Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन कशाबद्दल?????
अभिनंदन कशाबद्दल?????
मी हा धागा वाचताना कोणी तरी
मी हा धागा वाचताना कोणी तरी सुचवलं होतं कि माजिक बुलेट छान असतं.. ह्या वेळेस थान्क्स गिव्हिंग ला लक्षात ठेवून घेतले.. पण खूप धन्स ज्यांनी लिहिले होते ड्राय वाटणासाठी पण उपयोग होतो .. आता मी धणे पावडर घरी करते.. आणि बाकी हि बरंच काही पटकन होतं खूप दिवसापासून लिहेन म्हणत होते.. खूप खूप धन्स.
दरवर्षी प्रमाणे ऐनवेळि म्हणजे
दरवर्षी प्रमाणे ऐनवेळि म्हणजे काल मला आठवले की, येत्या शनिवारी होळी आहे. मनातच पुरण पोळ्या ट्राय करायचा बेत केला. मग अचानक आठवले की, माझ्या कडे पुरणयंत्रच नाही. त्यामुळे कदाचित सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा पोळ्या रहित कराव्या लागतील. तरीही मध्ये कधि वेळ मिळाल्यास ते पुरण यंत्र घेऊन यावे असा विचार आहे. मी आजपर्यंत 'अंजली' या ब्रँडचे यंत्र पाहिले आहेत. आणखी कुठले चांगले ब्रॅडसुद्धा आहेत का?
अमि, तुझ्याकडे फुडप्रोसेसर
अमि, तुझ्याकडे फुडप्रोसेसर असेल तर त्यातही पुरण वाटता येतं, तस्मात् पुपोचा बेत रहित करू नकोस.
धन्स मंजूडी. एक शंका: फुपो
धन्स मंजूडी.
एक शंका: फुपो मध्ये वाटल्यावर ओलसर नाही रहात ना?
नंतर चटका द्यायचाच आहे ना
नंतर चटका द्यायचाच आहे ना पुरणाला. त्यामूळे ओले नाही रहाणार. (आयुष्यात एकदाच पुरणपोळ्या करूनही मी सल्ला देतेय.
)
तू चुकीच्या माणसाला प्रश्न
तू चुकीच्या माणसाला प्रश्न विचारते आहेस, पण धाडस करतेच उत्तर द्यायचं, तेही चुकीच्या बाफवर
पुरणात गूळ घातल्यावर त्यात डाव उभा राहिपर्यंत शिजवतेस ना पुरण? मग ओलसर नाही राहणार. आणि समजा राहिलंच ओलसर तर पसरट डिशमधे ठेवून १-१ मिनिट मावेत ठेव. फुप्रोचं S आकाराचं पातं असतं ते लावून पुरण वाटतात.
माझ्याकडे पुरणयंत्र होते पण
माझ्याकडे पुरणयंत्र होते पण मला ते नकोसे झालेले म्हणुन मी बाईला देऊन टाकले
मला पुरणयंत्रातुन पुरण काढायचे म्हणजे भारी कटकट वाटते.
आता पुरणपोळी करताना पुरण शिजवतानाच जरा जास्त शिजवते. आवश्यक वाटते तर मिक्सरमधुन काढते, नाही काढले तरी चालते. तसेच उचलुन पिठाची चाळण घेऊन त्यात टाकते आणि काढते जरासे दाबुन. चांगले होते अगदी बारिक. जरी पातळ वाटले तरी ताटात थोडेसे पसरुन ठेवले की सुकते.
नंतर चटका द्यायचाच आहे ना पुरणाला
हे काय असते? मी नाही देत चटका. की पोळीमधुन चटका बसणार असे म्हणायचेय?
पुरण वाटल्यानंतर त्यात गुळ /
पुरण वाटल्यानंतर त्यात गुळ / साखर घालून डाव उभा राहिपर्यंत शिजवतात ना त्याला आज्जी चटका देणं म्हणते.
अल्पना, अगं इकडे
अल्पना, अगं इकडे सर्वसाधारणपणे शिजवलेल्या डाळीत गूळ घालून ते आळेपर्यंत शिजवतात त्यात डाव उभा राहिपर्यंत... आणि मग वाटतात
ते वाटून झालं की झालं पुरण तयार.
धन्स अल्पना, साधना आणि
धन्स अल्पना, साधना आणि मंजूडि. मीही प्रयत्न करुन पाहते आता फुप्रो वापरुन.
मंजू मी एकदाच आईला विचारून
मंजू मी एकदाच आईला विचारून पुरण केलं होतं. डाळ वाटली पुरणयंत्रात. मग त्यात साखर घालून आळेपर्यंत शिजवलं.
बाकी एरवी आई नक्की कसं पुरण करायची /करते हे कधीच बघितलं नाहीये. (वर्षातून जास्तित जास्त एकदा केलं जातं पुरण आईकडे. मी चार वर्षात एकदा केलं)
. डाळ वाटली पुरणयंत्रात. मग
. डाळ वाटली पुरणयंत्रात. मग त्यात साखर घालून आळेपर्यंत शिजवलं. >> आम्ही आधी गुळ्/साखर घालुन शिजवतो आणी मग वाटतो
मी पण तसच शिजवते अनि मग
मी पण तसच शिजवते अनि मग वाटते..
mixer kinva food pro madhun..
वाटायला पुपोचे S आकाराचे
वाटायला पुपोचे S आकाराचे ब्लेड म्हणजे प्लॅस्टीकचे असते ते ना

या शनिवारी वाटीभर फुपो मधे ट्राय करेल.. सगळे नको पहिल्या ट्रायला
नीधप प्रमाणे मलाही एक चान्गले
नीधप प्रमाणे मलाही एक चान्गले शिलाई मशिन घ्यायचे आहे .<<<
मला घ्यायचे नाहीये. माझे कधीच घेऊन झालेय.
<<<<< नीधप, तु कुठचे मशिन घेतले आहेस?
वर्षा_म, प्लॅस्टिकचे नाहि
वर्षा_म, प्लॅस्टिकचे नाहि कणिक मळायला जे स्टिलचे असते तेच.
प्लॅस्टिकचे नाहि कणिक मळायला
प्लॅस्टिकचे नाहि कणिक मळायला जे स्टिलचे असते तेच. >>> अरे देवा... मी २-४ वेळेसच कणिक मळली. पण प्लॅसटीलचे वापरले...
स्टीलच्या पात्याला धार असते ना.. मग कणीक मळायला धार कशाला हवी
चण्याची डाळ मोडायला धार हवी
चण्याची डाळ मोडायला धार हवी ना? स्टीलचे वापरायचे. कणिक मळण्यासाठी प्लास्टिकचे पाते असते.
मी २-४ वेळेसच कणिक मळली. पण
मी २-४ वेळेसच कणिक मळली. पण प्लॅसटीलचे वापरले...
कणिक मळली गेली ना ???????? मग झाले
चण्याची डाळ मोडायला धार हवी
चण्याची डाळ मोडायला धार हवी ना? स्टीलचे वापरायचे. >> हे पटले

साधना
माझ्याकडे कणिक मळण्यासाठि
माझ्याकडे कणिक मळण्यासाठि बिनधारेचे स्टिलचे पात आहे आणि कापण्यासाठि वेगळे आहे. प्लॅस्टिकचे पातच नाहि माझ्याकडे....
असो काम झाल्याशी मतलब..... 
भरपुर गोंधळ आहे इथे. बहुतेक
भरपुर गोंधळ आहे इथे. बहुतेक कणिक प्लॅस्टिकच्या पात्याने व कोबी / सिमला स्टीलच्या असे असते.
फु.प्रो. नसला तरि, चटणीच्या भांड्यात शिजलेली डाळ बारिक वाटुन (डाळितले पाणी कटाच्या आमटीसाठी आधीच काढणे, नाही तर पुरण आटेपर्यंत होळी पेटवायचि वेळ येईल.) मग गॅसवर ठेवायची गुळ / साखर वा दोन्ही घालुन. छान हलवत आटवायचे. पुरण तयार.
हो तेच.. S आकाराच .. छान
हो तेच.. S आकाराच ..
छान वाटाल्या जात त्यात....
मी खेतान चा फुड प्रोसेसर
मी खेतान चा फुड प्रोसेसर घेण्याच्या विचारात आहे कुणाला खेतान फु. पो चा अनुभव आहे का? एक दुकानदार म्हटला खेतान घेऊच नका. ईनालसा १-२ ठीकाणी सजेस्ट झाल. खेतान आणी ईनालसा मध्ये सारखेच फीचर्स आहेत. दोघांचे ब्लेड मेटलचे आहेत. गीनलाईन कुठेच दिसल नाही. खेतान्/ईनालसा मध्ये नारळ वाटी खोवणे, मटार सोलणे होईल का?
समु माझ्याकडे इनाल्साचा
समु माझ्याकडे इनाल्साचा फुप्रो आहे. त्यात एक ब्लेड (कणीक मळायची) प्लास्टिकची व बाकी स्टीलची आहे. नारळ खवण्याची ब्लेड आहे. पण आम्ही ओला नारळ खवुन पाहिलेला नाही. सुकलेला नारळ छान किसला जातो.
मटार फुप्रो मध्ये सोलता येतात?
मला एक कास्ट आयर्न (बीड ?) चा
मला एक कास्ट आयर्न (बीड ?) चा कॅसेरॉल परवा मिळाला आहे.
वजन जबरदस्त आहे त्याचे.
त्यात काय काय करतात?
@ भरत आभार ईनालसा मध्ये ३ ते
@ भरत आभार
ईनालसा मध्ये ३ ते ६ प्रकार आहेत मॅक्सी, मॅक्सी प्ल्स वै. काही प्रकारात सगळे ब्लेड डिस्क मेटलचे आहेत आता त्यात नेमका कुठला घ्यायचा हे ठरवण जरा जड जात. हो ग्रीन लाईन (नाव बहुदा बरोबर लक्षात आहे माझ्या)
मधे मटार पण सोलले जातात अस ते लोक प्रदर्शनात सा.न्गत डेमोत दाखवत होते. नेट वर ईनालसाच्या साईट वर सगळी माहिती आहे पण खेतान च्या साईट वर खेतान फु.पो. ची माहिती नाही
समु माझ्याकडे इनाल्सा मॅक्सी
समु माझ्याकडे इनाल्सा मॅक्सी आहे. त्यातले ज्युसर अॅटॅचमेंट्स मात्र नाहीत.
ते मटार वगैरे फक्त
ते मटार वगैरे फक्त प्रदर्शनातच सोलून मिळतात
आपण घरी करायला गेलो की ऑम्फस होते सगळे 
माझ्याकडेही इनाल्सा मॅक्सी आहे. चांगला आहे.
मला हॅन्ड ब्लेन्डर घ्यायचा आहे. 'बोस'चा चांगला आहे असे इथेच वाचलेय. तोच घेईन मोस्टली. काही टिप्स?
Pages