भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोनीच्या गोलंदाजी करण्याने कपिलदेवसकट लोक का उखडले?>>> क्रिकेट कसे खेळले जावे याच्या 'पारंपारिक' कल्पनांमुळे हे होते आहे असे वाटते. टेस्ट ड्रॉच होणार हे नक्की असेल, डेड रबर असेल तरच अशा गोष्टी कराव्यात असा काहीसा रोख आहे. धोनीने त्याच्या नेहमीच्या मेव्हॅरिक पद्धतीने निर्णय घेतला तर ते पचत नाहीए. मुद्दा हा आहे की त्याच्या बॉलिंगवर पीटरसन ऑउट झाला असता तर हेच लोक मास्टरस्ट्रोक, जिनिअस कॅप्टन्सी इ.इ. बोलत असते!!!

इंग्लंड ५ बाद ७२. जरी इंग्लंडला १५० पर्यंत उखडले तरी ५ व्या दिवशी जवळपास ३४० धावा करून सामना जिंकणे फारच अवघड आहे. इशांत शर्मा या खेळपट्टीवर एवढी धमाल करू शकतो, तर, इंग्लंडचे गोलंदाज त्याच्यापेक्षा जास्त धमाल करतील. सचिनचे १०० वे शतक बहुतेक दुसर्‍या डावात लागेल असं वाटतंय.

पाच विकेट्स गेल्यामूळे कमीत कमी Eng attacking बॅटींग करून tea time पर्यंत declare करेल हि शक्यता तरी अतिशय कमी झाली आहे. वेळ पडली तर negative balling करून धोनी हातभार लावू शकतो. तीनशेच्या वरचे target असेल तर आपण मॅच draw करण्याचाच प्रयत्न करणार हे उघड आहे.

बेल. पीटरसन क्रीजच्या बाहेर उभे राहून full length swing movement control करायला बघत होते म्हणजे पिच अजूनही खराब झालेले नसावे ?

150 up....total lead is 350..... defenetly DRAW.......

GAMBHIR ...la ball lagala.....

भारतापुढे २६९ + १८८ = ४५७ च लक्ष्य. भारताने सामना ड्रॉ करणं समर्थनीय आहे पण शक्य आहे का, हा खरा प्रश्न. गंभीर जखमी व सचिनलाही कसलंतरी इन्फेक्शन; कठीण दिसतेय परिस्थिती !!

मुकुंद आधीच बाद झालेला आहे. गंभीर व सचिन फलंदाजी करणार नसतील तर सामना वाचविणे खूप अवघड आहे (भारत जिंकण्याची शक्यता शून्य आहे). त्यात झहीर फलंदाजीला आला तरी पायाचे स्नायू दुखावल्यामुळे तो लवकर बाद होईल. म्हणजे लक्ष्मण, द्रविड, रैना व धोनीला पूर्ण दिवस खेळून काढावा लागेल.

ताप आल्यामुळे आज सचिन क्षेत्ररक्षणासाठी आला नाही. त्यामुळे तो दुस-या डावात चौथ्या क्रमांकावर खेळू शकणार नाही. भारताचे ५ गडी बाद झाल्यावरच त्याला फलंदाजीसाठी येता येईल, असा नियम आहे. त्यामुळे रैना ४ था, धोनी ५ वा, हरभजन ६ वा व नंतर सचिनला फलंदाजीसाठी येता येईल. गंभीर खेळू शकणार असेल तर तो ४ था येईल.

लक्ष्मण काल सुरूवातीला चाचपडत होता. पण नंतर बहुधा त्याला आपण लक्ष्मण आहोत आणि समोरचे बोलर्स ज्या स्कूलमधे शिकलेत त्या स्कूलचे जे हेडमास्तर बोलर्स होते त्यांनाही आपण धुतलेला आहे हे आठवलेले दिसते Happy एकेक सुरेख फटके मारलेत काल त्याने.

पण द्रविड काय खेळतोय ते केवळ अवघड बॉल्स कसे खेळावे हे शिकण्यासाठी बघावे. बॉल कसाही स्विंग होउ दे, सीमवरून येणारी मूव्हमेंट होउदे, स्पिन होउ दे, हा बरोबर लाईनच्या मागे उभा. अशा वेळेस गावसकर प्रमाणेच त्याचे लक्ष कधी विचलीत होत नाही.

आणि लेकाचे रोहित शर्मा, यूसुफ पठाण ला मिलीयन डॉ. चे बिलिंग देतात. द्रविडला आपणच वर्गणी काढून तेवढे दिले पाहिजेत Happy

८०- १. आज सकाळी सुरवातीला द्रविड-लक्ष्मण जोडी खेळत असणं [ व ते टिकणं ] हे बरंय. ह्या जोडीची प्रदर्शनीय खेळी होईलच.
<< आणि लेकाचे रोहित शर्मा, यूसुफ पठाण ला मिलीयन डॉ. चे बिलिंग देतात > > हल्ली सर्वच क्षेत्रात सोन्यापेक्षां चकाकीलाच मागणी व किंमत येते !!

सचिन तापाने आजारी व गंभीरला कोपरावर जोरदार फटका बसल्यामुळे तो पॅव्हेलियनमध्ये असल्याने, हे दोघे फलंदाजीला उतरतीलच याची खात्री नसताना, स्ट्रॉसने डाव घोषित करताना शेपूट घातली.

झहीरचाही पाय दुखावला असल्याने, तो फलंदाजीला आला तरी, त्याला नीट हालचाल करता येत असल्याने तो लगेच बाद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ३७५ धावांचे लक्ष्य ठेवून डाव घोषित करून स्ट्रॉसला आपल्या गोलंदाजांना एखादा तास जास्त देता आला असता. पण तब्बल ४५८ धावांचे लक्ष्य ठेवून त्याने एक तास वेळ घालविलाच व भारत विजयासाठी अजिबात प्रयत्न करणार नाही असे लक्ष्य समोर ठेवले. प्रॉयरच्या शतकाचे निमित्त करून त्याने डाव लांबविला. पण भारताच्या फलंदाजीच्या भीतिने त्याने शेपूट घातली असेच दिसत आहे.

चिमण गेलास का रे मॅच बघायला आज तरी...

वॉल पडलेली आहे.. पण लक्ष्मण आहे अजून... आणि गंभीर पण आलाय... आणि दुपारी १२२७ च्या आत ह्यातले कोणी आऊट होऊ नये म्हणजे सचिन त्याच्या नेहमीच्या नंबरवर खेळायला येऊ शकेल..

लक्ष्मण गेला आणि गंभीर पण गेला. साहेब आलेत. सामना वाचविणे अत्यंत अवघड आहे. साहेबांना नांगर टाकून खेळले पाहिजे. अत्यंत संयमाने खेळणार्‍या द्रविडने इतक्या बाहेरच्या चेंडूला बॅट लावावी याचे आश्चर्य वाटले.

<< पण भारताच्या फलंदाजीच्या भीतिने त्याने शेपूट घातली असेच दिसत आहे. >> खरंय; पण स्वतःच्या गोलंदाजांवर त्याने दाखवलेला अविश्वास अधिक असमर्थनीय आहे. आपल्या एकंदरीत गोलंदाजीच्या दर्जामुळे धोनीने असं केलं असतं तर तें कदाचित कांहीसं समजण्यासारखं होतं.

CHALAAA...MATCH GELI.....

HARI OM VITTHALAAAA....

हिम्या नाही गेलो रे! मला काल संध्याकाळीच लक्षात आलं की आपली लक्षणं काही खरी नाहीत म्हणून. आता वाटतंय बरं झालं नाही गेलो ते.

< पण भारताच्या फलंदाजीच्या भीतिने त्याने शेपूट घातली असेच दिसत आहे. >> खरंय; पण स्वतःच्या गोलंदाजांवर त्याने दाखवलेला अविश्वास अधिक असमर्थनीय आहे. >> किंवा त्यातेस्भारतीयांच्या पहिल्या टेस्ट् मॅचच्या statsवर अधिक विश्वास असेल Lol

हरभजन टेस्ट टिममधे पहिली choice म्हणून का असतो हे फक्त देवालाच माहित. त्याच्या नावाने ओरड झाली कि पुढच्या मॅचमधे खेळून जातो मग परत "ये रे माझ्या मागल्या". पुढच्या मॅचमधे सरळ त्याच्या जागी युवराजला घ्यावे. एक बॅट्स्मन वाढेल, आणि सध्याच्या हरभजनच्या बॉलिंगपेक्षा युवराज काय वाईट बॉलिंग करणार ? काहीच नाहि तर गेला बाजार रैना नि युवराज मिळून दोन वेगळे options तरी देतील. तसेही आपण अडीच बॉलर्सच्या जीवावर खेळतो. Sad

आणि लेकाचे रोहित शर्मा, यूसुफ पठाण ला मिलीयन डॉ. चे बिलिंग देतात>> हे पटले नाहि रे. त्यांना बिलिंग T-20 साठी मिळालेय. त्याच्या टेस्टशी घोळ नको. तिथे बिलिंग आले कि द्रविडचा नंबर असणारच. हे असली सरमिसळ करूनच वाट लागतेय Sad

>> अत्यंत संयमाने खेळणार्‍या द्रविडने इतक्या बाहेरच्या चेंडूला बॅट लावावी याचे आश्चर्य वाटले.
खरंय! वॉल थिन झाल्याचा तो संकेत आहे. आणि लक्ष्मणही जवळ जवळ पहिल्या इनिंगसारखाच गेला! हा सगळा आयपीएलचा परिणाम असू शकतो. पण मग इतका अनुभव काय कामाचा?

AREEEE.....PAN TYA DRAVID NE LAKSHMAN NE KAHI TARI KELE TARI......BHAJJI. SACHIN. GAUTAM DHONI YANNI KAY KELE AJUN...?....SHANKH ADHI NYANCHYA NAVA CHA VAAJAVAA...

rainaa gelaaaa......baaji prabhu gela...aata gadh engrajanchya haathi jaanar....

मला या प्रसंगी एकच गाणं सुचतंय -- रैना बीत जाये

पहिल्या डावात मार खाणे किंवा कशीबशी ड्रॉ करणे ही आपली परंपराच आहे आणि त्या प्रमाणेच सगळं यथास्थित चालू आहे.

historical test.....REALY....NO FIGHTING SPIRIT ...NO ANY THING..196 RUNS ENGLAND WIN...
FAKT LAKSHMAN ..DRAVID..RAINA..YANNICH KAY TE PRAYANT KELE.... BAKICHE TAR LORDS BAGHAYLA AALELE....

MAST HARALE...ITS CAN DO ONLY BY INDIA..A NO. 1 TEAM.....

HAR HAR DHONIDEV...SACHINDEV...

गोलंदाजीला धार येणं कसोटी सामन्यांतील विजयासाठी अत्यावश्यक. फलंदाजीत चढ उतार असले तरी पाया मजबूत आहे.
एक सामना हरलो म्हणजे मालिका गमावली असं थोडंच आहे. इंग्लंडचा हा संघ चांगलाच आहे व आपण त्यांच्या हवामानात, तिथल्या खेळपट्ट्यांवर खेळतोय [ सराव सामन्यांशिवाय ] तेंव्हा असं सुरवातीला होणं अश्चर्यकारक नक्कीच नाही . हा एक सराव सामनाच होता असं समजायचं, झालं !! आपल्या संघाला शुभेच्छा.

सचिनला काय झालंय ते कळतच नाहिय्ये. त्याने खेळलेल्या २३ व्या चेंडूवर २ धावा घेऊन तो ९ वरून ११ वर पोचला व त्यानंतर पुढचे सलग ३८ चेंडू त्याला एकही धाव करता आली नाही (किंवा त्याने धाव केली नाही). शेवटी ६२ व्या चेंडूवर त्याने १ धाव घेतली व १२ वर पोचला. तो ११ वर (२७ वा चेंडू खेळताना) असताना ब्रॉडच्या गोलंदाजीवर त्याच्याविरूध्द पायचितचे एक अत्यंत जोरदार अपील पंचांनी फेटाळले. रिप्लेमध्ये तो बाद झालेला दिसत होता. बहुतेक त्यामुळे तो नर्व्हस झाला व त्याने पूर्ण नांगर टाकला. १२ वर बाद होण्याच्या केवळ २ चेंडू आधी त्याचा एक अत्यंत सोपा झेल स्लिपमध्ये स्ट्रॉसने सोडला. नंतर लगेचच २ चेंडूत तो बाद झाला (१२ धावा, ६८ चेंडू, ८४ मिनिटे).

सचिन व सेहवाग जेव्हा आपला नैसर्गिक खेळ सोडून नांगर टाकतात, तेव्हा ते लगेच बाद होतात असे अनेकवेळा घडलेले आहे. आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता. सामना जिंकणे अशक्य होते, पण म्हणून, एकही धाव न करता ३८ चेंडू नुसते खेळून काढणे हे विचित्र दृश्य होते. कदाचित तो अंगात ताप असताना खेळत असावा किंवा त्याला धोनीने नांगर टाकून खेळ असा आदेश दिला असावा किंवा त्याला आज फलंदाजी अजिबातच जमत नव्हती.

पुढच्या सामन्यात बहुतेक गंभीर व झहीर दुखापतीमुळे बाहेर असतील. हरभजनची हकालपट्टी करून त्याच्याऐवजी मिश्राला घ्यावे.

"सामनावीर" पुरस्कार पीटरसनला उगाचच दिला. त्याच्याऐवजी मॅट प्रॉयर (७१ आणि नाबाद १०३ धावा आणि ५ झेल) किंवा ब्रॉडची कामगिरी (एकूण ७ बळी आणि दुसर्‍या डावात ७४ धावा) जास्त चांगली होती.

भारत जरी कागदोपत्री टॉपची टेस्ट टीम असली तरी त्या क्रमांकाला साजेशी कामगिरी अजून भारताने केलेली नाही. विंडीजविरूध्द्च्या शेवटच्या सामन्यात शेपूट घालून आपण खर्‍या अर्थाने नम्बर १ नाही हे भारताने सिध्द केलेच होते. आज पुन्हा सिध्द झाले.

सचिनला काय झालंय ते कळतच नाहिय्ये. >> खर तर त्याचे असे un-natural खेळणे नवीन नाहि. आधीही बघितलेले आहेत.

मास्तरा तू खेळ बघत होतास की चेंडू मोजत होतास? Lol
सचिनवर तुमच्या सारख्या लोकांनी टाकलेल्या अति अपेक्षांमुळे हे होत असणार! तो ही एक माणूसच आहे आणि त्यात प्रचंड सुपरस्टिशस! आज त्याला त्याचा नंबर सोडून खेळावं लागलं. त्यात लॉर्डसवर ३८ (की ३७?) पेक्षा जास्त धावा झालेल्या नाहीत, त्यात ४थ्या इनिंग मधे त्याच्या फारशा मोठ्या खेळी नाहीत. असल्या अनेक असतील सटर फटर गोष्टी!

असो. इंग्लंडने जास्त चांगला खेळ केला म्हणून ते जिंकले.

Pages