लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?

Submitted by जागोमोहनप्यारे on 20 June, 2011 - 12:45

लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?

1. लिंबू आणि मिरची

2. काळी बाहुली

3. पायताण उर्फ चप्पल

4. इतर, कोळसा इ.

यामागे नेमके काय लॉजिक आहे? मिरच्यांची संख्या किती असावी? टांगताना वार, वेळ याबाब्त कोणते बंधन असते का? काही लोक दारात कोळसा टांगावे असेही म्हणतात.. ते का?

nimbu.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपलीच इतराना सॉलीड नजर लागते, अशी स्वतःचीच कीर्ति सर्वत्र पसरवायची ! कोणाची मग बिशाद आहे तुम्हाला नजर लावायची !! Wink

त्यांची नजर या बीबीला कधी लागणार?
---- जागोजी... ते वर लिंबू आणि मिरची लावलेली आहे त्याची किमया आहे... वाईट नजर असणारे पसार झाले आहेत म्हणुन या बाजूला त्यांची गर्दी नाही.

काही माझ्यासारखे वाईट नजर असणारे आहेत पण ते निरुपद्रवी मधे मोडतात... (त्यांचा इफेक्ट शुन्य असतो).

अजून या बीबीवर बुप्रावाले, सांखिकीवाले, अनिसवाले.. इ लोक कसे आले नाहीत? त्यांची नजर या बीबीला कधी लागणार?

तुम्ही इथे 'हिंदू धर्मात सांगितले आहे, भारतीय संस्कृतीत म्हंटले आहे' असे लिहीले की लग्गेच येतील ते लोक.

इथे पूर्वी 'बॅक टू द फ्युचर' नावाचे सिनेमे होते. त्यातला बालहिरो, एरवी शांत नि गरीब असे, पण 'चिकन आहेस' म्हंटले की तो जीव तोडून मारामारी करायचा.
या लोकांचे तसेच आहे. हिंदू धर्म, भारतीय संस्कृति म्हंटले की लग्गेच शिव्या घालायला धावून येतील. शिवाय हे बायकांनी करावे म्हंटले की स्त्रीमुक्ति वाल्या पण धावून येतील.
किंवा हे मुसलमानांची नजर लागू नये म्हणून करतात, असे म्हंटले की सेक्युलर वाले पण येतील.
शिवाय भारत अमेरिका वाद होईल असेहि काहीतरी लिहा.

मग मज्जाच मज्जा!

अनंत काळपर्यंत चालणारा 'अनंतवाद' असे या धाग्याचे नाव द्यावे लावे लागेल.

<< इथे पूर्वी 'बॅक टू द फ्युचर' नावाचे सिनेमे होते. त्यातला बालहिरो, एरवी शांत नि गरीब असे, पण 'चिकन आहेस' म्हंटले की तो जीव तोडून मारामारी करायचा. >>

पटेश. Wink बादवे पाह्यलाय ब्याक टू द फ्यूचर.

Happy

जामोप्या .................................................

स्वतः ला लटकवा.....................भुते पण पळतील आणि बाकिचे सुध्दा.........

म्हणजे इतर थेर सुचनार नाही तुम्हाला........

bhvl.JPG

अस समजल जात की काही लोकांच्या नजरेत वाईट शक्ती असते. हे खर का मानायच तर सर्व धर्मात याचा विचार आहे. ( मानायच असेल तर माना. उगाच चर्चा नको. )

दुभती गाय या व्यक्तीची नजर लागल्यावर दुध देईनाशी होते. मुल आजारी पडते. दुकानदारी बसते असे अनेक अनुभव येतात.

माझा एक मित्र सांगायचा की गावातली प्रतिष्ठीत व्यक्तीला अशी शक्ती होती. ह्या व्यक्तीच्या नजरेला पडलेली काठेवाडी म्हैस दुध देणे बंद करायची. या व्यक्तीला गोठ्याकडे नेणे थांबवता येत नसे शिवाय या व्यक्तीला आपल्याकडे अशी शक्ती आहे याची जाणीव नव्हती.

एकदा या मित्राने नवीन म्हैस आणली ही बातमी लपवली. आठ दिवसाने ही बातमी गावभर झाल्यावर ही व्यक्ती आरडा ओरडा करत गोठ्यात घुसली.

या वेळेला गोठ्याच्या दरवाज्यात गोबर गॅस प्लॅन्ट मधुन काढलेले काळे पडलेले शेण होते. आधी या शेणावर त्यांची दृष्टी पडली आणि मग म्हशीवर. यावेळेला त्यांची नजर म्हशीला ला्गली नाही.

काळा रंग हा शक्ती शोषणारा रंग आहे ( sinking ). यामुळे याचा वापर काळ्या बेढब टांगायच्या बाहुल्या, वा अन्य या कामाच्या वस्तुत केला जातो.

सगळ्याच धर्मात असे आहे.. इतर धर्मातील लोक काय टाम्गतात? पण लिंबू आणि मिरची यासारखे गुणकारी काही नाही..

पण लिंबू आणि मिरची यासारखे गुणकारी काही नाही..

>>> जोरदार अनुमोदन !!

तुम्ह्ही धाग्याच्या सुरुवातीला लिंबु मिरची टांगली नसती तर कदाचित आत्ता पर्यंत हा धागा उडवला गेला असता Rofl

झक्की,

तुम्ही आंतरजाल कायद्याचे कारण सांगून आपले बरेचसे जुने प्रतिसाद उडवून टाकलेत. पण आता परत लिहायला लागलात हे चांगले केले. आता परत तुमचे जबरदस्त प्रतिसाद वाचायला मिळतील.

आंतरजाल कायद्याची भीति गेली का लिहिल्याशिवाय राहवत नाही?

आंतरजाल कायद्याची भीति गेली का लिहिल्याशिवाय राहवत नाही?

लिहिल्याशिवाय रहावत नाही.
अतिशयोक्ति आहे. मी उल्लेखिलेले विषय तसेहि कुठल्याहि चर्चेत येऊ शकतात, येतात असा अनुभव आहे.
बाकीच्यांचा काय अनुभव आहे माहित नाही. त्यांच्या भावना दुखावल्या असतील, विषयांतर होत असेल, तर तसे सांगा, मी उडवून देईन. पण कृपया मायबोलीला खटल्यात गुंतवू नका ही प्रार्थना.

कायद्याची भीति मायबोलीसाठी. उगाच मायबोलीला खटल्यात गुंतवले तर निर्दोषी असले तरी वकीलांचा, कोर्टाचा खर्च येईलच. नि कुणा न्यायाधीशाने खटल्याचा निकाल लागेपर्यंत मायबोली बंद ठेवा असे सांगितले की मग?? सत्यानाश!

मी एवढ्या सिरियसली धागा काढला, सगळ्याना माहिती मिळेल म्हणून, तर सगळ्युआनी पार त्याचा लिंबुटिंबु केला.. Sad

>>>> मी एवढ्या सिरियसली धागा काढला, सगळ्याना माहिती मिळेल म्हणून, तर सगळ्युआनी पार त्याचा लिंबुटिंबु केला.. <<<
च्यामारी, तरीच जामोप्या, इकडे तुझा लिम्बुटिम्बू झाला म्हणून शिन्च्या तिकडे आरतीच्या धाग्यावर माझा डब्बल लिम्बुटिम्बू करतोयेस होय..... Proud

रच्याकने.. आज दिल्ली हाय कोर्ट मधे बाँबस्फोट झाला.. तिथे कोणाची नजर लागली..?? लिंबुमिरची नव्हती ना बान्धली.. Proud

>>> रच्याकने.. आज दिल्ली हाय कोर्ट मधे बाँबस्फोट झाला.. तिथे कोणाची नजर लागली..?? लिंबुमिरची नव्हती ना बान्धली.. <<<
चिवडे, १९४७/४८ मधेच जर काश्मिरमधे लिम्बुमिरची बान्धली गेली अस्ती तर आजचा दिवस दिसला नस्ता. कळ्ळ? तेव्हा बान्धली नाहीतना? अजुनही इच्छा होत नाहीना?
मग भोगा....! Sad

Pages