युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षा, काल लिहायचे राहिले. आज रात्री लिहिन.
निर्मयी, त्यात कणीक घालून मिस्सी रोटी करता येईल. किंवा ताक घालून कढी करता येईल. काकडी किंवा कांदा घालून परतून भाजी करता येईल.

बेसन असेल तर त्यात कांदा, कोथिम्बीर, खोबरं घालून पाटवड्या टाईप करता येतील!!!नाहितर पाणी, तांदळाचे पीठ व रवा घालून धिरडी!!!

नंदिनी, अंड्याला एक छोटं छिद्र पाड, एक टवका काढुन त्यातुन पांढरा बलक बाहेर काढता येइल , पिवळा बलक आत अडकेल तो नंतर वेगळा काढता येईल.

अंडे मधोमध फोडायचे पांढरे पिवळे हातात घ्यायचे. पांढरे हातातून निसटून खाली ठेवलेल्या भांड्यात पड्ते. पिवळे गोल हातात राहते. हात हळू हलवून सर्व पांढरे खाली पडू द्यायचे. पिवळे वेगळ्या भांड्यात ठेवायचे.

बायको महिन्याभरासाठी माहेरी गेल्याने सध्या किचनओटा माझ्या मालकीचा आहे. पाठ थोपटा कारण अजुनही बाहेर जेवायला गेलेलो नाही. नेहमीच्या मेनूपेक्षा आणखीही पा.कृ. शिकलोय. मध्यंतरी लोकसत्तात एक लेख वाचून शिट्टी न करता कुकरमध्ये भात करण्याचा प्रयोग चालू आहे, पण कुठेतरी गणित चुकतंय. कधी थोडा कच्चा रहातोय तर कधी पाणीच जास्त होतेय. खाणेबल होतोय पण हवी तशी फिनिशिंग मिळत नाही. आणखी कुणी जर हा प्रयोग केला असेल तर १ वाटी तांदुळाला किती पाणी, गॅस मंद की फुल्ल, गॅस काढल्यावर किती वेळाने कुकर उघडायचा? या प्रयोगांत गॅस वाचेल हे नक्की!!

हेम, कोलम तांदूळ असेल हे गृहीत धरून सांगते. एक वाटी तांदूळाला दोन वाट्या आणि चार टीस्पून पाणी लागतं. तांदूळ धुऊन त्यात पाणी घालून डबा कूकर मध्ये ठेवला की कूकरचं झाकण लाऊन प्रेशर येईपर्यंत आच मोठी ठेवायची आणि प्रेशर आलं की आच एकदम बारीक करायची. बरोब्बर दहा मिनीटांनी आच बंद करायची.
त्यातच वरणाचा डबाही ठेवता येईल. तुरीच्या डाळीला दीडपट पाणी पुरतं. तूरडाळ दहा मिनीटं आधी पाण्यात भिजवून ठेवली तर छान मऊ वरण शिजेल. मूगाच्या डाळीला जेवढ्यास तेवढं पाणी लागतं.
कूकरात डाळीचा डबा खाली आणि त्यावर तांदुळाचा डबा शक्यतो ठेवा.

कूकरची शिटी नाही केली तर ऊर्जा तर वाचतेच पण अन्नातली पौष्टिकताही टिकून राहते.

कूकरची शिटी नाही केली तर ऊर्जा तर वाचतेच पण अन्नातली पौष्टिकताही टिकून राहते.

पण भौतिक शास्त्राच्या पुस्तकात कुकरमुळे अन्न लवकर शिजते असे वाचल्याचे आठवते.. चु भु द्या घ्या

जामोप्या, कुकरमध्ये जेवण लवकर शिजते कारण प्रेशरखाली पाण्याचा उत्कलनबिंदू वाढल्याने पाण्याचे तापमान वाढवता येते. तेच कुकरची शिटी केली की आत जमलेली वाफ=प्रेशर बाहेर सोडले जाते. म्हणजे पुन्हा तेवढी वाफ जमायला आणखी उर्जा खर्च होते. यासाठी पुरेसे प्रेशर जमले की आच कमी करून ठेवावी.

जयु, कांदा पातळ कापून प्रथम अवनमध्ये तेल लावून भाजून घे ( २५०-३०० F) आणि मग हव तर बाहेर तुपावर परत. तेल तूप खूप कमी लागतं. वेळ वाचतो आणि छान कुरकुरीत कांदा तयार होतो.

कांदा तळायच्या आधी त्यावर तांदळाचे पीठ भुरभुरायचे. चांगला कुरकुरीत तळला जातो कांदा.

मी नेहमीच लिहित असतो, कि प्रेशर कूकरमधे प्रेशर कायम ठेवणे महत्वाचे, शिट्या नाहीत. पण अगदी प्रसिद्ध लेखकही, वेळ न लिहिता शिट्याच लिहितात !!

प्रेशर कायम ठेवण्यासाठी कूकरच्या शिट्या होऊ द्याव्या की न द्याव्या असा प्रश्न आहे.
कूकरच्या झाकणाची शिटी काढायची नाही, ती तशीच ठेवायची आहे, फक्त ती वाजू द्यायची नाही.

बारिक आचेवर शिट्टी न करता पदार्थ शिजवायचा असेल तर प्रथम अर्धा तास भिजवून मग कुकरात लावावा, शिवाय त्यात नेहमीपेक्षा थोडं कमी पाणी घालावं.. (हा माझा अंदाज आहे.) कारण मोठ्या आचेवर कुकरने शिट्ट्या मारल्या की पदार्थाचा गिचका नाही होत, बारिक आचेवर होतो.

अगदी शास्त्रीय पद्धतीने कु़कर वापरायचा असेल तर वेंट (शिटीचा पाईप) मधून वाफ यायला सुरवात झाल्यावरच त्यावर शिटी (वेंट वेट) ठेवायला पाहिजे. असे केल्याने त्या पाइपमधे काही अडकलेले नाही, याची खातरजमा होते.

का बरं, मिनोती? मध गरम झालेला चांगला नाही का तब्येतीसाठी? लवकर सांगा, कारण मला रोज रात्री गरम दुधामधे मध घालुन प्यायची सवय आहे. मी साखरेला हेल्दी पर्याय म्हणुन चालु केलं होतं, पण जर चालत नसेल तर लगेच बंद करेन.

गरम दुधात मध हा वजन वाढवायला एक उपाय म्हणून सांगितला आहे. जाणकार सांगतीलच. मध गरम केल्यास त्यात केमिकल चेंजेस होतात.

अमा, स्टिल अ‍ॅम नॉट शुअर की 'गरम' दूधात मध घाला असा सल्ला दिला असेल. केमिकल चेन्जेस होतात असं तुम्हीच लिहिलं आहे. मध आणि गरम ह्याबद्दल सर्वच सल्लागार/ जाणकार थोडे कॉशस असतात सहसा. टाळलेले उत्तम. तसेही, 'कोमट'चा पर्याय आहेच. वर्ज्य करायला सांगत नाहीत.

पौर्णिमा, बरोबर आहे गरम नाही कोमट, माझ्या का लक्षात आले कोमट पाण्यात लिंबू रस व मध हे वजन कमी करायला, कोमट दुधात मध हे वजन वाढवायला असे सांगितले होते. आजकाल डायेटीशिअन नुसतेच कोमट पाणी व लिंबू रस सांगतात मध नाहीच. मी नेट वर पाहिले मध गरम केल्यास टॉक्सिक पदार्थ निर्माण होतात असे आहे पण पक्के कोणीच सांगत नाहिये. काही लोक मध स्वैपाकात रेग्युलर वापरतात असे ही आहे. टाळलेले उत्तम याला अनुमोदन. आजकाल साखरेस पर्याय म्हणूनही मध फारसा सजेस्ट करत नाहीत.

वजन वाढवायला, गरम दुधात मध? देवा रे, मी काय करत होते हे. एकीकडे जिममधे वजन कमी करण्यासाठी मरमर करुन मी दुसरीकडे गरम दुध आणि मध पीत होते. Sad

मी तर ओट्स पॉरिजमधे पण मध घालुन खाते. लगेच थांबवावे हे बरे. थॅंक्स गं मुलींनो. वाचवलंत मला.

Pages