५ महिन्याच्या बाळाचा आहार आणि झोप

Submitted by तनू on 31 January, 2011 - 02:15

मी मायबोली ची नवीन सदस्य आहे, माझा मुलगा आता ५ महिन्याचा आहे. तो नीट झोपत नाही. म्हनजे १०-१२ तास झोपतो फक्त. त्याला व्यवस्थित झोपन्यासाटी काय करु??

मि त्याला खालिल प्रमाने आहार देते
९ am- १ मारि बिस्किट दुधाबरोबर
११.३० am- नाचणी सत्व
झोपून उटल्यवर दूध (१ किवा २ वेळा)
६ pm- १ मारि बिस्किट दुधाबरोबर
८ pm- गुटी + breastfeeding
१० pm - तादूळ अणी मुगाच्या डाळीची खिमटी
रात्रि तो उटेल तेव्हा breastfeeding

व्यवस्थित झोपन्यासाटी आहारात काहि बदल करायला हवेत का? किवा ईतर काहि उपाय असेल तर सांगा please

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ओट्स बद्दल चौकशी करते आहे. आणि आयुर्वेदाप्रमाणे एखादे गोष्ट का चूक तेही विचारते आहे. (डायेटिशियन आणि आयु वैद्य दोघांकडे) अर्धी माहिती मिळाली आहे पुढची मिळाली की अपडेट करेन.

ओटस बद्दल मला माहीत नाही त्यामुळे...
बाकी वल्लरीच्या प्रतिसादात म्हटल्या गेलेल्या बाटली सह सर्वच मुद्द्यांना अनुमोदन. हल्ली डॉक्टरही आवर्जून बाटली ने दूध देऊ नका असं म्हणतात. मी अर्णवला आठवड्याच्या आतच वाटी चमचा वापरायला सुरूवात केली. सव्वा वर्षभरात तो पेल्याने पाणी, दूध प्यायला शिकला.

७ महिन्याच्या मुलाला अंड्याचे कोणते पदार्थ खायला घालतात
घरी कोणी खात नाही पण डॉक्टर ने वरचा आहार चालू करण्यास सांगितला आहे त्यात त्याने त्याला अंडे द्या म्हणुन सांगितले

उकडलेल्या अंड्याचा बलक कुस्करून थोडासा द्यावा.आठवड्याभर तेच प्रमाण ठेवून नंतर वाढवावे.

. हल्ली डॉक्टरही आवर्जून बाटली ने दूध देऊ नका असं म्हणतात. >> का? प्लॅस्टिक वाईट म्हणून? हायजिन स्टँडर्ड फॉलो केलं जात नाही म्हणून? का इतर काही कारण?

माझ्या बाळाच्या पेडीनं असं काही नाही सांगितलं अजून तरी.

बाटलीचा कम्फर्ट झोन एकदा मिळाला की बाळं इतर खाणं गिळायला फार त्रास देतात म्हणून हे प्रमुख कारण. दुसरं बाटलीचा हायजिन मेन्टेन करण्यापेक्षा वाटी चमच्याचा हायजिन मेन्टेन करणे सोपे जाते म्हणून. तिसरं बाटली "सोडवण्" हे एक वेगळंच काम होऊन बस्तं म्हनून.

आमच्यापण पेडीने बाटली चालू केली तर सातव्या आठव्या महिन्यात सोडवायची असेल तरच चालू करा अन्यथा वाटी चमचा बेस्ट असे सांगितले होते.

हो मला पण वाटी चमचा च वापरा सांगितल होत.. त्यानी वरील सर्व कारणांबरोबरच अजुन एक कारण सांगितले होते की.. आई च दुध पिताना जेवढी शक्ती बाळ लवतो त्यापेक्शा जास्त बटलीतुन दुध ओढायला जातो.. आणि त्यामुळे लहान कंटिन्युअस पिणार्या बाळांना त्रास्दायक होउ शकत ..

आमच्या आरोग्यसेविकेने उलटे सांगितले होते, की बाटलीतून दूध जास्त सहज येते, त्यामुळे बाळे आईचे दूध जोरकसपणे पीत नाहीत, त्यामुळे दूध कमी होऊ शकते. बाटली निदान पहिले ६ आठवडे टाळा असे सांगितले होते.

बाकी सहा महिन्याच्या बाळाला ते खाईल ते सगळे (बिनमिठाचे/ बिनसाखरेचे) दिलेले चालेल असे सांगितले होते. आम्ही उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, रताळ्याच्या फोडी, कच्च्या काकडीचे काप (दात शिवशिवताना विशेष उपयोगी), केळ्याच्या सळ्या, असे मुख्यतः बाळ आपापले हातात धरून खाऊ शकेल असे पदार्थ सुरुवातीला देत असू. जिभेचा रिफ्लेक्स कमी झाला की मग पाणी, दही, मऊ भात वगैरे. (लहान बाळांना काहीही तोंडात दिले तर ते सहसा बाहेर येते. केवळ चोखून पिण्यासारख्या - थेट घशात जाणार्‍या गोष्टीच चालतात. ते या रीफ्लेक्समुळे. त्यामुळे सहा महिन्याच्या आतल्या बाळाला वाटी चमचा वगैरे वापरून उपयोगी नाही. (इति डॉक्टर, सुइणी, आरोग्यसेविका, माहितीजाल वगैरे.))

गाईचे दूध, मध इत्यादी पदार्थ एक वर्ष पूर्ण झाल्यावरच.

आमचे बाळ ६ महिन्याचे आहे. आम्ही त्याला वर लिहिलेले सर्व पदार्थ आलटुन पालट्न देतो. तो १० ते १२ तास झोपतो, व्यवस्थित खेळतो. त्याचे वजन पण व्यवस्थित आहे. पेडि ने सांगितले कि त्याला सेरेलॅक चालू करा.
पेज, डाळीचे पाणी, उकडलेले सफरचंद, फळांचा रस, नाचणी सत्व, भाज्यांचे सूप चालू असताना व बाळाचे वजन व्यवस्थित असताना सेरेलॅक द्यायची गरज आहे का?

सेरेलॅक मधे काही जास्तीची पोषणमूल्ये असतात का जी ह्या वरच्या पदार्थामधे नसतात ? नेटवर त्यामधे १०० ग्रॅम मधे ९ ग्रॅम फॅट ६९ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असे दिले आहे. हे शरिराला हानीकारक नसतात का?

सेरेलॅक देण्याचे काही तोटे किंवा फायदे कोणी महित असल्यास सांगू शकाल का ?

आमच्या पेडिने सांगितले कि गाईचे दूध देऊ नका. त्या मधे क्षार असतात. त्यापेक्षा दूधाची पावडर द्या. कोणी याबद्दल पण मार्गदर्शन करु शकेल का ?

पेज, डाळीचे पाणी, उकडलेले सफरचंद, फळांचा रस, नाचणी सत्व, भाज्यांचे सूप चालू असताना पेडि ने सांगितले कि त्याला सेरेलॅक चालू करा............पेज म्हणजे फक्त वरचे पाणी नव्हे ना? तांदूळ,मूगडाळ ,थोडी नाचणी धूवून वाळवून,भाजून कोरडीच मिक्सरमधून पूड करून ठेवायची. एक छोटा चमचा पूड पाण्यात शिजवून मी देत असे.

आमच्या पेडिने सांगितले कि गाईचे दूध देऊ नका. ..........आमचे डॉक्टर गाईचे दूध द्या म्हणून सांगतात.त्यात कॅल्शियम जास्त असते. माझ्या मुलाचे डॉक्टर ,स्वतःच्या मुलीला गाईचे दूध देत असत.

पेज म्हणजे फक्त वरचे पाणी नव्हे ना?>>>>>

आम्ही सध्या तरी फक्त वरचे पाणी देतो आहोत. तुम्ही सांगितलेली पूड ट्राय करुन पहाते.

हर्षू, एका तज्ज्ञाच्या सल्ल्याविषयी शंका वाटली तर दुसर्‍या तज्ज्ञालाच विचारलेलं बरं. (सेकंड ओपीनियन.)
इथे आम्ही कोणी तज्ज्ञ नाही. आहारशास्त्रात नाही आणि मुलांच्या आरोग्यातही नाही. ही मर्यादा लक्षात घ्या. इथले सल्ले कितीही चांगल्या हेतूने दिले गेलेले आणि कदाचित आपापल्या स्वानुभवावर आधारित जरी असले तरी कधीकधी गैरलागू तर कधी परस्परविरोधी असू शकतात. तुम्ही राहत असाल तिथली परिस्थिती आणि तुमच्या बाळाची एकंदर प्रकृती याबद्दल बाळाच्या पेडीइतकी माहिती कोणाला असणार?

धन्यवाद स्वाती.

पुण्यात (शक्यतो औंध परिसरामधे) कोणाला चांगला डाएटिशीयन (आहारतज्ञ) माहित असल्यास कृपया सुचवाल का ?

मुंबई मधे मालती कारवारकर आहेत. पण त्या फक्त शनिवारी बाहेरचे रुग्ण पाहतात, आणि आम्ही शनिवारी येउ शकत नाही Sad

तुम्ही सांगितलेली पूड ट्राय करुन पहाते................ अर्धा सपाट चमचा (पोहे खायचा) तांदूळ,मूगडाळ पावडर पाण्यात
शिजवून घ्या.पातळसर ठेवा.बाळाला सहज गिळता येईल अशा तर्‍हेचे. आठवडाभर हे प्रमाण देऊन त्याला पचते आहे असे वाटले की मग त्यात लाल/दुधी भोपळा वगरै भाज्यांचा एखादा तुकडा घाला.

from what I know cerelac babies give you lot of trouble to eat regular food when they grow up. But you should check with other pedi to confim. 6 months is a good time to introduce mashed veg n fruit options. Good luck. Happy

हर्षू बारीक करून गाळून दिलं तरी चालेल, पण एकावेळी एकच काहीतरी आणि तेही एकच चमचा सुरूवात करून ते बाळाला कितपत पचतंय ते बघा. इथे मुलांचे संगोपन मध्ये बाळांचा खाऊ, दोन वर्षांपर्यंतचा आहार असे उपयुक्त धागे आहेत, तिथे तुम्हाला खूप माहीती मिळेल.
मालती कारवारकरांचं वंशवेल छान आहे पुस्तक.
माझ्या मुलाच्या पेडीने सांगितलेलं, त्याला सहा महीन्यांपर्यंत फक्त आईचं दूध (ते नसल्यास पाणी व गाईचं दूध) आणि त्यानंतर हळू हळू घरचं ताजं शिजवलेलं अन्न द्या. शक्यतो फॉर्म्युला दुधाची, सेरेलॅक व इतर रेडीमेड फूडची गरज नाही.

जर भाज्या ( पालक भोपळा,गजर,बटाटा ) उकडून मिक्सर मधुन बारीक (पातळ) करुन दिल्या तर ?....... मी वर लिहिल्या प्रमाणे यातील एखाद्याच भाजीचा छोटा तुकडा खिमटीत शिजवून द्या.

Maza mulga 2 varshacha aahe. 7-8 dat aalet. Tyala bhijavalela badam kinva bhijavalele akrod dila tar chalel ka?

खूप जूना धागा वर काढतेय.
माझी मनु आता ३ महिन्यांची होईल. अंगावरचं दूध नसल्याने पूर्ण फॉर्म्युल्यावरच आहे. भूक,वजन, वाढ सगळं नॉर्मल आहे. तिला ४ थ्या महिन्यापासून भाताच्या भरडीचे पाणी, वरणाचे पाणी देऊन चालेल का? चालले तर रोज द्यायचे का? नाचणी सत्व कधी द्यायचे? प्लीज सांगा.
एकतर अंगावरचं देता येत नाही हे गिल्ट आहेच, पण तिचं पोषण अपुरं राहू नये म्हणून धडपड.

>>>>
एकतर अंगावरचं देता येत नाही हे गिल्ट आहेच, पण तिचं पोषण अपुरं राहू नये म्हणून धडपड.
>>>>
हा गिल्ट काढ पहिल्यांदा..
लेकीचं भरण पोषण, लालन पालन यथाशक्ती करणं आई म्हणून तुझं कर्त्यव्य आहे... ते तू पूर्ण निभावते आहेस.. अंगावरचं दूध हा उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी एक आहे - एकमेव नव्हे
अंगावरचं दूध देऊनच आईपणा सिद्ध होतो असं कुठल्याही मॅन्युअल मध्ये लिहिलं नाहीए

बाकी कधी काय द्यायचं ते लेकीच्या डॉक्टर ला विचारून ठरवणं सगळ्यात उत्तम

गिल्ट नको गं
आलटून पालटून अगदी ताजा वरण भात मिक्सरमध्ये काढून देता येईल.हे मिश्रण अगदी ताजंच बनवावं लागतं.2 तासात आपल्या हवामानात खराब होतं.किंवा मुगडाळ तांदूळ तुपावर नीट परतून गार झाल्यावर पावडर करून खिमटी मिक्स, ते उकळत्या पाण्यात शिजवून.खिमटी मिक्स नीट परतलं असलं तर 10-15 दिवसांचं बनवता येईल.आवड माहीत नसेल तर 1 आठवड्याचं बनवलं तरी चालेल.
खूप गोड चवी लगेच इन्ट्रोड्यूस करू नका असं डॉ म्हणतात.
याच वरण भातात अगदी बेताने थोडी टोमॅटो रस शिजवून त्याची चव, फ्लॉवर, गाजर याची चव घालता येते.(एका वेळी एकच चव मिक्स करायची.तेही हळूहळू. म्हणजे एखाद्या वेळी असा किंचित भाजीयुक्त बारीक केलेला वरण भात घातला तर दुसऱ्या वेळी थोडा प्लेन आहार असं काही)
वरण भात मऊ शिजवून बारीक करून हे जवळ पास च्या 1-2 मुलांना आवडतं आहे.
नाचणी सत्व गोड असल्यास आठवड्यात 1-2 वेळाच.
(अर्थात बाकी बाळ हे सर्व आखीव प्लॅन तिच्या स्वतःच्या आवडीनुसार बदलेलच Happy काही दिवस अंदाज घेवून जे आवडते, त्यातल्या त्यात स्ट्रॉंग चवीचे नाही असे दे)
याच धाग्यावर मागे सॉलिड फूड मध्ये बरेच ऑप्शन्स दिलेत उकडलेले सफरचंद वगैरे
एक गोष्ट लक्षात ठेवायची.ज्याची मिक्स भाजी खाल्लेली आपल्याला अजिबात आवडणार नाही(फ्लॉवर+भेंडी,लाल भोपळा+टोमॅटो) अशी कोम्बो बाळालाही घालायची नाहीत.शक्यतो एका जेवणात एकच भाजी मिक्स.

स्नेहमयी, मी_अनू thank u.
खिमट,पेज देताना दुधासारखी पातळ हवी का? म्हणजे आता सद्ध्या तीला तेवढंच पचेल ना? आणि किती वेळा द्यायचं? आता formula २-३ तासांच्या अंतराने पीते ती.

गिल्ट नको वाटून घेऊ.
वरचं अन्न सुरू करताना मी कसं केलं होतं ते सांगते.
तांदूळ धुवून थोडे वाळवून घ्यायचे. मग नीट भाजून त्याची मिक्सरमध्ये बारीक पूड करायची. ही पूड बाटलीत वगैरे भरून ठेवायची. (एका वेळी फार तर आठवड्याला पुरेल एवढीच)
सुरुवातीला अगदी छोटा चमचाभर पूड पाण्यात कालवून, त्यात वाटीभर पाणी घालून नीट शिजवून घ्यायची. हवं असेल तितकं पाणी घालून चांगल्यापैकी पातळ करायचं.
मी फॉर्म्युला देत नव्हते. सुरुवातीला हे खिमट रोज एकदाच (शक्यतो दुपारी) अगदी चमचाभर द्यायचं. पचत असेल तर तीनचार दिवसांनी एक चमचा वाढवायचा. असं करत करत वाढवत न्यायचं. मग एक पूर्ण भूक भागेल एवढं.
मग तांदुळाबरोबर आधी मुगाची डाळ (पचायला हलकी) मग तुरीची. एखाद्या भाजीचा तुकडा (दुधी, लाल भोपळा, गाजर, पालकाचं पान वगैरे) खिमट शिजवतानाच घालायचा. आधी नुसता चवीसाठी. मग हळूहळू mash करून तोही भरवायचा.
या सगळ्यात कणभर मीठ मी तरी घालायचे. काही डॉक्टर पहिलं वर्ष मीठ देऊ नका असं सांगतात.
कुठलाही बदल करताना एका वेळी एकच करायचा. म्हणजे बाळाला पचतंय की नाही, याचा चांगला अंदाज येतो. त्या बदलाची सवय झाली की पुढचा बदल. जोर का धक्का धीरे से Happy
चौथा महिना मला जरा लवकर वाटतंय. मी पाचव्या महिन्यात सुरू केलं होतं हे सगळं. पण तो अंदाज प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. तुमच्या पेडियाट्रिशिअनचा सल्ला घे.

चौथा महिना मला जरा लवकर वाटतंय. मी पाचव्या महिन्यात सुरू केलं होतं हे सगळं. पण तो अंदाज प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. तुमच्या पेडियाट्रिशिअनचा सल्ला घे.>>+१

आणि जे काही देणार असू ते आधी आपण चव घेऊन बघायची.मीठ जास्त कमी किंवा इतर काही उग्र चव आहे का ते.
अगदी थोडे मीठ चालेल.
अजून 3 महिन्यांनी थोडे दात आले की अगदी लहान तुकडे(अडकणार नाहीत असे) करून पोळी किंवा धिरडेही एक दोन वेळा देऊन बघ.काही बाळांना भात किंवा चमच्याने खाण्यापेक्षा ते ग्लॅमरस वाटते.

Pages