१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
ह्म्म्म, तेच ठीक राहील.
ह्म्म्म, तेच ठीक राहील.
सध्यातरी माझ्यापुढे घरातली
सध्यातरी माझ्यापुढे घरातली मधाची एक बाटली कशी संपवायची एवढाच प्रश्न आहे. इथे आलेल्या माहितीवरून सरबतात आणि क्वचित सॅलड ड्रेसिंग म्हणुन मध वापरता येईल.
माझ्यासमोर वजन कसे कमी करावे असा प्रश्न आ वासून अजिबात उभा नाहीए त्यामुळे कोमट/गार दुधात मध घालून आ वासलेल्या तोंडात ते ओतायचा विचार करतो.
अहो, मध संपवू नका. हा एकच
अहो, मध संपवू नका. हा एकच पदार्थ असा आहे की ज्याला एक्स्पायरी डेट नसते. वर्षानुवर्ष मध व्यवस्थित राहतो. पण त्याला पाण्याचा हात लागू देऊ नका एवढंच पथ्य पाळा. मध औषधी आहे, त्याचा घरात बराच उपयोग होतो.
अगदी अगदी. तोंड आले तर मध
अगदी अगदी. तोंड आले तर मध घरात पाहिजे. खरेतर मधाच्या गुणांवर एक वेगळा बाफ काढता येइल. आरोग्या विभागात.
मयेकर, पंचामॄत करून बघा.
मयेकर, पंचामॄत करून बघा.
मंजुडी माझा प्रश्न बदलून
मंजुडी माझा प्रश्न बदलून विचारतो . बाटलीतला मध पोटात कसा पाठवता येईल ?
मधाला एक्स्पायरी नसते आणि तो फ्रीज मध्ये ठेवू नये हे माबोवरच वाचले होते.
कफ, घशाची खवखव यावर आराम म्हणूनच मधाची बाटली आणली होती. ग्लायकोडिनपेक्षाही चांगला आराम देतो मध.
नंदिनी छान आयडिया.
बरं मग पंचामृत रोज घ्यायचं
बरं मग पंचामृत रोज घ्यायचं असेल तर दोन भाग दूध आणि प्रत्येकी एक भाग तूप, साखर, दही आणि मध असं त्याचं प्रमाण आहे बहुतेक, ते तसंच शास्त्रोक्त पद्धतीने घ्या.
वर पूनमने लिहीलंय तसं लिंबूमधपाणी घेता येईल.
धन्यवाद मंजुडी.
धन्यवाद मंजुडी.
भरत, ब्रेड खात असाल तर
भरत, ब्रेड खात असाल तर ब्रेडलाही मध स्प्रेडसारखा लावून छान लागतो. ब्रेड + मध + लोणी (पर्यायी) = अहाहा!!
हो ब्रेड बरोबर छान लागतो मध..
हो ब्रेड बरोबर छान लागतो मध.. पण जीभ सोलवटते (निदान माझी तरी) कारण मध उष्ण असतो. एका दिवशी जास्तीत जास्त २ चमचे खावा.. नाहीतर
इडली, डोसे याबरोबर देखील मध
इडली, डोसे याबरोबर देखील मध मस्त लागतो.
केळ्याचे काप आणि त्यावर
केळ्याचे काप आणि त्यावर मध.... अह्हाहा
सफरचंदाचे तुकडे आणि त्यावर मध... तोंपासु
बदाम + काजु + पिस्ते थोडे रोस्ट करुन त्यावर मध... लागला
हे सगळे फक्त मयेकरांसाठी
डाएट कॉन्शस मंडळींनी वाचु नये कृपयाच 
कापल्यावर त्यावर आपण जसे लगेच हळद लावतो तसेच भाजल्यावर भाजलेल्या जागी मध लावायचा लगेच्च आग कमी होते. लोणी/तुप अजिब्बात लावायचे नाही.
वा.. बरेच उपयोग कळले मधाचे...
वा.. बरेच उपयोग कळले मधाचे... धन्यवाद सगळ्यांना
स्ट्रॉबेरीचे ४ -४ तुकडे
स्ट्रॉबेरीचे ४ -४ तुकडे करावेत. त्यावर चमचाभर मध घालावा. मधात बुडलेले तुकडे मस्त लागतात.
आता बास महत्प्रयासाने १
आता बास
महत्प्रयासाने १ वर्षात ९ किलो वजन कमी केलंय..
दक्षे हे घे अजुन
दक्षे
हे घे अजुन ...
शॉर्ट्ब्रेड किंवा बटर बिस्किटांचा चुरा, त्यावर व्हॅनिला आईस्क्रिम आणि वरतुन मध ... यम्मो
गरम गरम पॅनकेक्स आणि मध
म्युसली+घट्ट दही+ मध
केक+ व्हिप्ड क्रिम=मध

हनी बिस्किट सँडविचेस
मधातली शर्करा, ही रक्तात लवकर
मधातली शर्करा, ही रक्तात लवकर शोषली जाते. अनेक आयूर्वेदीक औषधे, मधातून खलून घ्यायची असतात, ती यासाठीच !
लाजो तूने बहुत मध खाया, अभी
लाजो तूने बहुत मध खाया, अभी थोडा मेरा मार खा...

दक्षे, मध मैने नही खाया...
दक्षे, मध मैने नही खाया... तुमकोच खिलाया... अभी मार भी तुमकोच दुंगी
चवळी भिजवलीय, चांगले मोड आले
चवळी भिजवलीय, चांगले मोड आले आहेत. पण आज शुक्रवार आणि ती करायची आहे सोमवारी. तोवर चिकट होऊ नये म्हणून काही उपाय करता येईल का...सध्या टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून डब्यात घालून फ्रिजात ठेवली आहे.
. तीन तीन दिवस ठेवलं तर झाडे
. तीन तीन दिवस ठेवलं तर झाडे येतील की! त्यापेक्षा आमच्याकडे पाठवून द्या.
चिवा, कोरडी करून फ्रिजात
चिवा, कोरडी करून फ्रिजात ठेवलीस तर टिकेल. ओलसर ठेवू नकोस.
चिवा, नूसती वाफवून फ्रीजमधे
चिवा, नूसती वाफवून फ्रीजमधे ठेवली तर चांगले. पेपरमधे गुंडाळून ठेवली तरी काळी पडायची शक्यता आहे.
फ्रीजर मधे राहील चांगली.
फ्रीजर मधे राहील चांगली. फ्रीज मधे नाही सांगता येत.
फ्रीजरमध्ये मोड आलेली धान्ये
फ्रीजरमध्ये मोड आलेली धान्ये ठेवली तर नेहेमी नीट शिजतातच असं नाही. त्याची जर उसळ किंवा आमटी करायची असेल सोमवारी तर ती आजच करून मग फ्रीज करावी.
पूर्ण वाफवून ठेवायची का
पूर्ण वाफवून ठेवायची का दिनेशदा फ्रिजमध्ये?
जामोप्या, झाडं नाही आली तर उसळ करून मटकावते आणि आली तर झाडंच तुमच्याकडे पाठवते...
स्वाती, आर्च, फुलपाखरू...धन्स.
हो चिवा, भाजीला शिजवतो
हो चिवा, भाजीला शिजवतो तेवढीच. आयत्यावेळी मसाला घालून उकळायची.
हेम एक सोपे आयडिया ही मी
हेम एक सोपे आयडिया ही मी ब्राउन राइसला वापरते. भात २ तास आधी पाण्यात भिजउन ठेवायचा प्रमाण मात्र १:२ इतकेच किन्चित जास्त पाणी चालेल.
राइस कुकर छोटा आणलात तर बेश्ट्च भाज्या/ राइस पटकन शिजतात विदाउट शिटी.
हेम | 5 June, 2011 - 00:30
आणखी कुणी जर हा प्रयोग केला असेल तर १ वाटी तांदुळाला किती पाणी, गॅस मंद की फुल्ल, गॅस काढल्यावर किती वेळाने कुकर उघडायचा? या प्रयोगांत गॅस वाचेल हे नक्की!!
धन्यवाद दिनेशदा...एवढी चवळी
धन्यवाद दिनेशदा...एवढी चवळी चिकट होणार म्हणून वाईट वाटत होतं. आजच ठेवते वाफवून.
सध्यातरी माझ्यापुढे घरातली
सध्यातरी माझ्यापुढे घरातली मधाची एक बाटली कशी संपवायची एवढाच प्रश्न आहे. भरतजी, आमचे पावसाळी ट्रेक्स सुरु झालेत. देऊन टाका आमच्यात..मधाशिवाय आणखी काही खाणेबल घरात असेल तर तेही चालेल. मधदाता सुखी भव!!!
Pages