Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नीरजा, बाई आच मोठा करून
नीरजा, बाई आच मोठा करून पोळ्या करते का? तसे असेल तर हा तवा तिला शक्यतो देऊ नको. मध्यम आचेवर वापरण्यासाठी हे तवे चांगले असतात. तुला खात्री असेल की बाई तवा नीट वापरेल, मध्यम आचेवर वापरेल तरच तिला दे. तसे नसेल तर आपला हात जगन्नाथ असेल तेव्हाच वापर
मी नॉन्स्टीक तवे कधीही वापरलेले नाहीत त्यामुळे त्याबद्दल सांगू शकणार नाही.
हो ती आच मोठा करूनच करत
हो ती आच मोठा करूनच करत असावी. मी काही एवढं लक्ष दिलेलं नाही. (कसली कुगृहिणी आहे मी!
)
तसंच करते. तिला जमतायत त्या लोखंडीवर पोळ्या. तेच बरं तिच्यासाठी..
>> हो ती आच मोठा करूनच करत
>> हो ती आच मोठा करूनच करत असावी. मी काही एवढं लक्ष दिलेलं नाही. (कसली कुगृहिणी आहे मी! )
तसंच करते. तिला जमतायत त्या लोखंडीवर पोळ्या. तेच बरं तिच्यासाठी.. <<
माझ्या एका अॅनोडाइज्ड तव्याची वाट लावायला सुरूवात केली होती बाईने. मोठया आचेवर पोळ्या करायची सांगुनही दुर्लश करत असे. तिला दुसरा तवा चालायचाच नाही. तो तवा दिसला नाही की चिडचिड करायची. एकदा ती ८-१० दिवस सुट्टीवर गेली तेव्हा मी तो तवा गायब केला आणि लोखडि तवा आणून ठेवला. ती आल्यावर सांगितले की त्याचं हँडल तुटलं म्हणून दुरूस्त करायला दिलाय. मग ती रोज मला विचारायची की दुरूस्त झाला का? एकदा तिला सांगितलं माहेरी देऊन टाकला.... प्रश्न मिटला.
गंमत म्हणजे, मी सासरी पुण्यात
गंमत म्हणजे, मी सासरी पुण्यात असताना पोळ्या केल्या की एकदम मऊ होतात(म्हणजे साध्या तव्यावर.), इथे आले कीच (तसाच तवा असूनही) काहीतरी धाड भरते पोळ्यांना!
सासरी best performance व्हायलाच हवा हे प्रेशर असेल ....
चला आता मी_अमि च्या पोस्टनंतर
चला आता मी_अमि च्या पोस्टनंतर शिक्कामोर्तब की तो तवा बाईला वापरायला न देणे.
साधना
साधना
तव्यावर इतकी चर्चा झाली तर
तव्यावर इतकी चर्चा झाली तर काही इनपुट माझ्याकडुन. चपाती साठी मी मातीचा तवा, जो ऊलटा असतो, वापरते. इंदुरला बरेच जण वापरतात. ह्या साठी गॅसचा स्टोव्ह हवा, इलेक्टिक कॉइलचा चालत नाही. ह्या पोळ्या पचायला खुप सहज असतात. पराठे लोखंडी तव्यावर करते. त्यामुळे लोह खनिज मिळते. नॉनस्टिक डोसे किंवा धिरद्यांसाठी.... अजुन तरी ठिक चाललय.
इथे बरेचदा तिच तिच चर्चा होत
इथे बरेचदा तिच तिच चर्चा होत असते तव्यांबद्दल म्हणून तव्यांच्या चर्चेसाठी हा धागा काढलाय http://www.maayboli.com/node/25369 तेव्हा तवे, फायपॅन प्रकाराबद्दल चर्चा त्या धाग्यावर करा. तसेच शक्य असेल तर आपापले तव्यासंबंधीचे पोस्ट त्या धाग्यावर हलवा. सगळ्यांनी १-२ पाने जरी केली तरी पटकन होवून जाईल काम.
धन्यवाद
रूनी, फूडप्रोसेसर्स, मिक्सर,
रूनी, फूडप्रोसेसर्स, मिक्सर, ब्लेंडर्स वगैरेचा पण एक वेगळा करुयात का?
तसेच तिकडे पोळ्यांचा एक, पुर्यांचा एक करूयात असे मला वाटतेय.
माझ्या मॅजिक बुलेट च्या ब्लेड
माझ्या मॅजिक बुलेट च्या ब्लेड च्या खालचे जे रबर असते त्याला कॅक्स पडल्यात , फक्त ते विकत मिळेल काय?
नाहीतर ईडली डोसा पीठ , वाटणं, चटण्या होतील असे ब्लेन्डर कुठले मिळेल अमेरीकन दुकानात ? फार महाग नकोय..
तोषवी फक्त खालची रबरची रिंग
तोषवी
फक्त खालची रबरची रिंग ना, अमॅझॉनवर बघ तिथे मिळेल कदाचित.
माझ्या मॅजिक बुलेट च्या ब्लेड
माझ्या मॅजिक बुलेट च्या ब्लेड च्या खालचे जे रबर असते त्याला कॅक्स पडल्यात , फक्त ते विकत मिळेल काय?
नाहीतर ईडली डोसा पीठ , वाटणं, चटण्या होतील असे ब्लेन्डर कुठले मिळेल अमेरीकन दुकानात ? फार महाग नकोय..>>>> Walmart ला पण मिळते.
वॉफल्स तुम्ही कोणी घरी बनवता
वॉफल्स तुम्ही कोणी घरी बनवता का? आणि त्यासाठी काय लागतं वेगळं (मटेरियल आणि उपकरणे दोन्ही)? ते देशात मिळतं का?
वॉफल्सची जाम आठवण येतेय पण इथे तयार मिळत नाहीत ना!!
नी, माझ्या काकीकडे सॅण्ड्विच
नी, माझ्या काकीकडे सॅण्ड्विच मेकरसारखे एक उपकरण होते. त्यात वॉफल्सचा साचा होता. ते वापरून ती वॉफल्स बनवायची. गरमगरम वॉफल्स आणि त्यावर मध....यम्मी!!!
इकडे कोणीतरी कृती टाकेलच. नाही तर मी काकीला विचारून टाकेन.
प्राची, रेस्पी देच आणि
प्राची, रेस्पी देच आणि उपकरणाबद्दल पण अजून काही तपशील कळले तर सांग गं प्लीज.
हो ग, 'इन्फ्रामॅटिक' का कायसं
हो ग, 'इन्फ्रामॅटिक' का कायसं नाव होतं ग. पण ही फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ग. काकीने सगळे चोचले पुरवलेत आमचे, अजूनही पुरवते.
नी, माझ्या बहिणीची एक मैत्रिण
नी, माझ्या बहिणीची एक मैत्रिण इलेक्ट्रिक सँडविच टोस्टर्स असतात त्यातच वॉफल्स करायची. मूळ चव कशी असते ते मला माहित नाही, पण ती जे करायची ते गरम गरम असताना त्यावर अमूल बटर आणि पातळ केलेला जॅम किंवा मध घालून खाताना फारच सुंदर चव लागायची. आम्ही ते वॉफल्स तिच्याकडेच खाल्ले होते.
खरं तर ते टोस्टर्स साफ करता येत नाहीत, पण तिची एक पद्धत होती. वॉफल्स घालून झाले की ती त्या टोस्टरवर पाणी शिंपडायची. मग लिक्विड सोपचे थेंब टाकून ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घ्यायची. मग दुसर्या चांगल्या फडक्याने दोन-तीन वेळा चांगल्यापैकी पुसून घ्यायची.
वॉफल मेकर नावाने काही गूगल सर्च होतंय का पहा.
माझी मैत्रीण उत्तम वॉफल्स
माझी मैत्रीण उत्तम वॉफल्स बनविते. गरम गरम फार मस्त लागतात. तिला विचारून टाकते. जे इलेक्ट्रिक सँडविचमेकर मिळतात त्यात वाफल अॅटेचमेंट असते तसा बघून घ्यायचा. हे माझं फार कंफर्ट फूड आहे वरून परत क्रीम वगैरे आहाहाहहहहहहहा.
लेमी शाईन झिंदाबाद...बस्के,
लेमी शाईन झिंदाबाद...बस्के, सीमा झिंदाबाद...महान आहे लेमी शाईन...भांडी आता अत्यंतच चकचकतायत.
नी, मी बनवते वाफल्स घरी.
नी, मी बनवते वाफल्स घरी. इलेक्ट्रिकच्या सॅन्डविच टोस्टर सारखे आहे माझे वाफल मेकर स्वस्तातले. छान होतात वाफल्स. माझा लेकही बनवू शकतो. मी चॉकलेट वाफल्सची रेसिपी मिसळपाव टाकली होती. http://www.misalpav.com/node/10657
वॉफल मेकर्स भरपूर आहेत नेट वर
वॉफल मेकर्स भरपूर आहेत नेट वर पण त्यातले देशात किती मिळतात आणि कुठले बरे पडतात?
नीरजा इथे बघ. हे बर्नरवर
नीरजा इथे बघ. हे बर्नरवर चालणारे वॅफल मेकर्स आहेत.
http://www.amazon.com/Coleman-807-804T-Waffle-Iron/dp/B000MQ63AI
कास्ट आयर्नचा हवा असेल तर
http://www.amazon.com/Romes-1100-Fashioned-Waffle-Iron/dp/B000BWCTL0/ref...
२-३ वर्षापूर्वी, पुण्यात
२-३ वर्षापूर्वी, पुण्यात कल्याणीनगरमधे Gold Adlabs Movie Theater आहे, त्या कॉम्प्लेक्समधे एक वॉफल्सचा स्टॉल होता. चांगली असायची चव. सध्या आहे की नाही तिथे माहीत नाही. वॉफलमेकर मिळेतोवर एकदा तिकडे चक्कर टाकून या.
रूनी , धन्स ग , शोधल्यावर ही
रूनी , धन्स ग , शोधल्यावर ही लिन्क मिळाली http://www.amazon.com/Replacement-Cross-compatible-Bullet-Blender/dp/B00...
तर वा क्या बात है!! 
माझ्याकडची ब्लेड च्या खाली जे पॉवर बेस वर लागतं त्या रबर ला क्रॅक्स गेल्यात. हे सगळ साडे तिन मधे मिळत असेल
तांदूळ धुवायला रोवळी घ्यायला
तांदूळ धुवायला रोवळी घ्यायला गेले तर खालील प्रकारची मिळते आहे दुकानांत. या रोवळीतून तांदूळ धुताना छिद्रांमधून बाहेर पडत नाहीत का? माझ्याकडच्या आधीच्या रोवळीला चहाच्या गाळण्यासारखी जाळी होती. त्यावर चोळून डाळ-तांदूळ धुता यायचे. या रोवळीबाबत मला वरील प्रश्न पडला आहे.
तुला असं हवंय का? असं आहे
तुला असं हवंय का?
असं आहे माझ्याकडे. पार्ल्यात मिळतं. घेऊन ठेवू का?
धन्स ग नी. मी सुट्टीला घरी
धन्स ग नी. मी सुट्टीला घरी गेले की घेईन तसलं. इकडेही मिळून जाईल, शोधावे लागेल.
ते वरचं वापरलं आहेस का तू?
ईडली , डोसाचे पीठ
ईडली , डोसाचे पीठ वाटण्यासाठीचा दगडी ईलेक्ट्रिकचा रगडा कुणी वापरला आहे का? मला लहान घ्यायचा आहे.कोणत्या कंपनीचा चांगला आहे?
प्राची, मोठं गाळणं मिळतं
प्राची, मोठं गाळणं मिळतं प्लॅस्टिकचं, तेही वापरता येतं. पूर्वी उसाचा रस गाळण्यासाठी असायची तशी मोठी गाळणी.. त्यात व्यवस्थित धूता येतात डाळ, तांदूळ इ.
मला कुणीतरी सजेस्ट करेल
मला कुणीतरी सजेस्ट करेल का?
माझ्या बहिणीला मला मायक्रोवेव्ह गिफ्ट करायचा आहे. तर चांगला कुठला असेल आणि किती किंमतीपर्यंत येईल?
Pages