सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे!

Submitted by sudhirkale42 on 3 April, 2011 - 12:42

सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे म्हणून माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
(मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे)
मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच. आपल्या संघाची विजयी सलामी सार्‍या वानखेडे मैदानाला देत असताना त्याला त्याच्या सवंगड्यांनी खांद्यावर घेऊन जी फेरी मारली तसा सन्मान क्वचितच कुठल्या खेळाडूला मिळाला असेल.
माझ्यासारखे सामान्य लोक त्याच्यावर प्रेम करतातच पण ही भावना सामान्य जनतेला त्याच्याबद्दल वाटणार्‍या प्रेमाचे आणि आदराचे द्योतक आहे. पण जेंव्हां त्या क्षेत्रातल्या बारकाया जाणणारे त्याचे सवंगडी त्याच्याबद्दलचे प्रेम, आदर आणि जवळीक व्यक्त करतात त्याची पातळी वेगळीच. हे दृश्य पाहून तिथे असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि दूरचित्रवाणीवर ते दृश्य पहाणार्‍या कोट्यावधी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल यात शंका नाहीं. हा प्रसंग सर्वांना सचिनला त्याचे सहकारी किती मान देतात हे दाखवून गेला आणि हे पहाणार्‍यांची हृदये गर्वाने फुगलीअसतील याची मला खात्री आहे. त्याच्या कित्येक सहकार्‍यांनी "आम्ही हा चषक सचिनसाठी जिंकला" असेही ठासून सांगितले.
भारताच्या राष्ट्रपती या नात्याने आपण पुढाकार घेऊन हा आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान सर्वांच्या लाडक्या सचिनला मिळवून देण्यासाठी भारत सरकारवर वजन व दबाव आणावा अशी मी आपल्याला विनंती करतो.
नमस्कार!
सुधीर काळे, जकार्ता
===================================
(ज्यांना मनापासून सचिनला भारतरत्न हा सन्मान मिळावा असे वाटते त्यांनीही अशीच साकड 'ममो' आणि 'प्रपा' यांना घालावी म्हणूनच वर त्यांचे ई-मेल पत्ते मी दिलेले आहेत.)
===================================

To:
Mrs Pratibhatai Patil
President of India
(presidentofindia@rb.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as the Head of the State should become proactive & strongly press the Government to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

To:
Mr Man Mohan Singh,
Prime Minister of India
(pmosb@pmo.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday on the TV screen (& at Mohali earlier) is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as our Prime Minister should take lead to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'आंतरराष्ट्रीय' पातळीवर जेव्हा "रिकॉर्ड" म्हणुन उल्लेख होतो तेव्हा सचिनमुळे "राष्ट्र: "भारत"" असे नाव लागते >>>

हा मुद्दा भारतरत्नासाठी ? अहो मग जवळजवळ ६००/७०० तरी भारतरत्न द्यायला लागतील आता! Proud

सचिनला भारतरत्न किंवा इतर कोणताही सन्मान दिला किंवा नाही दिला तरी त्याला किंवा त्याच्या चाहत्यांना काही फरक पडेल असे वाटत नाही >>
अहो मग मास्तुरे एवढे जीव तोडुन का लिहिताय मग ? Wink

"भारतरत्न" प्राप्त व्यक्ति.

१. १९५४ - डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन (५ सितंबर, १८८८ – १७ अप्रैल, १९७५)
२. १९५४ - चक्रवर्ती राजगोपालाचारी (१० दिसंबर, १८७८ - २५ दिसंबर, १९७२)
३. १९५४ - डॉक्टर चन्‍द्रशेखर वेंकटरमण (७ नवंबर, १८८८ - २१ नवंबर, १९७०)
४. १९५५ - डॉक्टर भगवान दास (१२ जनवरी, १८६९ - १८ सितंबर, १९५८)
५. १९५५ - सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१५ सितंबर, १८६० - १२ अप्रैल, १९६२)
६. १९५५ - पं. जवाहर लाल नेहरु (१४ नवंबर, १८८९ - २७ मई, १९६४)
७. १९५७ - गोविंद वल्लभ पंत (१० सितंबर, १८८७ - ७ मार्च, १९६१)
८. १९५८ - डॉ. धोंडो केशव कर्वे (१८ अप्रैल , १८५८ – ९ नवंबर, १९६२)
९. १९६१ - डॉ. बिधन चंद्र रॉय (१ जुलाई, १८८२ - १ जुलाई, १९६२)
१०. १९६१ - पुरूषोत्तम दास टंडन (१ अगस्त, १८८२ - १ जुलाई, १९६२)
११. १९६२ - डॉ. राजेंद्र प्रसाद (३ दिसंबर, १८८४ - २८ फरवरी, १९६३)
१२. १९६३ - डॉ. जाकिर हुसैन (८ फरवरी, १८९७ - ३ मई, १९६९)
१३. १९६३ - डॉ. पांडुरंग वामन काणे (१८८०-१९७२)
१४. १९६६ - लाल बहादुर शास्त्री (२ अक्तूबर, १९०४ - ११ जनवरी, १९६६), मरणोपरान्त
१५. १९७१ - इंदिरा गाँधी (१९ नवंबर, १९१७ - ३१ अक्तूबर, १९८४)
१६. १९७५ - वराहगिरी वेंकट गिरी (१० अगस्त, १८९४ - २३ जून, १९८०)
१७. १९७६ - के. कामराज (१५ जुलाई, १९०३ - १९७५), मरणोपरान्त
१८. १९८० - मदर टेरेसा (२७ अगस्त, १९१० - ५ सितंबर, १९९७)
१९. १९८३ - आचार्य विनोबा भावे (११ सितंबर, १८९५ - १५ नवंबर, १९८२), मरणोपरान्त
२०. १९८७ - खान अब्दुल गफ्फार खान (१८९० - २० जनवरी, १९८८), प्रथम गैर-भारतीय
२१. १९८८ - एम जी आर (१७ जनवरी, १९१७ - २४ दिसंबर, १९८७), मरणोपरान्त
२२. १९९० - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ अप्रैल, १९८१ - ६ दिसंबर, १९५६), मरणोपरान्त
२३. १९९० - नेल्सन मंडेला (१८ जुलाई, १९१८), द्वितीय गैर-भारतीय
२४. १९९१ - राजीव गांधी (२० अगस्त, १९४४ - २१ मई, १९९१), मरणोपरान्त
२५. १९९१ - सरदार वल्लभ भाई पटेल (३१ अक्तूबर, १८७५ - १५ दिसंबर, १९५०), मरणोपरान्त
२६. १९९१ - मोरारजी देसाई (२९ फरवरी, १८९६ - १० अप्रैल, १९९५)
२७. १९९२ - मौलाना अबुल कलाम आज़ाद (११ नवंबर, १८८८ - २२ फरवरी, १९५८), मरणोपरान्त
२८. १९९२ - जे आर डी टाटा (२९ जुलाई, १९०४ - २९ नवंबर, १९९३)
२९. १९९२ - सत्यजीत रे (२ मई, १९२१ - २३ अप्रैल, १९९२)
३०. १९९७ - अब्दुल कलाम (१५ अक्तूबर, १९३१)
३१. १९९७ - गुलजारी लाल नंदा (४ जुलाई, १८९८ - १५ जनवरी, १९९८)
३२. १९९७ - अरुणा असाफ़ अली (१६ जुलाई, १९०९ - २९ जुलाई, १९९६), मरणोपरान्त
३३. १९९८ - एम एस सुब्बुलक्ष्मी (१६ सितंबर, १९१६ - ११ दिसंबर, २००४)
३४. १९९८ - सी सुब्रामनीयम (३० जनवरी, १९१० - ७ नवंबर, २०००)
३५. १९९८ - जयप्रकाश नारायण (११ अक्तूबर, १९०२ - ८ अक्तूबर, १९७९), मरणोपरान्त
३६. १९९९ - पं. रवि शंकर (७ अप्रैल, १९२०)
३७. १९९९ - अमृत्य सेन (३ नवंबर, १९३३)
३८. १९९९ - गोपीनाथ बोरदोलोई (१८९०-१९५०) , मरणोपरान्त
३९. २००१ - लता मंगेशकर (२८ सितंबर, १९२९)
४०. २००१ - उस्ताद बिस्मिल्ला ख़ां (२१ मार्च, १९१६ - २१ अगस्त, २००६)
४१. २००८ - पं.भीमसेन जोशी (४ फरवरी, १९२२ - )
४२. २०१२ - सचिन रमेश तेंडुलकर (प्रतिक्षित)

*
साभार वि.पि.

हा मुद्दा भारतरत्नासाठी ? अहो मग जवळजवळ ६००/७०० तरी भारतरत्न द्यायला लागतील आता!>>> गणु साहेब Happy मी फक्त या "कलेत" असा उल्लेख केला आहे.

चातक, पण मग 'हिच' कला का ? इतर एवढे खेळ आहेत की. त्या सगळ्या कलेत रिकॉर्ड पाहिले तर मग ६००/७०० नक्किच होतात ना.

चातक, पण मग 'हिच' कला का ? इतर एवढे खेळ आहेत की. त्या सगळ्या कलेत रिकॉर्ड पाहिले तर मग ६००/७०० नक्किच होतात ना. >>> हं...हो.. होत असतिल बहुतेक... त्यांच्यासाठी तुम्ही करा विनंती. दुसर्‍यांचे माहीत नाही. पण, माझी तुम्हाला काहीच हरकत नाहीय साहेब. Happy
इथे फक्त सचिन चा मुद्दा आहे.

खान अब्दुल गफार खान हे पाकिस्तानचे नागरिक तर मंडेला द. आफ्रिकेचे.
भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान सामान्यतः भारतीय व्यक्तीलाच मिळावा अशी कल्पना. हे दोघे अपवाद.
मोरारजींना पण भारतरत्न मिळाले होते? त्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान मिळाल्याचे लक्षात होते.(कोणता आधी मिळाला?)
चातक, अमर्त्य सेन यांचे नाव अमृत्य सेन असे आले आहे.

हं...हो.. होत असतिल बहुतेक... त्यांच्यासाठी तुम्ही करा विनंती. दुसर्‍यांचे माहीत नाही. पण, माझी तुम्हाला काहीच हरकत नाहीय साहेब. स्मित
इथे फक्त सचिन चा मुद्दा आहे. >>>.

इथे सचिनचा मुद्दा नाहि, भारताचा आणी भारतरत्नाचा आहे. तुम्च्या आवडीवर भारत चालत नाहि. सर्व खेळांना प्रोत्साहन देणे हे सरकारचे काम आहे. तुम्हाला हे समजेल याची अपेक्षा नाहिच आहे.

Lol

भारताचा आणी भारतरत्नाचा आहे. .>> अहो रागाउ नका ओ साहेब...मान्य आहे पण तुम्हीच म्हणालात ना इतरांनाही आधी द्या म्हणुन, मग याला द्या.

तुम्च्या आवडीवर भारत चालत नाहि. >>> आवडीवरच 'रत्न' अवलंबुन असतं साहेब. भारतरत्न मिळवलेल्यांनी चांगलीच कामगीरी केली असणार ना...ते भारतीय जनसामांन्यांना आवड्ले असणार ना..? "न" आवडता कुणी कोणास "रत्न" तरी म्हणेल का? 'भारतरत्न' तर दुरच. भारत म्हणजे फक्त 'भुभाग' नव्हे साहेब. हे सांगणे न लगे.

सर्व खेळांना प्रोत्साहन देणे हे सरकारचे काम आहे>>> अगदी अगदी सहमत यात वादच नाही साहेब. यात 'क्रिकेट' आलंच ना..? नाहीतर म्हणाल "क्रिकेट" इंग्रजांच.
(तरी, अनेक मान्यवरांच्या उपस्थित रणजी करंडक, दुलीप करंडक, देवधर करंडक, हे एक दिवसीय 'देशी' सामने खेळले जातात देशात)

मान्य आहे पण तुम्हीच म्हणालात ना इतरांनाही आधी द्या म्हणुन, मग याला द्या. >>>
द्या की सचिनला, कुठे नाहि म्हणले ? पण ध्यानचंद, उषाला आधी द्यायला तुमचा विरोध का ? ते सचिनला सिनियर आहेत ना.? तुम्हि भारतीयच आहात ना ? Wink

आवडीवरच 'रत्न' अवलंबुन असतं साहेब. >>> आवडिवर नसते काका! आता हिटलर पण त्या काळात सर्व जर्मनांना आवडत होताच. पण म्हनुन त्याला जर्मन रत्न देणार का ? Proud

अगदी अगदी सहमत यात वादच नाही साहेब. यात 'क्रिकेट' आलंच ना..? नाहीतर म्हणाल "क्रिकेट" इंग्रजांच. >>>
अहो क्रिकेटला आता कीती प्रोत्साहन द्याल ? Proud काका, प्रोत्साहन त्या खेळांना देतात जे खेळ गलितगात्र झाले आहेत.

हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि त्यात आपण असंख्य वेळा ऑलिम्पिक सुवर्नपदके मिळवलेली आहेत . काय दिले आपण हॉकीवाल्याना....?

पण ध्यानचंद, उषाला आधी द्यायला तुमचा विरोध का ? >> साहेब इथे कुणीच याचा विरोध केलेला नाहीय. यात सिनिअर जुनिअर क्लास येत नाही, का इतके 'सैरभैर' होत आहात तुम्ही. Proud
खरंतर तुम्ही स्पष्ट्पणे सचिन चा विरोध करत आहात हे दिसत आहे.
मग आणखी २० वर्षानी जेव्हा कुणी तरी पात्र ठरेल या 'मानास' त्यावेळी तुमच्यासारखीच लोकं म्हणतील "सचिन तेंडुलकर' यांस का नाही दिला "भारतरत्न".

आता हिटलर पण त्या काळात सर्व जर्मनांना आवडत होताच. पण म्हनुन त्याला जर्मन रत्न देणार का ? >>>हा प्रश्नच बालिश आहे. याचे मत जर्मनच देतिल. Happy
***
हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि त्यात आपण असंख्य वेळा ऑलिम्पिक सुवर्नपदके मिळवलेली आहेत . काय दिले आपण हॉकीवाल्याना....? >> अहो... जोशी साहेब त्यावेळी तुमच्या सारख्या मतांची लोकं जास्त होती बहुतेक Lol त्यामुळे त्या त्या खेळांडुंचे सुवर्ण पदक, रजत पदक काय ते त्यांस मुकले बिच्चारे.

आता तुमचा "सचिन" ला ही विरोध...,मग आणखी २० वर्षानी जेव्हा कुणी तरी पात्र ठरेल या 'मानास' त्यावेळी तुमच्यासारखीच लोकं म्हणतील "सचिन तेंडुलकर' यांस का नाही दिला "भारतरत्न".

BEBRON OR WANKHEDE STADIUM..now should be rename...SACHIN RAMESH TENDULKAR STADIUM...SUPPORT US..

चातक आमचा सचिनला विरोध नाही. अर्थात जाकीर हुसेन, कामराज, गुलझारीलाल नन्दा, राजीव गांधी,मोरारजी देसाइ,एम जी रामचन्द्रन अशी नररत्ने त्या यादीत पाहून सचिनला द्यायला मुळीच हरकत नाही.... Proud

जोशी साहेब उगाचंच वाइट वाटुन घेउ नका..पण मला ही हेच म्हणायचं आहे सचिन ला "भारतरत्न" मिळणे यात कहीच गैर नाहीय. तसेच इतर 'पात्र' खेळाडुंनांही मिळण्यात काही वावगे नाही. पण माझा सचिनच्या कारकिर्दिकडे जास्त कल आहे एवढेच.

खरंतर तुम्ही स्पष्ट्पणे सचिन चा विरोध करत आहात हे दिसत आहे. >>>

झाले ! तुम्हि हे म्हणणारच मला माहित होते. दुसरे काय बोलणार तुम्हि, लोजिकल मुद्दे नसतील तर! मी आधीपासुनच म्हणत आहे की भारतरत्न द्या सर्वाना. एकदम पन्नास्/साठ खेळाडुंना द्या . त्यात सचिनला पण द्या. की माझे काय जाते! पण तुम्हाला ते पटणार नाहि! तुम्हाला फक्त सचिनलाच हवे. मग बाकिच्यांनी कितीहि भारताचे नाव उंचावले असु दे.

यात सिनिअर जुनिअर क्लास येत नाही, >>> अहो काका, सिनिअर जुनिअर चा प्रश्न नाहि हा! जो आधी खेळला, ज्याने भारताचे नाव उंचावले ज्याला अजुनही मिळाले नाहि त्यांना दया आधी असे म्हणणे आहे ते.

हा प्रश्नच बालिश आहे. >> प्रश्न तुम्च्या बालिश पणाच्या प्रश्नावर आहे Proud

तुमच्यासारखीच लोकं म्हणतील "सचिन तेंडुलकर' यांस का नाही दिला "भारतरत्न". >> बरोबरच आहे ते . काय चुकिचे आहे ?

BEBRON OR WANKHEDE STADIUM..now should be rename...SACHIN RAMESH TENDULKAR STADIUM...SUPPORT US.. >>

कशाला ? भारताचेच नाव बद्लुन सचिन ठेवा. Proud

सपोर्ट करा! कोणाला याबद्दल मेल पाठवायचा हे सांगा ! Proud

गणू Proud

जो आधी खेळला, ज्याने भारताचे नाव उंचावले ज्याला अजुनही मिळाले नाहि त्यांना दया आधी असे म्हणणे आहे ते. >> साहेब इथे कुणीच याचा विरोध केलेला नाहीय.का पुन्हा इतके 'सैरभैर' होत आहात तुम्ही. Proud
तुम्ही त्या सगळ्यांच्या नावाची शिफारस करा ना 'प्लिज' आम्हाला काहीच हरकत नाहीय साहेब. आम्ही फक्त 'सचिन' तरी केली आहे, 'काळे' साहेबांनी प्रत्यक्ष तसा निरोप दिला आहे मान्यवरांकडे.

(तेवढा प्रयत्न तुम्हीही करत नाहीय.., तुम्ही फक्त शब्दांची हवा सोडत आहात यांची आधी करा आणि त्यांची आधी करा, जो करत आहे त्यांचीही अडवणुक करत आहात...अरेरे काय हे साहेब शोभतं का तुमच्या सारख्या उच्च पातळीच्या (भारतीय?मराठी?) विचारवंताला..? )

वरील यादीत मोरारजी देसाई यांचे नाव खटकत नाही का कोणालाही? तसेच अमर्त्य सेन यांचे देखील? (अमर्त्य सेन यांनी सांगितले होते ते भारतवंशीय आहेत भारतीय नाहीत)
मला तर राजीव गांधी यांचे नावदेखील आवडले नाही या यादीत. इंदिरा गांधी का आहेत या यादीत? देशाला आणीबाणीची खरच गरज होती का? केवळ सत्ता वाचवण्यासाठी त्यांनी आणीबाणी लादली, जी केवळ अंतर्गत अनागोंदी आणि युद्धजन्य परिस्थिती यामध्ये वापरावी असे घटनेत लिहिले आहे. शिखांचे हत्याकांड देश विसरतो कसा?(मी इंदिरा गांधी यांच्या हत्येआधीच्या आणि नंतरच्या दोन्ही बाबतीत बोलत आहे) जर ते चुकीचे होते तर इंदिरा गांधी यांना भारत रत्न का मिळावे? जर चुकीचे नवते तर कॉंग्रेस त्या हत्याकांडाबद्दल देशाची माफी का मागतो?
(तसेच सरदार पटेल आणि डॉ आंबेडकर यांना फार फार उशिरा हा पुरस्कार मिळाला याचे देखील दुखः वाटते)

क्रीडा प्रकार आणि कला प्रकार यामध्ये वेगळे काय आहे? दोन्ही प्रकार लोकांना आनंद देण्यासाठीच आहेत ना? काही लोकांना गाण्यांची आवड असते काहीना खेळण्याची. मग कला हा प्रकार क्रीडेपेक्षा श्रेष्ठ कसा? कि क्रीडेमध्ये काही कौशल्य लागत नाही अस काही आहे का? आणि जागतिक पातळीची गोष्टच करायची म्हणाली तर क्रिकेट हा खेळ कमीत कमी १२ देशामध्ये तरी खेळला जातो. हिंदी गाणी किती देशामध्ये ऐकली जातात? शास्त्रीय संगीत किती देशामध्ये ऐकले जाते? बंगाली चित्रपट (सत्यजीत रे) देशाच्या किती भागात पाहिले जातात? नेल्सन मंडेला यांनी आफ्रिकेत जे काम केले त्याचा भारतात किती उपयोग झाला? मंडेला यांचा पूर्ण आदर आणि अभिमान ठेऊन विचारतो, ते स्वतःला गांधीजीच्या विचारसरणीचे मानतात म्हणून तर त्यांना भारतरत्न मिळाला नसेल का? तसे असेल तर गांधीना का नाही मिळाला? आणि हाच निकष लावायचा म्हणला तर उद्या ओबामा यांना का मिळू नये?

तसे असेल तर गांधीना का नाही मिळाला? आणि हाच निकष लावायचा म्हणला तर उद्या ओबामा यांना का मिळू नये? >> नाही, हा निकष नाही लावायचा..... अंहं...बोरगे साहेब.

मग कला हा प्रकार क्रीडेपेक्षा श्रेष्ठ कसा? कि क्रीडेमध्ये काही कौशल्य लागत नाही अस काही आहे का? आणि जागतिक पातळीची गोष्टच करायची म्हणाली तर क्रिकेट हा खेळ कमीत कमी १२ देशामध्ये तरी खेळला जातो.>> हा निकष लावायचा.

तसेच सरदार पटेल आणि डॉ आंबेडकर यांना फार फार उशिरा हा पुरस्कार मिळाला याचे देखील दुखः वाटते>> Sad हे असं 'सचिन' बाबत नको व्हायला, नाहीतर मग उद्या असाच "पश्चाताप" व्हायचा.

नितीन, इंदिरा गांधींना ७१ साली (बहुधा बांगला युद्धानंतर) मिळाला असे वरच्या यादीवरून दिसते. तेव्हा सर्वांचाच पाठिंबा मिळाला असेल. बाकी तुझे बरेच मुद्दे विचार करण्यासारखे आहेत.

मला तरी कला क्षेत्रात देतात तर क्रीडा का नाही याला काही कारण दिसत नाही. लता, सुब्बुलक्ष्मी, भीमसेन जोशी या लिस्ट मधे सचिनचे नाव बालिश का वाटावे याचेही आश्चर्य वाटते. आधीच्या क्रीडापटूंना द्यायला हवे होते हे मान्यच आहे. पण सचिनला देण्याच्या चर्चेतून ते निष्पन्न झाले तर चांगलेच आहे.

बाजो, त्या नररत्नांच्या यादीत सचिनला कशाला बसवताय? Happy

मलाही वाटतं कि इतक्यात मिळु नये कारण सचिन ची कारकिर्द अजुन चालु रहावी, अशीच बहरत रहावी !!!

कारण सचिन ची कारकिर्द अजुन चालु रहावी, अशीच बहरत रहावी !!! >>> दिपांजली, आपण निश्चिंत रहा सचिन ची कारकिर्द 'बहरतच' राहील या "मानाची" मागणीच मुळी त्याने केलेली नाहीय. त्याला मिळाला काय नाही मिळाला काय याचा परीणाम त्याच्या "बहरावर" नक्कीच होणार नाही.
(तुम्हाला असंतरी वाटतं की कारकिर्दि नंतर मिळावं, 'नशिब'.... माझं नाही (त्या "रत्ना"चं))

सचनिला भारतरत्न आज ना उद्या मिळेलच.
पण भारतरत्न सारखा सर्वोच्च मुलकी सन्मान, एखाद्यावर दबाव आणुन किंव्हा शिफारस करुन सचनिला
मिळावा असे सांगणे हा त्या पुरस्काराचा अपमान नाही काय?

असे आपले मला वाटते.

चातक तस.न नाही. भारतरत्न मिळाल्यानन्तर त्याच्या वागण्याबोलण्यातील उत्स्फूर्ततेवर परिणाम होइल. एक प्रकारचा अकाली प्रौढपणा त्याला साम्भाळवा लागेल. सबब तो निवृत्त झाल्यावर लगेच देणे उचित राहील एवढेच माझे म्हनणे आहे. त्याने खेळे पर्यन्त मानद डोक्टरेटही घ्यायच्या नाहीत असे ठरवले आहे . अन्यथा आतापर्यन्त एकूण एक विद्यापीठे त्यासाठी पुढे आली असती Happy

Pages