युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा पोळ्यांबद्दल शंका.. (फिरून फिरून गंगावेशीत..)
माझ्या पोळ्या मऊ होतात, फुगतात, पातळही होतात.. फक्त मी तव्यावर भाजताना जाडी वाढेल या भीतीने अजिबात तेल लावत नाही. त्यामुळे त्या कोरड्या वाटतात..
बरेच लोक अशा पोळ्या करतात पण त्यांच्या पोळ्या मस्त मॉईश्चर्ड दिसतात. त्या कशा काय? Uhoh
माझं चुकतं कुठे? कणिक मळताना, लाटताना, कि भाजताना?
कणिक मळताना मी तेल घालते, आणि कणिक मध्यम असते... (थोडी घट्टकडे झुकणारी) लाटताना पोळीच्या घडीत तेल लावते, काही लोक पीठ ही घालतात. मी ही लावायचे थोडं पण त्यानेही पोळी कोरडी होते असं मला कोणितरी सांगितलं म्हणून ते बंद केलं. भाजताना पोळी तव्यावर टाकल्या वर लगेच मी परतते... त्यामुळे मऊ होते... (माझा अनुभव)
प्लिज मार्गदर्शन करा..

भ्रमर, सोपी पद्धत म्हणजे रसना करुन कुल्फीच्या मोल्डमधे फ्रीझ करायचे. किंवा पुण्यात सकाळ शॉपिंग फेस्टिवलमधे एक खास बर्फाचा गोळा बनवणारे मशिनही मिळते. तसे मुंबईतही मिळेल. किंमत साधारण ५०० रु आहे पण. पण त्यात एक्दम मस्त बनते बाहेरसारखे. त्यामुळे जर मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी वगैरेपण उपयोगी होउ शकते .

दक्षिणा, पोळ्यांचे जाणकार योग्य मार्गदर्शन करतीलच, पण माझ्या मते, तू फुलके का नाही करून बघत? फुलके लाटताना घडी घालत नाहीत, त्यामुळे घडीत तेल लावायचा प्रश्न नाही, मग तेच तेल तू फुलका झाल्यावर वर लावू शकतेस, म्हणजे फुलका मऊ राहिल.

मंजु आयडीया मस्त आहे, पण फुलका पुर्ण फुगण्यासाठी कापडाने ठिकठिकाणी दाबावा लागतो ना? मग तिथे कडक नाही होत का? की तु विस्तवावर भाजतेस? Uhoh
अवांतर - माझी ताई फुलका लाटून तव्यावर टाकते लगेच पलटते आणि शेजारच्या विस्तवावर भाजते..

मला घडीची पोळी अजिबात जमत नाही त्यामुळे मी फुलकेच करते. फुलक्यांसाठी तवा पूर्ण तापवून मग गॅस बारीक करून ठेवते. फुलका लाटून झाला की पोळपाटाकडची बाजू तव्यावर टाकते. त्याचा रंग बदलला (पांढरट झाला) की बाजू पलटून गॅस मध्यम मोठा करते. तव्याकडच्या बाजूवर चॉकलेटी ठिपके पडले की डाव्या हाताने चिमट्यात तवा पकडून बाजूला घेते आणि उजव्या हातात फुलक्याच्या चिमट्याने फुलका पकडून पांढरी बाजू गॅसवर टाकते, गॅस मोठा करून फुलका फुगवते आणि खाली काढून एका मऊ कापडावर ठेवते. म्हणजे वाफेमुळे फुलके ओलसर होत नाहीत. सगळे फुलके करून झाले की प्रत्येकाला जरा तेलाचं बोट पुसून ठेवते.

दक्षिणा, पण फुलके ताजेताजेच खायला पाहिजेत. जर ठेवायचे असतील, तर मी खाकरा करणे पसंत करतो. तो वरणाबरोबर, आमटी बरोबर सुद्धा खाता येतो.

दक्षिणा, मीही पोळ्या येत असून झगडून फुलके शिकले कारण इकडच्या हवेत पोळ्या खूप मऊ रहात नव्हत्या. आणि मला आणि नवर्‍याला फुलके आवडत नव्हते. पण गेले ७-८ महिने फुलकेच.
मीही मंजूसारखंच करते. फुलका गॅसवरून उतरवला की वेताच्या छोट्या टोपलीत पेपर टॉवेल घालून त्यावर ठेवते, आणि लगेच त्यातली वाफ काढून टाकते. वर तूप लावते. Happy ही टोपली मी तुळशीबागेतून पोळ्यांसाठीच आणली, फक्त आणली तेव्हा त्याला वरून छान फॅन्सी कव्हर वगैरे होतं. ते रोज धुतलं नाही तर पोळ्यांना वास येतो म्हणून मी ते काढून टाकलं आणि आतली टोपली वापरते. Happy

दक्षिणा, माझा अनुभव असा की कणीक सैलसर असल्याशिवाय पोळ्या मऊ होत नाहीत. मी फूड प्रोसेसर मध्ये कणिक मळते, मग तेल लावून २-३ मिनिटे हाताने मळते. मग १० मिनिटांनी पोळ्या लाटायला घेते. बाकीचे बरेच फॅक्टर आहेत पण असे केले की माझ्या सकाळी केलेल्या पोळ्या संध्याकाळपर्यंत मऊ राहतात.

सीमाला विचार, तिने केलेया पोळ्यांइतक्या मऊ पोळ्या मी आजवर खाल्य्या नाहीत.

मंजूडी अगदी अगदी असच करते बर्का मी पण Happy आणि हि पद्धत दहा वर्षापूर्वी मी ट्रेन मधे एक मुलगी/बाई तीच्या मैत्रिणीला सांगताना ऐकली होती, आणि तेव्हापासुन करायला लागले होते. ती तूच तर नव्हतीस? Wink

सीमा तू एक पोळ्या-१०१ नावाचा व्हिडीओ टाक बाई, त्याने बर्‍याच लोकांच्या पोटाचा प्रश्न सुटेल.

सीमा...... $$$$$$$ किधर हो.... जल्दी आओ..

ज्ञाती अगं कणिक सैलसर मळली की फार प्रॉब्लेम नाही येत मला लाटायला पण पोळपाटाला चिकटणे, पीठ जास्ती लावावं लागणे... हे सकाळच्या गडबडीत छळवादी वाटतात.. Sad

कणीक घट्ट असणे, पोळ्या फार पातळ लाटणे, लाटताना जास्त पीठ लावणे, तव्यावर सारखी पलटणे, जास्त भाजणे,भाजून झालेल्या पोळ्या फॅनखाली उघड्या ठेवणे इ. आतापर्यंत मला सापडलेली कडक पोळ्यांची कारणे. कणीक भिजवताना थोडे मीठ घातले तर पोळ्या फुगतात, हलक्या होतात. हे काहीच नसेल तर गहू /पीठ बदलून पाहणे हा अंतिम उपाय.
'पोळ्या जमणे' म्हणजे काय? योग्य पोळी कशी असते? एक व्याख्या प्लीज हेडरमध्ये टाका.

अरे देवा Uhoh मी नाही गं एक्स्पर्ट बायांनो.
दक्षिणा , ज्या अर्थी पीठ पोलपाटाला चिकटतय त्या अर्थी पीठ चांगल मळल जात नाही. व्यवस्थित ,लुसलुशीत मळलेली कणिक अजिबात चिकटत नाही. पीठाची कंसिस्टन्सी बरोबर झाल्यावर कणिक , हाताला तेल लावून चांगली मळुन घे. कणिक अशी गुळगुळीत दिसायला पाहिजे मळल्यावर. फुड प्रोसेसर मध्ये किंवा हाताने कशीही मळली तरी. तसच चपाती लाटताना अति पीठ लावल्यामुळ पण चपाती कोरडी होत असेल.
घडी घालताना तेला बरोबर पीठ लावल कि चपातीला छान पापुद्रे सुटतात.

माझ्या आईच्या मते चपाती नुस्ती मऊ नाही तर मऊ आणि खुसखुशीत व्हायला पाहिजे. मी अजुन शिकत आहे तिच्यासारख्या चपात्या करायला.
कणिक मळुन झाल्यावरचा फोटो टाकायचा प्रयत्न करते. Happy

दक्षिणा, मी सुध्दा थोडी घट्ट भिजवते कणिक, पण तेल लावुन १० मी. झाकून ठेवते मग फुलके करते. त्या १० मी. कणिक मुरुन थोडी मऊ होते. हा माझा अनुभव.

सीमा माझी कणिक तु म्हणतेयंस तशी गुळगुळित होते छान.. पोळपाटाला चिकटत नाही सध्या, पण सैल भिजवली तर त्रेधा तिरपिट उडते.. Sad

चपाती, भाकरी, दही लावणे, तूप कढवणे ..... आणि फ्लॅक्स सीड्स यांचे स्वतंत्र बीबी झालेच पाहिजेत आणि त्यांच्या लिंक्स या बीबीच्या माथ्यावर झळकल्याच पाहिजेत..

गंम्मत करतोय.. पण हे व्हावेच नाही का ?

नको. मग तुळशीचे बी = फ्लॅक्स सीडस = जवस = तीळ = कारळं = हळीव
हे प्रश्न कुठे विचारणार आँ?
Proud

मायबोली FAQ's मध्ये सर्वाधिक खपाचे प्रश्न .

दक्षिणा, मलाही वाटते की बहुदा कणीक घट्ट भिजवतेस म्हणून पोळ्या मऊ होत नाहीत. जरा सैल कणिक भिजवली की मऊ होतात पोळ्या. शिवाय १० मिनिटं झाकून ठेवायची कणिक अन मग परत थोडी मळून घायची . अन हो, फार बारिक गॅसवर भाजली पोळी तरी ती कोरडी होते तेव्हा तवाही नीट तापलेला हवा Happy
फुलके करतानाही कणिक भिजवून १० मिनिट झाकून ठेवायची पुन्हा मलायची, मऊ होतात तेही .
आवडत असेल तर कणिक भिजवताना २ चमचे दही टाकत जा , त्यानेही मऊ होते पोळी.

माबो FAQ धागा काढून आधी झालेल्या चर्चांच्या लिंक्स तिथे दिल्या तर? Happy

दक्षिणा, दही किंवा थोडं कोमट दूध सुद्धा घालून बघ हवं तर. किंवा भिजवताना कोमट पाण्यात भिजव आणि १०-१५ मिनिटं ठेव कणिक मुरायला. मावे असेल तर १० सेकंदात पाणी पुरेसं कोमट होईल.
कणिक मळताना दोन्हे हाताने भरपूर दाब देऊन मळून घे. "पीठाचा अणूरेणू मळला गेला की पोळ्या-भाकर्‍या मऊ होतात" असं मला साबा म्हणाल्या होत्या. Happy

काळजी नको करू गं, जमतं सगळं! Happy
(हे ल तों मो घा सारखं वाटेल, पण इथे आल्यावर एकदा नवरा म्हणाला, की "सिरिअसली तू डबा द्यायचा विचार काही दिवस थांबवतेस का.. आपण रात्री गरम पोळ्या खाऊ, आणि फोनवर परत विचारू पाहिजे तर काय कराय्चं असतं पोळ्या नीट व्हायला ते..पण डब्यात पोळ्या नीट लागत नाहियेत..." कारण खाताना त्याला त्रासच होत असे. हे ऐकून मी दुपारी घरी एकटी बसून चक्क रडले होते! त्यामुळे या सगळ्यातून मी गेली आहे म्हणून सल्ले देतेय. रागवू नको! Happy )

ज्ञाती अगं कणिक सैलसर मळली की फार प्रॉब्लेम नाही येत मला लाटायला पण पोळपाटाला चिकटणे, पीठ जास्ती लावावं लागणे...>>> यापेक्षा थोडी कमी सैल हवी Proud

मी नाही गं एक्स्पर्ट बायांनो.>>>> सीमा इज बीइंग वेरी पोलाइट बर्का बायांनो,
सीमा अजिबात अतिशयोक्ती नाही, खरंच फार मऊसूत पोळ्या होतात तुझ्या. Happy
तु वर लिहीलं आहेस तशी कणीक मळायला लागल्यापासून बरीच सुधारणा आहे माझ्या पोळ्यात

कणीक भिजवताना तेल जरा जास्त घातला तरी मऊ होतात पोळ्या..
न शक्यतो सकाळ ची कणीक रात्रीच भिजवुन ठेवायची..

"पीठाचा अणूरेणू मळला गेला की पोळ्या-भाकर्‍या मऊ होतात" >> १००% अनुमोदन.
पीठ चांगल मळल्यावर फार मऊसूत पोळ्या होतात.

अवनी सेम पिंच.
सकाळी कणिक मळून पोळ्या करून मग हापिसला जायचं म्हणजे इम्पॉसिबल आहे. त्यामुळे मी कणिक रात्रीच मळून फ्रिजात ठेवत असते, त्याने भिजते ही चांगली आणि वेळ ही वाचतो.... त्यात ही काही टिप्स असल्या तर सांगा.. Happy
वर सांगितल्याप्रमाणे दही/कोमट दूध/पाणि घालून एकदा मळून पाहते.
बरं मग करायला शिकले की कोण कोण येणार माझ्या हातच्या पोळ्या खायला? Proud

एक प्रश्न..........

अळूवड्या करताना त्याने घसा खवखवू नये म्हणून चिंच टाकतात....

पण चिंच नसल्यास काय टाकावे???

कुठलाही आंबट पदार्थ टाकू शकतेस. अळू मधे कॅल्शीयम अ‍ॅक्झॅलेटचे स्फटीक असतात हे आपल्या धश्याला टोचतात. म्हणून घसामधे खास सुटते. हे स्फटीक आम्ला मधे विरघळतात म्हणून चिंच,लिंबू ताक आंबट चुका घालतात पदार्थाप्रमाणे.

Pages