Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२ माणसांच्या कुटुंबासाठी छोटा
२ माणसांच्या कुटुंबासाठी छोटा फ्रीज घ्यायचा आहे ? कुठ्ला चांगला(आणि स्वस्त !) आहे?
मिक्सर घ्यावा की फूड
मिक्सर घ्यावा की फूड प्रोसेसर, अशी चर्चा चालू होती ना मागे?
ज्यांच्याकडे आधीच मिक्सर आहे आणि चांगला चालू आहे, पण फुप्रोपण घ्यायचा आहे, त्यांनी हे मॉडेल बघावे.
कोणाला या मॉडेलचा अनुभव असल्यास कोणी इथे अजून माहिती देईल तर बरे होईल.
सुनिधी, अजून डिशवॉशर घेतला
सुनिधी, अजून डिशवॉशर घेतला नसशील तरः
मिनोतीच्या >>> मला बॉश चा लहान वाटला डिशवॉशर>>> ह्या वाक्याला मोदक. मी ही बॉशचा घ्यायचा असं ठरवून गेलेले आणि 'केनमोर' चा घेऊन आले. मस्त चालतोय.
नाही अजुन नाही घेतला. धन्यवाद
नाही अजुन नाही घेतला. धन्यवाद सायो. मिनोती तुझा पण मॉडेल लिही ना. कीचनएड, मेटॅग चे पण नाव दिसले पहिल्या पाचात.
अरे वा चांगली माहिती
अरे वा चांगली माहिती मिळाली.
सीमा, बस्के लेमी शाइन पावडर आणि वडी दोन्ही एकदम ठेवायचे का?
आता माझा प्रश्न. कार्पेटवरचे (भाजी/आमटीचे) डाग स्वच्छ करायला काय वापरावे.
कार्पेट साफ करणारे वॅक्युम क्लीनर मिळतात ना? त्याचा कितपत वापर होतो?
चांगला उपयोग होतो ज्ञाती.
चांगला उपयोग होतो ज्ञाती. माझ्याकडे सध्या बिसेलचा क्विक स्टीमर व्हॅक्यूम आहे. त्यात चालू शकेल असं बिसेलचंच क्लीनिंग सोल्युशन गरम पाण्यात मिसळून वापरल्यास व्यवस्थीत डाग निघतात कारपेट वरचे. आज पर्यंत चहा,कॉफी, क्वचित लेकीने सांडलेली औषधं,ईत्यादीचे डाग नीट निघालेत.
थॅन्क्स प्रॅडी !!
थॅन्क्स प्रॅडी !!
अरे वा प्रॅडी, बरी भेटलीस. एक
अरे वा प्रॅडी, बरी भेटलीस. एक सांग : हा जो बिसेलचा व्हॅक्युम क्लिनर आहे तो तुला हार्ड वुड, सिरॅमिक फ्लोअरवरही चालतो का की फक्त कार्पेट?
ज्ञाती हो, वडी व लेमी शाईन
ज्ञाती हो, वडी व लेमी शाईन एकत्र ठेवायचे.
फारच दाटी होइल. पण ट्राय करुन
फारच दाटी होइल. पण ट्राय करुन बघते मी सुद्धा.
सायो माझ्याकडे बिसेलचा
सायो माझ्याकडे बिसेलचा प्रोहिट व्हॅक्यूम क्लीनर आहे त्याला हार्ड फ्लोअरसाठि वेगळी अटॅचमेंट घ्यावी लागते
निवेदिता, लिंक देऊ शकशील का?
निवेदिता, लिंक देऊ शकशील का?
सायो माझ्याकडे हा
सायो माझ्याकडे हा आहे.
http://www.kohls.com/kohlsStore/electronicsgames/brandsforhomecare/bisse...
मी फक्त कार्पेटसाठि वापरते. मॅन्युअलमध्ये दिलेली आहे बाकि अटॅचमेंटची माहिती.
नविना, मला electric coil
नविना,
मला electric coil burner चा अनुभव नाही, पण अमेरिकेत मी एक तवा घेतला होता, Calphaon चा. हार्ड अॅनोडाइझ्ड. पण पोळ्या करायला तो मला तरी योग्य नाही वाटला. तुम्ही फक्त पोळ्या करण्यासाठी वापरणार की अजून काही?
पोळ्या करताना आपण गॅस कमी-जास्त करतो ते तंत्र या तव्यावर चटकन जमलं नाही मला तरी. तापायला आणि तापमान अॅडजस्ट व्हायला या तव्याला वेळ लागतो. शेवटी मी देशवारी केली तेव्हा नवीन तवे आणले २.
इंग्रो मधे इंडिअन ब्रँडचे तवे असतील तर ते पहा. त्यातला कॉइलसाठी कोणता हे मात्र आपणच ठरवावं लागेल.
तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देण्याऐवजी वेगळा अनुभव सांगितला म्हणून क्षमस्व, पण Calphalon चं नाव, हार्ड अॅनो...वगैरे मुळे इंप्रेस होऊन मी घेतला तो तवा नि उपयोग नाही झाला त्याचा. तुम्हाला तसा अनुभव येऊ नये म्हणून शेअर केलं.
प्रज्ञा, माझा अगदी उलट अनुभव
प्रज्ञा, माझा अगदी उलट अनुभव आहे calphalon चा
मिनोती, तुम्ही पोळ्या
मिनोती, तुम्ही पोळ्या करायलापण वापरता तो तवा?
मी देशवारीत तो घरीच ठेवला. एक तर तो जड आहे, त्यामुळे साबा म्हणाल्या की मीपण रोज नाही वापरणार....
पण डोसे वगैरे भारी झाले त्यावर.
पोळ्यांसाठी वापरताना नक्की कसं अॅडजस्ट करायचं?
प्रज्ञा, हो चपाती, पुरणपोळी,
प्रज्ञा, हो चपाती, पुरणपोळी, पराठे, उत्तप्पा, अडाई, डोसे इत्यादी सर्व प्रकार त्यावरच करते. माझा सिरॅमिक टॉप रेंज आहे. त्याला १-१० नंबर असलेली बटणे आहेत. तवा साधारण ५ वर तापायला ठेवते. हात साधारण इंचभर वरुन फिरवला तर उष्ण वाटेल इतपत गरम करते. तोवर घडीची पोळी तयार असते. मग ती टाकून गॅस ७ वर ठेवते. एका बाजून भाजून उलटताना तेल लावून उलटते. दुसरीकडे तेल लावते परत पहिली बाजू भाजते. अगदी व्यवस्थीत होतात पोळया माझ्यातरी. मी फुलके कधीही करत नाही कारण मला स्वतःलाच ते खायला आवडत नाहीत
सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेवटची पोळी झाली की लगेच तवा थंड बर्नरवर ठेवते नाहीतर तव्याची कढई होते!
मला अहो जाहो करू नको प्लिज.
प्रज्ञा, माझा अगदी उलट अनुभव
प्रज्ञा, माझा अगदी उलट अनुभव आहे calphalon चा >> अनुमोदन! इथे विचारुनच मी पण calphalon तवा घेतला. पोळ्या, पराठे, दोसे सगळे त्यावरच करते. ६ महिने झालेत पण अजुनही अगदी नवाच आहे.
हम्म.. घरी गेलं की वापरून
हम्म..
घरी गेलं की वापरून बघितला पाहिजे तवा.
मिनोती, सोनपरी, ठेंकू
मीपण १२-१३ वर्षे calphalonचा
मीपण १२-१३ वर्षे calphalonचा हार्ड अॅनोडाईज्ड तवा (१३ इंच) रोज पोळ्यांना वापरते. मस्त होतात पोळ्या. पुरण्पोळ्यापण छान होतात. मला आता नविन घ्यायचा आहे तर मिळत नाहीये.
तुम्ही ज्या सुगरणी त्या
तुम्ही ज्या सुगरणी त्या तव्यावर पोळ्या वगैरे करता त्यांना माझा दंडवत.
पण सिरिअसली, आता मलापण शिकायला हवं हे प्रकरण. सहज कोणाला जमलं तर पोळ्या करतानाचा व्हिडिओ टाका. खरंच माझं नक्की कुठे चुकतंय ते कळेल मला.
गंमत म्हणजे, मी सासरी पुण्यात असताना पोळ्या केल्या की एकदम मऊ होतात(म्हणजे साध्या तव्यावर.), इथे आले कीच (तसाच तवा असूनही) काहीतरी धाड भरते पोळ्यांना!
प्रज्ञा, अशा वेळी कणकेवर सगळा
प्रज्ञा, अशा वेळी कणकेवर सगळा दोष सोपवून मोकळं व्हायचं असतं.
अंजली, हा किंवा हा पाहीला
अंजली, हा किंवा हा पाहीला आहेस का?
मिनोती, हे दोन्ही नाहीत गं.
मिनोती,
हे दोन्ही नाहीत गं. माझा १३ इंच गोल आहे आणि चांगलाच जड आहे. त्याला दोन्ही बाजूला हँडल्स आहेत. घेतला तेव्हा $१०० ला होता. उद्या फोटो काढून टाकते.
सगळ्यांना धन्यवाद. मला
सगळ्यांना धन्यवाद. मला सगळ्याच गोष्टींना (पोळ्या, दोसा, पुरणपोळी ) उपयोगी पडेल असा हवा आहे. माझा आताचा तवा चांगला आहे पण तो आमच्या घरी मी इथे यायच्या आधी पासून आहे. नवर्याला विचारलं तर त्याला आठवत नाहीये कुठून घेतला ते. ई. ग्रो. मध्ये पहिला मी पण घरच्या सारखा नाही. मागे घेतलेला फिलिला असताना घेतला होता त्यामुळे तिथल्या ईंग्रो मध्ये मिळाला असेल कदाचित. पीट्सबर्ग मध्ये फिली सारखे ईंग्रो नाहीत. त्यामुळे मी थोडी कंफ्युज्ड आहे.
मिनोती, तो स्क्वेअर ग्रिडल पोळ्यांसाठी कामात येइल का? मी तसा macys, JCP, Target वगैरे मध्ये पाहिला, पण मग शुअर नव्हते म्हणून नाही घेतला.
मला अजून एक प्रश्ण आहे. तो म्हणजे कास्ट आयन चे तवे दोसा साठी वगैरे वापरता येतात का? बाकी गोष्टींसाठी कसे असतात ते?
प्रज्ञा, त्या तव्यावर पोळ्या
प्रज्ञा, त्या तव्यावर पोळ्या करण्यासाठी सुगरण असायची गरज नाही, मला पण येतात पोळ्या करता त्या तव्यावर
माझ्याकडे हा असा तवा आहे.
माझ्याकडे हा असा तवा आहे. सेटमधला. हार्ड अनोडाइज्ड आणि थोडा खोलगट. तो कशासाठी वापरू? आणि हीट कशी ठेवू?

नविना, माझ्याकडे स्क्वेअरच
नविना, माझ्याकडे स्क्वेअरच आहे
मी बेड-बाथ-बियाँड मधे घेतला आहे बहुतेक. त्यात २ प्रकार असतात एकाची किंमत २९.९९ आणि एकाची ३९.९९ असते. त्यातला माझा बहुतेक ३९.९९ वाला आहे (स्टील हँडल हाच एक फरक आहे बहुदा दोन्हीत).
कास्ट आयर्न ग्रीडल मी डोसे करायला क्वचीत वापरते कारण एकच की मला दोसा कोरडा लागतो आणि त्यावर करताना मला अजुनतरी तेल लावावे लागते. मी त्यात भाकरी करते, मेथी, माठ, वगैरे पालेभाज्या करते. अधेमधे चपाती पण करते.
नीरजा, तुला तो तवा पोळ्या, फुलके, पराठे वगैरेसाठी वापरता येईल. दोसे/उत्तप्पे/अडाई वगैरेला शक्यतो सपाट बुडाचा तवा असावा. यातव्यावर भाकरी करायच्या असतील तर मी मागच्या पानावर आशूडीला तंत्र समजावले होते ते वाच
मिनोती, माझा तवापण असाच
मिनोती, माझा तवापण असाच स्क्वेअर आहे. बहुतेक ३९.९९ चा आहे, बेड-बाथ मधलाच. तो तसला चौकोनी तवा बघून दुकानातच हातपाय गळून गेले असावेत माझे..
२ किलो तरी वजन असेल तव्याचं. रोज हाताळून घासताना कधी कधी माझी मानपण दुखायची (ती कहाणी वेगळी आहे). एकूण काय, तर त्या तव्याने माझा उरलासुरला आत्मविश्वास घालवायचंच काम केलं!
असो! ही साठाउत्तराची कहाणी पाचाउत्तरी नुसतीच संपूर्ण!
मिनोती माझ्याकडे भाकरीचा तवा
मिनोती माझ्याकडे भाकरीचा तवा आहे वेगळा. अगदी टिपिकल लोखंडी. मी तर त्यावरही पोळ्या करू शकते. भाकर्या मला एकुणातच अजून म्हणाव्या तश्या जमत नाहीत आणि आता स्वै. बाई असल्याने मी करायला जात नाही.
हा तवा असाच आहे माझ्याकडे. कोणीतरी आईबाबांना सगळा सेट गिफ्ट दिला होता. त्याची गरज नव्हती म्हणून तो पॅकबंद पडूनच होता कित्येक दिवस. मग माझं घर झाल्यावर मी हात मारला त्यावर.
माझा नॉनस्टीक आणि फ्लॅट तवा होता तोच मी इतके दिवस रोजच्या पोळ्यांपासून धिरडी/ डोसे/ हाफ फ्राय सगळ्याला वापरायचे. पण तो मध्यातून वर आलाय आणि कोटींग थोडसं उखडलंय त्यामुळे तो आता वापरण्यात अर्थ नाही ना. तेव्हा आता हा एक्स्चेंजमधे देऊन नवीन घेणारे मी. पण मग तो रोजच्या पोळ्यांना नाही वापरणार.
आता हा जो हार्ड अनोडाइज्ड आहे तो रोजच्या पोळ्यांना वापरू? पण त्याला तर हीट कमी असायला लागते ना? काय लक्षात ठेवायचं? स्वै.बाईला कळेल असं? की लोखंडीच वापरूदेत तिला. मी करेन तेवढ्यापुरता हा वापरू?
नॉनस्टीक रोज वापरू नये म्हणतात मग त्यापेक्षा हार्ड अनोडाइज्ड बरा का?
Pages