लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?

Submitted by जागोमोहनप्यारे on 20 June, 2011 - 12:45

लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?

1. लिंबू आणि मिरची

2. काळी बाहुली

3. पायताण उर्फ चप्पल

4. इतर, कोळसा इ.

यामागे नेमके काय लॉजिक आहे? मिरच्यांची संख्या किती असावी? टांगताना वार, वेळ याबाब्त कोणते बंधन असते का? काही लोक दारात कोळसा टांगावे असेही म्हणतात.. ते का?

nimbu.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हातरुमाल अश्रू पुसायला वापरतात
म्हणजे आता तुम्ही रडा

म्हणून हातरुमाल देणे अपशकुन मानतात , असे गुगलवर सापडले

अरे देवा, राकेश टिकेत ना 3-4 जणांनी पाठवले 29-30 जानेवारी ला.. केजरीवाल, कोणीतरी चौधरी आणि अजून एक दोन लोक्स

लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?
>>>>>>

लोकांनाच टांगावे, ते जास्त भरवश्याचे Happy

खरे तर पूर्वीच्या काळी लोक व्यवसायानिमित्त बैलगाडी आणि घोडे यांनी दूरवर प्रवास करत असत. रात्रीच्या वेळी मांजर जंगलातून जाताना दिसले तर तिचे डोळे चमकतात, ज्यामुळे बैल आणि घोडे घाबरतात. त्यामुळे रस्त्यावरून मांजर जाताना पाहिल्यानंतर लोक काही काळ प्रवास थांबवायचे आणि मांजर गेल्यावर पुन्हा प्रवास सुरु करायचे. हळुहळु या गोष्टीचा अर्थ बदलला आणि लोकांनी मांजर आडवे जाणे हे अशुभ मानले गेले.

https://www.loksatta.com/lifestyle/why-throw-a-coin-in-the-river-why-tak...

लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते आणि मिरची तिखट असते. जेव्हा ते दाराबाहेर टांगले जाते तेव्हा आंबट आणि तिखट सुगंध कीटक आणि कोळी यांना घरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते.

छपरातुन , खिडकीतून , व्हेन्ट मधून आत येतात >> तरी बेल वाजवून दारावर कोण आले त्यांना चावावे ह्या उद्देशाने कीटक तिकडे जातीलच. इतक्या इतर वासांतून ते लांब टांगलेल्या पदार्थाचा आंबट आणि तिखट सुगंध घेऊ शकत असतील तर ते मुळात इतर ठिकाणाहून येणार नाहीत.

गाडीला लिंबू मिरची लावण्यामागेदेखील शास्त्रिय कारण आहे. पूर्वी रथाची चाके मागे आणि घोडे पुढे असल्याने वळण घेताना जायरोस्कोपीक त्वरण रथाला उलटे करू शकत असे. ते होऊ नये म्हणून रथाला लिंबू मिरची टांगून त्याचा मागील भागाचा इनर्शिया वाढवला जात असते, जेणेकरून जायरोस्कोपीक त्वरण नियंत्रणात राहत असे.

मग लिंबू आणि मिर्चीवर कीड पडायचे कारणच नव्हते

बहुतेक लिंबू आणि मिरची एकत्र काम करत असणार , पण लिंबाच्या झाडाला मिरच्या नसतात आणि मिरचीच्या झाडाला लिंबू नसतात, म्हणून त्यांना कीड लागत असणार

Proud

हे किडे अमावासीय अंधारात जास्त उडत असणार , म्हणून अमावास्येच्या दिवसाचे महत्व

छे छे,
उन्हातान्हात जाताना डीहायड्रेशन होऊ नये म्हणून लिंबू
आणि चावलेला साप विषारी होता की कसे हे कळण्यासाठी मिरची ( विषारी असेल तर मिरची तिखट लागत नाही किंवा vice versa)

आणि दूरच्या प्रवासात हे हँडी मिळावे म्हनून वाहनांना लावतात

इति- WA फॉरवर्ड

स्वतः लिंबू मिरची न वापरणे.झाले खूप सोप आहे.
जग सुधारले पाहिजे हा हट्ट कशाला हवा.
स्वतः सुधारा लोकांना सुधरावयाला जावू नका
त्या मुळे च तुमचेच हस होईल.

लोक अशी सांगून सुधारत असती तर
तर आता सर्व च सज्जन असते.
लबाड,चोर,खुनी,लोक अस्तित्वच नसते.
त्यासाठी स्वतः सुधारा जग आपोआप सुधारेल.
अट्टल दारुडे पण दारू पिताना दारू कशी वाईट आहे हे दुसऱ्याला सांगत असतात.
त्याग करा,फक्त भक्ति करा,धन दौलत चा मोह ठेवू नका असे सांगणारे .
जग नश्वर आहे,देह नश्वर आहे .
असे उपदेश देणारे करोड रुपयाच्या गाडी मधून फिरतात
आणि दोन चार तरुणी नेहमी ह्यांच्या बरोबर असतात.

जगात किती संत,महात्मे होवून गेले लोकांची वृत्ती बदलली का?

जायरोस्कोपीक त्वरण >> तुम्हाला केंद्राभिमुख त्वरण म्हणायचं आहे का? >>>> अच्छा. मला मराठी शब्द माहीत नाही त्यासाठी. केंद्राभिमुख नसावे, कारण ते सेंट्रीपेटल/फ्युगल वाटते. जायरोस्कोपीक म्हणजे गोल फिरणाऱ्या वस्तूची स्थिती/दिशा राखणारे की बिघडवणारे त्वरण. रथाची चाके एका अक्षाभोवती फिरत असतात. वळण घेताना तो अक्षच फिरतो तेव्हा तो मूळची स्थिती राखायचा प्रयत्न करतो आणि तो तिसऱ्या अक्षाभोवती उचलला जाऊन रथ पलटी होऊ शकतो. हे पहा https://energyeducation.ca/encyclopedia/Gyroscopic_motion#:~:text=Gyrosc....

खरं म्हणजे कशाला पाहता? अश्या गोष्टी वैज्ञानिक आहेत म्हटल्यावर प्रश्न विचारायचे नसतात. WA वर पाठवाव्या.

>>>>>>>>अश्या गोष्टी वैज्ञानिक आहेत म्हटल्यावर प्रश्न विचारायचे नसतात.
खी: खी:

खरे तर विमानात वापरलं जाणारं हे तंत्रज्ञान रथामध्ये वापरले जायचे हे आपले पूर्वज किती प्रगत होते हेच दाखवते. टर्न कोओरडीनेटर किंवा एटीट्युड मीटर हे पुष्पक विमानात वापरले होते हेच सिद्ध होतंय.

>>> अक्षच फिरतो तेव्हा तो मूळची स्थिती राखायचा प्रयत्न करतो आणि तो तिसऱ्या अक्षाभोवती उचलला जाऊन रथ पलटी होऊ शकतो.>>>
या साठी रोड बँकिंग करतात ना? वळणावर रस्त्याची एक बाजू किंचित वर उचलली असते. 12 ला काहीतरी शिकल्याचे आठवतंय

रोड बँकिंग हे जास्त करून केंद्रपसारक (सेंट्रीपेटल) बलाला काबूत ठेवण्यासाठी आहे. गाडी वळणाच्या आतल्या बाजूला तिरकी केली तर तिच्या चाकांवर येणारा नॉर्मल (रिअ‍ॅक्शन) फोर्स हा पण तिरका असतो आणि तो दोन कंपोनन्ट्स मध्ये विभाजित करता येतो. त्यातला उभा कंपोनंट हा गाडीच्या वजनाला आधार देतो तर आडवा कंपोनंट हा केंद्रपसारक बलाला सावरतो. इथे रोड बँकिंग हे गाडी बाहेरच्या दिशेने स्किड होऊ नये म्हणून मदत करते. जायरोस्कोपिक परिणाम हा एक वेगळाच विषय आहे, तो गाडीला स्किड करत नाही, तर उलटवू शकतो. (ह्या उदाहरणात जायरोस्कोपिक परिणामही गाडीला त्याच दिशेला उलटवेल, त्यामुळे रोड बँकिंग उपयोगी पडेलच. पण तो त्याचा मूळ उद्देश नाही). कधीतरी गाडीच्या/रथाच्या यामिकीवर धागा काढेन जमल्यास.

हपा, मला सेंट्रीपेटल म्हणायचं होतं. जायरोस्कोप कसा होईल विचार करतोय, ती लिंक ओपन नाही झाली. उद्या शांतपणे वाचतो. डोक्याची बिजागीर गंजून पार खल्लास! Wink

Pages