..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्ये, तुला एक मोट्ठा डेअरी मिल्क चॉकलेट Happy

कोडं ६०:

बंटी एक ब्रह्मचारी तरूण. जन्मापासुन त्याला स्त्रीजातीचा तिटकारा. एखाद्या स्त्रीशी बोलणं तर दूर पण हा गडी तिच्याकडे बघायचा देखील नाही. एकदा बाईकवरून जात असताना त्याचा मोठा अपघात होतो. आजुबाजुची लोकं त्याला नजिकच्या हॉस्पिटलात घेऊन जातात. नेमकं तिथ उपचार करणारी निष्णात डॉक्टवर लेडिजच असते. डॉक्टरला समजते कि हा ब्रह्मचारी आहे आणि एखाद्या स्त्रीकडुन उपचार करून घेणार नाही. म्हणुन ती वॉर्डबॉयच्या मदतीने त्याला जबरदस्ती इंजेक्शन देते. स्त्री डॉक्टरचा स्पर्श होताच तो जोरात आरडाओरडा करून हॉस्पिटल डोक्यावर घेतो. इतर पेशंट काय झाले म्हणुन डॉक्टरला विचारतात, तेंव्हा ती स्त्री डॉक्टर कोणंत गाणं म्हणेल?

उत्तर:
जरासा उसको छुआ तो उसने हाय उसने मचा दिया शोर
मैने समझा था कि चल जायेगा जोर
और फिर जैसे हि
जरासा उसको छुआ तो उसने हाय उसने मचा दिया शोर

(लता मंगेशकर : शोर : जया भादुरी)

आता एक सोप्पं कोडं...

कोडं ६१:
एक arsonist असतो. त्याचं एका मुलीवर खूप प्रेम असतं पण ती त्याला अजिबात प्रतिसाद देत नसते. तिला उद्देशून तो काय गाणं म्हणेल?

६१ हे उत्तर असणार नाही, तरी पण
तमन्ना है के रोशन हो तेरी दुनिया तेरी महफिल
उजाला मिल सके तुझ को तो मैं घर भी जला दुंगा
तेरी आंखों की चाहत में तो मैं सब कुछ भुला दुंगा
मोहब्बत कैसे की जाती है दुनिया को दिखा दुंगा

६१:
ये महलों, ये तख्तो, ये ताजों की दुनिया
ये इनसां के दुश्मन समाजों की दुनिया
ये दौलत के भूखे रिवाज़ों की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है

जला दो, जला दो इसे फूँक डालो ये दुनिया
मेरे सामने से हटा लो ये दुनिया
तुम्हारी है तुम ही सम्भलो ये दुनिया, ये दुनिया ...

?????

कोक्र. ६१

"जलता है बदन, हो ... हाय! जलता है बदन
प्यास भडकी है, सरे शाम से जलता है बदन
इश्क़ से कह दो कि ले आए कहीं से सावन
प्यास भडकी है सरे शाम से जलता है बदन..."

~ आता हे गाण "तिचं" आहे, पण स्वप्ना हे 'तो' म्हणत्योय असे गृहित धरून चालवून घे.

कोडं ६२:

त्या दोघांचे नुकतेच लग्न झाले. घरात बरीच मंडळी असल्याने त्यांना एकमेकांशी नीटसं बोलताही येत नव्हते. अगदी "मधु इथे अन् चंद्र तिथे" अशी स्थिती होती. त्यातच तिच्या सासर्‍यांना टिबीची बाधा झालेली, संसर्ग होऊ नये म्हणुन त्यांना घराच्या मागेच एका खोलीत ठेवलेले. दोघांना एकमेकांना भेटण्याची ओढ लागलेली असते. सगळ्यांची नजर चुकवून तो तिला घराच्या मागे भेटण्यासाठी बोलावतो. अशावेळी ती कोणतं गाणं म्हणेल?

सोप्पय Happy

६२ :

"कैसे करू प्रेम की मै बात,
हाय, ना बाबा, ना बाबा, पिछ्वाडे बुढ्ढा खांसता..."

(टीबी वाला तिथे असल्याने...)

बरोब्बर स्वप्ना, भरत, प्रतीक Happy
स्वप्नाचा पैला नंबर Happy

कोडं ६२:

त्या दोघांचे नुकतेच लग्न झाले. घरात बरीच मंडळी असल्याने त्यांना एकमेकांशी नीटसं बोलताही येत नव्हते. अगदी "मधु इथे अन् चंद्र तिथे" अशी स्थिती होती. त्यातच तिच्या सासर्‍यांना टिबीची बाधा झालेली, संसर्ग होऊ नये म्हणुन त्यांना घराच्या मागेच एका खोलीत ठेवलेले. दोघांना एकमेकांना भेटण्याची ओढ लागलेली असते. सगळ्यांची नजर चुकवून तो तिला घराच्या मागे भेटण्यासाठी बोलावतो. अशावेळी ती कोणतं गाणं म्हणेल?

उत्तर :
कैसे करू प्रेम की मैं बात
ना बाबा ना बाबा
पिछवाडे बुढ्ढा खासता

(लता मंगेशकर, : साधना, चित्रपट: अनिता)

कोडं ६१:
एक arsonist असतो. त्याचं एका मुलीवर खूप प्रेम असतं पण ती त्याला अजिबात प्रतिसाद देत नसते. तिला उद्देशून तो काय गाणं म्हणेल?

उत्तरः
दिलबर मेरे कब तक मुझे ऐसेही तडपाओगे
मै आग दिलमे लगा दूंगा वो के पलमे पिघल जाओगे

६३ डी राजा यांनी पोलिस कोठडीत एक दिवस घालवल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी कोर्टात जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी नेण्यात येत होते. तिथे अर्थातच न्युज चॅनेल वाल्यांची गर्दी होती. आणि त्यांना राजा यांच्या कोठडीतील वास्तव्याबद्दलच कुतूहल होते.
तर राजा त्यांच्यासाठी कोणते गाणे म्हणतील?

जिप्सी....आता हे नसले तरी हेच म्हणा...>>>>प्रतीक, तेच गाणं Happy

चल, मग पेढे काढ १००, सातारी कंदी पाहिजेत.>>>>>गावाकडं गेल्यावर धाडतो, तवसर धीर धरा :-

काय धावतोय हा धागा !
अंजली, भरत आणि उल्हास, प्रयत्न चांगला होता पण नेहमीप्रमाणेच स्वप्नाला पैकीच्या पैकी मार्क्स!
कोडं क्र. ५४-- गणपतरावांच्या वखारीला ऐन पावसाळ्यात आग लागली . त्यांच्या मनाची तडफड झाली. खूप शोधूनही त्यांना आगीचे कारण सापडेना. आपली उद्विग्नता ते कशी व्यक्त करतील ?
उत्तर : रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन,
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन

Pages