स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी सांगायचंस की. (घ्यायच्या आधी).
आज घ्यायचाच ठरवल्यामूळे शेवटी जो मिळाला तो घेतला. परवा दिराने पण ग्रेट इंडिया पॅलेस हा भला मोठ्ठा मॉल पालथा घातला तर त्याला फिलिप्स आणि अजून एक दोन मॉडेल्सच दिसले. अन त्यातही बरीच अ‍ॅटॅचमेंटस नव्हती म्हणे. मला इथे होम अ‍ॅप्लायंसेस खरेदी करायचे म्हणजे अगदी कंटाळवाणं वाटतं. प्रत्येक दुकानात एखादंच मॉडेल असतं.

सॉरी गं.. या धाग्यावर येणंच झालं नाही. Sad पण बजाजचा फुप्रो लोक त्या एका वैशिष्ट्यासाठी प्रेफर करतात म्हणजे दुकानदारच सुचवतात म्हणून विचारले.

जाने दो, तसंही माझ्याकडे स्वैपाकात नारळ खूप कमी घातला जातो. वर्षातून एखाद्या वेळी खोवायची गरज पडेल, त्यावेळी नवरा आणि दीर आहेत अ‍ॅव्हलेबल. सो नो प्रॉब्स. Happy

http://www.woot.com/ इथे आज निंजा ब्लंडर $३५ ला आहे. मी वापरलेला नाही पण बर्‍याच जणांकडून तो चांगला असल्याचं ऐकलं आहे .

आशू, नारळ खवायच्या अ‍ॅटॅचमेंटसाठी ३ हजार जास्त घालण्यापेक्षा मी तुला त्यासाठी एक सोपी उपयुक्त पद्धत सांगू का? नारळ फोडल्यावर तो करवंटीपासून विलग करायचा, त्याची काळी/चॉकलेटी पाठ सोलाण्याने खरवडून टाकून छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालून मिक्सर इंचरवर दोन - दोन सेकंदांसाठी दोन तीनवेळा फिरवायचा. छान खोबरं निघतं.

सध्या विळीच्या खवणीची धार गेल्यामुळे नारळ खोवताना तुकडे पडताहेत, तर आमची बाई हे असंच वर लिहिल्याप्रमाणे खोबरं खवून ठेवते.

घरी फुप्रोमधे नारळ खवण्याची अ‍ॅटॅचमेंट मी वापरतच नाहीये कारण त्याच्या वेगाचं आणि माझं (आणि बाईचंही) काही जमत नाहीये अजून.

बरं झालं हा बाफ दिसला..
एक प्रश्न.. आधी येऊन गेला असेल आणि उत्तर असेल तर ते दाखवलं तरी चालेल.. मी बाफ वाचलेला नाहीये आधीचा..

आमच्या घरी हल्लीच हार्ड अयोडाईज्ड की तत्सम प्रकारचा तवा घेतला आहे.. त्याला बारीक काळे डाग पडतात.. म्हणजे खूप डार्क नाही.. अगदी फेंट.. आणि ते सहज जात नाहीत... तर ते कश्याने पडत असावे ? कसे टाळावे ? कसे घालवावे ? जोरात घासलं तर चालतं का ?

पराग, हार्ड अ‍ॅनोडाईज्ड तव्याचं तापमान मला जमायला जरा वेळ लागला. त्याआधी तू म्हणतोस तसे काळे डाग पडायचे. तवा खूप तापला की तसे काळे डाग पडतात. मी metal sponge ने घासायचे, हलक्या हातने घासलेत तरी निघून जातात. तव्यावर scratches पडत नाहीत. ही भांडी dishwasher-safe नसतात.

पराग, हार्ड अ‍ॅनोडाइझ्ड भांडं आधी घासून कोमट पाण्याने धुवून घेतलं का? तवासुद्धा.
आणि हार्ड अ‍ॅनो. ला मॅक्स हीट चालत नाही. ओरखडे येऊ शकतात. तवा तापयला वेळ लागणारच. त्यामुळे गरज असेल तेव्हा आधीच १० मिनिटं तवा मध्यम आंचेवर ठेवायचा तापवायला. खूपच छान टिकतो असा वापरला की. Happy

प्रज्ञा आधी म्हणजे ? वापरायच्या आधी ?? बहूतेक नाही..
तव्यावर scratches पडत नाहीत. >>> हा मग ठिक आहे... कारण मागे मी एक कोटेड भांडं जळलं आहे असं समजून जोरजोरात घासून त्याच्यावरच कोटींग घालवलं होतं.. Proud त्यामुळे हा तवा घासायच्या आधी माहिती काढायची आहे.. !
अजून काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर सांगा..
धन्यवाद प्रज्ञा, नासा Happy

पूर्वी इथे (अमेरीकेत) calphalon चा १३ इंची गोल, प्रोफेशनल हार्ड अ‍ॅनोडाइझ्ड विथ नॉन्स्टिक कोटिंगचा तवा मिळायचा. साधारण $१०० च्या आसापास किंमत होती. अतिशय छान तवा होता. मी बरेच दिवस झाले शोधते आहे पण मिळत नाहीये. कुणाला माहित आहे का कुठे मिळेल?

आज पहिल्यांदा नविन फुप्रो वापरले. जुन्यापेक्षा आवाज जरा जास्त वाटला मला. बाकी फुप्रो वापरताना काही प्रॉब्लेम नाही जाणवला.
पण मिक्सरमध्ये धणे बारीक केले, तर मिक्सरच्या भांड्याच्या खालचे जे लॉक असते ते आणि मिक्सरचे भांडे जिथे ठवतो ते लॉक घासून चक्क तो भाग किसल्यासारखा दिसतोय. अश्या पद्धतीने तर महिन्याभरात तो पार्ट रिप्लेसच करावा लागेल, आता कस्टमर केअरला फोन करुन कंप्लेंट करतेय. बघु काय होतंय.

स्वयंपाकाची भांडी धुवायला 'डिशवॉशर' नावाचे उपकरण घ्यायचे आहे. Proud (धाग्याच्या नावात माझा प्रश्न बसवायचा होता ना).
कोणाला हल्ली कोणता चांगलाय ते माहीत असेल तर सुचवा प्लिज. 'बोश' असे एक नाव दिसले.

सुनिधी,
मला बॉश चा लहान वाटला डिशवॉशर. मला १६ चे प्लेससेटींग बसू शकेल असा हवा होता. तसेच १/२ लोड किंवा फक्त वरचा रॅक लावता येईल असा हवा होता.
मी एलजी चा घेतला. नक्की मॉडेल तुला उद्या सांगते.

हे लिहीण्याचा मुद्दा असा की तुला नक्की काय काय फंक्शन्स हवी आहेत त्याची यादी करून मगच पहायला जा!

नक्की सांग मिनोती.
मला जास्त भांडी मावायला हवीत. स्टील ची भांडी स्वच्छ निघायला हवीत. आत्ता त्या भांड्यांवर पांढरे डाग फार पडतात. आणि तु लिहिल्याप्रमाणे १/२ लोड व वरचा रॅक लावायचा पण. आवाजाचा प्रॉब्लेम नाही.

सुनिधी, पांढरे डाग हे हार्ड वॉटरमुळे पडू शकतात. तू रिन्स एजन्ट वापरत नाहीस का? इथे पार्सिपेनीत जड पाणी आहे. बरेच लोक त्यासाठी वॉटर सॉफ्नर युनिट लावून घेतात. मी घेतलं नाहीये, पण डिशवॉशरमधे (जुनं आणि साधंसंच मॉडेल आहे GEचं) रिन्स एजन्ट वापरायला लागल्यास पांढरे डाग पडेनासे झाले.

बाकी नवीन घेणारच असलीस तर मिनोतीने म्हटल्याप्रमाणे LGचे चांगले आहेत.

बर्‍याचदा रिन्स एजंट वापरूनही पांढरे डाग जात नाहीत. मध्यंतरी माझ्याकडे अतीशय वाईट पाणी येत होते, स्टीलचे ताट पांढरेशुभ्र होऊन यायचे डिशवॉशरमधून. Sad मी वॉलमार्ट मधून लेमी शाईन नावाचा प्रकार आणलाय तो एक्दम हिट आहे! स्टिलची भांडी,ताटं मस्त चमकतात! Happy सुनिधी केवळ पांढरे डाग हा प्रॉब्लेम असेल तर लेमी शाईन, रिन्स एजंट्स ट्राय कर आधी.

बस्के, मी मागवलं लग्गेच हे लेमी शाइन. धन्यवाद. Happy
(त्याच ब्रॅन्डचं काहीतरी डिटर्जन्ट अ‍ॅडिटिव्ह आणि रिन्स एजन्ट असं दिसतंय तिथे. मी तू लिंक दिलेलीच पावडर मागवली.)

हो बस्के, रुनी, Rinse agent वापरुन पाहिला पण जैसे थे! आता लेमी वापरुन पाहीन. बस्के, धन्यवाद. ही पावडर rinse agent टाकतो तिथे टाकायची ना?
LG चे वॉशर्स दुकानात जाउन पहावे म्हणते. बाकी appliances ना मॅच होण्याकरता कदाचीत नवीन घेईन, पण त्याने डागांचा प्रश्न जाईल असे वाटत नाही कारण आमच्याकडे पण सॉफ्टनर नाहिये व hard water पण आहे.

मी पण बस्के ने लिहिलेले लेमी शाईन वापरते. ग्लास वगैरे तर इतके चकचकीत निघतात कि नविन भांडी आणली आहेत अस वाटाव. Happy त्याच्याबरोबर कॅसकेडच "कंपलीट अ‍ॅक्शन पॅक" डिश डिटर्जंट वापरते. कितीही घाण झालेली भांडी अतिशय स्वच्छ निघतात.
तसच फक्त लेमी शाइन घालुन रिकाम मशीन सुरु केल तर मशीन पण एकदम स्वच्छ होते.

(मला एकदम लेमी शाईन च सेल्स rep असल्यासारख वाटायला लागलय. :P)

सुनिधीला मी रूनीसारखी (इतकी बारीऽऽक??!!) दिसले! अजून लेमी शाइन मागवलंय तर हा परिणाम! आल्यावर काय होईल! Proud

स्वाती यु आर वेल्कम!
भांडी अतिशय बेक्कार निघत होती तेव्हा खूप खूप सर्च मारला होता. कॅस्केड डिशवॉशिंग पावडर पण बेकार वाटली मला. शेवटी बरेच काँबिनेशन्स ट्राय करून फिनिशचे कॅप्सुल्स आणि लेमी शाईन पावडर हेच काँबिनेशन पर्फेक्ट आहे सध्या. सुनिधी, रिन्स एजंट्च्या इथे नाही टाकायचे लेमी शाईन, पावडर/जेल्च्याच बरोबरीने टाकायचे. फिनिश-लेमी शाईन वापरले तर मला रिन्स एजंट सुद्धा नाही लागत.
सीमा म्हटली तसंच. ग्लासेस वगैरे इतके प्रचंड चकाकतात! (आय कुडन्ट बिलिव्ह माय ओन आईज...)

स्वाती Happy
बस्के, माझी चकाकणारी भांडी आत्ता डोळ्यापुढे गरगरा नाचाय लागलीत. आणतेच आता तो लेमी शाईन. खुप्पवेळा आभार तुझे.

मला अमेरिकेत तवा घ्यायचा आहे. जवळपास २ वर्षांपूर्वी आणलेला नॉन स्टिक होता आणि त्याचं कोटींग निघेल असं वाटतं आहे आता. पण मला नवीन तवा तसा नको आहे. तो थोडा खोल झालाय वापरुन. कुठे मिळेल आणि कसा तवा योग्य राहील electric coil burners वर?

Pages