेवा तिथं, अंघोळ बाकी आहे, तर म्हणे माझी पण झाली नाहीय्ये ) असो. मी मात्र नारळ नाकारत नाही, १-दीड वर्ष खाल्ल्ला आम्ही सगळ्यांनी अन आता मात्र खात नाही.. काही झाल नाही म्हणा खाऊनही. Happy

वर्षे, चार्वाकांना गुगलून काढ आणि बघ ते कसली गिरी करायचे ते.

माझ्या घरी जे १०, १३, वर्षं दिवसवारे झाले, ते आम्ही स्वतःच (गुरुजी बोलावले नव्हते) केले होते. १३व्याला ताम्हनात छोटासा होम करुन दत्ताचे जप करुन १३ वेळा रामरक्षा म्हटली होती. जेवढा खर्च आला असता तेवढा दान केला होता. नेहमीचंच जेवण आम्ही नेहमीचीच माणसं जेवलो. व्यक्ती जिवंत असताना त्यांची जमेल तशी शुश्रुषा केली होती. काकांनी तर माझ्या हातातच प्राण सोडला होता त्यांचा शर्ट मी बदलत असताना. स्मशानात त्यांना सोडायला मी, माझी आत्तेबहिण व माझ्या मैत्रिणीही गेलो होतो. तिथले विधीही मी आणि भावाने स्वतःच केले होते त्यामुळे एकप्रकारचे समाधान मिळाले. आम्हाला कसलीही भिती किंवा अशुभ वाटले नाही. माझ्या आईने (तिचा मेंदू आता २५%च उरला आहे) क्युरिऑसिटी म्हणून काकांच्या अस्थीकलशातून वरचं कापड सोडून अस्थी बाहेर काढली व बाबांना दाखवू लागली. बाबांनी शांतपणे ते परत कलशात ठेवून दिले. आम्ही मनोमन काकांना सॉरी म्हटलं.

जप, उपासना रोजच चालू असल्याने वेगळं काही केलं नाही. सुतकातही रोजचं पठण वगैरे चालू होतं. उलट १० दिवस मी रोज जास्तीची ११ वेळा रामरक्षा म्हणत होते. आत्याच्या आग्रहाखातर तिचं मन राखायला शेवटचे ७-८ दिवस बाबांनी पूजा केली नाही.

फाको: लिंब्या आता सौ. सोनार आणि सौ. लोहार ह्यांना का उगाच ह्या वादात ओढतोयस.

ह्या सगळ्या भंपक रुढींचच एकदा फायनल श्राद्ध घालायची वेळ आली आहे खरं तर... असो. तुमचं चालुद्या ( शेवटी हे वाक्य टाकलं म्हणजे इतरांना तुच्छ लेखल्याचं भयंकर म्हणजे भयंकरच सात्विक समाधान मिळतं Proud )

असो. तुमचं चालुद्या ( शेवटी हे वाक्य टाकलं म्हणजे इतरांना तुच्छ लेखल्याचं भयंकर म्हणजे सात्विक समाधान मिळतं फिदीफिदी )>>>> Lol अचूक !

माझी पोस्ट वाचून थोडा तरी आस्तिक झालास का? असेल तर पोस्ट चा उद्देश सफल, नसेल तर मी पोस्टीन्चे घाव घालतच रहाणार! सौ सुनारकी उपयोगी नव्हेच (हे कळतयं मला) तर सौ लोहारकीच लागणार अस्तील घालणार (टाळक्यात)! हाकानाका.
<<<
तुला असाच टाळक्यात "घालून" आस्तिक बनवलाय का? नास्तिक बनवायला काय / कशात / कुठे / किती घालावे/घालाव्या लागतात, ते पण येते मला Lol हवे असल्यास सांग. घालतो मी.
खीखीखी

ता.क.
लिंबोबांनी मैत्रीच्या प्रेमाने 'आस्तिक झालास' का असे उल्लेखिले, म्हणून उत्तरात 'तुला असाच टाळक्यात..' हा एकेरी उल्लेख आला. यात माबो वरील शिष्टाचाराचे उल्लंघन वै झाले असल्यास गाढवप्रेमाची सलगी म्हणून मा. अ‍ॅडमिन ने माफ करावे. (याप्रकारे एकेरी उल्लेखावरून अ‍ॅडमिन कडे विपूवर केलेल्या तक्रारी वाचल्यात मी.. म्हणून एवढे एक्ष्प्लनेशन)

केश्वी ग्रेट आहेस. मी पण माझ्या दत्तक बाबांचे और्ध्व दैहिक केले आहे. व चौदाव्याला शांत केली होती. घरचेच लोक होते. मला तर वाट्ते तुम्ही बारश्याचे जेवता व मग कधी तेराव्याचे जेवले तर जीवनाचे जे एक चक्र आहे ते किती क्षण भंगूर आहे त्याची एक प्रकारे जाणीव होउन मनाचे क्षितिज रुंदवते व ज्ञान, ध्यान मार्गे जाउ शकते.

>>> नास्तिक बनवायला काय / कशात / कुठे / किती घालावे/घालाव्या लागतात, ते पण येते मला <<< हे गाढवी प्रेम तुझ्या वाट्याला कुणाकडून मिळाले म्हणून तू नास्तिक झालास? Wink
असो.
दिल आहेस पण त्या डिस्क्लेमेरची मला गरज नाही. (मी तर प्रत्येक आयडी ही आयडीच्या अर्थाप्रमाणे घेऊन तसेच उद्देशुन लिहितो, आयडीमागची व्यक्ति किती बाल/तरुण/वृद्ध/ओळखीची/अनोळखी आहे याची फिकीर मला नसते... तू म्हणतो तसे काही काही नाकाने कान्दे सोलणार्‍यान्ना आवडत नाहीते अन करतात कम्प्लेण्टी... पण काय करणार? असतात अशीही काही "रिझर्व्ड" माणसे, चालायचेच)

लिंबू, पण जबरदस्ती का दुसर्‍याला आस्तिक बनायची? असं ओढून ताणून कुणी आस्तिक किंवा नास्तिक बनत नाही.

नै ग अश्विनी, मी नाही जबरदस्ती करत! फक्त आस्तिकान्च्या चर्चेत मधेच खुपसलेल नास्तिकान्च नाक थोडस खरवडून खाजवुन बघतोय काय होत ते! ॐ अस्त्राय फट Proud

आपलं सोडून दुसर्‍याचं का खाजवावं वाटतं लिंबूभाऊ तुम्हाला? खाजवा खाजवा. तुम्हाला आनंद येत असे ते जरूर खाजवा

अबे इब्लिसा, "ठेचून" हा शब्द आठवला नाही म्हणून ते लिहिलय, शिवाय "ठेचून" हा शब्द जरा जास्तच हिन्सक होतोय की काय अशामुळे देखिल लिहीला नव्हता! आता ठेचू? आय मी शब्द बदलू? Wink

पितरांचं श्र्रध , पक्ष यात मागास काय आहे समजले नाही.. हॅरी पॉटरमध्येही डिमेम्तरना पळवायला पेट्रोनस चार्म दिला आहे की.. हिंदीत त्याचे भाषांतर पित्रुदेव संरक्षणम असे दिले आहे... Happy पितरांबद्दल श्रद्धा असली की संकटं पळतात, हे रोलिंगबाईलाही मान्य आहे की. Proud ( Patronuses are also called spirit guardians though this may only refer to corporeal Patronuses. It is primarily designed for defence against otherwise unbeatable Dark creatures like Dementors and Lethifolds, though there are other uses.)

असो, श्राद्धाला ब्राह्मण म्हनून जेवल्यास काहीतरी शुद्धीकरण करावे लागते, इतकी माहिती तरी बाहेर आली, हे बरे झाले.. आता १००० गायत्री की आणखी काही यातही मतभेद असू शकतील..

पितृदेव संरक्षणम् Happy

gajanan.JPG

माझे आजोबा श्राद्धाच्या उद्योगानंतर संध्याकाळी एक्स्ट्राचा जप करीत संध्येबरोबर. तसेच श्राद्धाच्या कार्यांमुळे ते बरेच काहि-बाही दान करत. त्यांच्याशी झालेले जे बोलणे स्मरते त्यानुसार 'श्राद्ध-पक्षाच्या' कार्यांमुळे शुद्धी करावी लागते व ते उत्पन्न दान करायचे असते असे काहितरी होते (ते सगळे उत्पन्न दान करायचे असते की अंशतः वगैरे माहिती नाही :फिदी:)

श्राद्धाचे जेवण, श्राद्ध करणे वगैरे वरूनः मुळात जिथे एखादा माणुस श्राद्ध करतो तिथे हे प्रश्न मूलतःच void ठरत नाहीत का?

एकदरीत श्राध्द या विषयावर माझ्यासारखे ( पुरातन ) विचारवादी आणि चार्वाक असे दोन तट पडणे अपेक्षीत होते ते घडले.

याविषयावर आणखी थोडा प्रकाश टाकु पहातो.

( संदर्भ : शास्त्र अस सांगत भाग -१ )

श्राध्द अशा लोकांनी कराव ज्याना पितरांना अन्न दिल पाहिजे या विचारावर श्रध्दा आहे.

ज्यांना अशी श्रध्दाच नाही त्यांनी काहीही न करणे श्रेयस्कर

श्रध्दा बसेल तेव्हा बसेल पण उशीरा बसली तर गेलेली वर्षे पितर तळमळतील अशी किमान श्रध्दा असणार्‍यांनी मध्यम पक्ष म्हणुन श्राध्द कराव.

वरील विचार माझे होते आता शात्र काय सांगत ते पाहु.

श्राध्द तीन प्रकारे करता येत.

१) चटावरचे श्राध्द ज्यात ब्राम्हणाला बोलाऊन समंत्रक अन्न देणे अपेक्षीत आहे.
२) दुसर्‍या प्रकारात फक्त श्राध्दाचे मंत्र म्हणणारे ब्राम्हण व भोजना ऐवजी शिधा देणे अपेक्षीत आहे.
३) तिसर्‍या प्रकारात संकल्प करुन एक वेळेच्या भोजना इतकी दक्षीणा देणे अपेक्षीत आहे.

या तिनही प्रकारे श्राध्द काही कारणाने ( पैसे नाहीत/ घरचे लोक श्राध्दाला संमत नाहीत ) इ अश्या वेळी श्राध्दाचे अधिकारी ( मुलगा ) याने दक्षीण दिशेला तोंड करुन काखा वर करुन आपली असमर्थता पितरांना सांगणे हा सुध्दा प्रकार शात्राला मान्य आहे.
( यावरुन काखा ( बगला ) वर केल्या असा वाक्प्रचार पडला आहे. )

वरील प्रकारे समंत्रक श्राध्द बरेच काळ ब्राम्हण समाजात रुढ होते. सांप्रत काळी ही श्रध्दा आणि श्राध्दे लोप पावत आहेत. खर सांगायच तर माझे वडील हे टाळत आले.

मी मात्र माझ्या पित्याचे मृत्युनंतर सर्व विधी ब्राम्हणद्वारा पुर्ण केले. वर्ष श्राध्द ही श्राध्दाचे ब्राम्हण बोलाऊन केले. एका शाळेला देणगीही दिली. उद्देश इतकाच की वडीलांना शिकणार्‍या मुलांना मदत केलेले आवडत होते. यानंतर मात्र पित्याच्या नावाने भात व पाणी त्या तिथीला ( वर्ष श्राध्दाच्या दिवशी व पक्ष तिथी ) छतावर ठेवतो. त्यांचे मनाने आवाहन करतो. मग ते कावळे खातात.

माझ्या मते यातला काही अंश माझ्या पितरांना मिळतो व बाकी सर्व निसर्गाच्या स्वाधीन होतो कारण संध्याकाळी कावळे / कबुतरे यांनी शिल्लक ठेवलेले काहीही नसते अर्थात वाया जात नाही.

ब्राम्हण सोडता इतर समाजात ब्राम्हण आणि समंत्रक श्राध्दा ऐवजी सर्व उत्तम स्वयंपाक करुन पितरांच्या नावाने अन्न बाजुला काढुन पुढे ते गाय/ कावळे आणि नदीत अर्पण केले जाते.

ब्राम्हण सोडता इतर समाज हे अतिशय श्रध्देने हे करतो ही मी अनुभवले आहे. यात खंड पडत नाही.
यात काय अर्थ आहे असे म्हणणारा ब्राम्हण समाजाशिवाय अन्य विद्वान मी पाहिलेला नाही

काही जणांनी तांदुळ श्राध्द, अक्षता इ कारणासाठी नष्ट होतो याबाबत खेद व्यक्त केला.

मी वरती लिहले आहे की श्राध्दात काहीही व्यर्थ नसते या ना त्या रुपात ते निसर्गाकडे जाते. सजीवांकडे जाते ज्यांना ह्या अन्नाची आवश्यकता असते.

मोठ्या लग्नात जेवणावळीत वाया जाणार्‍या ( उकिरड्यात फेकुन कुजणार्‍या )अन्ना पेक्षा हे सजीवांपर्यंत अन्न जाणिव पुर्वक पोचवणे माझ्या मते चुकीचे नाही.

मायबोलीवरच उन्हाळ्यात पक्षांना पाणी ठेवण्याचा आग्रह करणार्‍या मान्यवरांना माझा विचार नक्की पटेल.

शेती असलेल्या खेड्यात पक्षांची अन्नाची व्यवस्था आपोआप होते पण शहरात मात्र कावळे चिमण्या यांना जो पर्यंत जाणिवपुर्वक अन्न देणार नाही तो पर्यंत त्यांना ते कसे मिळणार ?

जमिनीवरच्या कचर्‍यातुन अन्न कुत्रे वा मांजरासारख्या प्राण्याच्या भितीमुळे पक्षांना शोधणे जास्त कष्टदायक आणि जोखमीचे आहे.

याही पेक्षा आणखी सुटसुटीत आणी मंत्र म्हणाणार्‍या ब्राम्हणांच्या अनुपलब्द्ततेवर पर्याय म्हणुन न्यु वे आश्रम लोणावळा यांनी एकाच वेळी किमान २०० श्राध्दे करण्याची पध्दत विकसीत केली आहे असे समजले आहे. माझ्या बहिणीने याचा अनुभ घेतला आहे.

सर्वपित्री अमावस्येला हा अनेकांसाठी हा विधि केला जातो. मंत्र स्पिकर्स वर म्हणले जातात. मंत्राचा अर्थ ही मराठित सांगीतला जातो. ज्यांना जमिनीवर बसता येत नाही अश्यांसाठी खुर्चीवर बसुन सर्व विधी करण्याची सोय आहे.
सर्व पित्री अमावस्येला सर्व पितर अर्थात आई/ वडील गुरु बहीण भाऊ शुश्वर काका मामा इतकच काय मित्र इ चे श्राध्द एकाच वेळी करण्याची सोय येथे आहे.

वर आलेल्या प्रतिसादात कुणीतरी हे सर्व केल्यावर समाधान लाभण्याचा उल्लेख केलाय तो मी अनुभवलाय.

चार्वाक म्हणतो त्या प्रमाणे ज्यांना "कर्ज काढुन फक्त स्वतःसाठी तुपच प्यायच आहे "त्यांनाही मोकळीक आहे.

हे केल्याचे आणि न केल्याचे परिणाम सुक्ष्म आहेत. गहन आहेत. आजच्या उपलब्ध्द शास्त्राने परिणाम सिध्द करणे अशक्यप्राय आहे त्यामुळे इतर बाबींवर चर्चा न करणे इष्ट ठरावे.

चार्वाक म्हणतो त्या प्रमाणे ज्यांना "कर्ज काढुन फक्त स्वतःसाठी तुपच प्यायच आहे "त्यांनाही मोकळीक आहे.

हा धागा "धार्मिक" मध्ये असल्याने मी इथे प्रतिसाद द्यायचे टाळतो. ज्यांची श्रद्धा आहे अशांनी आपापल्या मनाला जसे योग्य वाटेल तसे श्राद्ध करावे इतपत मला मान्य आहे. पण चार्वाकाचे एकच वाक्य संदर्भरहीतपणे उद्धृत करणे चुकिचे आहे. याच चर्वाकाने "जमिनीवरील ब्राम्हणांना जेवण दिल्याने आकाशातील पितरांचे पोट भरत असेल तर तळमजल्यावरील लोकांनी जेवण केल्यावर गच्चीवरील लोकांचे पोट भरेल काय? " असा प्रश्न उपस्थीत केला होता.

हे केल्याचे आणि न केल्याचे परिणाम सुक्ष्म आहेत. गहन आहेत. आजच्या उपलब्ध्द शास्त्राने परिणाम सिध्द करणे अशक्यप्राय आहे त्यामुळे इतर बाबींवर चर्चा न करणे इष्ट ठरावे.

श्रद्धेने केलेल्या विधींचे उगाचच ओढून ताणून वैज्ञानीक समर्थन करणे कशाला ? श्राद्ध केल्याने मानसिक समाधान मिळते इतके पुरेसे आहे.

जमिनीवरील ब्राम्हणांना जेवण दिल्याने आकाशातील पितरांचे पोट भरत असेल तर तळमजल्यावरील लोकांनी जेवण केल्यावर गच्चीवरील लोकांचे पोट भरेल काय? "

मा विजय कुलकर्णी- वरील अर्थाचा मुळचा संस्क्रूत श्रोक सांगु शकाल काय ? मी मांडलेल्या इतर मतांवर ( जाणीव पुर्वक पक्षांना अन्न ) एकमत झाले असते तर आनंद झाला असता.

चार्वाकाचे तुपाचे ( ऋण कृत्वः घृतं पिबेत ) उदाहरण भोगवादी वृती या अर्थाने आहे. जो समाज भोगवादी वृत्तीचा होतो त्याला न दिसणार्‍या पितरांचच काय पण दृष्य स्वरुपातल्या निसर्ग साखळीच सुध्दा काही देण घेण नसत या अर्थाने.

याच चर्वाकाने "जमिनीवरील ब्राम्हणांना जेवण दिल्याने आकाशातील पितरांचे पोट भरत असेल तर तळमजल्यावरील लोकांनी जेवण केल्यावर गच्चीवरील लोकांचे पोट भरेल काय? " असा प्रश्न उपस्थीत केला होता. >> आणि तो तुम्हाला मान्य आहे का?

मान्य असल्यास चार्वाकाच्या काळात भारतात बहुमलली घरे बांधण्याइतका प्रगत समाज रहात होता हे पण मान्य करावे लागेल.

Pages