Submitted by जागोमोहनप्यारे on 20 September, 2011 - 04:00
श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? जेवल्यास काय होते?
( एवढाच विषय लिहिल्याने सुरुवातीच्या काही प्रतिसादांमध्ये लोकांचा गैर्समज झाला आहे.. हा विषय खरे तर असा आहे.... >> श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण ब्राह्मण किंवा सवाष्ण म्हणून बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? जेवल्यास काय होते?
अर्थात इतर लोकही अशा जेवणाला टाळतातच, त्याबाबतही काही लिहिले तरी हरकत नाही.)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोक हो, >>> श्राध्द तीन
लोक हो,
>>>
श्राध्द तीन प्रकारे करता येत.
१) चटावरचे श्राध्द ज्यात ब्राम्हणाला बोलाऊन समंत्रक अन्न देणे अपेक्षीत आहे.
२) दुसर्या प्रकारात फक्त श्राध्दाचे मंत्र म्हणणारे ब्राम्हण व भोजना ऐवजी शिधा देणे अपेक्षीत आहे.
३) तिसर्या प्रकारात संकल्प करुन एक वेळेच्या भोजना इतकी दक्षीणा देणे अपेक्षीत आहे.
>>>
तात्पर्यः कसंही केलं तरी ब्राह्मणास 'अन्न दान /दक्षीणा' द्या. आता तो ब्राम्हण कोण हे जाउ द्या. जन्माने बाह्मण की ब्राह्मण म्हणून बोलाविलेला इतर ज्ञातीतील पुरुष हे गौण आहे. माझा वाद जातीशी नाही, प्वाटभरु पौरोहित्याशी आहे.
तर लोक हो, माझा प्रश्न,
माझा बाप मेला, त्याचा आत्मा तळतळतो हे कुणी पाहीले? अन तो तसा तळतळू नये म्हणून कुणा २ पायाच्य प्राण्यास जेवण रूपी लाच का देऊ मी? माझ्या घरातली ४ तोंडे सकाळ संध्याकाळ 'आ' करतात त्याची भ्रांत आहे मला. वर २ लोकांस कुठून आणून देऊ जेवण?
त्या बापाच्या आत्म्यास 'छोटी शिडी' लावून स्वर्गात पोहोचविण्याची अन थोपटुन थोपटून शांत झोपविण्याची गॅरंटी घेणारे हे लोक, कशावरून तो तिथे पोहोचला अन तळतळत नाही असे सिद्ध करतात? कुणा obscure ग्रंथात यांनीच लिहीले म्हणून्?
पटत नाही हो.
या सगळ्या लॉजिक मधे मी ४ लोकांच्या संसाराला सकाळ-संध्याकाळ जेवू घालण्याचा प्रयत्न करणारा गरीब ७०% सामान्य माणूस आहे, हे लक्षात घ्या, प्लीझ विसरू नका.
माझ्या पितरांना शांती लाभण्यासाठी, त्यांच्या नातवंडा पतवंडांना सुखात ठेऊ, त्यांची उन्नती करू २ वेळ प्वाटभर त्यांना घालू, की कर्ज काढून बापाचे दिवस वारे करू? अहो तो मेला त्या तारखेला तर करायलाच लागते श्राद्ध, वरून तो पित्तर पाठा. त्यात पन? काब्र भो? इथे काय झाड लागून राहिले काय पैक्या चे?
हा धागा "धार्मिक" मध्ये असल्याने मी इथे प्रतिसाद द्यायचे टाळतो.
हे पटले नाही. धर्म ही कुणा मूठभरांची जहागीर नाही. संपूर्ण हिंदू धर्मियांस त्यांचा धर्म काय, कसा अन तो कुणी सांगीतला, का सांगितला? त्यात त्यांना चूक वाटते त्याबद्दल शंका विचारण्याचा अधिकार आहेच आहे.
इथे मत मांडले की येऊन आस्तिकांच्या धाग्यात खुपसणारे नास्तिक वगैरे बडबड ऐकू येते. अरे हूट, देव काय कानात येउन सांगतो का तुमच्या? की अमक्याच्या कपाळावर त्याने नास्तिक शिक्का मारलाय म्हणून?
ता.क.
ते काखा वर करणे हा प्रकार किती हेटाळणीचा आहे हे तुम्हाला ठाऊक आहेच. गृहप्रमुख म्हणून कधी कोणत्या कार्यात काखा वर कराल का तुम्ही, शास्त्राला मान्य आहे म्हणून? कि कर्ज काढून पूर्ण कराल?
limbutimbu | 21 September,
limbutimbu | 21 September, 2011 - 14:40
अबे इब्लिसा, "ठेचून" हा शब्द आठवला नाही म्हणून ते लिहिलय, शिवाय "ठेचून" हा शब्द जरा जास्तच हिन्सक होतोय की काय अशामुळे देखिल लिहीला नव्हता! आता ठेचू? आय मी शब्द बदलू? डोळा मारा
>>>>
हे असले 'हिंसक' फार पाहिलेत मी आयुष्यात. डोळा मारण्याचा इमोट टाकला की तुमची हिंसा विनोदी होत नाही. मुद्दे टिकले नाहीत कि गुद्दे आठवतात. काय ठेचायचं आहे? डोळे मारण्याचे आय्कॉन न टाकता निधड्या छातीने सांगा एकदा, नक्की काय विचार आहे. दोन्ही प्रकारे उत्तर देईन. ते पण नेट वर हवे, कि प्रत्यक्ष, ते ही सांगून टाका!
मान्य असल्यास चार्वाकाच्या
मान्य असल्यास चार्वाकाच्या काळात भारतात बहुमलली घरे बांधण्याइतका प्रगत समाज रहात होता हे पण मान्य करावे लागेल. >>
माधव
बरा पकडलास. नाहीतर हे घर बाल्टीक वगैरेहून आयात केले असतील
आर्यांची घर.
माझा वाद जातीशी नाही,
माझा वाद जातीशी नाही, प्वाटभरु पौरोहित्याशी आहे. >>> का? असा वाद का असावा? सर्वांना निधर्मी, नास्तिक (खरे तर नास्तिक शब्द म्हणजे देवावर श्रद्धा नसणारा असा अर्थ नाही), अश्रद्ध वगैरे कसे राहता येईल. ह्या प्रश्नाचा समाजशास्त्रीय आणि मनोवैज्ञानिकदॄष्टीने विचार केल्यावर काय वाटते? जुन्या सामाजिक आणि अर्थव्यवस्थांचा आपला अभ्यास आहे का? कुठल्या धर्मात विनापौरोहित्य समाज आपणास आढळला का? नसल्यास त्याचे कारण काय असावे?
---------------------------
तुमची वरिल पोस्ट ही त्या त्या व्यक्तीचे मत म्हणून पाहा ना. तुम्ही जसे नास्तिक तसे काही आस्तिक असू शकत नाहीत का? मग मुळात जर ते आस्तिक आहेत हे "त्यांना" मान्य असेल तर हे करू नका, ते करू नका हे सांगण्याचा अधिकार इतर व्यक्तीला कसा काय येऊ शकतो? ज्याने त्याने ठरवावे. श्राद्ध करायचे करा, न करायचे नका करू. इतके सोपे आहे.
जो जे वांछिल तो ते लाहो!
हां श्राद्ध रुढीच बंद करा असे तुमचे म्हणणे असेल किंवा वर लिहिल्याप्रमाणे पोरोहित्यवर्गच तुमच्या आदर्श समाजव्यवस्थेत नसेल तर ते मांडण्याचे हे बाफ ठिकाण नाही कारण मुद्द्लात इथे सो कॉल्ड आस्तिकवर्ग श्राद्धाच्या चर्चा करत बसला आहे. ज्या तुमच्या माझ्यासारख्याला फालतू वाटतात. (हो मलाही) पण तशा चर्चा करायचा त्यांचा अधिकार मान्य करू या! आणि हिंदूंमधील अशा रुढी बंद करण्याकरता पाऊले वैयक्तिक स्वरूपात उचला. ( जसे नवीन बाफवर ह्या रुंढीवर लिहिणे कारण हा बाफ धार्मिक मध्ये आहे) आपल्या नातेवाईकांचे श्राद्ध न करणे, सत्यनारायणाला न जाणे अशा टाईपचे ज्यातून निदान हे स्वतः (पुरते) बदलले एवढे समाधान राहील.
मान्य असल्यास चार्वाकाच्या
मान्य असल्यास चार्वाकाच्या काळात भारतात बहुमलली घरे बांधण्याइतका प्रगत समाज रहात होता हे पण मान्य करावे लागेल
याचा मूळ युक्तीवादाशी संबंध काय? चार्वाकाच्या काळचा समाज प्रगत नव्हता असे मी कुठे म्हणले आहे? रसेल किंवा डॉकिन्स च्या कितितरी शतके आधी चार्वाकासारखे तर्कशुद्ध विचार मांडणारे माझ्या देशात होउन गेले याचा मला अभिमान आहे.
श्रद्धेने जे हा विधी करतात त्यांनी तो अवश्य करावा. त्यात विज्ञान घुसवू नये आणी चर्वाकाचा जडवादाला भोगवाद असे नाव देवून बदनाम करू नये हीच अपेक्षा.
मा. विजय कुलकर्णी, श्रद्धेने
मा. विजय कुलकर्णी,
श्रद्धेने जे हा विधी करतात त्यांनी तो अवश्य करावा. धन्यवाद ! पण जी पिढी हे प्रथमच करायला लागते त्यांच्या मनात प्रश्न पडतो की हे का करायच आणि ज्याच उत्तर जडवादात नाही.
हा सगळा विषय अत्यंत सुक्ष्म असा आहे.
जडवादाने नाही मान्य केल तरी माणसाला आत्मा आहे आणि म्हणुन मृत्युनंतर जीवन आहे. यात अनेक तर्काच्या पातळीवर मानता येईल अश्या गोष्टी आहेत. तर्काच्याच जोरावर चार्वाकाने सुध्दा अनेक विरोधाभास दाखवुन धर्मात घुसलेल थोतांड बाहेर काढल आहे. माझ्या मते आद्य शंकराचार्यांपर्यत ही घुसळण होत राहिली आणि त्यानंतर पुनश्च आणखी मुलभुत स्वरुपात धर्म आणि त्याला अनुरुप कर्मकांड पुढे आली जी आजची पिढी करत आहे.
त्यात विज्ञान घुसवू नये आणी चर्वाकाचा जडवादाला भोगवाद असे नाव देवून बदनाम करू नये हीच अपेक्षा.
यात विज्ञानाने बरच साध्य करता येईल. अस झाल तर प्रत्येक नवीन पिढीची श्रध्दा आणखी बळकट होईल. विषीष्ठ प्रकाराच्या फोटोग्राफीने दहावा किंवा अन्य विधिच्या वेळेला पिंडाला आत्मा स्पर्श करतो का हे पहाण्याची माझी इच्छा आहे. ज्यावेळेला कावळा पिंडाला कावळा शिवत नाही त्यावेळेला खरच आत्मा पिंडावर असतो का हे समजले तर हेच विधी अजुन सश्रध्दतेने पुढची पिढी करेल.
शास्त्रीय संशोधन करायच नाही आणि जे जे प्राचीन त्याला अंधश्रध्दा म्हणुन ठोकायच याला भोगवाद म्हणु नये अस का बर म्हणता ?
धर्म म्हणल की बंधन येत आणि ते झुगारण्यासाठी काही वेळा जडवादला आधार घेण्याची मानवी प्रवृत्ती आहे यात मला अत्यंत गैर असे काही वाटत नाही कारण हा मानवी स्वभाव आहे.
>>>> ब्राम्हण सोडता इतर समाज
>>>> ब्राम्हण सोडता इतर समाज हे अतिशय श्रध्देने हे करतो ही मी अनुभवले आहे. यात खंड पडत नाही. यात काय अर्थ आहे असे म्हणणारा ब्राम्हण समाजाशिवाय अन्य विद्वान मी पाहिलेला नाही <<<<
नितिनभौ, त्या सर्व पोस्टलाच अनुमोदन
श्राद्धाने होणारे परिणाम
श्राद्धाने होणारे परिणाम सुक्ष्म असतात. या विधिनंतर खरच एक समाधान मिळते (अर्थात ते केले तर आणि श्रद्धेने केले तर)
>> जमिनीवरील ब्राम्हणांना जेवण दिल्याने आकाशातील पितरांचे पोट भरत असेल तर तळमजल्यावरील लोकांनी जेवण केल्यावर गच्चीवरील लोकांचे पोट भरेल काय?<<<
या प्रश्नाच्या उत्तराबाबत म्हणायचे तर. असाच एक प्रश्न गोन्दवलेकर महराजांना विचारला होता. "जर राम राम असा जप केला तर राम भेटेल मग पैसा पैसा जप केला तर पैसा मिळेल काय?" त्यावर त्यान्नी खुपच छान आणि पटण्याजोगे उत्तर दिले होते. आता नीट्से आठवत नाही पण ज्यान्ना हवे आहे त्यान्नी गोन्दवलेकर महाराजांचे चरित्र (ले: के. वि. बेलसरे) नक्कीच वाचावे.
>>>हे असले 'हिंसक' फार
>>>हे असले 'हिंसक' फार पाहिलेत मी आयुष्यात. डोळा मारण्याचा इमोट टाकला की तुमची हिंसा विनोदी होत नाही. मुद्दे टिकले नाहीत कि गुद्दे आठवतात. काय ठेचायचं आहे? डोळे मारण्याचे आय्कॉन न टाकता निधड्या छातीने सांगा एकदा, नक्की काय विचार आहे. दोन्ही प्रकारे उत्तर देईन. ते पण नेट वर हवे, कि प्रत्यक्ष, ते ही सांगून टाका! <<<<
अरेच्च्या? तुमची आधीची विनोदबुद्धी तुम्हाला सोडून कुठे गेली? त्या बुद्धिने तुम्हाला नाक खाजवण्यावर अप्रत्य्क्षपणे अजुनही काय काय खाजविण्याचा श्लेष दर्शविता आला, मग त्यावर त्याच अनुषन्गाने मी शब्दच्छल केला तर विनोदबुद्धी सोडून गेल्याने आख्खे आयुष्य आठवावे? हे भयन्कर प्रकरण आहे हो! तुमच्या सोडून गेलेल्या विनोदबुद्धिला पुन्हा बोलावुन घ्या.
अन कस्लि निधडी छाती अन कस्ल काय, काय बोलता काय तुम्ही? टिचभर देखिल न भरणार्या धपापत्या हपापत्या धडधडत्या छातीचे आम्ही, तुमच्यासारख्याला कोण हो "ठेचू" पहाणार? कैच्याकैच मनोराज्ये रन्गवता बोवा तुम्ही!
सोईस्कररित्या "शब्दशः अर्थ घेऊन" गुद्दे ओढुनताणून का आणताहात? मुद्दे टिकले नाहित म्हणून की विनोदबुद्धीने रजा दिली म्हणून?
या पोस्ट मधे एकही इमोट की फिमोट काय म्हणतात ते टाकला नाहीये, प्लिज नोटच!
(पण दात विचकविल्याशिवाय पोस्ट अपुरी अपुरी वाटत्ये मला)
याचा मूळ युक्तीवादाशी संबंध
याचा मूळ युक्तीवादाशी संबंध काय? >> या बाफशी काहीच संबंध नाहिये (ती पोस्ट या बाफवर टाकल्याबद्दल दिलगीर आहे) पण केदारला बरोबर कळला त्या पोस्टीचा संबंध. तुम्हालाही कळला असेलच
नविन युक्तीवाद करताना आपण मागे केलेल्या युक्तीवादाशी फारकत तर घेत नाही ना हे पण बघितले पाहिजे ना?
पंगत चांगलीच लांबली..
पंगत चांगलीच लांबली..
जामोप्या आता इथे आलेल्या
जामोप्या आता इथे आलेल्या सगळ्याना जेवन घाला........................
तुम्हाला सुध्दा नकोत्या गोष्टी उकरुन काढण्याची सवय आहे.....धार्मीक बाब लिंबु भाउ ना विपु मधुन विचारत जावा...........
श्राध्द तर घातलेच नसणार तुम्ही नाही कुणाकडे गेले असल जेवायला...........उगाच आपले.....टाईमपास......
१. लिंबूसाहेबांची limbutimbu
१. लिंबूसाहेबांची limbutimbu | 22 September, 2011 - 10:12 नवी पोस्ट वाचली.
जाऊन द्या. तुमची इनोदबुद्धी जागी आहे. माझी जरा झोपी गेली, अन त्या गैरसमजातून थोडा संताप पण झाला होता. मिर्चीचा ठेचा करून भाकरी सोबत खाऊ घालीन कधी तरी अगदी प्रेमाने. माझा संताप माफ करा अन 'बो' घेउन टाका. ~दात न विचकता, मना पासून विनंती~
२. केदार,
तुमचे विचार मान्य.
>>
पण तशा चर्चा करायचा त्यांचा अधिकार मान्य करू या! --> संपूर्ण मान्य.
>>
आणि हिंदूंमधील अशा रुढी बंद करण्याकरता पाऊले वैयक्तिक स्वरूपात उचला. ( जसे नवीन बाफवर ह्या रुंढीवर लिहिणे कारण हा बाफ धार्मिक मध्ये आहे) आपल्या नातेवाईकांचे श्राद्ध न करणे, सत्यनारायणाला न जाणे अशा टाईपचे ज्यातून निदान हे स्वतः (पुरते) बदलले एवढे समाधान राहील.>>
स्वतः पुरते तर करतोच.
अन कृपया माझी पहिली पोस्ट देखिल वाचणार का? माझ्या बालबुद्धीने विनोदी प्रकाराने सांगितले होते, की बुवा मला बोलवा, मी येईन. पाप पुण्यापलिकडे, तुम्ही बोलावलंत, अन गेलेल्या माणसाची आठवण गोड करणे हा उद्देश असेल तर नक्कीच येईन.
यात थोडी चिडचिड याकरिता झाली की लिंबूकाकांनी उग्गा मला ओरडा घातला कि हा नास्तिक का नाक खुपसतो आहे इथे. याला आस्तिकता शिकवू या. मग म्हटलं जरा थोडं खुपसावं अजून. जाऊ द्या. ते तिरसट पणे वागणं चुकलं जरा.
----
धार्मिक नावाच्या बाफ वर आस्तिकांनी च येथे लिहावे असा इथे नियम असेल, तर माझ्या वाचनात आला नाही. त्याबद्दल क्षमस्व.
----
आता थोड्या फालतू (इब्लिस) शंका:
मी आस्तिक आहे कि नास्तीक याचे सर्टीफिकेट कुठे मिळेल अन त्यासाठी कुठे परिक्षा द्यावी लागते हे कुणी स्पष्ट करील काय?
तसेच धार्मिक क्रिया (कर्म-कांड या अर्थाने. ?करायच्या गोष्टी) करण्यासाठी आस्तिकच असावे लागते हे कुठे लिहीले आहे?
तसेच धार्मिक क्रिया
तसेच धार्मिक क्रिया (कर्म-कांड या अर्थाने. ?करायच्या गोष्टी) करण्यासाठी आस्तिकच असावे लागते हे कुठे लिहीले आहे?
आपण कित्येक वेळा बघतो की फारच थोडी आस्तिक्यबुद्धी असलेले लोक झाडून सगळे उपास करत असतात आणि पुर्ण आस्तिक असलेले फारच थोडे उपास करतात किंवा एकही करत नाहीत.
>>> कर्मकांड करण्यासाठी आस्तिक असावेच असे नाही तसेच आस्तिकाने सगळी कर्मकांडं करायलाच पाहिजेत असेही नाही
हा बाफ कुठून कुठे गेला !
जामोप्या - या बाफचे आता
जामोप्या - या बाफचे आता श्राद्ध घाला आणि पुढचा नवा बाफ सुरु करायचा विचार करा.
थोडे उपास करतात किंवा एकही करत नाहीत
--- उपवासाचे नाव काढू नका.... मला साबुदाण्याचे खमंग वडे, चमचमीत खिचडी, बटाट्याचे पापड आठवतात... आणि तोंडाला पाणी सुटते. काय मज्जा असते :स्मित:.
उपवासाची मिसळ, मँगो मिल्कशेक
उपवासाची मिसळ, मँगो मिल्कशेक अन् काय काय !
मला श्राध्दाचे वडे चालतील
मला श्राध्दाचे वडे चालतील फारच टेस्टी असतात.
पक्षाचे जेवण.. म्हणजे मला
पक्षाचे जेवण.. म्हणजे मला वाटले पारवा, व्हला, चतुर, पानकोंबडी, कांडाकरकोचा वगैरेंची काहीतरी पाकृची माहीती मिळेल.
आम्ही रामगा पण जेवलो आहे...त्यामुळे श्राध्दाचं चुकवायचा संबंध नाही.
आपली शंका दूर करतानाच
आपली शंका दूर करतानाच इतरानाही मदत व्हावी, असा उदात्त्त्त्त्त्त भाव धागा काढाणार्या प्रत्येकाच्याच मनात असतो... खाजगी विपु कशाला करायची?
जाता जाता , ज्ञान प्रबोधीनी
जाता जाता , ज्ञान प्रबोधीनी वाले ( कधी कधी महिलाही) आपल्या घरी येऊन सुटसुटीत श्राद्ध सांगतात. ते दक्षिणाही संस्थेसाठीच घेतात. छान उपक्रम.
prashant_the_one जाता जाता -
prashant_the_one
जाता जाता - आपल्या लोकांनी पिंड, पूजा, लग्न यात होणारी तांदळाची अक्षम्य उधळपट्टी थांबवली तर तांदळाची १०-१५% गरज कमी होईल कुणी पूजा, लग्न या साठी रिसायकल होउ शकणा-या मटेरिअलच्या इको-फ्रेंडली अक्षता का नाही तयार करत? अखंड बिझनेस मिळेल >>>>>>
तांदळाची अक्षम्य उधळपट्टी ???? ज्या देशात दर वर्षा॑ काठी ८००० कोटीचं धान्य शासकीय धान्य कोठारान्ची व्यवस्था नसल्याने सडून जाते तेथे तुम्हाला लोकांनी केलेली पिंड, पूजा, लग्न यात तांदळाची अक्षम्य उधळपट्टी
वाटते?
इको-फ्रेंडली अक्षता>>>>:?? अक्षता म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. तांदुळ असा एकच धान्य आहे ज्याचे
शेल्फ लाईफ सर्व धान्या त जास्त आहे. http://extension.usu.edu/foodstorage/htm/white-rice/
प्रकाश काळेल | 22 September,
प्रकाश काळेल | 22 September, 2011 - 19:06 नवीन
पक्षाचे जेवण.. म्हणजे मला वाटले पारवा, व्हला, चतुर, पानकोंबडी, कांडाकरकोचा वगैरेंची काहीतरी पाकृची माहीती मिळेल.
>>>
प्रकाशजी,
आजकाल 'पक्षाचे' जेवण म्हणजे ते इलेक्शन च्या काळात 'फाट्या'वरल्या ढाब्यावर कोंबडीचा पातळ रस्स अन आधी तीर्थप्राशन करून मिळणारे घाऊक जेवण असा अर्थ असतो.
रामगा हा नवीन शब्द ऐकला.. रामगा म्हणजे काय?
विवेक नाईक | साहेबजी, मला
विवेक नाईक |
साहेबजी,
मला वाटते अक्षत म्हणजे ज्यास क्षति पोहोचली नाही असे, संपूर्ण. क्षय होत नाही ते अक्षय असते ना?
ज्वारीच्या अक्षता पाहिल्या आहेत मी रच्याकने.
पक्ष २-३ दिवसात संपेल..
पक्ष २-३ दिवसात संपेल..
>>>ज्या देशात दर वर्षा॑ काठी
>>>ज्या देशात दर वर्षा॑ काठी ८००० कोटीचं धान्य शासकीय धान्य कोठारान्ची व्यवस्था नसल्याने सडून जाते तेथे तुम्हाला लोकांनी केलेली पिंड, पूजा, लग्न यात तांदळाची अक्षम्य उधळपट्टी वाटते? <<<
अनुमोदन
अन समजा नस्ते सडत तरीही, देशभरातल्या हॉटेलातुन जेव्हडे ताटात टाकलेले अन्न एका दिवसात वाया जाते त्यापेक्षा कितीतरी कमी प्रमाणात पिन्ड वगैरे धार्मिक कृत्याद्वारा अन्न वापरले जाते. अन उद्या समजा हॉटेलात्/घरात अन्न वाया घालवणे बन्द झाले तरीही, धार्मिक कृत्यात वापरल्या जाणार्या अन्नाबाबतचा आक्षेप विचारात घेतला जाणार नाही.
> मान्य असल्यास चार्वाकाच्या
> मान्य असल्यास चार्वाकाच्या काळात भारतात बहुमलली घरे बांधण्याइतका प्रगत समाज रहात होता हे पण मान्य करावे लागेल.
चार्वाक हा शब्द पहिल्यांदा सातव्या शतकात वापरल्या गेला.
ऐहोले हे चौथ्या ते सहाव्या शतकातील आहे. तिथे दुमजली मंदिरे आहेत. (बदामी जवळ. सुंदर आहे. भारताच्या विधानसभेचे मॉडेल तेथील एका मंदिरावरुनच ठरवले आहे).
दुमजली घरे असायची हे त्यावरुन सिद्ध होत नाही, पण टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीस्ट्स नक्कीच उपलब्ध होते.
बहुदा ब्राह्मण खालच्या मजल्यावरील लोकांनी श्राद्धाला बोलावले तर जात नसावेत - ते वरच्या मजल्यावरील लोकांपर्यंतच पोचेल म्हणुन.
महाभारतात चार्वाकाचा उल्लेख
महाभारतात चार्वाकाचा उल्लेख आहे म्हणे.
हिंदूंमधील अशा रुढी बंद
हिंदूंमधील अशा रुढी बंद करण्याकरता पाऊले वैयक्तिक स्वरूपात उचला. .>>>>>
फक्त हिंदूं जुन्या बुरसट विचाराचें ! सर्वपीत्री अमावास्या, श्रा ध्द, सगळेच जुने परंपरा जपणारे.
पण फक्त हिन्दु धर्मा त च ही प्रथा आ हे का? ALL SOULS DAY किन्वा SHABE E BARAT
हे सुध्दा सर्व पीत्री अमावास्या सारखेच साजरे केले जातात.
रमजानच्या शेवटच्या आठवड्यात
रमजानच्या शेवटच्या आठवड्यात मुसलमान लोकही इद अल फित्र साजरे करतात... पितर, पॅट्रोनस, फित्र.. शब्दही किती सिमिलर आहेत..
तांदळाची अक्षम्य उधळपट्टी
तांदळाची अक्षम्य उधळपट्टी ???? ज्या देशात दर वर्षा॑ काठी ८००० कोटीचं धान्य शासकीय धान्य कोठारान्ची व्यवस्था नसल्याने सडून जाते तेथे तुम्हाला लोकांनी केलेली पिंड, पूजा, लग्न यात तांदळाची अक्षम्य उधळपट्टी
वाटते >>>>>
म्हणून अक्षता मध्ये तांदूळ घालवणे व्यवहार्य आहे? म्हणजे दुसरे करतात म्हणून आपण सुद्धा तेच करायचे ? आपला त्या नासाडीतला हा खारीचा वाटा !!
1,000,000 कुटुंबांनी दर वर्षी फक्त १०० ग्रॅम तांदूळ अक्षता मध्ये घालवले तर 100,000 किलो तांदुळ दर वर्षी वाया गेले! संपूर्ण जगातल्या हिंदू कुटुंबांचे असे गणित केले तर काय आकडा येईल?
थोडक्यात, "असे का?" असं न विचारता "बाबा वाक्यं प्रमाणं" असंच पुढे चालू ठेवायचं की जे अयोग्य दिसते ते थांबवायचे? लहानपणापासून आपले झालेले "कंडिशनिंग" ओळखून त्यात शक्य ते दुरुस्त करायचे की मागल्या पिढीच्या चुका परत पुढे चालू ठेवायच्या? सगळं आपल्या हातात आहे !!
आणि काहीही दुरुस्त करायचे नसेल तर मग इको फ्रेंडली गणपती तरी का बनवायचा? होउदेत की जे काही नुकसान पर्यावरणाचे होत आहे ते ! आपल्याला काय? पुढची पिढी घेईल बघून.. नाही का?
Pages