भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेल खरे तर चांगला खेळत नाहीये कमित कमी दहा वेळा चेंडु त्याच्या बॅट्ला चुकवुन गेला आणि हाच खर प्रश्ण आहे कारण चांगला फलंदाज एव्हाना कट लाउन आउट झाला असता पण जिथे चांगला फलंदाज
ट्रॉट , पीटरसन, सचिन, द्रविड एका इंचाने चुकतो तिथे बेल २ इन्चाने चुकतो पण नक्कीच तो कॅच देइल मागे लव्कर.

Ishant to Bell, out Caught by Dhoni!! And England's woes continues! Not the best of deliveries though
म्हणुनच आउट झाला जर चांगला बॉल असता तर चुकलाच असता.

१२४-८ !
<< पीके क्या खाके आयेला है? >> पीकेच्या गोलंदाजीसाठी हवामान व खेळपट्ट्या आदर्शवत आहेत ! [ मी मालिका सुरूं होण्यापूर्वीच 'तो चमकणार' असं म्हटलंय व माझे अनेक अंदाज चुकले तर एखादा तरी बरोबर येणारच ना !!! :डोमा:]

तिसरी विकेट गेल्यावर कुठल्याहि जोडीने तीसच्या वर धावा केल्या नाहीत नि आता नवव्या जोडीने ३१!

अ‍ॅक्टयुली झाले असे आहे कि फिल्डिन्ग अ‍ॅटॅकिन्ग लावली आहे याचा फायदा घेउन ते धुलाइ करताहेप.
बॉलर्स चा प्रॉब्लेम की ते प्रत्येक चेंडु विकेट घ्यायला टाकत आहेत अशात खुप रन्सा मिळु शकतात.
शेपटासाठी आपल्याकडे आणि साउथ अफ्रिकेकडे कोणताच प्लॅन नसतो.

चांगले फिरकी गोलंदाज नसल्याने शेपूट आपल्याला त्रास देणारच; शेवटच्या दोन दिवसात तर ही उणीव अधिकच जाणवते/ जाणवेल.
भारत १-१ !

dravid chi ani Lakshman chi changalich pariksha chalu aahe....

24/1 stumps....
jinkanya chya chances vadhalya...udya chya divasat 300 che var karave laganar

चांगला गेला आजचा दिवस. ९ व्या बळीसाठी केलेली भागीदारी वगळता आणि मुकुंदचा बळी वगळता बाकी दिवस भारताच्या बाजूने होता. भारताने तिसर्‍या दिवशी उपाहारापर्यंत ४०० चे लक्ष्य ठेवून खेळ केला पाहिजे. सचिनचा आशिर्वाद असेल तर सचिनचे १०० वे शतक ह्या सामन्यात होईल.

तो मुकूंद मठ्ठ आहे का? तीन वेळा तसाच आउट झाला. आणि पहिल्याच बॉलवर चौका वगैरे. मेष राशीचा दिसतोय. हातातली मॅच घालवू नये.

प्रविण कुमारच्या उसळत्या चेंडूने स्वानच्या हाताला झालेली दुखापत इंग्लंडला महाग पडूं शकते, विशेषतः भारताच्या दुसर्‍या डावात.

दोन दिवस आहे आत हातात......५०० किमान करायला हवेत... आरामात जिंकु..

१२४/८ वरून ईंग्लंड २२१... Sad एकंदरीत आपल्या गोलंदाजांनी विशेषतः श्री ने हवामानाचा व दमट खेळपट्टीचा मस्त फायदा ऊठवला. आता ऊद्या दिवसभरात ३००+ करायला हव्यात.
सचिन या सामन्यात/डावात शतक करेल असे ऊगाच वाटते आहे.
असाम्या,
थोडा जरी सूर्यप्रकाश पडला ऊर्वरीत दिवसात तरी खेळपट्टी ठणठणीत होईल.. तितकिशी धोकादायक नसेल असे वाटते. लक्षमण चे ड्राइव्ह मस्तच होते.. फॉर्मात वाटतोय Happy
ऊद्याच्या पहिल्या सत्रात पुन्हा एकदा सामन्याला निर्णायक दिशा मिळेल.
-----------------------------------------------------------------------------------
धोणी च्या नावाने शिमगा केला की नेमका त्याच्या निर्णयाच्या बाजूने आपला खेळ होतो. तसे असेल तर दर वेळी त्याच्या नावाने शिमगा करायची तयारी आहे- Happy काल पिके चे चेंडू भज्जी पेक्षा जास्त वळत होते Happy श्री ची गोलंदाजी बघायला मस्त वाटले. फक्त शेपूटाला गोलंदाजी करताना थोडा चेव/भावना कमी व अचूकता/टप्पा यावर लक्ष केंद्रीत केले असते तर १५० मध्ये आटोपले असते.

<< फक्त शेपूटाला गोलंदाजी करताना थोडा चेव/भावना कमी व अचूकता/टप्पा यावर लक्ष केंद्रीत केले असते तर १५० मध्ये आटोपले असते. >> आपलं शेपूट गुंडाळायला जलदगती व त्यांचं शेपूट गुंडाळायला चांगली फिरकी गोलंदाजी , असा कदाचित हमखास फॉर्मुला असावा !!

लक्ष्मणला रौफ कडून संजिवनी बहाल...

हॉटस्पॉट मधे बिंदूचा कोणताच नामोनिषाण दिसत नव्हता... मात्र स्निको मधे कटचा / धुळीकणांचा आवाज आलेला दाखवत होते... कोणती टेक्नॉलॉजी सरस यावर आता बराच गदारोळ होणार असे दिसते.

Pages