सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे!

Submitted by sudhirkale42 on 3 April, 2011 - 12:42

सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे म्हणून माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
(मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे)
मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच. आपल्या संघाची विजयी सलामी सार्‍या वानखेडे मैदानाला देत असताना त्याला त्याच्या सवंगड्यांनी खांद्यावर घेऊन जी फेरी मारली तसा सन्मान क्वचितच कुठल्या खेळाडूला मिळाला असेल.
माझ्यासारखे सामान्य लोक त्याच्यावर प्रेम करतातच पण ही भावना सामान्य जनतेला त्याच्याबद्दल वाटणार्‍या प्रेमाचे आणि आदराचे द्योतक आहे. पण जेंव्हां त्या क्षेत्रातल्या बारकाया जाणणारे त्याचे सवंगडी त्याच्याबद्दलचे प्रेम, आदर आणि जवळीक व्यक्त करतात त्याची पातळी वेगळीच. हे दृश्य पाहून तिथे असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि दूरचित्रवाणीवर ते दृश्य पहाणार्‍या कोट्यावधी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल यात शंका नाहीं. हा प्रसंग सर्वांना सचिनला त्याचे सहकारी किती मान देतात हे दाखवून गेला आणि हे पहाणार्‍यांची हृदये गर्वाने फुगलीअसतील याची मला खात्री आहे. त्याच्या कित्येक सहकार्‍यांनी "आम्ही हा चषक सचिनसाठी जिंकला" असेही ठासून सांगितले.
भारताच्या राष्ट्रपती या नात्याने आपण पुढाकार घेऊन हा आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान सर्वांच्या लाडक्या सचिनला मिळवून देण्यासाठी भारत सरकारवर वजन व दबाव आणावा अशी मी आपल्याला विनंती करतो.
नमस्कार!
सुधीर काळे, जकार्ता
===================================
(ज्यांना मनापासून सचिनला भारतरत्न हा सन्मान मिळावा असे वाटते त्यांनीही अशीच साकड 'ममो' आणि 'प्रपा' यांना घालावी म्हणूनच वर त्यांचे ई-मेल पत्ते मी दिलेले आहेत.)
===================================

To:
Mrs Pratibhatai Patil
President of India
(presidentofindia@rb.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as the Head of the State should become proactive & strongly press the Government to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

To:
Mr Man Mohan Singh,
Prime Minister of India
(pmosb@pmo.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday on the TV screen (& at Mohali earlier) is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as our Prime Minister should take lead to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चातक-जी,
मी लिहिले होते पण ते न उठल्याचे पाहिले नव्हते.
आता लिहून लेख पुन्हा पोस्ट केला आहे.
धन्यवाद,
काळे

'आभारी' काळे साहेब..!
हा 'निरोप' पाठ्वुन आपण खरंच एक प्रकारे 'कर्तव्यच' निभावत आहात.

(आता तर भारत सरकारला हे विनाविनंती समजायला हवे, ज्या प्रकारे संघाने कामगीरी केली आहे.)

भारत रत्न सचिन तेंडुलकर... मिळणार आहे हे नक्की, प्रश्न कधी मिळणार हाच आहे ? विश्वचषक जिंकल्याची वेळ सर्वात योग्य आहे किंवा अजुन दोन कसोटी शतके थांबावे?

सचिन अजून खेळतो आहे. अजूनही काही टप्पे तो गाठणार आहे. तो निवृत्त होईल त्याचे पुढचे वर्षी द्यावे असे मत आहे.भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे त्यापलिकडे काही नाही.खेळ्ताना दिल्यास प्रोटोकॉलचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. उदा. काल मैदानावरच सचिनने शॅम्पेनचा आस्वाद घेतला. आम्बेडकर, महर्षी कर्वे , महामहोपाध्याय काणे, लताजी, अशा व्यकतीच्या तोडीच्या व्यक्तीला असे वागणे शोभणार नाही. खेळाडू म्हणून मात्र तो ते एन्जॉय करू शकेल. स्वत; सचिनने अनेक विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेट खेळत असेपर्यन्त स्वीकारायच्या नाहीत असे जाहीर केले आहे....

बाळू जोशी >> बरोबर. क्रिकेट खेळण्या व्यतिरिक्त त्याने देशाकरीता काही विधायक काम केले तर ..

अटलजीना देण्याऐवजी अडवानीजींना द्यावा. त्यानी बाबरी उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे...

मग भारतरत्न लताबाईंनी गाण्याव्यतीरिक्त आणखी कुठली विधायक कामे केली आहेत?

बी, त्या क्शेत्रातल्या सर्वोत्तम कामगिरीबरोबर इतर क्षेत्रातही मुलुखगिरी करायलाच हवी का? सुयोग, सचिनने इतर क्षेत्रात विधायक काम केलेच पाहिजे असे मी सूचित केले नाही. फक्त त्याचे कर्त्रुत्व सुफल सम्पूर्ण झाल्यावर त्याला द्यावे एवढेच मला म्हनायचे आहे. तरी बहुधा ह्या २६ जाने. ला न्म्बर लागेल असे वाटते. प्रतिभातई ही आहेत ...

काही वादविवाद उत्पन्न होण्यापुर्वी, मी स्पष्ट करु इच्छीतो की सचिन हा एक महान खेळाडू आहे. त्याने केलेले विक्रम निश्चितच उच्च पातळीचे आहेत.

आता भारतरत्न पुरस्काराबद्दल थोडेसे - ही माहिती भारत सरकारच्या संकेतस्थळावरून घेतलीय. (http://india.gov.in/myindia/bharatratna_awards.php)

Bharat Ratna is the highest civilian honour, given for exceptional service towards advancement of Art, Literature and Science, and in recognition of Public Service of the highest order.

या पुरस्काराच्या परिघात क्रीडा क्षेत्राचा कुठेच उल्लेख नाहिये. त्यामुळे सचिन ह्या पुरस्काराला पात्र ठरू शकतो की नाही हाच मूलभूत प्रश्न आहे.

लतादिदींनी काही विधायक काम केले नसेल ही, पण कलेच्या क्षेत्रात त्यांची कामगिरी वादातीत आहे.

भावना समजल्या. पण सचिनला भारतरत्न देण्याची आवशकता नाहि. अनेक कारणे आहेत.

१. भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे जो वैयक्तिक कामगिरिसाठी दिला जातो. सांघिक नाहि.क्रिकेट हे टीमवर्क आहे. सचिन जे विक्रम केले त्यात त्याला बाकिच्यांची साथ नसती तर ते झाले नसते.
२. खेळाडुला दिले जाणारे खेलरत्न हे सर्वात मोठे बहुमान आहे.
३. जर खेळाडुला भारत्रत्न देण्याचे ठरवले तर आधी ध्यानचंद, पी टी उषा, मिल्खा सिंग यांना द्यावे लागेल

आता तसेहि भारत रत्न हे पण राजकारण करुन दिले जाते. त्यामुळे त्याची dignity कधीच गेलि आहे.

मन्दार.... Rofl

भारताच्या विकासात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल तसेच पहिले संपूर्ण गैरकाँग्रेसी सरकार चालवून भारतिय लोकशाहीबद्दलचा विश्वास बळकट केल्याबद्दल वाजपेयींना हा पुरस्कार द्यायला हरकत नसावी. ( मी भाजपाचा मतदार नाही हे आवर्जून नमूद करतोय..).

काँग्रेसची खिलाडुवृत्तीही दिसून येईल यातून..

बाजोंशी सहमत. सचिनला द्यावेच, पण निवृत्त झाल्यावर. आशा आहे की ते एवढ्यात नाही Happy

निवडुंग - त्यात क्रीडा नसेल कारण त्यात कधी कोणाला द्यायची वेळ येइल असे तेव्हा वाटले नसेल Happy जोक्स अपार्ट, कला आणि साहित्य क्षेत्र असेल तर क्रीडा नसणे हे केवळ नजरचुकीने असावे.

गणू. - सांघिक कामगिरीचा मुद्दा बरोबर आहे. पण गेली २१-२२ वर्षे सचिन ने भारतीयांना दिलेला आनंद त्याला त्या योग्यतेचा बनवू शकतो. मैदानावरची कामगिरी हा एवढाच एक निकष यात नाही (त्यात कपिल सुद्धा लायक असावा, तसेच उषा, ध्यानचंद ई.), सचिन चे योगदान त्याच्यापलिकडचे, आपल्यासारख्यांना शब्दात न पकडता येण्यासारखे वाटते.

त्यांचेहि कार्य सुफल सम्पूर्ण व्हायचे आहे.>>> Uhoh म्हणजे स्वर्गवासी झाल्यानंतर...? तेव्हा तर भेटणारच कुणी मागीतला नाही तरी भेटणार.

पवारांना भूमीरत्न सोबत खेलरत्न पण दिला गेला पाहिजे. हातात कधी बॅट ही न धरता ते क्रिकेट जगाचे बादशाह झालेत. साखररत्न पण आहेच एवढं कमी पडलं तर..

सचिन चे योगदान त्याच्यापलिकडचे, आपल्यासारख्यांना शब्दात न पकडता येण्यासारखे वाटते. >>>>

म्हणुनच म्हणले कि भावना समजल्या. अशाच भावना त्या काळात ध्यानचंद बद्द्ल होत्या. दुर्देवाने उषा बद्द्ल नव्हत्या कारण तो पर्यत क्रिकेटने सर्व खेळ खाउन टाकले होते.

सांघिक कामगिरीचा मुद्दा बरोबरच आहे. केवळ सचिनला भारतरत्न देणे हा त्याच्या बरोबर खेळलेल्यांचा कामाकडे दुर्ल़क्ष केल्यासारखे आहे.

कला आणि साहित्य क्षेत्र असेल तर क्रीडा नसणे हे केवळ नजरचुकीने असावे. >>>
नजरचुकीने नाहि. आणी म्हणुनच आजपर्यत कोणत्याही खेळाडुला हा सन्मान दिला गेला नाहि. खेळासाठी खेलरत्न म्हणूनच निर्माण केले.

मलाही गणूचे मुद्दे पटलेत. वेगळ्या कोनातून विचार केलाय गणूनी.
---- गणू यांनी रास्त मुद्दा मांडलेला आहे.

@गणू,
मुद्दे अगदी पटेश.. Happy

भावना आणि पुरस्काराची पात्रता यात गल्लत होउ नये असं वाटतं.

सचिनला भारतरत्न योग्य वेळी मिळेलच याची खात्री आहे.
करोडो भारतीयांना आनंदाचे हजारो क्षण मिळवून देणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर (भले मग ते क्रिकेट खेळणारे दहा देश असतील) आपल्या कामगिरीने लोकप्रियता मिळवणे आणि स्वतःच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान पटकवणे (क्रिकेट हा सांघिक खेळ असला तरी त्यातल्या वैयक्तिक कामगिरीची नोंद ठेवली जातेच ना? नाहीतर प्रत्येक खेळाडूच्या नावावर धावा/बळी का नोंदवले असते, संघाच्याच नावे नोंदवायचे, स्कोररला पण काम कमी Happy ) या गोष्टी पुरेशा आहेत.

पी टी उषाची कामगिरी क्रिकेटने खाऊन टाकली म्हणणे योग्य नाही. जर ऑलिंपिकमध्ये तिचे मेडल हुकले नसते तर आज जशी शुटिंगची लाट आहे तशी अ‍ॅथलेटिक्सची येऊ शकली असती.

Pages