
तांदळाचे पिठ
मिठ
१ ओला नारळ खरवडून
गुळ
खसखस
चारोळी/काजु/आक्रोड/मनुका
वेलची/केसर
तुप
तापलेल्या भांड्यात तुप टाकुन खसखस घाला. आता त्यावर गुळ घाला व मंद गॅसवर वितळू द्या.
गुळवितळला की लगेच खोबर व चारोळी/काजु/आक्रोड/मनुका/बदाम पैकी काही आवडत असेल ते घाला किंवा जे घरात असेल ते थोडे थोडे घाला.
थोडा वेळ परतुन गॅस बंद करा.
आता १ ते दिड ग्लास पाणी घेउन त्यात मिठ टाकुन गरम करण्यासाठी ठेवा. आता पाणी उकळायच्या आधी जे भांड्याच्या तळातुन बुडबुडे यायला लागतात तेंव्हा तांदळाचे पिठ अंदाजे टाकत ढवळा व लगेच गॅस बंद करा म्हणजे मोदक वातड होत नाहीत. जास्त पिठ टाकु नका. पिठ ओलसर राहील एवढेच टाका.
पिठ परातीत काढा व थोडे थंड झाले की पाण्याने मळायला घ्या. जास्त पाणी लावु नका. हलकेच हात भिजेल एवढेच घेत रहा व चांगले मळून घ्या.
आता मोदक करायला घेताना परत थोडे पिठ जरा मळा व लिंबाएवढा गोळा घेउन त्याची पातळ वाटी करा.
वाटीत तळाला नारळाचे सारण भरा. आता वाटीच्या बाहेरच्या बाजुला दुमडत कमी अंतरावर कळ्या करा. मग वाटीच्या वरच्या भागाच्या कळ्यांना हलके आतल्या बाजुला गोल गोल फिरवत वरच्या दिशेने जुळवा. टोकाची शेंडी टोकदार करा.
आता हे मोदक २० ते ३० मिनिटे मोदक पात्रात वाफवुन घ्या.
मोदकांबरोबर आमच्याकडे करंज्या (शिंगर्या) व खापट्या (पिठाची चपटे गोल) करण्याची पद्धत आहे.
प्रथम वंदनिय गणपती म्हणुन गणपतीच्या मोदकाने सुरुवात करत आहे. तसे आमच्याकडे नागपंचमी ह्या पहिल्या श्रावणातल्या सणालाच नागोबाच्या नैवेद्यासाठी मोदक करण्याची प्रथा आहे.
उकळवणी घेताना काही जणं पाण्याबरोबर दुध किंवा तेलही घालतात.
वाटी वळताना काही जणं ती पातळ होण्यासाठी हाताला तेल लावतात. मी नेहमी पाणीच वापरते.
मोदकाच्या सारणात आक्रोड जास्त चांगला लागतो हा माझा अनुभव आहे.
साखरचौतीच्या गणपतीला नारळाच्या सारणात गुळाऐवजी साखर घालतात.
(नागपंचमीच्या दिवशी ऑफिसला जायच्या घाईमुळे सगळे फोटो काढू शकले नाही त्याबद्दल क्षमस्व. पण परत केल्यावर सगळे फोटो इथे लोड करण्याचा प्रयत्न करेन.)
राखी, दिपाली, मी अमि, सीमा,
राखी, दिपाली, मी अमि, सीमा, बस्के, प्रज्ञा, अश्विनी, अरुण, चातक, प्राची धन्यवाद.
प्राजक्ता हा उकडण्यापुर्वीचा फोटो आहे म्हणून एवढे पांढरे दिसत आहेत. पण उकडल्यावर पण बर्यापैकी पांढरेच होते.
मृनिष मी तो विचार करतेय. पण सवड मिळत नाही.
जागु, छानच झालेत मोदक. हा
जागु,

छानच झालेत मोदक.
हा माझा झब्बू
~साक्षी
वा: फारच अप्रतीम.जागू तू
वा: फारच अप्रतीम.जागू तू सर्वच कलात निपूण दिसतेस.
साक्षी, तुझेही मोदक फार सुंदर
साक्षी, तुझेही मोदक फार सुंदर वळलेयस
साक्षी, मस्त. कसल्या सुगरणी
साक्षी, मस्त. कसल्या सुगरणी आहात एकेक. मी तर जन्मात कधी हे मोदक केले नाहीत. करेन असंही वाटत नाही. मी तळणीच्या मोदकांवरच समाधान मानते.
साक्षी सुंदर झाले आहेत ग तुझे
साक्षी सुंदर झाले आहेत ग तुझे मोदक. खुपच छान. साच्यासारखे अगदी.
समई मवा धन्स.
काय सुंदर दिसतायेत हे मोदक.
काय सुंदर दिसतायेत हे मोदक. सगळ्या मोदकांना दहाच्यावर कळ्या. मान गये. जागूताई, तुझे सलाम!
साक्षी, तू केलेले मोदक पण छान झालेत.
मी अद्याप उकडीचे मोदक खाल्ले नाहित. आमच्याकडे हे कधी केले नाहीत अन मला आजवर कोणाकडे मोदक खायला आमंत्रण आले नाही. स्वतःच करुन खावे म्हटले तर आपल्याला उकड काढायला जमेल का? ईथेच घोडे अडतेय.
नलिनी, तू जगाच्या पाठीवर जिथे
नलिनी, तू जगाच्या पाठीवर जिथे कुठे रहात असशील तिथल्या गणेशोत्सवात किंवा चतुर्थीला कोण्या मोदक निपुण बल्लवांच्या घरी उकडीच्या मोदकाच्या प्रसादाचे निमंत्रण लावून घेच्च!!!
ज्यांना इतके सुबक मोदक आपल्याला वळता येतील / नाही अशी शंका वाटते त्यांनी मोदकाची लांबची बहीण/ भाऊ श्रीयुत/ श्रीमती एला अडा (केरळातील खाद्यप्रकार) जरूर करावा. तो फसण्याची शक्यता कमी वाटते
:
एला अडा
नलिनी माझ्याकडे ये गणपतीला मी
नलिनी माझ्याकडे ये गणपतीला मी तुला शिकवेनही आणि खायलाही देईन
अरुंधती अगदी बरोबर.
जागू , खूपच सुरेख
जागू , खूपच सुरेख
अकु एला अडा आपल्याकडे पण
अकु एला अडा आपल्याकडे पण करतात. त्याला पातोळी म्हणतात. केळीच्या पानाऐवजी हळदीची पाने वापरतात.
जागू सुंदर मोदक. पीठ एकदम सही
जागू सुंदर मोदक. पीठ एकदम सही जमलेय.
साक्षी तुझे पण छानच आहेत
कसले मस्त दिसतायत मोदक.. एकदम
कसले मस्त दिसतायत मोदक.. एकदम सुबक... साच्यातून काढल्यासारखे.. जागू तुस्सी ग्रेट हो.
मोदकाच्या कळ्या फार सुरेख आणी
मोदकाच्या कळ्या फार सुरेख आणी एक सारख्याच आल्या आहेत >> अनुमोदन..
धन्य आहात तुम्ही, खरच सुरेख.. __/\__
अकु, इथे तरी कोणाकडे
अकु, इथे तरी कोणाकडे मोदकासाठी आमंत्रण मिळेलसे दिसत नाही.
जागू, आमंत्रणाबद्दल आभारी आहे.:स्मित: ह्या गणपतीत नाही जमणार पण कधी तरी नक्की येणार मी तुझ्या हातचे मोदक खायला आणि शिकायला पण.
नलिनी, अगं आमंत्रण ''लावून''
नलिनी, अगं आमंत्रण ''लावून'' घ्यायचे असते गं!

भरत, एला अडालाच पातोळी म्हणतात का? दोन्ही प्रकार खाल्ले नाहीएत, त्यामुळे माहित नव्हते. धन्स!
जागू सुरेख वळल्येस
जागू सुरेख वळल्येस मोदक.
साक्षी तुझाही झब्बू मस्त
चिउ, एच.एच. धन्यवाद. नलिनी
चिउ, एच.एच. धन्यवाद.
नलिनी वाट पाहतेय मी आणि गणपतीबाप्पा.
जागू आणि जादुई बोटे लाभलेल्या
जागू आणि जादुई बोटे लाभलेल्या सुगरणींसाठी :
एका कुकरी शोमध्ये डबल डेकर मोदक पाहिला होता. पारी नेहमीपेक्षा थोडे मोठी घ्यायची. त्यात सारण नेहमीपेक्षा जरा कमी भरून मोदक वळायचा. वर पारीचा जो भाग राहील, त्यात पुन्हा सारण भरून खालच्या मोदकापेक्षा लहान आकाराचा मोदक बनवायचा.
चला, करा आणि फोटो टाका
भरत माझी आई असे एकावर एक २
भरत माझी आई असे एकावर एक २ किंवा ३ मोदक बनवते.
भरत हो मी पाहीले आहेत असे
भरत हो मी पाहीले आहेत असे मोदक. नक्की ट्राय करेन. धन्स.
अनु आईच्या मोदकांचे फोटो टाक ना.
साक्षी, झब्बु देखणा दिसतोय
साक्षी,
झब्बु देखणा दिसतोय एकदम !
हो ग जागू, माझ्या कडे नाहीत
हो ग जागू, माझ्या कडे नाहीत मोदकांचे फोटो. भारतवारीत आईला करायला सांगून नक्की टाकेन. तिला टाकायला येईलच अस नाही. पण विचारते तिला येतिल का ते.
मी ७वी ८वी असताना मोदकांच्या स्पर्धा झाल्या होत्या त्यात तिने दोन्ही वर्षी पूर्ण शहरात १ ला नंबर मिळवला होता
दिपांजली अनु आईचे अभिनंदन ग
दिपांजली
अनु आईचे अभिनंदन ग तेंव्हासाठी. तुझी कॉलर एकदम ताठ झाली असेल ना तेंव्हा.
मी करते डबलडेकर मोदक, पण सुबक
मी करते डबलडेकर मोदक, पण सुबक वगैरे अजून जमत नाही. सरावाने येईलच सुबकपणा
मंजे उद्याच्या संकष्टीच्या
मंजे उद्याच्या संकष्टीच्या मुहुर्तावर चांगलेच होतील.
मला येतात डबलडेकर. फोटो पण
मला येतात डबलडेकर. फोटो पण काढलाय. सापडला की टाकेन.
~साक्षी.
लय भारी दिसतायत मोदक
लय भारी दिसतायत मोदक !!!!!!!!!!!!!!!!!
मंजुडी मस्तच ग. मी पण पुढच्या
मंजुडी मस्तच ग. मी पण पुढच्या वेळी ट्राय करेन.
जोशिप धन्यवाद.
साक्षी तुझ्या फोटोच्या प्रतिक्षेत.
मस्तच आहे हा डबलडेकर मोदक.
मस्तच आहे हा डबलडेकर मोदक.
Pages