५ महिन्याच्या बाळाचा आहार आणि झोप

Submitted by तनू on 31 January, 2011 - 02:15

मी मायबोली ची नवीन सदस्य आहे, माझा मुलगा आता ५ महिन्याचा आहे. तो नीट झोपत नाही. म्हनजे १०-१२ तास झोपतो फक्त. त्याला व्यवस्थित झोपन्यासाटी काय करु??

मि त्याला खालिल प्रमाने आहार देते
९ am- १ मारि बिस्किट दुधाबरोबर
११.३० am- नाचणी सत्व
झोपून उटल्यवर दूध (१ किवा २ वेळा)
६ pm- १ मारि बिस्किट दुधाबरोबर
८ pm- गुटी + breastfeeding
१० pm - तादूळ अणी मुगाच्या डाळीची खिमटी
रात्रि तो उटेल तेव्हा breastfeeding

व्यवस्थित झोपन्यासाटी आहारात काहि बदल करायला हवेत का? किवा ईतर काहि उपाय असेल तर सांगा please

Group content visibility: 
Public - accessible to all site users

५ महिन्याच्या बाळाला नाचणी सत्व (पाण्यात mix करून शिजवून चिमुटभर साखर, मीठ आणि तूप घालून) , तांदूळ-मुगडाळ भरडी (मीठ आणि जिरेपूड घालून ) , apple शिजवून , चिक्कू smash करून इ. व्यतिरिक्त काय देऊ शकते ?
सध्या मी जो देतेय तो आहार बरोबर आहे ना?

घरी जेवणासाठी वरण शिजवता का ? ती डाळ शिजताना जरा जास्त पाणी घालायचे. हळद, हिंग पण घालायचे.
घरात जी भाजी होत असेल त्याचा एखादा तुकडा त्यात टाकायचा ( अगदी उग्र वासाची / चवीची भाजी नको )
मग ते पाणी आणि भाजीचा तूकडा मॅश करुन, गाळून ते पाणी द्यायचे. मीठ जरा कमी घालायचे.
एकावेळी १ ते २ टेबलस्पून पुरे.

कडधान्य शिजत असेल तर त्यातलेही पाणी असेच द्यायचे.

वरील खाऊशिवाय रताळे, बटाटा, लाल भोपळा, कणगर ( शिजवून ) सिताफळ वगैरे गराची फळे देता येतील.
एकावेळी एखादा टेबलस्पूनच द्यायचे. काही त्रास झाला नाही तरच ते परत द्यायचे.
इथे बाळांचा खाऊ असा एक बीबी आहे. त्यात बरेच पदार्थ आहेत.

श्वेतु, बाळ्गुटी नाही देत? त्यात असतात ना खारीक आणि बदाम वळसे(फेरे) उगाळून! मग पुन्हा पावडर कशाला? गुटी दीड दोन वर्षांपर्यंत द्यावी

७ महिन्याच्या बाळाला रात्रीचे जेवण (मऊ खिचडी वगैरे ) किती वाजता द्यावे?
मी असे ऐकलय की बाळांना रात्री जड पदार्थ देऊ नये म्हणून विचारतेय .
pls help

mi maybolichi navin sadsya aahe maz bal sade pach mahinyach aahe ,mi tyala ajun baherch kahich khayla start nahi kelay pani sudha nahi, fakt feeding karte.tyach vajan 8 kg aahe .tar mi aaharat survat kashapasun karu...ajun kahihhi try nahi kel

मी कोणी कोणी काय विचारलय नावं नाही वाचली. धागा खूप जुना आहे, तरीसुद्धा -

बिस्कीट्स कोणाहीसाठी चांगली नाहीत. १. त्यात मैदा असतो ज्यात काहीही पोषण्मूल्य नसते २. ती बेक केलेली असतात त्यामुळे त्यात चुकून काही पोषण्मूल्य असेल ते जवळ जवळ सगळे उडून गेलेले असते. ३. त्यात मार्गारिन किंवा डालडा असते जे अज्जिब्बात चांगले नाही.

वर सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे नाचणी सत्व, गव्हाचे सत्व, तांदूळ किंवा गव्हाच्या बारीक रव्याची खीर, खिमटी, गायीचे दूध, म्हशीचे पाणी मिक्स करून उकळलेले दूध, आईचे काढून ठेवलेले दूध ( आईचे दूध फ्रीजशिवाय २४ तास राहते, फ्रीजमध्ये २० दिवस राहाते. रेफ - डॉ गीतांजली शाह ह्यांचे गर्भसंस्कारावरचे पुस्तक) (म्हशीचे / गायीचे दूध कसे द्यायचे याबद्दल डॉ बालाजी तांबे ह्यांच्या गर्भसंस्कार पुस्तकात देखील थोडी माहिती आहे.)

५ महिन्याच्या लहान बाळाला दुधातून साखर गूळ द्यायची काहीही गरज नाही, खीरीमध्ये थोडी घालावी हवीतर.
तसेच खिमटी करून देताना चिमूटभर सैंधव / मीठ घातलेले चालेल. मीठातून थोडे सोडियम जायला पाहिजे पोटात नाहीतर पुढे सोडियम पोटॅशियम इम्बॅलन्स होऊ शकतो

वाटी चमच्याने दूध पाजण्यात काहीही गैर नाही फक्त ते दूध कानात ओघळत नाही ना एवढी काळजी घ्यावी. (माझ्या डॉ मैत्रिणीच्या मुलाला कानात इन्फेक्शन झाले होते.) बाटली शक्यतो वापरू नये, सोडवायला कठीण. बोंडले वापरणे चांगले, पण वेळ लागतो, पेशन्स असायला पाहीजे.

लहान मुलांचं झोपण्याचा आयडीयल वेळ काही नसतो, प्रत्येक मुलाचा वेगळा असतो. मुले जाग आली की जागी राहाणार आणि झोप आली की झोपणार, मुलांना झोळीत किंवा कशातही घालून जोरजोरात झोके देउन झोपवू नये. मुले जागी असतील तेव्हा त्यांना मोकळे ठेवावे. त्यांच्याशी बोलावी त्यांना थोडासा वेळ बाहेर फिरवावे, पुस्तके किंवा खेळणी दाखवावीत. छोटीशी घंटी किंवा॑ वाटे चमचा ह्यांचा आवज ऐकवावा, संगीत, गाणी ऐकवावी. . त्यांना झोप येऊ लागली की स्वतःच झोपतात. त्यांचे डोळे झोपेने जड होऊ लागले की त्यांना बांधून टाकावे किंवा मग झोळीत ठेवावे. आंघोळ झाली की झोपलीच पाहिजेत, खाल्ले की झोपलीच पाहीजेत हे चूक आहे. आपल्याला चालेल का हे कम्पल्शन?
बाळ दिवस भर झोपत असेल रात्री झोपत नसेल तर बाळाची मालिशची वेळ बदलून बघावी, रात्री मालिश करावे, खाल्ल्यानंतर एका तासाने हलक्या हाताने. खूप तेलाने थपथपला नाही तर बरे, मग त्याला आंघोळ न घालता झोपवले तरी चालेल. सकाळी आंघोळ घाल - तो सकाळी जागा असलेला जास्त चांगला आईसाठी आणि त्याच्यासाठी सुद्धा. कारण सूर्य वर येतो तेव्हा शरीराचे आणि मेंदूचे काम सुरू होते.. तेव्हा सगले पडदे खिडक्या बंद करून बाळाला झोपू देण्यापेक्षा बाळाला उजेड येईल अशा जागी ठेवले तर त्याच्या झोपेचे तंत्र हळू हळू बदलेल. शिवाय बाळ झोपला की आवज करू नका बाळ झोपला आहे असे करण्यापेक्षा रोजची कामे रोजच्या आवाजात चालू ठेवावीत. शिवाय सक्काळी सक्काळी बाळ उठलेला चांगला, पण रात्रीतून जागा होऊन बसत असेल तर आपण आवज नकरता, दिवा न लावता बाळाला दूध पाजून, त्याच्याशी थोडेसे बोलून झोपून जायचे. बाळाला सांगायचे, रात्र चालू आहे झोपायची वेळ आहे, आता सगले झोपलेत आणि तू सुद्धा आता झोपतो आहेस.

४ महिन्याला गव्हाच्या आणी तांदळाच्या रव्याची खीर गायीच्या दुधातून चालू केली तर चालते. पण काहीही करण्यापूर्वी पेडियाट्रिशियनचा सल्ला घ्यावा. बाळाची आज्जी, काकी मावशी एत्यादी एत्यादी कोणी काहीही म्हणाले तरी प्रथम पेडियाट्रिशियनचा सल्ल घ्यावा.

साधारण सहा महिन्यानंतर बाळाला सेरेलॅक दिले तर चालते. (कधी मधी दिलेले चांगले असते, सवय राहाते आणि बाळाला घेऊन बाहेर जाताना खूप हॅण्डी - पेडियाट्रिशियनचा सल्ला )

श्वेतू - साधारण ७-९ वाजेपर्यंत. त्यापेक्षा उशीर करू नये शक्यतो. पण बाळ किती वाजता झोपते हेही महत्वाचे.

अव्शु - गव्हाच्या / तांदळाच्या रव्याची खीर, रावा भाजून, मग तूपावर भाजून, एका चमच्याला एक कप गायीचे आधी उकळलेले दूध, साखरेची गरज नाही, पण्धरा मिनिटे शिजवून. (पेडियाट्रिशियनने सांगितलेली रेसिपी) पहिल्या आठवड्यात तांदळाचा रवा (तांदूळ धुवून, सुकवून, भाजून मग रवा करायचा अगदे बारिक) दुसर्‍या आठवड्यात गव्हाचा रवा - अशाच प्रकारे घरी करता आला तर बेस्ट किंवा बाजरात मिळतो तो जाडा रवा वापरायचा.

वल्लरीच, तुम्ही बर्‍याच धाग्यांवर लहान मुलांच्या संदर्भात सल्ले देत आहात. चांगली गोष्ट आहे. पण लहान बाळांना ओट देऊ नयेत, वर्षाच्या आतल्या बाळाला मीठ द्यावे, बाटली देऊ नये हे नक्की कशाचा आधारावर म्हणता आहात?

Cinderela

बाटली नको कारण १. सवय सुटायला जाम त्रास होतो २. बातलीने दूध प्यायल्यावर आपण दात ओल्या कपडयाने पुसून घेतो का? ब्रश करतो का? नाही. दातावर दूध साचून राहातं दात किडतात. त्यापेक्षा आपण जेव्हा वाटी चमच्याने दूध पाजवतो तेव्हा (घरात कोणी अनुभवी आजी असेल तर सांगते - दूध प्याजल्यावर पाच मिनिटाने वाटी चमच्याने पाणी पाज बरे) - दात किडतात, माझा स्वतःचा अनुभव. नवरा डेंटिस्ट असून न ऐकल्याचे परिणाम

ओटमील नको कारण - आपण पोहे उपमा हा नाश्ता सोडून ओटमील का खायला लागलो किंवा डायेटिशिन आपल्याला ओट्स खायला का सांगतात, कारण ओट्स मध्ये सोल्युबल फायबर असतात आणि ते एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करतं. मुळात मुलांमध्ये कोलेस्टेरॉल असतं का कमी करायला? दुसरी गोष्ट ओटस म्हण किंवा ओटमील म्हण त्याचे बेसिक प्रॉपर्टीज बदलत नाहीत ना. ओट्स हे धान्य मुळात पचायला जड आणि गॅस तयार करणारं आहे. मुलांची पचनशक्ती एवढं जड अन्न खायला तयार झालेली नसते. शिवाय आपल्या (मराठी माणसाच्या) जीन्सना ओट्स पचवायची ताकद नाहीये कारण ते आपल्या मातीत पिकणारं धान्य नाही आहे शिवाय आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी ते खाऊन ती ताकद तयार केली नाहीये. ओट्सपेक्षा आपल्या मातीत पिकणारं अन्न मुलांना द्यावं - ज्वारी, बाजरी (फक्त थंडीत), तांदूळ, नाचणी, वरी. ते पचायला हलकं असतं. पोहे नुसते दुधात भिजवून खायला द्यावे. ओट्स हे थंड प्रदेशात बनतं, ते तिथल्या माणसांसाठी जास्त योग्य. - इति आयुर्वेदिक एमडी. शिवाय ओट्स मील खाऊन माझ्या मुलाचं वजन १४ वरून १२ वर आलेलं मी स्वतः अनुभवलय, त्यामुळेही नको. (माझी डायेटिशियन देते बरं तिच्या चार वर्शाच्या मुलीला. पण माझ्या आयु. एमडी मैत्रिणीने, फॅमिली डॉ ने आणि पेडीयाट्रिशियन ने - सगळ्यांनी मला एकच प्रश्न विचारला आपलं पारंपारिक अन्न काय संपलं का बाजारातलं? त्यापेक्षा दूध पोहे दे. )

राहता राहिलं मीठ - मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड. ह्यातला सोडियम हा फॅक्टर आपल्या पेशीचा आतला का बाहेरचा भागासाठी महत्वाचा. आणि पोटॅशियम हा बाहेरच्या किंवा आतल्या भागासाठी. आपल्या पेशींसाठी सोडियम आणि पोटॅशियमचा बॅलन्स राखणं महत्वाचं म्हणून सहा आठ महिन्यापासून मुलांना कणभर मीठ खाऊ घालण्यात काहीही अयोग्य नाही.

ओट्सच खूप चांगलं सोयाबिनच चांगलं तर तूप शेंगदाण्याचं नारळाचं तेल वाईट हे सगळे फूड इंडस्ट्रीने पसरवलेले समज आहेत कारण मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज त्या वस्तू बनवून विकतात. खाण्याच्या बाबतीत आपले "जुने ते सोने" - इति आयुर्वेदिक एमडी.

शिवाय जर कोनी पराठा आणि दूध, फोडणीचे पोहे आणि दूध मुलांना देत असाल तर पराठा, पोहे ह्यात मीठ घालू नका कारण ते विरुद्धान्न आहे. मीठाचे अन्न खाल्यावर दोन तास तरी दूध पिऊ नये. दूध प्यायल्यावर एक्-दीड तास तरी मीठाचे अन्न खाऊ नये. - इति आयुर्वेदिक एमडी.

पण लहान बाळांना ओट देऊ नयेत, वर्षाच्या आतल्या बाळाला मीठ द्यावे, बाटली देऊ नये हे नक्की कशाचा आधारावर म्हणता आहात?>>> +१

>> मीठाचे अन्न खाल्यावर दोन तास तरी दूध पिऊ नये. दूध प्यायल्यावर एक्-दीड तास तरी मीठाचे अन्न खाऊ नये
आँ? क्रीम/पनीर घालून भाज्या करत नाही का तुम्ही? मीठ असलेल्या शेवयांची खीर?

>> ओट्स हे धान्य मुळात पचायला जड आणि गॅस तयार करणारं आहे. शिवाय आपल्या (मराठी माणसाच्या) जीन्सना ओट्स पचवायची ताकद नाहीये
याला काय संदर्भ आहे? मराठी मुलाची फायबर्सची गरज (पोहे आणि उपम्यातून) कशी भागवायची? फायबर्स असलेले पण गॅस तयार न करणारे कुठले पदार्थ असतात? आयुर्वेदिक एम्डी प्रकृतीनुसार सल्ले देत नाहीत का? असे सरसकट देतात?

>> ह्यातला सोडियम हा फॅक्टर आपल्या पेशीचा आतला का बाहेरचा भागासाठी महत्वाचा. आणि पोटॅशियम हा बाहेरच्या किंवा आतल्या भागासाठी.
म्हणजे काय?

>> २. ती बेक केलेली असतात त्यामुळे त्यात चुकून काही पोषण्मूल्य असेल ते जवळ जवळ सगळे उडून गेलेले असते.
बाकी मैदा / हायड्रोजनेटेट फॅट्स वगैरे ठीक, पण बेक केल्याने न्यूट्रीशन्स 'उडून' जातात हा शोध नवीन आहे.

बातलीने दूध प्यायल्यावर आपण दात ओल्या कपडयाने पुसून घेतो का? ब्रश करतो का? नाही. दातावर दूध साचून राहातं दात किडतात. त्यापेक्षा आपण जेव्हा वाटी चमच्याने दूध पाजवतो तेव्हा >>>> वाटी-चमच्याने दूध द्या नाही तर बाटलीने द्या शेवटी दात पुसण्याचे काम आपण/आई/बाबा करणार आहेत त्यामुळे त्यात खास बाटलीचे असे डिसअ‍ॅडव्हांटेज नाही.

लहान मुलांची पचनशक्ती डेव्हलप होत असते कबूल. म्हणून तर अन्न व्यवस्थित शिजवून देतात. ओट काही त्यांना कच्चे खाऊ घालत नाहीत कुणी. रोल्ड ओट्स असतील तर अजिबात काही त्रास न होता पचतात मुलांना. तुम्ही लहान मुलांना काय किंवा धडधाकट मोठ्या माणसाला काय एकच पदार्थ प्रमाणापेक्षा खाऊ घातलात तर त्याचे दुष्परिणाम दिसणारच. पण म्हणून सगळ्यांनी तो पदार्थ खाणं बंदच करावं हे अजिबात नाही पटलं.

शिवाय आपल्या (मराठी माणसाच्या) जीन्सना ओट्स पचवायची ताकद नाहीये कारण ते आपल्या मातीत पिकणारं धान्य नाही आहे शिवाय आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी ते खाऊन ती ताकद तयार केली नाहीये >>>> का-ही-ही. पिढ्यान पिढ्या जगभरातले लोकं इकडच्या फॉरेनहून तिकडच्या फॉरेनला जाऊन येऊन खाऊन पिऊन राहिलेत. तुमच्या थेअरीनुसार हे सगळे अपचनाने आजारी व्हायला हवेत.

ओट्सच खूप चांगलं सोयाबिनच चांगलं तर तूप शेंगदाण्याचं नारळाचं तेल वाईट हे सगळे फूड इंडस्ट्रीने पसरवलेले समज आहेत >>>> कुणाला असतील तर माहिती नाही, फूड इंडस्ट्रीने पसरवलेले कुठलेही गैरसमज मी करून घेतलेले नाहीत. सकाळ-संध्याकाळ ओट्स खाऊ घालावेत असं अजिबात म्हणणं नाही. माझा प्रश्न फक्त तुम्ही इतक्या छातीठोकपणे कुठल्या आधारावर ही माहिती देत आहात?

राहता राहिलं मीठ. मिठाचं महत्व मला माहिती आहे हो. एक वर्षाच्या आतल्या बाळाला मीठ द्यावं ही माहिती तुम्हा कशाच्या आधारावर देत आहात हे मी विचारलं होतं.

माझा लेक ३.५ महिन्याचा असल्यापासून बाटलीने दूध प्यायला लागला. इथे डेकेअरमधे थोडेचे वाटी चमचे असणार? झिरो कॅविटीज.
ओट्मिल वगैरे सगळं खायचा. मुळात बेबीफूडही मी जारमधलेच वापरले. तेव्हा वेळाही नव्हता आणि परदेशी डेकेअर मधे जमलेही नसते. माझे मामा निष्णात वैद्य. त्यांनी सांगितले होते बाळाच्या डॉकच्या सल्ल्याने वाग. शेवटी देश तसा वेश.

वल्लरीच, तुमच्या काही बातमीफलकांवरच्या पोस्टी आवडल्या आणि तिथे तसं नमूदही केलं आहे. हे लिहिण्याचं कारण म्हणजे तुमच्या सगळ्या पोस्टी खोडूनच काढायचं ठरवून त्यावर पोस्टी टाकल्या जात आहेत असा तुमचा गैरसमज होऊ नये. पण जेव्हा तुम्ही 'लहान मुलांना ओट्स देऊ नये'' यासारखी काही विधानं वैश्विक सत्य असल्यासारखी मांडता ते आक्षेपार्ह आहे.

उदा: तुमच्या बाळाचं वजन ओट्स खाऊन कमी झालं असं तुम्ही म्हंटलंय. ते होण्यामागे 'ओट्स' हेच एकमेव कारण आहे गृहित धरून चाललं तरी इथल्या अनेक भारतीय, मराठी बाळांवर ओट्स सिरियल खाऊन असा परिणाम झालेला नाही. व्यवस्थीत वजन वाढलंय.

>>'मुळात मुलांमध्ये कोलेस्टेरॉल असतं का कमी करायला''
म्हणजे काय? प्राण्यांमधे असणारच ना? आवश्यकतेपेक्षा 'जास्त' अशा अर्थानं म्हणायचं असेल तर ही लिंक बघा. : लहान मुलांमधेसुध्दा हाय कोलेस्टेरॉल असण्याची शक्यता असते. http://www.webmd.com/cholesterol-management/guide/high-cholesterol-children

तुम्ही खूप उत्साहानं लिहिता हे आवडलं. फक्त निराधार विधानं करण्यावर आक्षेप आहे.

स्वाती२>> +१

ते अळणी पराठे खाणार का मुलं? Uhoh
मग तसं तर ब्रेकफास्टला एकतर गोडच खाल्लं पाहिजे किंवा दूध बंद. दोन्ही अयोग्य नाही का?

वल्लरी, हा धागा किमान दोन वर्षं जुना आहे, याच धाग्यावरच्या जुन्या पोस्ट्स पाहिल्यास तर तू दिलेले बहुतांश सल्ले इथे येऊन गेलेले आहेत.

इथे लसूण घातलेले पदार्थ सात्विक लागते/वाटते चवीला असे विधान पब्लिक फोरमवर बिंधास ठोकणारे महाभाग आहेत. ना लसूणीचे गुणधर्म व सात्विक आहार म्हणजे काय माहीत नाही व सात्विक आहारात कोणते पदार्थ अपेक्षित असतात भारतीय आयुर्वेदानुसार ह्याचा अर्थ लक्षात कोण घेतय मग?
पण द्यायचे ठोकून...हां, पण दुसर्‍याच्या उलट तपासणीचा हक्क हा बजावलाच पाहिजे मात्र; भारीच विनोदी चाललय.

urgent--------mala mazya 2 varshcya mulichii bottle feeding band karaych ahe tya sathi me kay karu--te pani glass ni pite halu halu pan zopata kovi madhe zopet bhook lagali ki bottle lagtech...nahi dili tar khoop radun gondhal ghalate....mala tichi bottle chi savay kashi sodvavi tech nahi kalat...ani ajun ti ratra bhar nahiye zopat..tine ratri shant zopave mahnun me kay karu...
tich diwas bhar khan
sakali uthale 9 vajata mag9.45am omelet
nanter school madhe ildi/jam-bread/paratha/smile asch kahi tari sanck
dupari asel ti bhaji poli
nanter 2-30pm zoptana dudh(te pan bottle nich ,ekat nahi bilkul)
uthlya nanter 5-5.30pm fruit-watermelon/pear/apple
7.30pm-8pm-khichdi(tandul+moong dal+toor dal+1/2 vegetalbes)
then 10pm-10.30 paratha/poli roll/upma
mag te khoop masti karun11.30-11.45pm la dudh piun zopate
tila half milk+half water as dudh chalu ahe
tar tichi botllechi savay kashi band karu

एक मैत्रीण,
दुपारी झोपताना किंवा रात्री झोपेत दूध देणे थांबवा. दुसरे असे की २ वर्षाच्या मुलीला सकाळी ७ ला उठायची सवय लावा. तिचा बेडटाईम साडे अकरा- पावणे बारा आहे तो ८ पर्यंत मागे आणायाचे बघा. त्यासाठी सुरुवातीला दुपारची नॅप कदाचित कमी करावी लागेल. रात्री एकदा खिचडी मग परत दहा वाजता पोळी हे मला तरी योग्य वाटत नाही. साडेसातला जेवण मग गाणे/गोष्ट ऐकत आठ वाजता झोप असे करुन बघा. दुपारी पण पोळीभाजी खाऊन झोप आणि झोपून उठल्यावर दूध आणि स्नॅक. सकाळी उठल्यावर एकदा आणि दुपारी झोपून उठल्यावर एकदा छान डिझाईनच्या ग्लासमधे दूध द्यायचे. माझ्या लेकाचा विन्नी द पू चा ग्लास होता. रात्री उठल्यास दूध द्यायचे नाही. सुरवातीला मुलं रडतात पण एक आठवड्यात रुळतात.

thanks swati-pan problem asa ahe ki tich school asat-10am-1pm jar te lavkar uthali tar te school madhe zopi jate mahnun mala lavkar nahi uthavta yet

एक मैत्रीण. ती रात्री लवकर झोपली तर तिची झोप पुरी होइल. मग शाळेत नाही झोपणार. हळूहळू झोपेची वेळ बदलायची. सुरुवतीला कदाचित शाळेत डुलकी काढेल Happy त्याबद्दल आधीच शाळेत बोलून ठेवायचे. एक महिनाभरात झोपेचे रुटिन बसेल.

Pages