Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सीमा तुझं क्लिनींग
सीमा तुझं क्लिनींग प्रॉडक्ट्स विषयातले R&D एकदम वाखाणण्याजोगे आहे.
मी तुझ्याजागी असेन तर
मी तुझ्याजागी असेन तर स्क्वीजी आणणार नाही. रोज आंघोळ करताना माझ्याकडुन शक्यच नाही ते वापरण. आणि ती एक नविन अडगळ होईल घरामध्ये. >>>>>> सीमा..............अगदीच...मी हाच विचार केला की रोज???????????????? ना बा...आपल्यानं नाही होणार...
पण काल मी घरातलं दिसेल ते सर्व साफ केलं...तुझ्या मॅजिकनं...आणि शिवाय मि. क्लीन इरेझरचा स्पे पण चांगला आहे. एकदम भारी...आमच्या बाथटबमध्ये चेहरा दिसतो इतकं सर्व स्वच्छ !!! देव तुझं भलं करो...
लवकरच मॅजिक एरेझर आणून प्रयोग
लवकरच मॅजिक एरेझर आणून प्रयोग करण्यात येईल.
कोरड्या भाज्या करण्यासाठी
कोरड्या भाज्या करण्यासाठी अॅल्युमिनिअमच्या कढयांना काय पर्याय असतात?
http://www1.macys.com/catalog
http://www1.macys.com/catalog/product/index.ognc?ID=342326&CategoryID=46...
हा मिक्सर म्हणून कसाय ? इडली दोसा च वाटण होत का चंगल ह्यात? त्या बरोबर कसलसं फूड प्रो. ही आहे ते कुणी वापरलय का ?
माझ्याकडच्या क्रॉकपॉट मधलं
माझ्याकडच्या क्रॉकपॉट मधलं भांडं फुटलं
नुसतं भांडं मिळतं का कुठे?
मुंबैकरांसाठी ( किंवा जिथे
मुंबैकरांसाठी ( किंवा जिथे महानगर/ पाइप गॅस आहे तिथल्यांसाठी) प्रश्न
सतत घर बदलण्याच्या ओघात माझ्या गॅसच्या शेगडीचे सेटींग सिलेंडर ते महानगर ते परत सिलेंडर असे य वेळा बदलले गेलेय. त्यामुळे छोट्या आणि मोठ्या दोन्ही गॅसची मॅक्झिमम फ्लेम अॅडजस्ट करून घेतलीये पण गॅस लहान करताना हवा तितका लहान होत नाही. शेगडीवाल्याने हात टेकले. तो म्हणतो सेटींग चेंज करत राह्यल्याने हे होतंय.
तुम्हा लोकांचा काय अनुभव? काही उपाय यावर शेगडी बदलण्याव्यतिरिक्त?
नीरजा, तुझी शेगडी ज्या
नीरजा, तुझी शेगडी ज्या कंपनीची आहे, त्या कंपनीच्या सर्व्हीस सेंटरला संपर्क करणे शक्य आहे का?त्यांना एकदा शेगडि दाखव.
ह्म्मम्म हे करून बघते. धन्स
ह्म्मम्म हे करून बघते. धन्स अमि.
ईथे कुणी स्लो कुकरमध्ये
ईथे कुणी स्लो कुकरमध्ये भारतीय पदार्थ केले आहेत का?
रेसिपीज चा एखादा धागा आहे का? नेहमीपेक्शा किती वेळ जास्त लागतो?
वत्सला, मी उत्तर दिले होते -
वत्सला, मी उत्तर दिले होते - आता ते मलाच दिसत नाहीये. म्हणून पुन्हा लिहितेय. अनूपी सिंगला यांचे पुस्तक "इंडियन स्लो कूकर" चांगले आहे. बाकी पुस्तके स्लो कूकर या विषयावर खूप आहेत पण इंडियन रेसिपीजसाठी हे मला आवडले. एमेझोनवरून मागवता येईल.
अमी
वत्सला, जुन्या मायबोलीतली
वत्सला, जुन्या मायबोलीतली स्लो कूकर पाककृतींची ही लिंक - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/139026.html?1215825593
आणि नव्या मायबोलीतली ही लिंक - http://www.maayboli.com/node/2624
एकीकडे इडल्या, एकीकडे आप्पे
एकीकडे इडल्या, एकीकडे आप्पे लावून, हात धुवून पोस्टायला घेते आहे.
इतके दिवस मॅजिकबुलेटचं लई कौतुक केलं, पण त्यात इडली दोश्याची पिठं मनासारखी होत नाहीत. उकड्या तांदूळ बारिक करताना तर एका तांदळाचे चार तुकडे केले की मॅ. बु.चा जीव जातो. म्हणून मग फार्फार रीसर्चांती एक निंन्जा नावाच्या कंपनीचा मिक्सर- ग्रायंडर घेतला. ११००वॉटाच्या मोटारीमुळे तांदूळाचं उगाळलेल्या चंदनासारखं गंधाच्या कंन्सिस्टंन्सिचं काहीतरी झालं. पण या मिक्सराच्या प्लास्टिकच्या बेसाला हे वरच्या जारातलं गरगरणं मानवेल की नाही अशी धास्ती होती. आधीचे मिक्सरांचे पिठं बारिक करतानाचे थयथयाट बघितले होते. पण याला सक्शन कप्सने चिकटवून बसवता येतं. (मॅन्युअल न वाचल्यामुळे हा साक्षात्कार उशिरा झाला.)
तेव्हापासून दिसेल ते टाक निंन्जात मोहींम सुरू आहे. हायली रेकमेंडेड.
(Ninja kitchen system 1100 पैसा वसुल होईपर्यंत टिको!)
बाईच्या बेभरवशी कारभाराला
बाईच्या बेभरवशी कारभाराला कंटाळून माझ्या बहिणीने भारतात डिश वॉशर घेतला आहे. इथे बहुतेक असतात तसाच आहे. दोन रॅक आहेत. भांडी स्वच्छ धुवून निघतात. वॉशर अजिबात आवाज करत नाही. फक्त बाईला हे "मिशन" अजून लावता येत नाही त्यामुळे ती उगवलीच तर धुवून वाळलेली भांडी जागेवर लावण्याचं काम करते
कुणाला घ्यायचा असल्यास रेकमेंडेड.
केवढ्याला घेतला आणि कुठे तेही
केवढ्याला घेतला आणि कुठे तेही सांगशील का? पुण्यात/ मुंबईत किंवा अन्यत्र...
आणि तो घरात बसवून द्यायला कंपनीचे लोक येतात का? काही प्रॉब्लेम आला तर सर्व्हिस वगैरे..
@मृण्मयी , हे बरं झालं
@मृण्मयी , हे बरं झालं सांगितलसं ते. मी अजुनही मना सारखा ब्लेंडर घेतला नाहिये. कारण ऑस्टरायझर
चा असून नसल्या सारखा झालाय. कधी चालतो कधी नाही. त्यामुळे सगळी भिस्त फूड प्रोसेसर वर ठेवावी लागते. निन्जा पण मी वेग वेगळ्या किमतीचे पाहिले. Walmart/Costco/ bed bath and beyond सगळी कडे वेगळ्या किमती होत्या. तुला किती ला पडला?
मीही इथे ब्लेंडरबद्दल
मीही इथे ब्लेंडरबद्दल विचारायलाच आले होते. माझ्याकडे असलेला ऑस्टर बिघडलाय. माझ्याकडे मॅ बु चेच एक वर्जन आहे. त्यात चटण्या, मसाला वाटण वगैरे होतात. खरंतर तोही आजकाल सुरु केला की अडकून बसतोय.
मृ कुठून घेतला निन्जा?
निन्जाचे दुसरे एखादे मॉडेल कुणी वापरलेय का?
बेड बाथ मधून घेतला. इथे
बेड बाथ मधून घेतला. इथे KS1200 दाखवलाय. घरी KS1100 आहे. किंमत तेव्हडीच. २०% सुटीच कूपन वापरलं. $१२७.९९ ला मिळालं. गेल्या १२ वर्षांत जे काही घेतलं ते इतकं महाग नव्हतं. मग सुमीत वगैरे बघावं म्हणून विचार केला. (साधारण ५०० वॉट्सचं अस्तं. किंमत मात्र अशीच तगडी. पुन्हा स्पेअर पार्ट्सचे घोळ, वॉरंटीच्या भानगडी.) म्हणून निन्जा घ्यायचं ठरवलं. यात एक आवडलेली गोष्ट अशी की ब्लेड्स फक्त भांड्याच्या बुडाला नसून वर झाकणापर्यंत आहेत. त्यामुळे खालचं बारिक होतंय आणि वरचं नाही, पुन्हा ढवळा अशी कटकट नाही. फोटू बघा.
ज्ञाती, माझा एक मॅबु ५ वर्षं रगडून वापरून झाला. बिघडला. म्हणून पुन्हा तोच प्रकार घेतला. याला ३ महिन्यांत बेसला तडे गेलेत. परत करावा का विचार करतेय. पण बराच उशीर झालाय.
तिथे पण रिव्यूज चांगले
तिथे पण रिव्यूज चांगले लिहिलेत. (फक्त एक सोडून) बरेच जणं ऑस्टर ला कंटाळून निंजा घेतला असं पण लिहित आहेत. दिसायला छान दिसतोय अर्थात प्राईसी पण आहेच.
हो मलाही हविये डिशवॉशर ची
हो मलाही हविये डिशवॉशर ची माहीती..
थॅन्क्स मृण्मयी! माझा मॅ बु
थॅन्क्स मृण्मयी!
मॅ बु पण नवीन घ्यावा लागतोय की काय अशी शंका आहे. निंजा दोन्हीसारखा वापरता येतो असं ऐकलंय, खरंय (ना) ?
माझा मॅ बु दीड वर्षाचाच आहे, पण वरचे भांडे त्यात बसवल्यावर अडकतेय. बहुधा काढता-घालताना जोरात फिरवला गेला असेल. मी त्यात इडली-डोशाचे पीठ नव्हते करत, त्यासाठी ऑस्टर वापरत होते. ज्युस्/मिल्क्स्शेक करायचा म्हटल्यावर दोन्ही ब्लेंडर गळताहेत
मागे शोनूने सांगितलं तसं ओस्टर च्या मशीनसाठी वरची भांडी इंडियन ग्रोसरीस्टोअर मध्ये मिळतात का बघते.
माझ्याकडे प्रितीचा मिक्सर
माझ्याकडे प्रितीचा मिक्सर आहे. गेले ५-६ वर्षे वापरतेय. एकदम मस्त आहे. इडली/डोसा, मसाले, चटणी सगळे छान वाटले जातात. मी नक्कीच रेकमेंड करेन.
डिशवॉशर सीमेन्स कंपनीचा आहे.
डिशवॉशर सीमेन्स कंपनीचा आहे. एलजीचे पण मिळतात. बहिणीने ठाण्यात विजय सेल्समध्ये घेतला. ३० की ४० हजार किंमत आहे बहुतेक. फुल्ली ऑटोमॅटिक आहे. तिथे त्या दुकानात आणि एकूणच ठाण्यात तरी डिस्प्ले पीस नव्हते म्हणे. कॅटलॉग बघून ऑर्डर करायचे.
धन्यू सिंडरेला..
धन्यू सिंडरेला..
माझ्या ११ वर्ष जुन्या
माझ्या ११ वर्ष जुन्या फूडप्रोसेसरचे भांडे खराब झाले आहे. म्हणजे लॉक करायचा खटका तुटला आहे. फूडप्रोसेसर उत्तम आहे. फक्त भांडं कुठे मिळू शकतं माहीती आहे का? कुझिनआर्टचा आहे.
राखी अमॅझॉनवर शोधलेस का तू
राखी अमॅझॉनवर शोधलेस का तू भांडे?
तू म्हटल्यावर बघीतलं तिकडे.
तू म्हटल्यावर बघीतलं तिकडे. आधी मॉल, टारगेट वगैरेत पाहिले होते

हा पार्ट तुटलाय. आता करते ऑर्डर. थँक्स रूनी
इथे पॅनकेक साठि जे पसरट ग्रिल
इथे पॅनकेक साठि जे पसरट ग्रिल मिळतात ईलेक्ट्रिक वर चालणारे त्यावर पोळ्या करुन पाहिल्यात कुणि? होतात का चांगल्या?
मदत करा ना प्लीज. फुड
मदत करा ना प्लीज.
फुड प्रोसेसर घ्यायचा विचार करते आहे. मी जपान मधे असते आणि घरी तिघेच(मी, नवरा आणि ३ वर्षाचा मुलगा).
फुप्रोचा कितपत उपयोग आहे?
इकडे ताक करणे वगैरे होत नाही. बेकिंग बर्यापैकी करते. मिक्सर, ब्लेंडर आहेच.
कुकीप्रेस मध्ये ती चकलीसाठी
कुकीप्रेस मध्ये ती चकलीसाठी वापरतो तशी चकती असते त्याने चकल्या कश्या होत्यात? कुणी कुकी प्रेस वापरलयं/वापरता का चकल्या करण्यासाठी?
Pages