५ महिन्याच्या बाळाचा आहार आणि झोप

Submitted by तनू on 31 January, 2011 - 02:15

मी मायबोली ची नवीन सदस्य आहे, माझा मुलगा आता ५ महिन्याचा आहे. तो नीट झोपत नाही. म्हनजे १०-१२ तास झोपतो फक्त. त्याला व्यवस्थित झोपन्यासाटी काय करु??

मि त्याला खालिल प्रमाने आहार देते
९ am- १ मारि बिस्किट दुधाबरोबर
११.३० am- नाचणी सत्व
झोपून उटल्यवर दूध (१ किवा २ वेळा)
६ pm- १ मारि बिस्किट दुधाबरोबर
८ pm- गुटी + breastfeeding
१० pm - तादूळ अणी मुगाच्या डाळीची खिमटी
रात्रि तो उटेल तेव्हा breastfeeding

व्यवस्थित झोपन्यासाटी आहारात काहि बदल करायला हवेत का? किवा ईतर काहि उपाय असेल तर सांगा please

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवन्तिका १०-१२ तास म्हणजे पुरेशी आहे ना झोप ? तज्ञ मंडळी सांगतीलच.
माझ्या मते त्याला मारी बिस्कीट नको देउ. त्याऐवजी डाळीचे पाणी, भाज्यांचे क्लिअर सुप वगैरे दे. डाळींबाचा, अ‍ॅप्पलचा ज्युस देउ शकतेस. अ‍ॅप्पलचा चमच्याने खरवदून मऊ गर देउ शकतेस. द्राक्षाची वरची साल काढून मउ गर देता येईल.

माझ्या मते त्याला मारी बिस्कीट नको देउ. >>>
मलाही तेच म्हणायचं होतं. ५ महिन्यांच्या बाळाला मारी बिस्किट?? Uhoh

अवंतिका,
१०-१२ तास झोपतो फक्त. >>> म्हणजे दिवसभराची एकंदर झोप १०-१२ तास आहे? की तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळून एकूण १०-१२ तास झोपतो??

  1. रात्रीची झोप शांत लागण्यासाठी लहान बाळांना रात्री झोपण्यापूर्वी तेलाचा मसाज आणि कोमट पाण्याने पुसून घेणे फायदेशीर ठरेल.
  2. बाळाच्या डोक्यावर तेलाचा हलका मसाजही उपयुक्त आहे.
  3. सध्या थंडीचे दिवस असल्याने बाळाला गुंडाळणी मध्ये गुंडाळून झोपवा. घट्ट गुंडाळल्यावर लहान बाळे शांत झोपतात.

मारी बिस्कीट शक्यतो टाळा. दिवसातून दोनदा तर मुळीच नको.. आणि दिवसात १०-१२ तास झोप व्यवस्थित आहे की.. रात्री सुद्धा साधारण तीन तासानी उठणारच की बाळ.. .आणि झोप हळूहळू कमीच होत जाते.. दोन महिन्याचा असताना जर १६-१८ तास झोपत असेल तर नंतर नंतर झोप कमीच होणार आहे.. त्यामुळे फिकर नॉट..

खायला सफरचंद, मोसंबी, चिक्कू, केळं अशी फळं द्या.... सफरचंद किसून द्या किंवा सरळ उकडून द्या.. उकडल्यावर त्याची चव पूर्णच बदलते.. त्यामुळे ते देताना त्यात थोडीशी पीठीसाखर घाला. मोसंबी ज्यूस पण देता येईल. किंवा नुसता गर पण देता येईल..
टोमॅटो, बीट, गाजर, पालक ह्यांचं सूप सुद्धा देता येईल..

५ महिन्याच्या बाळाला मारी बिस्कीट खरच योग्य नाही.
वर सुचवलेले सगळे पदार्थ चालतात. या बरोबर रव्याची खिर देता येईल.
आणी रात्री १० ला खिमट म्हणजे त्याला व्यवस्थित पचते का ते बघ. नाहितर ८ ला गुटी बरोबर दे त्यामुळे झोपेपर्यंत थोड हातपाय हलवल्यामुळे पचेल. डाळीच पाणी, भाज्यांच सुप हे खरच छान आहे.
सग़ळ एकदम चालु करु नको. १ पदार्थ निट पचतो आहे बघुन नविन काहि देऊन बघ.

मी माझ्य मुलींना पुढिल आहार देत होते. नाचणि पिठ १ च. साजुक तुप १ च. दुध १ कप( लागेलतसे). आणि गुळ चविप्रमाणे
१ च. तुपावर पिठ भाजुन घ्या. नंतर त्यात दुध आणि गुळ घालुन शिजवुन घ्या. खिर तयार. मुल अतिशय आवडीने खातात.
पण तरिही अनुने सांगितल्या प्रमाणे सगळं एकदम चालु करु नये.

मी कुठेतरी ऐकलंय की तान्ह्या बाळांची वाढ होत असल्या कारणाने त्यांना दिवसातले २० तास झोप सुद्धा लागू शकते. जाणकार प्रकाश टाकतीलंच.
निंबुडा सांगतेय त्याप्रमाणे रात्री झोपण्यापुर्वी बाळाला तेलाने मसाज, गरम पाण्याने अंघोळ, शेक असे उपाय केले तर बाळ शांत झोपेल. संध्याकाळी ६ नंतर शक्यतो पचायला जड पदार्थ देऊ नका..

१०-१२ तास झोपतो.... अगग... माझं पोरगं या वयात जेमतेम ८ -९ तासच झोपायचं. अगं योग्य झोप आहे ही Happy
बिस्किटं इअतक्यात का सुरू केली ? किमान आपली आपण चाउ शकत नाहीत तो पर्यंत तरी नकोच अन नंतरही टाळावीतच.
सकाळीपण भाताची पेज (भाजलेल्या तांदूळाची ) द्यावी.

माझाही मुलगा लहानपणी रात्री सलग २ तासाच्या वर झोपत नसे. नंतर १ / दीड तास जागा. परत झोप. दिवसा पण खुप झोपायचा नाही. जसा रान्गाय्ला लाग्ला तशी झोप वाढ्ली त्याची. मला वाट्त १० / १२ तास झोप पुरेशी आहे.

सर्वाना प्रतिसादाबद्दल धन्यवाद

@निंबुडा, तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळून एकूण १०-१२ तास झोपतो
माझ्या आईने सान्गितल्याप्रमाणे पार्ले बिस्किट चालु करायच होत, पन साबानि मारि द्यायला सान्गितल.
बिस्किट एकदम बारिक चुरा करून दूधात मिक्स करुन देते.

झोपताना मि त्याला तेलाचा मसाज करते, आनि गुंडाळून टेवते (हात बाहेर)

नाचणी सत्व पण मि विकतच आणल आहे (नाचणी+ सा़ख्रर मिक्स)

सफरचंद न उकडता दिल तर चालेल का? तादूळ अणी मुगाच्या डाळीची खिमटी हि पचायला जड आहे का? ती रात्रि दिली तर काहि प्रोब्लेम नाहि ना?

सफरचंद उकडूनच द्यायचे, पचायला सोप्पे जाईल. Happy
कुठलाही नवीन पदार्थ एकवेळी एकच आणि भुक लागल्यावरच द्या.तादूळ अणी मुगाच्या डाळीची खिमटी हि पचायला जड नाही. पण सुरूवार करायची असल्यास एकदम रात्री नको, दुपारी किंवा रात्री ८ - ९ च्या दरम्यान द्या. सुरूवातीला थोडी पातळच द्यावी आणि पचायला लागल्यास थोडीफार घट्ट द्यावी.
नाचणीची खीर पातळ देऊ शकता. बिस्कीटे शक्यतो नकोच.
वंशवेल पुस्तकात .. बिस्किटीना पर्याय म्हणून पदार्थ दिला आहे.सगळ्या डाळी आणि गहू मिळून. योग्य प्रमाणात नंतर सांगते. मी माझ्या मुलाला द्यायची.

१०-१२ तास म्हणजे चांगली झोप आहे या वयात.

आहारासाठी हिरकुने दिलेली लिंक पाहा.
कृपा करून इतक्या लहान वयात बिस्किटं देऊ नका! Sad काय पोषणमुल्ये असतात त्यात?? असे पदार्थ देऊन ओबेसिटी वाढेल त्यापेक्षा नीट पोषक आहार द्यावा असे मला वाटते. तुम्ही पौष्टिक आहार घेऊन पूर्णपणे दुध/फॉर्म्युलावर राहिले बाळ तरी चालेल मग..
तसेच साखरेची सवयही इतक्या लहानपणापासून असू नये(असे म्हणतात) .

बस्के, अगदी खरं. सात महिने अगदू पूर्णपणे आईच्या दुधावरही मस्त होतात मुलं. फारतर एखादी भूक भाताची पांतळ पेज/ नाचणीचे सत्व ठीक आहे....

http://www.maayboli.com/node/5215

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93902.html हे पण नक्की वाच Happy

<<तसेच साखरेची सवयही इतक्या लहानपणापासून असू नये(असे म्हणतात) . >> हो खरच आहे, आतापासून जर त्याला साखरेची सवय लागली तर पुढे खुप त्रास होतो. साखरेला पर्याय गुळ चांगले आहे जास्त नाही पण गरज पडल्यास थोडे देण्यास हरकत नाही.

मलाही तेच म्हणायचं होतं. ५ महिन्यांच्या बाळाला मारी बिस्किट??
>>अनु.
सात महिने अगदू पूर्णपणे आईच्या दुधावरही मस्त होतात मुलं. फारतर एखादी भूक भाताची पांतळ पेज/ नाचणीचे सत्व ठीक आहे....>> मी अगदी हेच टायपणार होते.
बाळाला शक्य तितके breastfeeding द्यावे. आणि त्याचे काहिही गणित नाही. त्याला भुक लागेल तेंव्हा. तसेच बाळाचे वजन किति आहे?
माझा मुलगा ६ म. झाल्यावर मि त्याला, पाव भाग कोणतेही फ्ळ्,(केळे, चिक्कु, मोसंबे इ.), formula milk/boiled water/milk (after crush in the separate mixer jaar) द्यायची. तसेच मुग डाळ, तांदुळ धुवुन, वाळवुन, भाजुन, ते मिक्सर्वर बारिक्,(अक्षरशः वस्त्रगाळ पुड करुन) करुन घेणे, हे द्यायची. प्रमाण-२ चमचे ही पावडर, थोड्या दुधात पेस्ट करुन घेणे, मग उरलेले दुध घालुन सरसरीत करुन घेणे, आणि छोट्या पातेल्यात किंवा, फ्राय पॉन मधे शिजवणे.

<<तसेच साखरेची सवयही इतक्या लहानपणापासून असू नये(असे म्हणतात) >> हे अगदि बरोबर आहे. अतिरीक्त साखरेचि गरज नसते मुलांना. नाचणि सत्व विकतच्या पेक्षा वर सांगितल्या प्रमाणे नुसत्या पिठाचि खिर चांगली. पिकलेले केळ पण चांगले. बेस्ट === ब्रेस्ट फिडिंग

<<तसेच साखरेची सवयही इतक्या लहानपणापासून असू नये(असे म्हणतात) >> मध देता आला तर चांगले.
बिस्कीट नको इतक्यात. कधी बाहेर गेलात तर बरे पडते पण घरी तरी नको. आणि बाहेर पण हॉटेलात सत्व, मीठ, चमचा, अगदी कढई / पातेले नेण्यास हरकत नाही. मी तर प्रत्येक हॉटेलच्या किचनला भेट देते अजुनही (मुलगा ३ वर्षे ८ महीने). कोणी नाही म्हणत नाही. बिस्कीट टाळा. विशेष काही अडत नाही. आणि कुठेही जाताना दुधात प्रो त्साहन पावडर टाका. आयुर्वेदीक आहे. दुध नासायची क्रिया चांगलीच लांबते.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद
माझा office time ९ - ६ आहे. त्यामुळे घरातुन ८ ला निघाव लागत आणि घरि पोह्चायला ७.३०-८ होतातच. त्यामुळे सारखे breastfeeding शक्य नाहि. मि त्याला सध्या aarey cow milk देते. formula आनला होता पन साबा ना जमत नाहि नीट प्रमाण, म्हानुन cow milk सुरु केले. माझ्या एका frnd ने सान्गितले होते कि साखर न टाकता दुध दिले तर acidity होते म्हनुन मि दूधात थोडिशि साखर टाकते. मग आता साखर टाकने थाबवु का?

तुला दुध जर व्यवस्थित प्रमाणात येत असेल तर पंप करुन ठेवु शकतेस बॉट्ल, वाटी चमच्याने द्यायला सांगू शकतेस..बघ जमलं तर...

नमस्कार,
आपण धाग्याचे शीर्षक बदलून योग्य ते अर्थबोध होणारे शीर्षक देणार का, मायबोलीवर "मदत हवी आहे" शीर्षकाचे किमान डझनभर धागे सापडतील. सविस्तर शीर्षक दिल्याने पुढे कोणाला संदर्भासाठी हा धागा लागला तर सापडणे सोपे होईल.
धन्यवाद.

सॉरी टु से, पण पाच महिन्यांच्या बाळाला मारी बिस्किट देणे हे अजिबात झेपत नाहीये! काल तुमचा हा धागा वाचल्यपासुन एक प्रश्न मनात आला, तुम्ही नोकरी करणारी स्त्री आहात म्हणजे शिक्षित आहात, बाळाचा आहार काय असावा याबद्दल बरीच पुस्तके, माहिती उपलब्ध आहे, डॉ पण योग्य ती माहिती देऊ शकतात. तुम्ही यापैकी कोणतीच मदत घेतली नाही? फॉरम्युला चे प्रमाण साबाना जमत नाही म्हणुन तुम्ही नेहमीचे दुध देता? डॉ ना याबद्दल विचारले का? फॉरम्युलाचे प्रमाण तुम्ही काहीतरी युक्तीने त्याना ठरवुन द्या! (मेजरींग कप्/चमचा यांचा वापर करुन) स्पष्टवक्तव्याबद्द्ल माफ करा पण अगदीच रहावले नाही म्हणुन लिहीले.

अवंतिका, नाचणी सत्त्व बिनासाखरेचे पण मिळते. त्यात थोडी जिरे पावडर आणि कणभर मीठ घालुन शिजवून देउ शकतेस. खिमटी तो नीट घेत असेल तर ११-१२ वाजता सकाळी घेउ दे. सन्ध्याकाळी एखादे फळ कुस्करुन. रात्री शक्यतो पेज किंवा भाज्यांचे सुप दे.
वत्सला, अगं भारतात तरी माझ्यामते डॉक्टरसुध्दा ५ महिन्यांच्या बाळाला फोर्म्युलापेक्षा गायीचे दुध सजेस्ट करतात. किमान माझ्या डॉकनी तरी तसेच सांगितले होते. ३ महिन्यांपर्यंत, ब्रेस्टफिडिंग आणि गरज असेल तर फॉर्म्युला. आणि मग हळुहळु गायीच्या दुधावर स्विच व्हायचे. गायीचे दुध देताना आधी थोडे पाणी मिसळुन ऊकळुन द्यायचे. नंतर पाण्याचे प्रमाण हळुहळु कमी करत, पूर्ण बंद करायचे.

वत्सलाना, अनु.
अवंतिका मी एक आइ म्हणुन कळकळीने सांगते की चांगल्या पेडि. चा सल्ल घ्या. मला दुध कमी होते, बाळाचे पोट भरत नसे म्हणुन डॉ. ने dexolac हे formula milk सन्गितले. तर आम्ही(मी तर असायलाच हवे) सगळे ते formula milk करण्यात इत्के तयार झालो होतो, measuring spoon and measuring cup च्या मदतीने. बाळाच्या मावशींबरोबरच बाकी इतर स्टाफ पण एक्दम तैय्यार झाला होता.
आणि ९ म. नंतर डॉ. ने गायिचे दुध सुरु करायला सांगितले पण पहिल्या दिवशी बाळाने एक चमचा पण तोंडात नाही घेतला. रडायचा सारखा. त्यामुळे डॉ. च्या (हे सारखे लक्षात ठेवावे.) सल्ल्यानेच आम्ही चक्क म्हशीचे दुध सुरु केले, काही दिवस पाणी mix करुन ,नंतर पुर्ण.

प्रतिसादाबद्दल सर्वाचे आभार.

@वत्सला तुम्हि काळजीने सान्गितले त्यामुळे राग आला नाहि. ३ महिन्यापर्यन्त formula दिला होता. त्यानतर गायीचे दुध चालु केले. त्याचा त्याल काहि त्रास झाला नाहि.

बाळाचा आहार काय असावा याबद्दल बरीच पुस्तके, माहिती उपलब्ध आहे, डॉ पण योग्य ती माहिती देऊ शकतात.>> मि याबद्दल बरिच माहिति वाचलि. मि कित्येक पुस्तका मध्ये वाचल आहे पावडर पेक्शा गायीच दुध दिलेल चान्ग्ल. एकाच गोष्टि बद्द्ल २ डॉ. वेगले मत देतात. म्हनजे मि तो २ महिन्याचा असतान बहिनिकडे गेले होते, त्या डॉ. ने सान्गितल ४ महिन्यापासुन solid देउ शकता, पन मुबईच्या डॉ. ने सान्गितल ६ महिने फक्त दुध.

त्याला आता ६ वा माहिना सुरु होईल. तर तादूळाच्या लाह्या दुधात भिजवुन मउ करुन दिल्या तर चालतिल का?

त्याला दात आले आहेत का?
चुरमुरे शक्यतो नको. त्याने पोट फुगते. वर लिंक दिलीय त्यातले काही ट्राय कर ना.

अवंतिका, आजुन एक सांगु, डॉ. एक्च कायम ठेवा. जो देव धरला तोच एक. मतमतांतरे खुप होतात. आणी डॉ. तुम्च्या परिसरातील हवेत, जे बाळाला सारखे पाहातात. परगावच्या डॉ. चा सल्ला विचारात घेवु नका.

Pages