युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अखि आमसूल किंवा चमचाभर आगळ टाकलंस तरिही चालेल.
तसं ही आळू पुर्ण शिजवल्यावर खवखवत नाही, तरिही बेटर टू बी ऑन द सेफर साईड Happy

भ्रमर, प्लास्टीक कुल्फीच्या मोल्ड मधे सरबत भरुन गोठवल्याने बरिचशी गोळ्या सारखी मजा घेता येते. फक्त रसना, टँग सारखी सरबते घेऊ नका. माला सारख्या ब्रॅन्ड्स ची जि सिरप्स मिळतात, ज्यात पाणी घालून डायल्यूट करावी लागतात ती घ्या. जितके कमी पाणी घालाल तितकी जास्त सुंदर चव मिळेल आणि खुसखुशीत पणाही. ह्यात ऑरेंज आणि आंब्याचे सिरप्स खुप मस्त आहेत. सध्या आमच्याकडे रोजचा रतिब चालू आहे ह्याचा. नक्की ट्राय करुन बघा. मोल्ड्स मी हायपर मधून घेतलेत. ते खुपच सोयीस्कर आहेत. बर्याचदा मोल्ड्सचा ही प्रॉब्लेम असतो.

मोल्डही शक्यतो अ‍ॅल्यूमिनियमचे असावेत म्हणजे लवकर थंड होतात.

स्वप्ना Proud
असो, मोलाच्या टिप्स देणार्‍या बायांनो, काल रात्री कणिक मळताना गरम आणि थंड पाणी शिवाय वाटीभर कोमट दूध वापरून कणिक मळून आज त्याच्या पोळ्या केल्यात. दुपारनंतर रिपोर्ट टाकेन. करताना तरी स्मूथनेस जाणवत होता.. Happy

सख्यांनो, चिवड्याचे पोहे कुरकुरीत होण्यासाठी ओव्हनमधे किती टेंपरेचरला किती वेळ ठेवायचे ते मी विसरलेय. सांगू शकेल का कोणी?
अन प्लीज प्लीज कढईत भाजायला सांगू नका. त्यात ते कधीकधी 'वळणदार' होतात नि मला तसा चिवडा आवडत नाही.

मल २-३ युक्त्या हव्या आहेत. कृपया माहित असेल तर सांगा.

१. पालकाची ताकातली पातळ भाजी बनवायला डाळीच्या पिठाशिवाय अजुन कसली पिठे वापरता येतील?
२. Fat free दूधाचा चक्का निघेल का?
३. मुदत संपलेली baking powder उरली आहे (बेकिंग सोडा नव्हे), त्याचा पदार्थात वापरण्याशिवाय अजुन कुठे उपयोग होउ शकतो का?

डाळीच्या पिठाशिवाय >>> तुला हरभरा डाळीचे पीठ नको असेल तर मसूर डाळीचे वापरु शकतेस. किंवा तांदळाची पिठी चालेल बहुतेक.

सुमॉ, २०० ला ३०-३५ मिनिटं. अजिबात वाकडे न होता सुंदर कुरकुरीत पोहे. फोडण्या घाला, चिवडे करा!

धन्स मृ. लग्गेच उत्तर दिल्याबद्दल. आज ऑ ऑ घालून सो कॉल्ड हेल्दी चिवड्याचा प्लॅन आहे.

पालकाची ताकातली पातळ भाजी बनवायला डाळीच्या पिठाशिवाय>>

मी बरेचदा वरणाचा ( तूर डाळीच्या) गोळा लावते.

सुनिधी , बेसन ऐवजी मुगाच पीठ बरेच ठिकाणी रिप्लेसमेंट म्हणुन वापरता येत. त्यामुळे ते चालेल. आई तर बेसनच पीठल न करता , ज्वारीच्या पीठाच हिरव्या मिरच्या घालून पिठल करते. फारच सुंदर लागतं. त्यामुळे ज्वारीच पीठ लावुन पण करता येईल का अस वाटत. करुन बघायला पाहिजे.

आमच्या केक च्या क्लास मध्ये तरी बेकिंग पावडर जितकी फ्रेश वापराल तितकी चांगल. आणी एक्स्पार्यड वापरु नका असं सांगितलेल.

त्याचा पदार्थात वापरण्याशिवाय अजुन कुठे उपयोग >>> सीमा, ती हेच विचारतेय. फ्रीझ/फॅन वगैरे स्वच्छ करायला वापरत असतील की Wink

मेधा, थँक्स. आज चिवडा करणारच आहे. इ.ग्रो मधे केप्रचा चिवडा मसाला मिळालाय. तो घालून आणि न घालता असे दोन प्रकार.

ज्वारीचं पीठ लावून मी पण करते भाज्या, पिठलं. चांगलं लागतं. माझ्या दिरांना बेसन चालत नाही म्हणून कढीमधे पण मुगाचं वा ज्वारीचं पीठ वापरतात आमच्याकडे.

सुनिधी
बेकींग पावडरच्या वेगवेगळ्या उपयोगासाठी मितानने काढलेला 'सुंदर माझे घर' की अश्याच नावाचा धागा आहे तो बघ. तिथे बे.पा. वापरून घरातले काय काय स्वच्छ केले जाऊ शकते याची यादी होती.

मानुषी, विकिपीडिया म्हणतोय की आमचूर म्हणजे कच्च्या आंबट आंब्याच्या (कैरी)फोडी उन्हात वाळवून त्याचा चूर(पावडर)करुन ठेवतात.नंतर ती अन्नास आंबट चव येण्यासाठी वापरतात. Happy

आमचूर करण्यासाठी कैरीच्या साली काढून उभट फोडी करायच्या. या वाळलेल्या फोडी म्हणजेच आंबोशी. हिची पूड म्हणजे आमचूर, नगरच्या हवेत या फोडी नीट कडकडीत वाळतील. मुंबईला त्या अर्धवट कूटून परत वाळवाव्या लागतात, म्हणजेच याची नीट पूड होते. भेळेची चटणी व इतर उत्तर प्रदेशातल्या चटण्या व पदार्थ करताना आमचूर वापरतात.
आंबट कैरीचा किस, नूसते मीठ घालून बरणीत भरुन ठेवला तरी टिकतो (न वाळवता) मीठ मात्र भरपूर घालावे लागते. आपल्या पद्धतीच्या चटण्या, आंबा डाळ वगैरे करायला हा किस उपयोगी पडतो. त्यावेळी पदार्थात मीठ जपून घालायचे.

धन्यवाद रुनी, ह्या धाग्याविषयी माहितीच नव्हती Happy

हं. अकू, दिनेश दा धन्यवाद.
मला दरवर्षी इतर अनेक पदार्थांबरोबर कोकणातून आमचूरही येत असतो. या वर्षी म्हटलं ...त्याच त्या नगरच्या कडक उन्हात करून बघू. दोन कैर्‍यांच्या बारीक फोडी करून उन्हात वाळवल्यात आता मिक्सरमधून काढते. पण म्हटलं अजून काही ऑथेंटिक रेसिपी असल्यास विचारावी.
आंबोशीचं लोणचं.............अहाहाहा!

अय्यो! मी कधीकधी आमसुलाला पर्याय म्हणून आमचूर वापरत होते! Proud चुकल्यासारखं काही वाटलं/ कळलं नाही म्हणून विचारायची वेळ आली नव्हती ती आता आली बहुतेक! चालते का असे?

आशूदी, गोव्यात, चवीत बदल म्हणून असे वापरतात. तिथे बाजारात विकायलाही असतात.
मानुषी, इथे आहे लोणचे.

Pages