५ महिन्याच्या बाळाचा आहार आणि झोप

Submitted by तनू on 31 January, 2011 - 02:15

मी मायबोली ची नवीन सदस्य आहे, माझा मुलगा आता ५ महिन्याचा आहे. तो नीट झोपत नाही. म्हनजे १०-१२ तास झोपतो फक्त. त्याला व्यवस्थित झोपन्यासाटी काय करु??

मि त्याला खालिल प्रमाने आहार देते
९ am- १ मारि बिस्किट दुधाबरोबर
११.३० am- नाचणी सत्व
झोपून उटल्यवर दूध (१ किवा २ वेळा)
६ pm- १ मारि बिस्किट दुधाबरोबर
८ pm- गुटी + breastfeeding
१० pm - तादूळ अणी मुगाच्या डाळीची खिमटी
रात्रि तो उटेल तेव्हा breastfeeding

व्यवस्थित झोपन्यासाटी आहारात काहि बदल करायला हवेत का? किवा ईतर काहि उपाय असेल तर सांगा please

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत रागी फ्लोर या नावाने मिळते त्यालाच नाच्णी सत्व म्हणतात का? मी सगळे जुने bb वाचुन काढ्ले पण उत्तर सापड्लं नाही, प्लीज सांगा.

अवंतिका, हे पहा:
http://wholesomebabyfood.com/

ईथल्या स्टेज १ च्या रेसीपी पहा. ऑफिस सांभाळून करता येण्यासारख्या आहेत. किंवा साबांना पण जमतील.
फॉर्मुला साठी तूच प्रमाणात पावडर काढून वेगवेगळ्या वाट्यात ठेव आणि त्याला लागणारं पाणी, बाळाला पाजायच्या बाटल्यांमध्ये भरून ठेव. त्यांना आयत्यावेळेस फक्त पावडर बाटलीत घालून नीट हालवून द्यायला सांग.

( गायीच्या दुधाविषयी परदेशात आणि देशात मतांतरे आहेत. परदेशात ते, आपल्याला मिळेपर्यंत त्याच्यावर झालेल्या प्रक्रीयेमुळे नको म्हणतात, अ‍ॅलर्जीच्या धोक्यामुळे. बालाजी तांब्यांच्या आयुर्वेदाच्या पुस्तकात चालेल म्हणून सांगतात. माझी आई पेडी आहे भारतात. ती बर्याच पेशंट्स ना, ज्याना काही कारणामुळे दुध (देता) येत नाही किंवा फॉर्मुला आजीबात परवडत नाही त्याना, गायीचे दुध, पातळ करून चालेल म्हाणून सांगते )

रागी म्हणजे नाचणी पण रागी फ्लार म्हणजे नाचणी सत्व नाही. इथे अमेरिकेत नाचणी सत्व मला तरी मिळाले नाही. मी भारतातुन मागवायचे लेक लहान होता तेव्हा.

चार महिन्याचे झाल्यावर तांदळाची पेज, मूगाच्या डाळीची भाजून केलेली भरडी - त्याची पेज, भोपळा, केळे असे एकेका आठवड्याच्या अंतराने चालू केले. अंतर यासाठी की बाळाला काय पचते ते कळावे. दात शिवशिवायला लागले तेव्हा एक मोठी खारीक चघळायला देत होते. चावून चिकट झाली की काढून टाकून देत असे. दोन महिने असे झाल्यावर पेज थोडी घट्ट करायला सुरुवात केली. भोपळ्याच्या जोडीला फरसबीच्या शेंगा उकडून लगदा करून सुरुवात केली. मग मऊ भात, व त्यात शिजताना बोटभर गाजराचा तुकडा टाकायला लागले. तो तुकडा मुलाला चघळायला देत असे.

मीहि ऐकले आहे पीठ वापरता येते.
पीठ भाजुन अर्धे पाणी अर्धे दूध घेउन खीर बनवावी का? भाजयची गरज आहे का?

बाळ १ वर्‍शाचं होइपर्‍यन्त त्याला मीठ वा साखर देउ नये असे वाचण्यात आले आहे. भाजयाची फळाची पेस्ट खातो तो मीठ न टाकता पन नाचणी ,खिचडि, मउ भात हे असे पदार्‍थ मीठ न टाकता तो कसा खाईल ? अनि मी प्रयत्न केलहि पण मीठ लागतेच त्याला. १ग्राम पेक्शा जास्त मीठ देउ नये म्हणे. आता वयानुसार quantity वाढल्याने त्या पदार्‍थातलं मीठाचं प्रमाण ही वाढतं. काय करु?

सुप्रिया, खातात मुलं मीठाशिवाय. आपल्याच डोक्यात असतं कसं खाईल वगैरे. माझा मुलगा मीठाशिवायच वरण भात (प्युरी करून) खातो. वाटलंच तर थोडा हिंग टाकता येईल.

मुलांना सुरवातीपासूनच जर साखर, मीठ यांची चव माहित नसेल तर आरामात खातात ते. पण एकदा का सवय झाली त्या चवींची (मीठ, साखर यांची) कि मग मात्र अळणी पदार्थ खायला कुरकुर करु शकतात.

माझी मुलगी ५ महिन्यांची आहे. तिला मि २ वेळा फोर्मुला मिल्क देते आणि सकाळी १ वेळा पेज देते. पण तिचे वजन कमी आहे असे डॉ चे म्हणणे आहे. मग तिल मि अजुन १ पेज चे टाइमिंग वाढवु का?
पण मग संन्ध्याकाळी २ लगेच वरचे दिले तर माझ्या दुधावर कही परीणाम होइल का?
म्हन्जे ७ वाजता पेज आनि ९ वाजता फोर्मुला तर चालेल का? मला माझे दुध लवकर बन्द करायचे नाहिये. पण तिचे वजन पण वाढायला पाहिजे.
सध्यातरि मि सकाळी ९ वजता फोर्मुला मग १ दा माझे मग १:३० - २:०० वाजता पेज मग जसे लागेल तसे माझे दुध आणि रात्री ९-१० वाजता फोर्मुला असे देते. तर आत मी पेज का फोर्मुला चे टाइमिंग वाढवु?

जितक जमेल तेवढ अंगावर पाजलेल उत्तम .दूध पुरेस येत नसेल ,मुलाची भूक भागत नसेल तर गाईच दूध चालेल .फळ मऊ करून ,भाज्यांच सूप्,पेज वगैरे ,हे दुपारी बारा पर्यंतच .संपूर्ण बाहेरच दूध असेल तर एक लिटर दूध दिवसभरात लागतच .डॉक्टरांचा सल्ला केव्हाही चांगलाच .मूल जितक जास्त झोपेल तितक चांगल .

धन्यवाद छाया.

मुलांचे पोट भरले हे कसे समजावे? माझी मुलगी पेज खाताना पहिले २-४ घास बाहेर काढते मग जरा २-४ घास व्यवस्थित खाते मग परत बाहेर काढते. पण खात असते. पण तिचे पोट भरले आहे का नाही हे मला कळतच नाही. कारण बाहेर काढत असली तरी जेव्हढे देईन तेव्ह्ढे खात असते. मग मीच माझे प्रमाण ठरविले आणि त्याप्रमाणे देते. पण कधी कधी वाटते तिला अजुन दिले तरी खाईल. पण बाहेर काढत खात असल्यामुळे मी जास्त देते की कमी हेच मल कळत नाही तर ह्यासाठी मी काय करु मला कोणी सांगाल का? पेजेचे प्रमाण वाढवु का अजुन दुसरे टॉप फीडींग वाढवु?

नाचणी दुधात शिजवून देता येईल हवे असल्यास.

मुलांचे पोट भरले हे कसे समजावे? >> ती किरकीर करत नाही ना? झोपते ना व्यवस्थित? खेळते ना नीट? अस्वस्थ नसते ना?
दर तीन तासांने काहीतरी द्यायचो आम्ही.

टोन्ड मिल्क मग गायीचे दूध असे हळुहळु सुरु करता येईल. आधी एकच फीड मग ते पचतेय नीट असे कळल्यावर मग दुसरे.. असे फॉर्म्युला फीड हळुहळु बंद करता येईल. टोन्ड मिल्क आणि गायीच्या दुधात फॉर्म्युलापेक्षा जास्त कॅलरीज असतील त्याने वजन वाढायला मदत होईल.

गाई च दुध सगळ्यात उत्तम, माझ्या डॉक नि फोर्मुला मिल्क चा डब्बा फेकून द्यायला सांगितला होता, त्याला दुधामध्ये, चिकू, केळं, आंबा, असा फ़क़्त वासापुरता / चवीपुरता घालून ते दुध द्यायचे, Cerelac वगैरे बिग नो , भ्याजांचा सूप देणे- कूकर ला भ्याज्या लावणे, त्यात, मीठ, तूप घालणे म्हणजे बाळाचा पोट साफ होत, नंतर मिक्सर मधून काढून देणे दात येयीपर्यंत. खिमट, रव्याची खीर, नाचणी, फळं, बिस्किट फ़क़्त Digestive कोंड्याचा असत ते, मैदा नसतो etc you have to give, my baby is now 1.5 year old, he started eating all these things 5 month onwards, but nothing can beet breast feeding so if you all new moms have it please feed your babies till you can and he demands..

वरण भाताचे पाणी कधीपासुन देता येते? मी सध्या पेज देते आहे
२ वेळेस तर ती १वेळेस देउन १वेळेस वरण भाताचे पाणी देउ? का २ वेळेस पेज आणि १ वेळेस वरण भाताचे पाणी देउ?
आणि जुस द्यायचा असेल तर केव्हा आणि कसा देउ?
तसेच नाचणी सत्व फोर्मुला मिल्क वपरुन देता येते का? ते पण कधी सुरुवात करु?
खुप प्रश्न आहेत काय करु ते कळतच नाही.

निर्मयी... तूला बाळाबद्द्ल काही विचारायचे असल्यास सर्वप्रथम तू डॉ. चा सल्ला घे.
माझ्या मुलाच्या वेळी विचारलेले तेव्हा ते बोललेले कि, चार महिन्यानंतर हिरव्या सालीचे पुर्ण पिकलेले केळे , सफरचंद ( उकडून गर काढून )दिले तर चालेले.

http://www.maayboli.com/node/5215

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93902.html हे पण नक्की वाच

मला माझ्या बाळाला नाचणी सत्व चालु करायचे आहे ते कसे करायचे मला प्लिज सांगाल का?
मझ्याकडे नाचणी सत्व आहे पीठ नाही त्यामुळे ते कसे शिजवायचे (दुध न वापरता) आणि तसेच फोर्मुला मिल्क वापरुन कसे देता येइल ते पण सांगा?

निर्मयी, सुरुवात करताना वाटीभर दुधाला (गायीचे दुध किंवा मग पाणी) छोटा चमचाभर सत्व पुरते. त्यातही पाव वाटी दूधात सत्व नीट मिक्स करुन घे, गोळे राहायला नकोत. मग ते पाव वाटी दुध-सत्व बाकीच्या दुधात मिक्स कर. मग दूध मंद आचेवर गॅसवर ठेव. सारखे ढवळत राहा. साधारण ३-४ मिनिटात ते खीरीसारखे घट्ट होउ लागते आणि सायीप्रमाणे वर येउ लागते. मग खाली उतरवून लगेच वाटीत काढ. नाहीतर भांड्याला लागून करपते.
बाळ थोडे मोठे झाले की दूध आणि सत्व दोन्हीचे प्रमाण वाढव.
फोर्म्युला घालून काही शिजवता येत नाही. दोन्ही एकत्र द्यायची गरज नाही असे माझे मत.

हे सत्व पाण्यातुन दिले तर चालते का>> हो नक्की. जुन्या बीबी वरही या विषयावर बरीच माहिती आहे. तीही पहा.

निर्मयी, मी असं करते:
- एक कप पाणी छोट्या पातेलीत उकळायला ठेवते.
- एका वाटीत एक मोठा चमचा भरून सत्व घेते. त्यात तीन चार चमचे गार पाणी घालून नीट कालवून घेते.
- मग हे मीश्रण उकळत्या पाण्यात घालून नीट हलवते. पीठाला चकाकी आली की शिजलं असं समजावं.
- हे बरच घट्ट असतं. मग खायला देताना, त्यात दूध / फॉर्म्युला मीक्स करून, थोडं सरसरीत, करून देते.
- जराशी गोडसर चव करायची असेल तर खजूर भिजवलेलं पाणी वापरायचं.
तुझं बाळ किती महिन्यांचं आहे ते माहीत नाही, पण ७-८ महीन्यांचं झलं की याची धिरडी घालून, छोटे तुकडे करून दूध/ फॉर्म्युलात भिजवून "फिंगर फूड " म्हणून देऊ शकतेस.

वरदा, खजूर भिजवलेल्या पाण्यात नाचणीचं सत्व ( त्यात कधी कधी गव्हाचं सत्व मिसळते ) घालून भजीच्या पिठा पेक्षा थोडंसं सैल भिजवते आणि नॉनस्टीक पॅन वर एक थेंब तूप टाकून त्यावर एक चमचा पीठ पसरते ( चमच्यानेच ). दोन्हीकडून शिजलं की छोटे तुकडे करून देते.
अंडं दिलेलं चालत असेल तर गव्हाच्या सत्वात अंडं फोडून त्याचीही छोटी धिरडी/ऑमलेट घालून देता येतात.
( मी पूर्ण देते, पाण अ‍ॅलर्जीची भीती वाटत असेल तर फक्त पिवळे देऊ शकता. त्यात भरपूर ओमेगा ३ असते )

अरे वा मस्त आयडीया आहे. गव्हाचं सत्व शिजवून घेत्तेस ना आधी? मग कच्चं अंडं घालून धीरडी ना?

Pages