पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

Submitted by Admin-team on 16 December, 2009 - 13:40

पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"लै भारी कोल्हापुरी" - अप्रतिम कोल्हापुरी जेवण........ व्हेज, नॉनव्हेज दोन्ही मस्तच!!!! तिकडच्या जेवणाला तोड नाही. आवर्जुन जावे असे ठिकाण. PCMC मधे इतके चांगले जेवण.....आणि इतकी चांगली service कोठेही मिळत नाही. पत्ता खाली देत आहे.....
A/2/4 D1 Block, Nr Thermax Chowk, MIDC Rd, Chinchwad, Pune - 411033

बाप रे. बाहेर खायला इतकी ठिकाणं आहेत चिंचवड मधे!
मी लहान असताना फक्त वृशाली आणि मयूर होतं.
नंतर काही वर्षांनी शीतल म्हणून एक सुरु झालं होतं.
एकदा पाहुण्यासारखं जायला पाहिजे चिंचवडला म्हणजे तुम्ही सगळ्यांनी लिहिलेली ठिकाणं ट्राय करता येतील.

मेखलाजी, जेव्हा वृशाली होत तेव्हाही नेवाळे मिसळवाले होते. मारुतीच्या मंदीरापाशी भागवतांच होटेल होत जिथे कांदाभजी मिळायची. फरक इतकाच या दोन्ही ठिकाणी महिला यायच्या नाहीत.

घरौंदा जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर पुण्याकडे जाताना फिनोलेक्स चौकात डावीकडे वळल्यावर कोर्टाकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर आहे.

'चावडी'मध्ये चवीपेक्षा व्हरायटीसाठी जावं. अर्थात, पदार्थांच्या व्हरायटीपेक्षा ए.सी. हॉल, ओपन पॅसेज, भारतीय बैठक अशीच व्हरायटी जास्त Happy चवीबद्दल फार विशेष सांगण्यासारखं नाही, जास्त मसालेदार असल्यानं काहींना 'चवदार' वाटण्याची शक्यता.

अजमेरा कॉलनीमधलं 'छाया पराठा' अप्रतिम. चव आणि सर्व्हीस दोन्ही मस्त. पहिला पराठा संपेपर्यंत "अगला कौनसा?" अशी विचारणा होते Happy पूर्वी ते साखर पराठा देखील बनवायचे, स्पेशल आयटम होता तो. कितीही पराठे खाऊन झाले तरी शेवटी एक साखर पराठा खायचाच, असा नेम होता. नंतर त्यांनी हा आयटम काढून टाकला (कार्बनमुळं तवे खराब होतात, असं काहीतरी कारण दिल्याचं आठवतंय).

निगडीच्या 'सावली'बद्दल कुणीच लिहीलं नाही? निगडी उड्डाणपुलाखालच्या चौकात डावीकडं वळल्यावर लगेच डावीकडं वळल्यावर 'सावली' दिसतं. दुपारी किंवा संध्याकाळी डोसा, उत्तप्पा असं काहीतरी खायचं असेल आणि कॉफी पित निवांत बसायचं असेल, तर चांगलं ठिकाण. जेवणामध्ये भरपूर व्हरायटी मिळेल, चित्र-विचित्र नावाच्या डिशेस मिळतात (चायनीज स्टार्टर पासून ते पंजाबी डिशेस पर्यंत).

चाफेकर चौकाच्या अलीकडं 'गायत्री' स्टॉल आहे. स्पेशल आयटम - मूग भजी. शिवाय फक्त गुरुवारी दडपे पोहे मिळतात. हा पदार्थ मिळणारे अजून कोणतेही ठिकाण जवळपास माहिती नाही.

हा धागा इतके दिवस नजरेतून सुटला होता. जिज्ञासूंनी इथे जरुर शंका लिहाव्यात. यथाशक्ती निरसण केले जाईल. Happy

जैन शाळा चिंचवड शेजारी एक उडप्याच होटेल आहे. चवदार रवाळ इडली चटणी शेकडाच्या भावाने मिळतात.

पदार्थांच्या व्हरायटीपेक्षा ए.सी. हॉल, ओपन पॅसेज, भारतीय बैठक अशीच व्हरायटी जास्त >>>
Lol
सावली मध्ये जेवणाची क्वालिटी बरीच बरी आहे. पण सर्विस... मला तरी फार चांगला अनुभव नाय आला. त्यामुळे मी टाळतोच.
कधी काळी साने बंधु डायनिंग हॉल सुरु झालेला तेव्हा खुपच भारी होते जेवण. नंतर ढेपाळला दर्जा.
आता तर काय तिथे सानिधी नावाच हॉटेल सुरु झालय पंजाबी वै वै...

प्रदिपचा समोसा मस्तय. Happy

प्रदिपचा सामोसा गेले वीस पेक्षा जास्त वर्ष मी खातोय. खरच चव अत्युत्तम आहे. कोणत्याही हॉटेलमध्ये रविवारी रात्री जेवायला गेलात की सेवा ढेपाळते हा अनुभव सर्वत्र आहे.

पिंपरी चौकातुन शगुन चौकात जाताना पुलाच्या अलिकदे रत्ना व्हेजिटेरिअन होटेल आहे, तिथलि टेस्ट मस्तच आहे

नव्या सांगवीत PWD gound वर "बारामतीचा खमंग वडापाव" नावाचा एक गाडा संध्याकाळी ६ नंतर लागतो. फारच छान चव!!

संत तुकारामनगर- डी.वाय. पाटील कॅम्पसमधले "दक्षिण" एकनंबर हॉटेल आहे. (म्हणजे आम्ही असतांना होते) आता रिन्नोव्हेशन नंतर तिथली मजा गेली आहे असे मित्रलोक्स सांगत असतात.

त्याच भागात गणपती मंदिरासमोर 'जोसेफ वडापाव' ची गाडी (कधीकधी) लागलेली असते. तुम्ही कधी त्या भागात असलात, आणि तुमच्या नशीबाने जोसेफ अंकल त्यादिवशी आलेला असेल तर नक्की ट्राय करा तिथला वडापाव. नशीब फारच जोरावर असेल तर मूंगभजीसुद्धा मिळेल.

मला नक्कीच धन्यवाद द्याल तुम्ही ! Wink

ज्ञानेश ~

अहो मागच्या शनिवारी मी चक्क संत तुकारामनगर - डीवायपी तसेच वाय.सी.एम. - याच परिसरात होतो ना...! गणपती मंदिर काही माहीत नाही पण डीवायपीच्या आसपास 'शनी चौक' आहे तिथे मुलाची सासुरवाडी आहे. तिथेच रात्रीचे भोजन होते. तुमचा 'दक्षिण' हॉटेलचा उल्लेख आज, आत्ता, वाचला, अन्यथा मी त्या जोडीला आणि सूनेच्या घरातील अन्य दोघांना तेथेच नेले असते.

...तसे झाले असते तर मग इथेच तुम्हाला धन्यवादही दिले असते.

फिर कभी....त्यावेळी शक्य झाल्यास तुम्हीही या तिथे...जुन्या आठवणींना उजाळाही मिळेल आयताच.

अरेरे, थोडक्यात चुकामूक ! Happy

पुढच्या वेळी तिकडे जाल तेव्हा नक्कीच मी सांगीतलेल्या ठिकाणांना भेट द्या. मलाही शक्य असेल तर येईनच ! आयुष्यातली काही सर्वोत्तम वर्षे त्या परिसरात गेली आहेत, तेव्हा अटॅचमेन्ट आहेच ! वायसीएमला तर 'पडीक' असायचो आम्ही.

असो.
बाकी विपूत बोलू, इकडे अवांतर होतंय ! Wink

>>काकडेपार्कमधे एक वडापाववाला असतो फक्त संध्याकाळी ४ तास तो पण मस्त, वड्याचा साईज पुणेकरांना शोभणार नाही एवढा मोठा आणि चव सुद्धा जबरी. <<
हे कुठे आहे? पोद्दार शाळेजवळ? आणि चाफेकर चौकात करमरकरांचे दुकान कुठे आहे? आणि ती भजी-वाडापावची गाडी कुठल्या मशिदीसमोर आहे, चाफेकर चौकात का?

हे कुठे आहे? पोद्दार शाळेजवळ? >>>> हो... काकडे पार्कमधलं SBI चं ATM आहे त्याच्या बरोबर समोर.. त्याच बाजुला.. सुविधा च्या समोर... फक्त तो रोज असतोच असं नाही.. त्यामुळे मनात आलं अन गेलो त्याच्याकडे वडापाव खायला असं करता येत नाही.. Wink रच्याकने, तो पार्टी साठी वगैरे पाव-भाजी पण बनवुन देतो.. अप्रतिम असते (साधारण ५ वर्षापुर्वी तरी अप्रतिम होती, पण तेव्हाचा वडा-पाव अन आताचा वडापाव यामधे चवीत घसरण नसल्याने पावभाजी आतापण अप्रतिम असेल अशी आशा करायला हरकत नाही)

Pages