Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? 
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रतीका, त्या जॉय मुखर्जीला
प्रतीका, त्या जॉय मुखर्जीला 'जॉमु' च्या ऐवजी 'जामु' म्हणून तू समस्त बंगाल्यांचा अपमान करतो आहेस. त्यांना कळलं तर तुझ्या हापिसात येऊन 'चॉलबे ना, चॉलबे ना' करत फर्निचर पेटवतील.
प्रतिक्..आमच्या काळातला
प्रतिक्..आमच्या काळातला कॉलेजच्या पोरांचा पिक्चर तो! कॉमेडी म्हणुन बघितला!
स्वप्ना, अनु अगरवालचा
स्वप्ना, अनु अगरवालचा जन्मकुंडली नावाचा पण एक सिनेमा होता. त्यात ती बहुतेक विनोद खन्नाची हिरॉइन होती. त्यात पाकिस्तान रिटर्न, रिना रॉय पण होती.
प्रतीक.. तो आशीकी नावाचा
प्रतीक.. तो आशीकी नावाचा शिनुमा मी तीन वेळा पाहीला होता.. काय करणार गाणी हिट्ट आणी मी नुकताच कॉलेजात जायला लागलो होतो.. त्या राहुल ने नंतर एक भुताचा शिनुमा केला होता त्यात त्यो माणसाचा डायरेक्ट वाघ व्हायचा..

आर्या.. हो हो खलनायीका सुद्धा पाहीला आहे..
>>त्या राहुल ने नंतर एक
>>त्या राहुल ने नंतर एक भुताचा शिनुमा केला होता त्यात त्यो माणसाचा डायरेक्ट वाघ व्हायचा.
शेळीचा वाघ झालेला हा जगातला पहिला इन्सिडन्स असावा. ह्यावरून तर 'वाघ बकरी चाय' निघाली नसावी ना? ह्या पिक्चराचं नाव जुनून. त्यात 'वक्त कटे नही कटता है तेरे सिवा मेरे साजन' हे एक मस्त गाणं होतं. ते पूजा भटने वाया घालवलं. अविनाश वाधवान ही त्या गाण्यातली जमेची बाजू.
>>अनु अगरवालचा जन्मकुंडली नावाचा पण एक सिनेमा होता. त्यात ती बहुतेक विनोद खन्नाची हिरॉइन होती.
तेव्हा विनोद खन्नाला साडेसाती असावी.
राहुल रॉयचा इंग्रजी 'द घोस्ट'
राहुल रॉयचा इंग्रजी 'द घोस्ट' वरुन काढलेला भूताचा सिनेमा ना?
स्वप्ना___/\___ ... तुला त्या
स्वप्ना___/\___ :D... तुला त्या शिनुम्यातील गाणी सुद्धा माहीती आहेत..
तुम्हाला किंग एडवर्ड आठवा
तुम्हाला किंग एडवर्ड आठवा माहीत असेलच. पण त्याने आपल्या प्रियतमेसोबत एक हिंदी गाणे म्हटले, चक्क एका अंतर्यासकट हे नसेल माहीत. ओळखा ते गाणं.
स्वप्ना, यु आर ऑन द राइट ट्रॅक. 'ताज' के आसपासही ढूंढना.ताज सिर्फ अंतरे में है. एक घर बनाउंगा गाणार्यांतल्या गायिकेच्या बहिणीने हे युगुलगीत म्हटलंय. आणि पुरुष गायक घर बनानेवाला गायक नाही मिळाला की जो चालवून घ्यायला लागायचा तो.
आर्या, घोस्ट पॅट्रीक स्वेझी
आर्या, घोस्ट पॅट्रीक स्वेझी आणि डेमी मूरचा. जुनून बहुतेक कुठल्यातरी वेअरवुल्फवरच्या हॉलिवुडपटाची कॉपी असावी.
ओह्..आठवले. राहुल रॉयचा
ओह्..आठवले. राहुल रॉयचा 'घोस्ट'वर आधारीत चित्रपट 'प्यार का साया'
आणि हा 'जुनुन' महेश भट्टची आत्मकथा आहे म्हणतात ना?
घोस्ट च्या हिंदी आवृत्तीत,
घोस्ट च्या हिंदी आवृत्तीत, रारॉ च होता. शिवाय शीबा, अमृता सिंग, मोहनीश बहल, अवतार गिल होते. याचीच फेमिनानीन आवृत्ती निघाली होती, त्यात जयाप्रदा आणि जितेंद्र होते.
'जुनुन' महेश भट्टची आत्मकथा
'जुनुन' महेश भट्टची आत्मकथा आहे म्हणतात ना?>>> महेश भट्टचा वाघ व्हायचा???
राम मी पण नुकतच कॉलेजात पाऊल
राम
मी पण नुकतच कॉलेजात पाऊल ठेवलेल आणि मैने प्यार किया च्या क्रुपेने तेव्हा तसलेच चित्रपट रतिब घालत त्यात गाण्यामुळे तरलेला हा चित्रपट.
ह्यांनी 'दिल' चा किंवा त्यांनी 'आशिकी' चा शेवट ढापला अशी ओरड होती. अर्थात दिलही गाण्यांवरच जगला.
मला अजिबात ते तेलाचे बोळे आवडले नव्हते पण मी काळानुरूप डक कट म्हणजे राहुल रॉयला न शोभलेली पण मला शोभेलशी वाटलेली हेअर् स्टाईल केलेली.
जुनून कॅटपिपल वरून उचलेला तर घोस्ट वरून प्यार का साया.
Whoopi Goldberg ला जसच्या तस फॉलो केल्याबद्दल अमृतासिंगला फिल्मफेअरही होत.
महेश भट ची आत्मकथा 'जनम' नावाची टेलीफिल्म होती. त्यात तो एरंडेल कोयनेल चे कॉकटेल प्यायलेल्या चेह-याचा कुमार गौरव आणि सध्या भंसाळीच्या चित्रपटात सहाय्यक भुमिकेत दिसणारी शेर्नाझ पटेल होती.
याच चित्रपाटाच कौतुक चढल्यामुळे पुढे भटाला 'मी अक्कर माश्या मी अक्कर माश्या' म्हणायची सवय लागली.
शेवट 'जख्म' च्या वेळेस नानाभाई भट्टानी सांगितल की त्याच्या रडगाण्यकडे लक्ष देऊ नका. त्याच्या आईशी माझ रीतसर लग्न झालेल त्यामुळे हा माझा औरस मुलगा आहे.
राम,
राम, http://www.dishant.com/album/junoon-%281992%29.html - इथे ते गाणं ऐकून बघा. कदाचित आवडेल.
भरत, अश्या हिंटा मला उपयोगी पडत नाहीत.
>>हा 'जुनुन' महेश भट्टची आत्मकथा आहे म्हणतात ना?
मला वाटतं तो 'जनम'
पी टी उषा एकदा
पी टी उषा एकदा महाराष्ट्रातल्या एका छोट्याश्या खेड्यात तिथल्या क्रीडांगणाचं उदघाटन करायला जाते. तिथल्या लोकांना ती खुपच जोरात धावते आणि तिनं जगात नाव कमावलय इतकंच माहित असतं. तर तिच्या स्वागताच्या वेळी ते कोणतं मराठी गाणं म्हणतील?
हम्म अनुराधाबै तेव्हा फॉर्मात
हम्म अनुराधाबै तेव्हा फॉर्मात होत्या. आशिकी, दिल है की मानता नही, लाल दुपट्टा मलमल का, मीरा का मोहन यातली गाणी तेव्हा सारखी वाजायची. आणि एक मुनमुनसेनचा चित्रपट 'बहार आने तक' यातला हिरो थोराड होता.
तुम्हाला किंग एडवर्ड आठवा
तुम्हाला किंग एडवर्ड आठवा माहीत असेलच. पण त्याने आपल्या प्रियतमेसोबत एक हिंदी गाणे म्हटले, चक्क एका अंतर्यासकट हे नसेल माहीत. ओळखा ते गाणं.
तो - तू हुस्न है मैं इश्क हूं तू मुझमें है मैं तुझमें हूं
ती - मैं इसके आगे क्या कहूं तू मुझमें है मैं तुझमें हूं
ती -हुजूर एक न एक दिन ये बात आएगी
के तख्त-ओ-ताज भला के एक कनीज भली
तो - मैं तख्तो ताज को ठुकरा के तुझको ले लुंगा
के तख्त-तो-ताज से तेरी गली की खाक भली
>>घोस्ट च्या हिंदी आवृत्तीत,
>>घोस्ट च्या हिंदी आवृत्तीत, रारॉ च होता. शिवाय शीबा, अमृता सिंग, मोहनीश बहल, अवतार गिल होते. याचीच फेमिनानीन आवृत्ती निघाली होती, त्यात जयाप्रदा आणि जितेंद्र होते.
हा जयाप्रदा आणि जितेंद्रचा चित्रपट एकदा टीव्हीवर पाहिला होता. त्यात तिच्या बाळाला व्हिलन कंपनी (ह्यात अरूणा इरानी पण होती बहुतेक) मारणार असते. मग ती एक्दम रणचंडीचा अवतार धारण करते आणि त्यांचा खातमा करते. ती फक्त त्यांच्या इमानी कुत्र्याला दिसत असते. पण मला वाटतं पिक्चरच्या शेवटी जितूबाबाला पण दिसते. मग तो रडतो वगैरे. बहुतेक ही पीडा टळली एकदाची म्हणून आनंदाने असेल कदाचित.
>>Whoopi Goldberg ला जसच्या तस फॉलो केल्याबद्दल अमृतासिंगला फिल्मफेअरही होत.
हरे रामा! अमृतासिंगला पाहून आत्मेसुध्दा पळतील.
भरत, हे गाणं मी ऐकलेलं नाही त्यामुळे उत्तर आलंच नसतं.
आर्या... हीप हीप हुर्ये...
आर्या... हीप हीप हुर्ये... यातला मीरा का मोहन सोडून मि हे सर्व चित्रपट पाहीले आहेत...
आर्या, अजुन एक चित्रपट होत
आर्या, अजुन एक चित्रपट होत "आयी मिलन कि रात"
(त्यांना तसा साप.... सॉरी शाप
असतो
. पण गाणी मात्र मस्त होती. 
यात अविनाश वाधवान आणि कुठलीतरी हिर्वीन होती.
यात हिरो दिवसा साप बनायचा तर हिर्वीन रात्रीची
लाल दुपट्टा मलमलकाची गाणी आजही आवडतात (ऐकायला) .
हीप हीप हुर्यो>>>> रामकाका,
हीप हीप हुर्यो>>>>
रामकाका, हिप हिप हुर्रे.. हुर्यो करणे हा वेगळा प्रकार आहे.
ए मला अजुन एक शिनुमा आठवला...
ए मला अजुन एक शिनुमा आठवला... त्यात ते काली तेरी चोटी है परांदा तेरा लाल नी हे गाणे होते.. तो सुमन का सुमीत आणी तारीक नावाचे हिरु होते .. हीरवीण कोण ते आठवत नाही..
सुंदर गाणी असलेला फालतु शिनुमा म्हणजे शेखर सुमन आणी रेखाचा... सांज ढले .. गगन तले वाला..
हा!!!! हा!!! हा!! बहार आने
हा!!!! हा!!! हा!!
बहार आने तक
म्हणजे ते 'काली तेरी चोटी है परांदा तेरा लाल...' रंगोली फेम गाण. हे लाव॑ल्याशिवाय रंगोली संपायच नाही. मी केलाय पातक हा चित्रपट पहायच. त्यावेळेस दुरदर्शन व्यतिरीक्त काहीही लागल की पाहील जायच त्यामुळे केबल टीव्ही सोकावलेला.
तो थोराड नट म्हणजे तारीक शाह शोमा आनंदचा नवरा.
तारीक शाह शोमा आनंदचा
तारीक शाह शोमा आनंदचा नवरा>>>>हा तोच ना जो "है अगर दुश्मन दुश्मन जमाना गम नही, कोई आये कोई हम किसीसे कम नही" या कव्वालीत ऋषी कपूरच्या मागे तुनतुना घेऊन बसलेला आहे.
जिप्सी क्या याद दिलायी!!!!
जिप्सी क्या याद दिलायी!!!! चित्रपटातली हिरविन 'शाहिन'
आई मिलन की रात. यातली गाणी एकसे एक होती.
कितने दिनो के बाद है आई सजना रात मिलन की
कसम से कसम से,ओ रब्बा कसम से
काला शाह काला
मैने किसी को दिल दे दिया..
आई मिलन की रात. यातली गाणी
आई मिलन की रात. यातली गाणी एकसे एक होती>>>>येस्स्स. मस्त गाणी :-). मी आता ते "काला शा काला" हेच गाणं आठवतं होतो.
राम उत्सव सुद्धा देखणा सिनेमा
राम
उत्सव सुद्धा देखणा सिनेमा होता. कालिदासाच चारूदत्त वसंतसेना ...
त्याकाळी तू विशिष्ट सिन साठी पाहील्यामुळे कंटाळला असशिल.
दोन्ही गाण्यांच प्रेझेंटेशन छान होत.
ती अविनाश वाधवान बरोबरची उभट चेह-याची हिरवीण म्हणजे शाहीन सायरा बानोची भाची, नंतर सुमित सहगल्शी लग्न केलेल ते फाटल. नुकतच सुमितने फराह शी केलय.
जितेंद्र जयाप्रदाचा चित्रपट 'माँ'
'बरसात मे जब आएगा सावन का महीना' यावर गाण्यावर नाचण त्याकाळी प्रत्येक शाळाकॉलेजात कंपल्सरी होत.
शिवाय सुमार गानूने गाऊन वाया घालवलेली त्याहूनही वाईट जितेंद्रने प्रेझेंट केलेली 'आइने के सौ तुकडे' नावाची गझलही त्यात होती.
काली तेरी चोटी है वाली हिरवीन
काली तेरी चोटी है वाली हिरवीन आपली म्हाभारतातली 'द्रौपदी' होती.
आई मिलन की रात च संगीत नौशादच
आई मिलन की रात च संगीत नौशादच होत.
काही वर्षांपुर्वी पडून गेलेल्या अकबर खानच्या ताजमहाल लाही त्यांच संगीत होत.
त्यातल हरी हरन च ' अपनी जुल्फे मेरे शानो पे बिखर जाने दो' ऐका. अप्रतिम आहे.
पण चित्रिकरण अगागा प्रत्येक लोकल मधे अंडवेअर मधे उभा असणारा झुल्फी सईद आणि कोणालाही माहीत नसलेली नूरजहान ची नात सोनिया जहान
दुसर एक 'मुमताज तुम्हे देखा जब ताजमहल देखा' हे गाणही चांगल आहे बहुदा पुरया धनश्री मधे बांधलय.
त्यात एक कव्वालीही चांगली झालेय.
तेरी मेहफिल मे किस्मत आजमाकर टाईप सिन.
सगळ्या मुघल राज्यांच्या आयुष्यात इतके एकसारखे प्रसंग कसे घडायचे.
पी.टी. उषा....तर तिच्या
पी.टी. उषा....तर तिच्या स्वागताच्या वेळी ते कोणतं मराठी गाणं म्हणतील?
दोन स्मरतात...पैकी जे बसेल त्याला ओके म्हणा मामी....! नसतील तर स्वप्ना सांगेलच. तिचा गाण्यांचा अभ्यास पाहून मी अवाक् झालोयं !!
१. "ही चाल तुरुतूरू, उडती केस भुरूभुरू, डाव्या डोळ्यावर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली..."
आणि
२. "उषःकाल होता होता...."
Pages