युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्यातरी माझ्यापुढे घरातली मधाची एक बाटली कशी संपवायची एवढाच प्रश्न आहे. इथे आलेल्या माहितीवरून सरबतात आणि क्वचित सॅलड ड्रेसिंग म्हणुन मध वापरता येईल.
माझ्यासमोर वजन कसे कमी करावे असा प्रश्न आ वासून अजिबात उभा नाहीए त्यामुळे कोमट/गार दुधात मध घालून आ वासलेल्या तोंडात ते ओतायचा विचार करतो.

अहो, मध संपवू नका. हा एकच पदार्थ असा आहे की ज्याला एक्स्पायरी डेट नसते. वर्षानुवर्ष मध व्यवस्थित राहतो. पण त्याला पाण्याचा हात लागू देऊ नका एवढंच पथ्य पाळा. मध औषधी आहे, त्याचा घरात बराच उपयोग होतो.

अगदी अगदी. तोंड आले तर मध घरात पाहिजे. खरेतर मधाच्या गुणांवर एक वेगळा बाफ काढता येइल. आरोग्या विभागात.

मंजुडी माझा प्रश्न बदलून विचारतो . बाटलीतला मध पोटात कसा पाठवता येईल ? Happy

मधाला एक्स्पायरी नसते आणि तो फ्रीज मध्ये ठेवू नये हे माबोवरच वाचले होते.
कफ, घशाची खवखव यावर आराम म्हणूनच मधाची बाटली आणली होती. ग्लायकोडिनपेक्षाही चांगला आराम देतो मध.
नंदिनी छान आयडिया.

बरं मग पंचामृत रोज घ्यायचं असेल तर दोन भाग दूध आणि प्रत्येकी एक भाग तूप, साखर, दही आणि मध असं त्याचं प्रमाण आहे बहुतेक, ते तसंच शास्त्रोक्त पद्धतीने घ्या.
वर पूनमने लिहीलंय तसं लिंबूमधपाणी घेता येईल.

भरत, ब्रेड खात असाल तर ब्रेडलाही मध स्प्रेडसारखा लावून छान लागतो. ब्रेड + मध + लोणी (पर्यायी) = अहाहा!!

हो ब्रेड बरोबर छान लागतो मध.. पण जीभ सोलवटते (निदान माझी तरी) कारण मध उष्ण असतो. एका दिवशी जास्तीत जास्त २ चमचे खावा.. नाहीतर Sad

केळ्याचे काप आणि त्यावर मध.... अह्हाहा Happy

सफरचंदाचे तुकडे आणि त्यावर मध... तोंपासु Happy

बदाम + काजु + पिस्ते थोडे रोस्ट करुन त्यावर मध... लागला Happy

हे सगळे फक्त मयेकरांसाठी Happy डाएट कॉन्शस मंडळींनी वाचु नये कृपयाच Proud

कापल्यावर त्यावर आपण जसे लगेच हळद लावतो तसेच भाजल्यावर भाजलेल्या जागी मध लावायचा लगेच्च आग कमी होते. लोणी/तुप अजिब्बात लावायचे नाही.

स्ट्रॉबेरीचे ४ -४ तुकडे करावेत. त्यावर चमचाभर मध घालावा. मधात बुडलेले तुकडे मस्त लागतात.

दक्षे Proud हे घे अजुन ...

शॉर्ट्ब्रेड किंवा बटर बिस्किटांचा चुरा, त्यावर व्हॅनिला आईस्क्रिम आणि वरतुन मध ... यम्मो Happy

गरम गरम पॅनकेक्स आणि मध Happy

म्युसली+घट्ट दही+ मध Happy

केक+ व्हिप्ड क्रिम=मध Happy Happy Happy

हनी बिस्किट सँडविचेस Happy

मधातली शर्करा, ही रक्तात लवकर शोषली जाते. अनेक आयूर्वेदीक औषधे, मधातून खलून घ्यायची असतात, ती यासाठीच !

चवळी भिजवलीय, चांगले मोड आले आहेत. पण आज शुक्रवार आणि ती करायची आहे सोमवारी. तोवर चिकट होऊ नये म्हणून काही उपाय करता येईल का...सध्या टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून डब्यात घालून फ्रिजात ठेवली आहे.

चिवा, नूसती वाफवून फ्रीजमधे ठेवली तर चांगले. पेपरमधे गुंडाळून ठेवली तरी काळी पडायची शक्यता आहे.

फ्रीजरमध्ये मोड आलेली धान्ये ठेवली तर नेहेमी नीट शिजतातच असं नाही. त्याची जर उसळ किंवा आमटी करायची असेल सोमवारी तर ती आजच करून मग फ्रीज करावी.

पूर्ण वाफवून ठेवायची का दिनेशदा फ्रिजमध्ये?
जामोप्या, झाडं नाही आली तर उसळ करून मटकावते आणि आली तर झाडंच तुमच्याकडे पाठवते...
स्वाती, आर्च, फुलपाखरू...धन्स.

हेम एक सोपे आयडिया ही मी ब्राउन राइसला वापरते. भात २ तास आधी पाण्यात भिजउन ठेवायचा प्रमाण मात्र १:२ इतकेच किन्चित जास्त पाणी चालेल.
राइस कुकर छोटा आणलात तर बेश्ट्च भाज्या/ राइस पटकन शिजतात विदाउट शिटी.

हेम | 5 June, 2011 - 00:30
आणखी कुणी जर हा प्रयोग केला असेल तर १ वाटी तांदुळाला किती पाणी, गॅस मंद की फुल्ल, गॅस काढल्यावर किती वेळाने कुकर उघडायचा? या प्रयोगांत गॅस वाचेल हे नक्की!!

सध्यातरी माझ्यापुढे घरातली मधाची एक बाटली कशी संपवायची एवढाच प्रश्न आहे. भरतजी, आमचे पावसाळी ट्रेक्स सुरु झालेत. देऊन टाका आमच्यात..मधाशिवाय आणखी काही खाणेबल घरात असेल तर तेही चालेल. मधदाता सुखी भव!!! Happy

Pages