सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे म्हणून माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
(मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे)
मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच. आपल्या संघाची विजयी सलामी सार्या वानखेडे मैदानाला देत असताना त्याला त्याच्या सवंगड्यांनी खांद्यावर घेऊन जी फेरी मारली तसा सन्मान क्वचितच कुठल्या खेळाडूला मिळाला असेल.
माझ्यासारखे सामान्य लोक त्याच्यावर प्रेम करतातच पण ही भावना सामान्य जनतेला त्याच्याबद्दल वाटणार्या प्रेमाचे आणि आदराचे द्योतक आहे. पण जेंव्हां त्या क्षेत्रातल्या बारकाया जाणणारे त्याचे सवंगडी त्याच्याबद्दलचे प्रेम, आदर आणि जवळीक व्यक्त करतात त्याची पातळी वेगळीच. हे दृश्य पाहून तिथे असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि दूरचित्रवाणीवर ते दृश्य पहाणार्या कोट्यावधी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल यात शंका नाहीं. हा प्रसंग सर्वांना सचिनला त्याचे सहकारी किती मान देतात हे दाखवून गेला आणि हे पहाणार्यांची हृदये गर्वाने फुगलीअसतील याची मला खात्री आहे. त्याच्या कित्येक सहकार्यांनी "आम्ही हा चषक सचिनसाठी जिंकला" असेही ठासून सांगितले.
भारताच्या राष्ट्रपती या नात्याने आपण पुढाकार घेऊन हा आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान सर्वांच्या लाडक्या सचिनला मिळवून देण्यासाठी भारत सरकारवर वजन व दबाव आणावा अशी मी आपल्याला विनंती करतो.
नमस्कार!
सुधीर काळे, जकार्ता
===================================
(ज्यांना मनापासून सचिनला भारतरत्न हा सन्मान मिळावा असे वाटते त्यांनीही अशीच साकड 'ममो' आणि 'प्रपा' यांना घालावी म्हणूनच वर त्यांचे ई-मेल पत्ते मी दिलेले आहेत.)
===================================
To:
Mrs Pratibhatai Patil
President of India
(presidentofindia@rb.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as the Head of the State should become proactive & strongly press the Government to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta
To:
Mr Man Mohan Singh,
Prime Minister of India
(pmosb@pmo.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday on the TV screen (& at Mohali earlier) is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as our Prime Minister should take lead to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta
निवडुन्ग ...........मी ते
निवडुन्ग ...........मी ते विचारले आहे............आरोप नाही केला आहे...........
आणि तुम्ही आरोप करत आहत........सचिन च्या कंपनी नी तो कर भरला आहे........जर त्याला गिफ्त मिळाली असेल तर तो का कर भरेल...? त्याने ती विकत नाही घेतली आहे...........
इथे लग्नाला जे गिफ्ट येतात त्या वर पण कर भरतात का.......? लोक जकात सुध्दा भरत नाही .........त्या वर.......
स्वतः विकत घेतली असेल तर कर भरावा..........नाही घेत्ली तर का भरावा......... उगाच कोनी गळ्यात मारली असेल तर त्या वर भरमसाठ कर त्याने का भरावा.............???????????
sumiit, खरं तर मी इथे पोस्ट
sumiit,
खरं तर मी इथे पोस्ट करणार नव्हतो, पण राहवलं नाही आपला गैरसमज पाहून.
आपल्या माहितीसाठी - गिफ्ट मिळालेल्या वस्तूवर कर भरावा लागतो. फक्त स्वता: विकत घेतली तरच भरावा, असं काही नाहिये. आपणास जर वाटत असेल की उगाच कोणी गळ्यात मारलीय, तर त्याने मान सोडवून घ्यायची ना नाकारून, कशाला विनंती अर्ज करत फिरायचे?
परत एकदा सांगतो, तुम्ही पहिल्यापासून आधीचे सर्व पोस्ट्स मन लावून वाचा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. परत परत तेच उगाळत बसायची आणि आपणा दोघांचा ही वेळ वाया घालवायची माझी इच्छा नाही.
इथून पुढे मी त्याच मुद्द्यावर बोलणार आहे, जो आधी चर्चिला गेला नाही. धन्यवाद.
गिफ्ट मिळालेल्या वस्तूवर कर
गिफ्ट मिळालेल्या वस्तूवर कर भरावा लागतो. >>>>>>>>>> मी टॅक्स मधे आहे.........त्यामुळे कोण काय करते सगळे माहीती आहे..............
या वरुनच मी बोललो........ गिफ्ट वर का लावला कर कारण काळ्या पैसाने गिफ्ट दिले जात होते.....म्हणुन त्या साठी हा कर लावला गेला...........
>>> त्याचे चाहते तेव्हा कुठे
>>> त्याचे चाहते तेव्हा कुठे होते. नेमके सचिन ला मागणी करत असताना ध्यानचंद चे चाहते पावसाळी बेडका सारखे बाहेर आले..याचा अर्थ फक्त असा होतो की हे सगळे मुर्ख माणसे आहे .. पावसाळी बेडके.. नुसते विरोध करणे हेच यांचे काम ..इतके दिवस काय गटारात लपुन होतात काय..कि विहिरीत. ?
अनुमोदन! मोरारजी देसाई, एम जी रामचंद्रन, राजीव गांधी इ. राजकारणी मंडळींना "भारतरत्न" पुरस्कार दिला गेला, तेव्हा ध्यानचंद, पी टी उषा इं. ना तो आधी द्या व नंतर राजकारण्यांना द्या अशी मागणी कोणीही केल्याचे ऐकिवात नाही. पण जेव्हा सचिनला हा पुरस्कार द्या अशी मागणी सुरू झाली तेव्हा लगेच विरोध सुरू झाला. ध्यानचंदना "भारतरत्न" द्यायची मागणी करणार्यांना तो ध्यानचंदना मिळावा असे मुळीच वाटत नाही. जर ध्यानचंदना हा पुरस्कार मिळावा असे त्यांना खरेच वाटत असते, तर, त्यांनी ही मागणी गेल्या ५० वर्षांत अनेकदा केली असती किंवा इतरांना देताना (वर उल्लेख केलेल्या राजकारण्यांना) त्यांच्याऐवजी ध्यानचंदना द्या असा आग्रह धरला असता. सचिनला "भारतरत्न" द्यायची चर्चा सुरू झाल्यावर, ध्यानचंदना तो आधी द्या अशी केवळ सचिनद्वेषामुळे यांनी मागणी सुरू केली आहे. खरं तर त्यांना ध्यानचंदना हा पुरस्कार मिळावा किंवा नाही याविषयी काहिही देणेघेणे नाही. त्यांचा केवळ तो सचिनला द्यायला विरोध आहे. त्यासाठीच ध्यानचंद यांचे नाव पुढे केले जात आहे.
जर त्याला गिफ्त मिळाली असेल
जर त्याला गिफ्त मिळाली असेल तर तो का कर भरेल...? त्याने ती विकत नाही घेतली आहे...........
--- त्याला गिफ्ट मिळालेल्या वस्तुंवर भारत सरकारने का भरावा कर?
इथे लग्नाला जे गिफ्ट येतात त्या वर पण कर भरतात का.......? लोक जकात सुध्दा भरत नाही .........त्या वर.......
--- लोकं जकात भरत नाही म्हणुन त्याने customs waiver मागावे? अनेक लोकं संपुर्ण आयुष्यात १ रुपयाचा करही चुकवत नाही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा.
स्वतः विकत घेतली असेल तर कर भरावा..........नाही घेत्ली तर का भरावा......... उगाच कोनी गळ्यात मारली असेल तर त्या वर भरमसाठ कर त्याने का भरावा.............???????????
--- त्याला कुणी जबरदस्ती केली होती गाडी घेच म्हणुन? आता त्या गाडीला रस्त्यावर चालवण्यासाठी इंधन लागणार, याच न्यायाने सरकारने इंधन पुरवण्याचा मक्ता घेतला आहे कां?
सचिनला "भारतरत्न" द्यायची
सचिनला "भारतरत्न" द्यायची चर्चा सुरू झाल्यावर, ध्यानचंदना तो आधी द्या अशी केवळ सचिनद्वेषामुळे यांनी मागणी सुरू केली आहे.
नमस्कार.
--- मास्तुरेजी
भारतरत्न देण्याबद्दल काही निकष आहेत. निवडुंग तसेच गणूजी (चाणक्य) यांनी सर्वात आधी त्याबद्दल लिहीले आहे. तो कोणत्या कार्यास मिळू शकतो यावर चर्चा झालेली आहे. त्या निकषातच सचिन बसत नाही आणि तुम्हा सर्वांचा प्रयत्न त्याला तेथेच बसवायचा असा आहे. आता ते निकषे तुम्ही / मी ठरवलेली नाहीत. जर सचिनला द्यायचे तर आधी ध्यानचंद, उषा, कपिलदेव यांचे हक्क आहेत. त्यांच्या काळात यावर चर्चा झाली नाही असेही नाही, पण आजच्यासारखे मिडीआ मॅनेज केलेले नसेल. त्यांना आजवर दिले गेलेले नाही कारण ध्यानचंद, उषा यांचे क्रिडा हे कार्यक्षेत्र भारतरत्नाच्या निकषातच बसत नाही. त्यासाठी खेलरत्न हा वेगळा पुरस्कार आहे.
निवडुंग आणि गणूजींनी जे मुद्दा उपस्थित केली आहे तो अगदी योग्य आहे http://india.gov.in/myindia/bharatratna_awards.php आणि अजुनही त्या मुद्द्याला मुद्देसुद खोडता आलेले नाही. मुद्दे संपले असतील तर मी समजतो पण भारतरत्नाला विरोध म्हणजेच सचिनद्वेष असे होत नाही हे समजावुन घ्या.
शेवटी सर्व पुरस्कारात (पद्म असो वा भारतरत्न) राजकारण असते...
ते येथे येणारच (रत्न देण्याचे श्रेय लाटणे :स्मित:) नाही असे नाही.
सर्वप्रथम - मी सचिनद्वेष्टी
सर्वप्रथम - मी सचिनद्वेष्टी नाहीय. तो महान खेळाडू आहे हे मी कधीच नाकारलं नाहिये. पण जेव्हा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची गोष्ट येते, तेव्हा हे शेअर केल्याशिवाय राहवत नाहिये.
हा बाफ भरकटत राहण्यापेक्षा सचिन च्या सर्व वादग्रस्त प्रकरणांच्या लिंक्स इथे देत आहे. ज्याने त्याने वाटेल तो बोध घ्यावा..
१. फेरारी प्रकरण -
http://www.espncricinfo.com/india/content/story/124935.html
http://articles.timesofindia.indiatimes.com/2002-09-11/mumbai/27303900_1...
http://www.espncricinfo.com/india/content/story/125234.html
http://www.atimes.com/atimes/South_Asia/DJ03Df04.html
२. फेरारी साठी मोफत इंधन -
http://timesofindia.indiatimes.com/cricket/Special-fuel-for-Sachins-Ferr...
३. Luxury Car Cess Invasion -
http://cricket.zeenews.com/fullstory.aspx?nid=27019
४. जाहिराती मधील उत्पन्न कलाकार या नावाखाली करमुक्त करण्याचा प्रयत्न -
http://ibnlive.in.com/news/taxing-times-for-sachin-gavaskar/40559-7.html
५. जिम साठी वाढीव FSI -
http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1727
आणि जर कुणास वाटत असेल की कर चुकवून ही भारतरत्न देण्यास काहीच हरकत नाही, त्यांच्यासाठी -
प्रियांका चोप्रा ला पद्म अवार्ड nomination नाकारण्यात आलं होतं कर बुडवेगिरी प्रकरणात.
http://daily.bhaskar.com/article/BIZ-NEWS-priyanka-loses-on-padma-award-...
उदय यांना अनुमोदन. शिवाय,
उदय यांना अनुमोदन.
शिवाय, समाजसेवा हा पुरस्कारासाठी निकष असू शकत नाही, त्यामुळे तो मुद्दा इथे उपस्थित करणं गैरलागू आहे.
१. भारत रत्न हा सर्वोच्च
१. भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे जो वैयक्तिक कामगिरिसाठी दिला जातो. सांघिक नाहि.क्रिकेट हे टीमवर्क आहे. सचिन जे विक्रम केले त्यात त्याला बाकिच्यांची साथ नसती तर ते झाले नसते.
२. खेळाडुला दिले जाणारे खेलरत्न हे सर्वात मोठे बहुमान आहे.
३. जर खेळाडुला भारत्रत्न देण्याचे ठरवले तर आधी ध्यानचंद, पी टी उषा, मिल्खा सिंग यांना द्यावे लागे>>>>>>>>>>> हे मुद्धे होते..............
लता मंगेश्कर यानी गाण्या व्यक्तिरिक्त काय केले..........? जर संगीतकार चांगले नसते तर.... गीतकार चांगले नसते तर............?
सत्यजीत रे यांनी चित्रपट बनवण्या व्यतिरिक्त काय केले.........?? जर कलाकार चांगले अभिनय केला नसता तर... उदा. आमिर खान याने क्रिकेट वर लगान आही अव्वल नंबर या दोन चित्रपटात काम केले......... एक आपटला आणि एक ऑस्कर ला गेला.............
डॉ. अमर्त्य सेन यांनी काय केले.......... भारता साठी विचार्तोय......??
रवी शंकर यानी संगीता व्यक्तिरिक्त काय केले...........???????
मोरारजी देसाइ यांनी काय केले.......? हाच तो ना जो मुंबई ला तोडुन गुजरात ला जोडायला बघात होता.......??????
उदय ,,,,,,,, निवडुन्ग ,,,,,,,,,,चानक्या (गणु) .............आणी बकिचे.................
आधी या प्रश्नाचे उत्तर द्या...............................?????????????
याना काय निकश लावला भारत रत्न देताना...............
त्याच बरोबर सैफ अली खान, काजोल, शाह रुख खान,,, यांनी काय केले पदम्श्री मिळाली..........???????
किमान शाह रुख खान चे समजु शकतो.........पण काजोल.........सैफ अली...........कमल हसन ???? काय केले यानी अभिनया व्यक्तिरिक्त................???????
काहिच नाही........... मग
बाकी फेरारी चे जर बोलत असाल ती त्याला मिळाली.... त्याला मिळाली.. त्या साठी त्याने अर्ज केलेला की कर माफी मिळावी............त्याने तो बुडवला नाही........हसन अली सारखा त्याने तो बुडवला नाही...........
त्याला तो नाही भरायचा होता त्याने नाही भरला.......तुम्हाला वाटले तर तुम्ही भरा ना स्वतःचा..........
घराचा एफ एस आय बाबत बोलत असाल तर त्या साठी पण अर्ज केलेला आहे..........बाकिच्यांसारखा आधी बांधुन माग अर्ज नाही केला त्याने............
आनी मी या आधी सुध्दा म्हनालो आहे........ कर वाचवणे हे कर बुडवने न्हवे.............कर वाचवण्याचा प्रयत्न सगळे करतात............ त्याने केले तर तुमच्या का पोटात दुखत आहे.... तुम्ही नाही वाचवत.........?
जर नाही वाचवत तर तो तुमचा व्यक्तिगत बाब आहे...............दुसर्याच्या व्यकतिगत बाबींवर बोट ठेवण्याचा अधिकार कोणी दिला..?????????????
तुम्ही जर प्रयत्न केला तर मी तुमच्या वर बोट ठेवेल..............मग म्हणु नका वयक्तिक घेतात आपण..........तुम्ही जे करतात ते वयक्तिक नाही???????????
तो काय तुमच्या घरी धुनी भांडी करतोय का?.............
लक्षात ठेवा........... समोर च्या वर एक बोट उचल्ताना ४ बोटे आपल्या कडे असतात.............
sumiit, जर नाही वाचवत तर तो
sumiit,
जर नाही वाचवत तर तो तुमचा व्यक्तिगत बाब आहे...............दुसर्याच्या व्यकतिगत बाबींवर बोट ठेवण्याचा अधिकार कोणी दिला..????????????? >>>>
तुम्हाला माझा मुद्दाच समजत नाहिये. आपण मी दिलेल्या सर्व लिंक्स पाहिल्या आहेत का?
कर वाचवायचा प्रयत्न करणे आणि कर बुडवणे, या गोष्टी व्यक्तिगत्/खाजगी नाहीत. सचिन च्या खाजगी आयुष्याबद्दल मी एक अक्षर तरी काढले आहे का? तुम्ही परत वाचा वाटलं तर माझे सर्व पोस्ट्स. सचिन त्याच्या घरी काय करतो याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही.
कर भरणे हे सामाजिक कर्तव्य आहे, आणि ती वैयक्तिक बाब नाहिये. तुम्ही मला सांगा, जर ती वैयक्तिक बाब असती, तर IT Department ने raids टाकणे वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा नसती का? मानवाधिकार वाले शांत बसले असते का? माझं हे म्हणणं आहे की त्याने देशाप्रती असणारी कर्तव्यपूर्ती केलेली नाही.
आपला मुद्दा काय आहे हे स्पष्ट करा आधी.
आपल्याला असं म्हणायचं आहे का - की सचिन ने कर वाचवायचे प्रयत्न केले आणि कर बुडवला तरी त्याला भारतरत्न द्यावे?
तसे जर असेल तर मी असहमत आहे या विचारास. बाकी आपणास काय वाटावे हा आपला भाग झाला.
मी सगळं स्पष्टपणे मांडलं आहे, तरी आपणास पटत नसेल तर ठीक आहे. याउपर मला काही म्हणायचं पण नाहिये.
या विषयावर खरंच हे.मा.शे.पो.
सचिनद्वेष्ट्यांच्या डोळ्यात
सचिनद्वेष्ट्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा एक लेख -
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=172228&boxid=231936416&pgno=4&...
कर भरणे हे सामाजिक कर्तव्य
कर भरणे हे सामाजिक कर्तव्य आहे, आणि ती वैयक्तिक बाब नाहिये. तुम्ही मला सांगा, जर ती वैयक्तिक बाब असती, तर IT Department ने raids टाकणे वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा नसती का? मानवाधिकार वाले शांत बसले असते का? माझं हे म्हणणं आहे की त्याने देशाप्रती असणारी कर्तव्यपूर्ती केलेली नाही>>>>>>>>>>>
आता पर्यंत किती कर बुडव्यान विरुध्द आपण गळा काढला आहे.......? राजकिय नेते...अभिनेते ( यात बच्चन पण येतो.. ) हसन अली ........ यांच्या विरुध्द आपण किती आणि कुठे काय लिहिले आहे........?????
जावा .............. आधि त्यांच्या विरुध्द गळा काढा .................मगच इथे या.............
तुम्हाला कोणी सांगीतले की तुम्म्ही सचिन वर काही बोला.......इन्कम टॅक्स वाले काय ते बघुन घेतील.........ते त्यांचे काम आहे ....... आपले नाही..... त्याने भरला किंवा नाही भरला ......त्यात तुमचे काय गेले.......?
समजा गेले आहे काही........... मग इतरांनी कर बुडवला तर किति गेले तुमचे................???????
तरीच म्हटल हा धागा कुठे
तरीच म्हटल हा धागा कुठे हरवला... काल तीन तीन धागे होते... एक मेला बिच्चारा...
सुमितभौ.... जरा तुमची गल्ली चुकाय लागल्या... म्हणुन फिरुन फिरुन तिथच येताय . निवडुंग बिचारा थकला राव... हात टेकले त्याने... जरा पैल्यापास्न वाच्त या म्हणजे तुमाला नेमकं उमगल.
मास्तुरे, आख्या मायबोलीवर सचिन द्वेष्टे कोण असल अस मला तरी वाटत नाय... जर तुमाला पटत नसल तर एक पोल (सर्वे) घेउन टाका... मग बघु 'सचिन द्वेष्टे' हा श्ब्द इथे वापरायचा कि नाही ते...
रच्याकने, पुढारीच एव्ढ मनावर घेत जाउ नका बरं.... आणि विश्वसंचार तर मुळीच नको ...
वर मी काही प्रश्न लिहीले
वर मी काही प्रश्न लिहीले आहेत.............
किमान त्याची कोणी उत्तरे देतील का................??????
जर नसतील देता येत तर ......... फाजुल चर्चा करत बसु नका............
सुमित भौ तुमी साळ्त जात हुता
सुमित भौ तुमी साळ्त जात हुता तवा पुस्तकाची पान पलटत होता कि नाय मागचा धडा वाचायला... तस जरा माग जावा तिथ सगळी उत्तर हैती. जरा पुढ मागं शोधा .. (काय नुसतं नवनित / २१ अपेक्षीत वाचुन पास झालाय्सा)
चाणक्य (डोम्बलाचा) (गणु चा
चाणक्य (डोम्बलाचा) (गणु चा डुआय)............ >>>.
धन्यवाद . तुमची अक्कल समजली. डुआय म्हणे
मीच माझे निक नेम बदलुन चाणक्य ठेवलेय. डुआय म्हणजे काय हे समजुन घ्या आधी. तुम्हाला जर डुआय कशाला म्हणतात हे माहित नसेल तर माबोवर येत जाउ नका 
आधि त्यांच्या विरुध्द गळा काढा .................मगच इथे या............. >>> त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करा मग काढ्तो त्यांच्याविरुद्ध गळा.
वर मी काही प्रश्न लिहीले
वर मी काही प्रश्न लिहीले आहेत.............
किमान त्याची कोणी उत्तरे देतील का................??????
वाचता येते का तुम्हाला ?
वर मी काही प्रश्न लिहीले
वर मी काही प्रश्न लिहीले आहेत.............
किमान त्याची कोणी उत्तरे देतील का................??????
ज्या प्रमाणे सचिन कोणते रेकॉर्ड तोडायचे बाकी राहिले आहे, हे बघुन मैदानावर ते तोडण्यासाठी येतो त्याच प्रमाणे समस्त भक्त मंडळी त्याला कोणता पुरस्कार अजुन मिळालेला नाही आहे हे शोधतांत आणि मग मायबोलीवर त्याला तो मिळायलाच हवा म्हणुन हट्ट धरतात....
----- सर्वांना (सचिन द्वेष्टांना !) तुम्ही अगदी निरुत्तर केलेले आहे. केवळ तुमच्या युक्तीवादापुढे माझी माघार
व्याख्येची गुलामी झुगारायची आहे ? मग परमविर चक्राचा पण आग्रह धरा... त्यांचे नियम किंवा निकषे गेली खड्ड्यात. त्याने देशासाठी किती तरी युद्धे जिंकलेली आहेत. मला भक्त मंडळींना सचिन थोर आहे हे पटवण्यासाठी पुढारी सारख्या दैनिकाचा आधार घ्यावा लागावा
हे बघुन दु:ख झाले.
मला हा धागा सुरु करणार्या श्री काळे यांचे मत वाचायला आवडेल. त्यांना भारतरत्न किताब कोणाला मिळतो, ते देण्याचे निकषे काय असतांत हे पत्र लिहीण्यापुर्वी माहित होते कां?
व्याख्ये मधे काय आहे ? मग
व्याख्ये मधे काय आहे ? मग परमविर चक्र, अशोक चक्र यांचा पण आग्रह धरा... त्यांचे नियम किंवा निकषे गेली खड्ड्यात. >>>>>>
फक्त देशीच का? इदेशी पण पाहिजे राव! त्याशिवाय काहि मजा नाहि गड्या.

नोबेल पण मिळालेच पाहिजे सचिनला. सध्या खेळासाठी नोबेल देत नाहित पण सचिनला द्या ते! औस्कर पण द्या. ते पण खेळासाठी देत नाहित सध्या म्हणुन काय झाले. तसेच बुकर पण द्या त्याला आणी मेगसेसे पण ! बदल करु की त्यात!
उदय, अनुमोदन. मास्तुरेजी, मी
उदय,
अनुमोदन.
मास्तुरेजी,
मी सचिन द्वेष्टी नाही हे आधीच स्पष्ट केलेलं आहे, पण जिथे तो चुकलाय तिथे तो खरंचंच चुकलाय, आणि म्हणून भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारासाठी मागणी करताना सर्व गोष्टींचा विचार केला जावा एवढंच माझं म्हणणं आहे.
मला हा धागा सुरु करणार्या श्री काळे यांचे मत वाचायला आवडेल. त्यांना भारतरत्न किताब कोणाला मिळतो, ते देण्याचे निकषे काय असतांत हे पत्र लिहीण्यापुर्वी माहित होते कां? >>>>
एवढा उहापोह झाल्यानंतर मलाही श्री. काळे यांचे याबाबत मत वाचायला आवडेल. बर्याच प्रथितयश दैनिकांत आणि नियतकालिकांत त्यांनी लिखाण केलेले आहे, सकाळ या वृत्तपत्रासाठी पण ते लिहितात. त्यांचं याबाबत मत काय आहे? एवढ्या सगळ्या चर्चेनंतर अजूनही ते पुरस्कारासाठी आग्रही आहेत का? असल्यास त्यांचे काय विचार आहेत ते त्यांनी इथे मांडावेत.
धन्यवाद.
बास करा की आता. किती तो तोंड
बास करा की आता. किती तो तोंड फुटेस्तोवर वाद घालता. तो सचिन तुम्हाला ढुंकुनही विचारणार नाहीये. त्याला उद्या भारतरत्न मिळाला म्हणून तो मायबोलीवर येऊन आभार पण मानणार नाहीये आणि नाही दिला म्हणून तो येऊन शिव्या पण देणार नाहीये.
स्पष्ट बोलते त्याबद्दल माफी असावी.
तुमच्यापैकी एकाच्या तरी मताला या सर्व विषयात काडीची तरी किंमत आहे का. का उगाच किबोर्ड बडवून पानंच्या पानं भरताय. काहींना वाटतो त्याला मिळावासा काहींना नाही वाटतो. पुढे काय
या सर्व अंतहीन बडबडीला भारतरत्न समितीच्या लेखी शून्य किंमत आहे. हे सत्य कृपया आपल्या डोक्यात ठसवून घ्या.
रितू, सर्व पोस्टस
रितू,
सर्व पोस्टस वाचल्याबद्दल आणि आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभार.
इथे मत प्रदर्शन करणार्या कुणाच्याच मताला किंमत नाही, आणि आपलं मत तेवढं किमतीचं आहे नाही का? आपल्या मते मग भारतातील इतर नागरिकांनी विचार करणे आणि मत प्रदर्शन करणे सोडून दिले पाहिजे, कारण त्यांच्या मताला काही किंमत नाहीये.
आपणास काही मुद्दे मांडायचे असतील तर आपले स्वागत आहे, आणि ही अंतहीन बडबड वाटत असेल आपणास, तर इथे प्रतिसाद द्यायची ही काही गरज नाहीये. आपण आपली मते दुसर्या बाफ वर मांडा, जिथे त्याची किंमत असेल.
धन्यवाद.
प्रतिसाद देणार नव्हते पण
प्रतिसाद देणार नव्हते पण रहावलं नाही...
>>> पण जिथे तो चुकलाय तिथे
>>> पण जिथे तो चुकलाय तिथे तो खरंचंच चुकलाय, आणि म्हणून भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारासाठी मागणी करताना सर्व गोष्टींचा विचार केला जावा एवढंच माझं म्हणणं आहे.
सचिनच्या तुलनेत कमी कर्तृत्व असलेल्या व सचिनच्या तथाकथित चुकांच्या तुलनेत अनेक गंभीर चुका केलेल्या काही जणांची नावे आतापर्यंत "भारतरत्न" मिळालेल्यांच्या यादीत आहेत. जर "भारतरत्न" साठी एखादी सर्व चौसष्ट कलागुणसंपन्न व्यक्ती हवी असेल, तर, माझ्या मते, अशी व्यक्ती सापडणे अवघड आहे. सचिनद्वेषामुळे ज्यांना सचिनला "भारतरत्न" द्यायला विरोध करायचा आहे त्यांना तो करू देत. पण सचिनच्या तथाकथित चुकांमुळे तो ह्या पुरस्कारास पात्र नाही असे म्हणणे योग्य वाटत नाही.
निवडुंग - तुम्ही व्यक्तिश: सचिनद्वेषी नाही हे वाचून आनंद झाला. पण सचिनला भारतरत्न द्यायला विरोध करणारे इतर काही सचिनद्वेष्टे इथे त्याची संदर्भहीन टिंगलटवाळी करत आहेत.
पण सचिनला भारतरत्न द्यायला
पण सचिनला भारतरत्न द्यायला विरोध करणारे इतर काही सचिनद्वेष्टे इथे त्याची संदर्भहीन टिंगलटवाळी करत आहेत.
---- संदर्भहीन कसे काय? तुम्हीच दैनिक पुढारी मधे आलेला 'व्याख्येची गुलामी झुगारा' असा काहिसा संदर्भहीन लेखाचे समर्थन करत आहात.
सचिनच्या तुलनेत कमी कर्तृत्व असलेल्या व सचिनच्या तथाकथित चुकांच्या तुलनेत अनेक गंभीर चुका केलेल्या काही जणांची नावे आतापर्यंत "भारतरत्न" मिळालेल्यांच्या यादीत आहेत.
--- असे असेल तर मग तुम्ही भक्त मंडळी सचिनला त्या कमी कर्तुत्व असणार्या व्यक्तींच्या रांगेत बसवण्याचा का हट्ट धरत आहात? त्याने त्याची कुठली उंची वाढणार आहे?
सचिनच्या तुलनेत कमी कर्तृत्व
सचिनच्या तुलनेत कमी कर्तृत्व असलेल्या व सचिनच्या तथाकथित चुकांच्या तुलनेत अनेक गंभीर चुका केलेल्या काही जणांची नावे आतापर्यंत "भारतरत्न" मिळालेल्यांच्या यादीत आहेत >>> मास्तुरे, अहो मास्तुरे, मग ज्या चुका झाल्या त्या आता होउ नयेत म्हणुन प्रयत्न करायचे का, पुर्वीच्या चुका उगाळत बसायच्या ? तुमच्या विद्यार्थ्यांना हेच त्याच त्याच चुका करायला सांगता असे दिसते तुम्हि.
पण सचिनला भारतरत्न द्यायला विरोध करणारे इतर काही सचिनद्वेष्टे इथे त्याची संदर्भहीन टिंगलटवाळी करत आहेत. >>>
सचिनच्या क्रिकेट कारकिर्दिबद्दल एकाहि माणसाने इथे टवाळी केलेली नाहि. क्रिकेट सोडुनही सचिनची टवाळी नाहि. जे बावळटासारखे त्याला भारतरत्न द्या म्हणतात त्यांची टवाळी केली आहे :फिदी:. सचिनला भारतरत्न देउ नका म्हणणारा सचिनद्वेष्टा कसा ठरतो बुवा !
जर "भारतरत्न" साठी एखादी सर्व चौसष्ट कलागुणसंपन्न व्यक्ती हवी असेल, तर, माझ्या मते, अशी व्यक्ती सापडणे अवघड आहे. >>> मास्तुरे म्हणुनच तुम्हाला भारतरत्न कोणाला द्यावे हे समजत नाहि हे जे मी म्हणले ते यासाठीच.
अहो भारतरत्नासाठी चौसष्ट कलागुणसंपन्न व्यक्तीचा काय उपयोग ? जरा वाचा घटनेत भारतरत्नाला लायक असण्याचे काय व्याख्या आहे ती.
>>> एवढा उहापोह झाल्यानंतर
>>> एवढा उहापोह झाल्यानंतर मलाही श्री. काळे यांचे याबाबत मत वाचायला आवडेल.
श्री. सुधीर काळे यांनी राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पत्र पाठवून सचिनला "भारतरत्न" हा पुरस्कार देण्यात यावा अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांचे मत स्पष्ट दिसत आहे. सचिन हा या पुरस्कारासाठी सर्वार्थाने योग्य असून त्याला हा पुरस्कार मिळावा असे बहुसंख्य भारतीयांना वाटते. तसेच श्री. काळे यांनाही वाटत आहे असे वरील पत्रांवरून दिसून येते. अर्थात त्यांचे मत बदलले असल्यास तसे त्यांनी लिहावे.
सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे
सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे कि BCCI भारताला representच करत नाहि. सचिन BCCI साठी खेळतो. त्यामुळे जो खेळाडु भारतासाठी खेळतच नाहि त्याला कसले भारतरत्न देताय ?
हाहाहाहा, मी विचारच करत होतो
हाहाहाहा, मी विचारच करत होतो अजुन हा मुद्दा कुणी कसा नाही आणला...
गणू तुझी चिकाटी जबरदस्त आहे...
आपलेपण लोक येडे आहेत....च्यामारी हा विश्वचषक बीसीसीआयने जिंकला आणि उगाच भारत जिंकला भारत जिंकला करत नाचत सुटलेत...
कधी (गणूसारखे) शहाणे होणार देव जाणे...:)
आपलेपण लोक येडे आहेत... >>>
आपलेपण लोक येडे आहेत... >>> आत्ता कळले होय तुला ! धन्य आहे!
Pages