स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल नॉनस्टिक तव्यावर भाकरी करुन पाहिल्या. व्यवस्थित झाल्या. मिनोतीने सांगितल्यानुसार गॅस लहान मोठा करण्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे. Happy

लालूचा चॉपर घेतला एकदाचा. दीड कपवाला साडे बारा डॉलरला मिळाला. (बरी मिळाली का किंमत ? :D)

एवढसं भांडं आहे मग त्यात पावभाजीच्या भाज्या कशा चिरायच्या ? Uhoh

साक्षी, व्ही स्लाईसर मी अनेक वर्षे वापरतोय. तो त्या सेफ्टी होल्डरसकटच वापरायचा. पहिल्यांदा जपून वापरावा लागतो कारण तो खूप धारदार असतो. एकदा हात बसला कि झाले. कांदा, टोमॅटो, कोबी, बटाटा सगळ्यासाठीच वापरतो. तो धुण्याचे तंत्र पण नीट संभाळावे लागते.

सिंडी, एका वेळी चिरल्या जाणार नाहीत. दोन तीन वेळा टाकाव्या लागतील. पण सुटसुटीत आहे तो हँडी चॉपर एकदम. पटापट काम होतं.

कोणाला भारता मधे चान्गला water purifier माहीत आहे का? मझ्या requirements:
1. storage टाएप हवा
२. सधारन ४००० पर्यान्त असावा.
कोणाला माहीत अस्ल्यास जरूर सन्गा, अनुभव असेल तर उत्तम. माला kent star chaa bio pure सध्या टोप वर अहे...

प्राची, इन्टरनेटवर शोधलं तर इथे माहिती सापडली.
इथे
>> he CCIE showroom Manager, S Mukherji told bangalorebest.coShow pottery and jars in Khurja craftm that the process of making Khurja ceramic pottery includes baking the raw artefacts at a temperature of 1,200 degrees,and no lead is used in the manufacture to give the colour, hence it can also be used for cooking.

असं म्हटलंय.

प्राची, स्वाती
धन्यवाद, माझ्या माहितीत भर घातल्याबद्दल, खुर्जा पॉटरीबद्दल मी आधी कधी ऐकले नव्हते. आता नेटवर सगळे वाचून काढीन.

धन्यवाद स्वाती.
इकडे प्रदर्शनात मिळतायेत असली भांडी. पण ती ओरिजनल आहेत की डुप्लिकेट कळत नाही. Sad एखाद्या चांगल्या दुकानात खात्रीची मिळतील बहुतेक.

अगं मुलींनो बित्तुबंगाच्या आलू बंजारा वरून मातिच्या भांड्यांबद्द्ल आणि खुर्जा पॉटरीबद्दल चर्चा झाली होती ना. तिथे बघितलंत का ? Happy

मागे काही वर्षांपुर्वी मी रेगजीनच फोल्डींगच कपाट घेतलेल आता कुठल्या दुकानांत ते दिसत नाही कुणाला माहिती आहे का पुण्यात कुठे मीळेल.

प्राची, खुर्जा पॉटरीमध्ये अन्न शिजवता येते असं मी मागे पेपरात वाचले होते. युपीमध्ये बुलंदशहर, मेरठ च्या बाजुला आहे हे शहर.

हो मी रैनाच्या विपुमध्ये विचारलं होतं. पण खुर्जा पॉटरी अगदी गुळगुळित असल्याने त्यात मातीच्या भांड्यात शिजवल्यावर येणारा स्वाद येणार नाही असं वाटल्याने त्यात काही शिजवलं नाही.

पुढच्या महिन्यात बुलंदशहरला एक चक्कर होणार आहे,त्यावेळी खुर्जाला जावून तिथल्या त्या दादुच्या दुकानात/ फॅक्टरीमध्ये विचारून येणार आहे. थोडंसं शॉपिंग पण करायचं आहे. Happy

न म स्का र
मी ह्या धाग्याचे नियमीत वाचन करीत असते. चर्चा एन्जाय करते . नीधप प्रमाणे मलाही एक चान्गले शिलाई मशिन घ्यायचे आहे . बरनीना ह्या ब्रान्ड चे मशिन मुन्बईत मीळेल का ?
धन्यवाद !

व्ही स्लायसर मीही गेली १५ वर्षे वापरते. एकदम बेस्ट. धार अजुन जशीच्या तशी. पण दिनेशनी लिहिल्याप्रमाणे काळजी घेणे गरजेचे. मी धुताना विम लिक्विड टाकुन टुथब्रशने साफ करते स्लायसर.

बरनिनाचे मशिन मुंबईत मिळते. दादरला कबुतरखान्याजवळ शिलाई मशिनची दुकाने आहेत तिथे मी बर्निनाची अ‍ॅड पाहिलीय.

Pages