स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला नविन बार्बेक्यु ग्रील घ्यायचेय तेव्हा कुठली घ्यावी? माझे अजुन गॅस की कोळसा ठरत नाहिये. ३-४ माणासांच्या कुटुंबासाठी योग्य ठरेल अशी हवेय.
गॅससाठी coleman paul jr. / weber Q100
कोळश्यासाठी lodge hibachi sportsman बर्‍या वाटतायत.
दुसर्‍या कुठल्या चांगल्या आहेत. अनुभवी लोकांनी मार्गदर्शन करावे. माझ्याकडे इलेक्ट्रीकची आहे. या आधीची कोळश्याची एकदम सस्त्यातली होती.

१९८५ साली हॉकिन्स चे सिमरमॅटीक आणि इन्फ्रामॅटिक अशी दोन उपकरणे बाजारात होती (त्यावेळी मी हॉकिन्समधे होतो) त्यात वॅफल अटॅचमेंट होती. पण ती दोन्ही प्रॉडक्ट्स अजिबात चालली नाहीत.

तांदूळ वगैरे धुण्यासाठी माझ्याकडे एक खास उपकरण आहे. त्याचा फोटो मी इथल्या चित्रमय झब्बू मधे टाकला होता. त्या बोलला एकाच बाजूने आणि तीसुद्धा तळापासून वर जाळी आहे. त्यामूळे त्यात धान्य धूता येते. थोडा वेळ भिजत घालून, पाणी निथळताही येते. पण ते नायजेरियातले प्रॉड्क्ट आहे. भारतात ते डिझाईन कुणी बाजारात आणले तर फार चालेल.

स्वाती,
बार्बेक्यू ग्रील घेताना तुम्हाला 'फ्लेवर' महत्वाचा आहे की सोय यावर अवलंबून आहे. तसच वर्षातून तुम्ही किती वेळा ग्रिल वापरता हेही विचारात घ्या.
जर फ्लेवर / कोळशाच्या ग्रिलवरचा स्वाद महत्वाचा असेल आणि कोळशाच्या वापरून झालेल्या राखेच्या साफसफाईला हरकत नसेल तर तर ३-४ जणांच्या कुटुंबासाठी हा ग्रिल चांगला आहे. आठवड्यातून एकदा ग्रिल केलंत तरी ४-५ वर्षे सहज टिकतो. वापरून झाल्यावर वर कव्हर घालून ठेवायचा. किंमत पुरेपूर वसूल होते. थोडा मोठ आणि दणकट हवा असेल तर अशा प्रकारचा चांगला आहे. कोळशाचा स्वाद अर्थातच मस्त असतो आणि एकदा त्याची सवय झाली की गॅस ग्रिलींगची चव फारशी आवडत नाही. कोळसा पेटवणं, नंतरची त्याची स्वच्छता थोsडी जास्त कटकटीची आहे पण एकदा सवय झाल्यावर काही वाटत नाही. शिवाय कोळशाचे स्वस्त आणि आकाराने लहान असल्याने शाकाहारी / मांसाहरी असे दोन वेगवेगळे ग्रिल्स ठेवू शकता.
जर गॅस ग्रिल हवा असेल तर Weber सर्वात जास्त चांगले आहेत आणि अर्थातच महागही आहेत. तुम्ही भरपूर (जवळ जवळ रोज) ग्रिलींग करत असाल तर हा घ्या. नाहीतर $२००-$४०० च्या रेंज मधे तुम्हाला भरपूर प्रकार पहायला मिळतील. गॅस ग्रिल घेताना स्टिल बॉडी किंवा Black Outer body असे दोन ऑप्शन्स आहेत. स्टीलचे अर्थातच महाग आहे. ग्रिलींग सरफेस, बर्नर्स किती आहे ते बघून घ्या. कडेला एक वेगळी शेगडी (बर्नर) आहे ना तेही बघा.
तुम्हाला Gas and Coal Combination चे पण ग्रिल्स मिळतील. गॅसवर अर्ध शिजवून स्वादासाठी कोळशाच्या ग्रिलवर टाकायचं.

पहिल्या ग्रिलवर ८ वर्षात एकदाही ती बाजूची शेगडि वापरली गेली नाही. साधारण एप्रिल पासून ऑक्टोबरपर्यंत दर आठवड्या ३-४ वेळा ग्रिल करून देखील. त्यामुले पुढचे ग्रिल घेताना ती शेगडी नसलेलंच ग्रील घेतलं.

जिथे गॅस सिलेंडर ठेवणार ती जागा नीट कव्हर्ड असली तर धूळ वगैरे बसत नाही.

गॅस ग्रिल घेतला तर पर बर्नर बीटीयू जास्त असलेला घ्यावा.
ग्रेटस ( जाळी ) मजबूत, दणकट, न गंजणारी असावी . काही वेळा एकच मोठ्या ग्रेट ऐवजी २-३ छोट्या ग्रेट असलेलं मॉडेल मिळत, अल्पसंख्यांक व्हेज / नॉन व्हेज असतील तर त्यातला एक ग्रेट अल्पसंख्यांकांसाठी राखीव ठेवता येतो.

इलेक्ट्रिक रगडा मी अल्ट्राचा वापरतेय गेले ८ वर्षं. भारतातून आणलेला, पण अमेरिकन व्होल्तेजला चालणारा आणला होता.
भारतात माझ्या बहिणीकडे , आई कडे , सासरी इत्यादी पण अल्ट्राचेच आहेत. इडली, डोसे, अप्पे, अडे, मेदु वडे, पेसरट्टु, याचं वाटण अगदी मस्त होतं त्यात.

हे इथे लिहावे की नाही....

सिंक चकचकीत होण्यासाठई काही जादू आहे का...रोज घासलं तरी चकचकीत नाही राहाते. पुण्यातल्या घरी रोज हात फिरला की तसंच्या तसं राहातं...इथे टेक्सासात नाही राहाते...पाणी हे कारण असू शकतं का...म्हणजे ते स्वच्छ असतं पण दिसत नाही...डाग जात नाहीत...

पाण्यात क्षार असल्याने किंवा पाणी जड असल्यानेही डाग पडतात.
उकडलेल्या टोमॅटोच्या साली घासल्याने असे डाग कमी होतात.

चिवा वॉलमर्ट मध्ये मिळते ते लेमी शाईन वापरून बघ. बर्‍याच लोकांनी भांडी चकचकीत असे लिहीलय तुझे स्टीलचे सिंकपण चकचकीत होईल. Happy

अरे वा! इथे चांगल्या आयडीया देताहात लोक.. माझा पण एक प्रॉब्लेम सोडवायला मदत करा रे.. मुंबईत शॉवरहेड, पण्याच्या नळ/तोट्या कशा साफ करायच्या.. मी साबन लावते तेवढ्यापुरतं स्वच्छ दिसतं पण थोड्या वेळाने परत पाण्याचे पांढरट डाग दिसतात..:अओ: ऑफिसमध्ये हाउसकीपींग वाले किती चकाचक ठेवतात सगळं.. ठीक आहे ते लोक सारखं-सारखं तेच करत असतात पण तरी मी मरमर करुन ते नळ घासले तर एक दिवस तरी स्वच्छ दिसायला हवं ना.. Sad
आमच्याकडे नॉर्मल पाणी येतं.. जड वै नाही.

बस्के, हां...आता आणते बे सो...रुनी, नाही ना चालले लेमी सिंकसाठी...प्राची, टोमॅटो ट्राय मारेन...धन्स...

चिंगी
खूप ब्लीच असलेले क्लीनर वापरतात ते सफाई कामगार म्हणून सगळे चकाचक दिसते. पिण्याचा पाण्याच्या भांड्यांना पांढरे क्षार बसलेले दिसत असतील तर पाणी जड आहे असेच म्हणावे लागेल.

चिवा ,Magic Eraser वापर सिंक स्वच्छ करण्यासाठी. नव्या सारखे दिसते. एकदा तो magic eraser हातात घेतला कि सगळ घर त्याने स्वच्छ करावस वाटायला लागत. Happy
इथे पहा. http://www.mrclean.com/en_US/magic-eraser-extra-power.do
नेहमीचा "ओरिजिनल" पण चालेल.

तसच Bar keeper's Friend ने पण भांडी , सिंक एकदम चकचकित होते.

सीमा गं सीमा................................ हो हो...नक्की वापरून पाहीन....मी ते वॉकींग शूज साफ करायला वापरायचे...पण आता आजच वापरेन सिंकसाठी....तू एकदम पप्पू पेजर आहेस बघ... (हे प्रेमानं म्हटलय हां...)

सीमा, शॉवर स्टॉल्ससाठी काय वापरतेस?
(मी आता तुझ्याकडे ट्यूशन लावणार आहे क्लीनिंग प्रॉडक्ट्ससाठी. :P)

मी सांगू, मी सांगू - आमच्या क्लीनिंग लेडी ने सांगितलेला उपाय- रोज आंघोळीनंतर स्क्वीजीने काच अन भिंती पुसायच्या. आठवड्यातून एकदा फंटास्टिक किंवा आपल्या आवडिचा कुठलाही स्प्रे वापरून पुसायच्या. कितीही हार्ड पाणि असलं तरी रोज कोरडं केलं की बस.

फक्त नळावर आणि शॉवरहेडवरच असतात.चवीला पण छान गोड असतं पाणी.. जड नाहीये. >>>>

नळ आणि शॉवरहेड विनेगर मध्ये बुडवून ठेवायचे २-३ तास. ( put vinegar in a ziploc and tie it around showerhead/ नळ) . सगळे क्षार निघून जातात.

वेस्ट्साइड मध्ये नवीन अंडाकृती प्लेट्स आल्या आहेत. त्यातच एक वाटी आहे. पोळी रस्सा किंवा इडली सांबार साठी चांगल्या आहेत. पूर्ण डिनर सेट आहे. नवे डिनर सेट, व इतर सामानही आले आहे.

स्वाती , शॉवर डोअर स्वच्छ करण्यासाठी पण Magic Eraser च वापरायचा. बाथरुम क्लिनिंग साठी खास मोठे पॅड मिळतात ते आणले तरी चालेल. पण Original Magic Eraser पण व्यवस्थित वर्क होतो.
शॉवर डोअर खुप पटकन क्लिन होत त्याने.
वरती हार्ड वॉटरची चर्चा चालली आहे म्हणुन , CLR नावाच प्रोडक्ट मिळत लोज किंवा होम डिपो , वॉलमार्ट मध्ये. त्यांने शॉवर हेड वगैरे अगदी नव्यासारखा होतो.
मी तुझ्याजागी असेन तर स्क्वीजी आणणार नाही. रोज आंघोळ करताना माझ्याकडुन शक्यच नाही ते वापरण. आणि ती एक नविन अडगळ होईल घरामध्ये. Happy

अ‍ॅडमिन , मदत समिती स्वच्छतेसंबधी वेगळा बाफ आहे तिथे ही पोस्टस हलवता येतील का? तसदीबद्दल क्षमस्व.

Pages