श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण

Submitted by जागोमोहनप्यारे on 20 September, 2011 - 04:00

श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? जेवल्यास काय होते?

( एवढाच विषय लिहिल्याने सुरुवातीच्या काही प्रतिसादांमध्ये लोकांचा गैर्समज झाला आहे.. हा विषय खरे तर असा आहे.... >> श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण ब्राह्मण किंवा सवाष्ण म्हणून बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? जेवल्यास काय होते?

अर्थात इतर लोकही अशा जेवणाला टाळतातच, त्याबाबतही काही लिहिले तरी हरकत नाही.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी ताई, अगदी बरोबर,
देवाला मानतो. इतक्यातच मामे बहीणीचं लग्न आहे. म्हणून थोडी धाकधुक होती कि - जावे? , न जावे? काय करावे?.
तुमचा सल्ला मोलाचा आणि मार्गदर्शक वाटतो. म्हणून धन्यवाद! Happy

तीन वर्ष धाग्याला वर्षश्राध्हाला काही मिळालं नाही, म्हणून ते भूत होऊन वर आलं.

ह्या सगळ्या भंपक रुढींचच एकदा फायनल श्राद्ध घालायची वेळ आली आहे खरं तर... असो. तुमचं चालुद्या ( शेवटी हे वाक्य टाकलं म्हणजे इतरांना तुच्छ लेखल्याचं भयंकर म्हणजे भयंकरच सात्विक समाधान मिळतं फिदीफिदी )>>>>>>:हहगलो: आधुनीकतेचा बाफ वाचत होते काउन्ची ही लिन्क सापडली.:फिदी:

मी जवळच्या नातेवाईकांच्या श्राद्धाचे जेवण मी जेवलेय आणि त्याने काहीही अपाय होत नाही (मला काही झालं नाही).मुळात अन्न हे अन्न असते .श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण चांगले नाही आणि केवळ इतर प्रसंगांचे चांगले ,(शुभ -अशुभ)असे काही नसते. श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण खाउ नये यावर माझा विश्वास नाही. (घरातील जेष्ठ व्यक्ती सांगतात की या ज्या परंपरा आहेत त्या पाळ्ण्यामागे नक्की चांगला हेतु असतो.वाईट नाही. )

श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण ब्राह्मण किंवा सवाष्ण म्हणून बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का?

हा विषय आहे.

घरातल्या नातलगाच्या श्राद्ध्हाचे जेवण जेवणे वेगळे आणि ब्राह्मण म्हणुन दुसर्‍याच्या घरी जाउन तिथे जेवणे वेगळे

<<अर्थात इतर लोकही अशा जेवणाला टाळतातच, त्याबाबतही काही लिहिले तरी हरकत नाही>> (विषयाला)धाग्याला अनुसरुनच आहे . मी इतर मधे मोडते (अजुनतरी) .म्हणुन लिहिलेय(वैयक्तिकरीत्या मात्र जातीपाती, धर्म ,देश यातील भेदभाव मी मानत नाही . माणुसकी वर माझा विश्वास आहे.)

श्राद्धाच्या जेवणाला टाळतात?? ऐकावे ते नवलच Uhoh

आमच्यात भोपळ्याचे वडे, काळ्या वाटाण्याचे सांबार, दह्याची कोशिंबीर, आंबट वरण - भात, आणि तांदळाची खीर असा फक्कड बेत असतो, लोणचे पापड आणि दोन प्रकारच्या चटण्या ओघाने आलेच..

कोण म्हणले जाऊ नका.. मला तर आवडते Happy

अंत्य विधी म्हणजे काय

आमच्या ओळखीचे एक गृहस्त वारले होते तर काही लोक हार फुले प्रेताला वाहण्यासाठी विचारत होते तर तेथील नातेवाईकांनी "अजून अंत्यविधी झालेला नाही" असे सांगितले

तर अंत्य विधी म्हणजे काय तो कसा करतात कुणाला अनुभव व कुठे प्रत्यक्ष पहिले आहे का

आमच्यात भोपळ्याचे वडे, काळ्या वाटाण्याचे सांबार, दह्याची कोशिंबीर, आंबट वरण - भात, आणि तांदळाची खीर असा फक्कड बेत असतो, लोणचे पापड आणि दोन प्रकारच्या चटण्या ओघाने आलेच..

कोण म्हणले जाऊ नका.. मला तर आवडते स्मित>>>>> काय????????? हे अस चमचमीत जेवण अशासाठी बनवतात की हे झाल ते ईश्वरइच्छा समजून शोक आवरून पुढे जगण चालू ठेवायच....तुम्हाला ते आवड्ते?????.......मी तर कधीही ते नीट जेवू शकलेले नाहीये.......कायम मी बरेच पदार्थ काढून ठेवते जेवण सुरु करण्यापूर्वी

मूळ मंत्र काय आहेत त्यांचे किती महत्व आहे. सर्व पारंपारिक विधी करायलाच हवेत का, असे इ. प्रश्न पडणार नसतील आणि सुटसुटीत काम हवे असेल तर ज्ञानप्रबोधिनीकडून करायला हरकत नाही.

माझे वडिल जिवंत असेपर्यन्त मला कोणी श्रधाचे जेवणासाठी बोलवीत नव्हते, मात्र वडिल वारल्यानंतर, बोलावू लागले व मी ही मनात कोणतीही शंका न ठेवता , जेवणाचा आनंद , " अन्न हे पूर्ण्रब्रह्म " म्हणून घेत आहे व यापुढेही घेत रहाणार.अन्न हे शेवटी अन्न आहे, हे ध्यानात घ्यावे.आता तुम्हाला अगदीच " पिंडाचे भाताचे गोळे " तर खाऊ घालत नाही ना ? तेच अन्न त्याच घरातील माणसे ही खात असतातच ना ? काही ' बाधा ' व्हायची तर त्यांना ही व्हावयास हवी, पण तसले काही होत नाही.आणि असे हे प्रश्न , ज्यांची पोटे भरलेली असतात, त्यांनाच पडू शकतात.ज्यांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत पडलेली असते, त्यांना कोणी बोलवीत नाही. आमच्या ओळखीच्या एक शिक्षिका होत्या, त्या त्यांच्या वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी चक्क पाच भिकार्‍यांना पोटभर जेऊ घालत असत , शिवाय कपड्यांचा एक जोड भेट म्हणून देत असत. असे व्यक्तिमत्व अलिकडे दुर्मिळच ! !

असे हे प्रश्न , ज्यांची पोटे भरलेली असतात, त्यांनाच पडू शकतात.ज्यांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत पडलेली असते>>>>>>>>> असहमत. माझ्या भावाच्या बाराव्याचे जेवण देवळाजवळील भिकार्‍यांना द्यायला गेलेल्यांनी सांगितले की ते अन्न त्या भिकार्‍यांनी न घेतल्यामुळे समुद्रात सोडले,बरेचजण असे जेवण किंवा पाणीही पित नाहीत.मात्र बाराव्याचे प्रसादाचे जेवण म्हनून जेवतातही.

Pages