सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे!

Submitted by sudhirkale42 on 3 April, 2011 - 12:42

सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे म्हणून माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
(मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे)
मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच. आपल्या संघाची विजयी सलामी सार्‍या वानखेडे मैदानाला देत असताना त्याला त्याच्या सवंगड्यांनी खांद्यावर घेऊन जी फेरी मारली तसा सन्मान क्वचितच कुठल्या खेळाडूला मिळाला असेल.
माझ्यासारखे सामान्य लोक त्याच्यावर प्रेम करतातच पण ही भावना सामान्य जनतेला त्याच्याबद्दल वाटणार्‍या प्रेमाचे आणि आदराचे द्योतक आहे. पण जेंव्हां त्या क्षेत्रातल्या बारकाया जाणणारे त्याचे सवंगडी त्याच्याबद्दलचे प्रेम, आदर आणि जवळीक व्यक्त करतात त्याची पातळी वेगळीच. हे दृश्य पाहून तिथे असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि दूरचित्रवाणीवर ते दृश्य पहाणार्‍या कोट्यावधी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल यात शंका नाहीं. हा प्रसंग सर्वांना सचिनला त्याचे सहकारी किती मान देतात हे दाखवून गेला आणि हे पहाणार्‍यांची हृदये गर्वाने फुगलीअसतील याची मला खात्री आहे. त्याच्या कित्येक सहकार्‍यांनी "आम्ही हा चषक सचिनसाठी जिंकला" असेही ठासून सांगितले.
भारताच्या राष्ट्रपती या नात्याने आपण पुढाकार घेऊन हा आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान सर्वांच्या लाडक्या सचिनला मिळवून देण्यासाठी भारत सरकारवर वजन व दबाव आणावा अशी मी आपल्याला विनंती करतो.
नमस्कार!
सुधीर काळे, जकार्ता
===================================
(ज्यांना मनापासून सचिनला भारतरत्न हा सन्मान मिळावा असे वाटते त्यांनीही अशीच साकड 'ममो' आणि 'प्रपा' यांना घालावी म्हणूनच वर त्यांचे ई-मेल पत्ते मी दिलेले आहेत.)
===================================

To:
Mrs Pratibhatai Patil
President of India
(presidentofindia@rb.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as the Head of the State should become proactive & strongly press the Government to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

To:
Mr Man Mohan Singh,
Prime Minister of India
(pmosb@pmo.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday on the TV screen (& at Mohali earlier) is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as our Prime Minister should take lead to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन ला भारतरत्न मिळावे.....
श्री. गणु..........आपल्याला उभ्या आयुष्यात क्रिकेट प्रयत्न करुन सुध्दा खेळता आले नाही का.......कि बॅट नीट पकडता आली नाही..? एवढा राग क्रिकेट वर आहे तर या बिबी वर येतातच कशाला.......उगाच वाद उकरुन काढायला ????? मागे मी वानखेडे किंवा बेब्रॉन स्टेडिअम चे नाव सचीन ठेवा या साठी पाठींबा द्या म्हणुन बोललो तर तुम्ही काय लिहिले..>>>>कशाला ? भारताचेच नाव बद्लुन सचिन ठेवा. फिदीफिदी
सपोर्ट करा! कोणाला याबद्दल मेल पाठवायचा हे सांगा ! फिदीफिदी>>>
काय हे..उद्या धुवा म्हणुन सांगितले तर विचारणार का कसे म्हणुन ????????(फळे धुवा) Happy
भारत क्रिडा क्षेत्रात जास्त करुन सचिन मुळेच ओळखला जातो......जगात कुठे ही जावा....क्रिकेट माहीती नसेल पण सचिन माहीती आहे लोकांना..(या वर वाद होइल.. पण जगातील फार मित्र आहेत ज्याना सचिन माहीत आहे..पण क्रिकेट चे ञान अत्यल्प आहे...).
तुमच्या मते जर सचीन पेक्षा महान व्यक्ती आहेत ज्यांना मिळाले नाही......तर तुम्ही मागणी करणारे बिबी उघडाना....आणी इतके दिवस काय झोपलेलात का ..........आम्ही सचिन साठी मागणी केली तर झोपेतुन उठलात.....!! चांगल्या कामात खोडा घालने हेच काम आपल्या सारख्या लोकांचे असते.......स्वतः कधी कामे करणार नाहीत..........आणि कोणी करत असेल त्याला नावे ठेवावी.....काळे साहेब जकार्ता मधुन मागणी करत आहे ...........आनि तुम्ही..इथे भारतात बसुन विरोध करतात......
इतकाच राग असेल ना किंवा येत असेल ना.....तर पुन्हा असे फालतु प्रतिक्रिया टाकत जाउ नका......तुम्हाला ही राग येनार नाही ...........आणी तुम्च्या मुळे आम्हालाही............ Happy

मी तर सचिनला नोबल मिळालाच पाहीजे या मागणीवर अडुन बसलोय ब्वा!

ईथे सगळे सचिनद्रोही दिसतायेत. कोणी नोबेलची मागणी करतच नाहीये.

ओहो बराच दंगा झालेला दिसतोय या बाफवर..
मीही काही मते टाकू इच्छितो...
क्रमांक १ - सचिनला भारतरत्न मिळणे...
वरती कुणीतरी स्पष्ट केलेलच आहे की भारतरत्न कशासाठी दिला जातो व आत्तापर्यंत कुणाकुणाला दिला गेला आहे. आत्तापर्यंत कोणच्याही खेळाडूला हा पुरस्कार मिळालेला नाही व सचिनपासून त्याला सुरूवात व्हावी ही अपेक्षाही फार चुकीची नाही. पण कुणालाही असे वाटत नाही का तो पुरस्कार आपणहून दिला गेला तरच त्याचे महत्व आहे. दबाव किंवा दडपण आणून दिलेला पुरस्कार, भले तो भारतरत्न असो वा नोबेल (सुदैवाने तो असा दिला जात नाही) तर तो सचिनला तरी स्विकारावा वाटेल का याचा विचार करावा.
क्रमांक २ - अजुन कुणीतरी मुद्दा मांडलाय की सांघिक खेळ असताना केवळ एकाच खेळाडूला का...हा अत्यंत मूर्खपणाचा आणि तद्दन बालीश मुद्दा आहे. खेळ जरी सांघिक असला तरी त्यातली कामगिरी वैयक्तिक असते. सचिन ज्यावेळी फलंदाजी करतो त्यावेळी दुसर्या बाजूने फलंदाज त्याला साथ देतो म्हणूनच तो धावा करू शकतो हेही एक अत्यंत बिनडोक वाक्य. लक्षात घ्या, जरी त्याला दुसर्या बाजूने साथ मिळत असली तरी त्याच्या धावा त्याच्या त्यालाच करायच्या असतात. आणि त्याने त्या केल्या आहेत. जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांना तोंड देत, वाट्टेल त्या परिस्थितीत. समोर पडझड होत असतानाही त्याने एकहाती किल्ला लढवला आहे. गेली कित्येक वर्षे तो हे करत आला आहे त्यात सगळे श्रेय फक्त सहकार्यांचे. मग बाकी फलंदाज खेळायला आल्यावर सहकारी
काय आम्ही नाही जा असे म्हणत निघून जात होते का काय. का सचिन आला की त्याला स्पेशल ट्रिटमेंट होती.
क्रमांक ३ - सांघिक कामगिरीचे मूल्यमापन. हाच न्याय सगळ्यांना लावायचा झाला तर हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांनाही तो लागू होतो. बाकीच्या खेळाडूंनी साथ दिली म्हणून त्यांनी एवढे गोल मारले. बाकीचे खेळलेच नसते तर काय एकटे ध्यानचंद ११ खेळाडूंविरुद्ध खेळणार होते का. पेले, मॅराडोना, रोनाल्डो, मेस्सी हे महान फुटबॉलपटू आहेत. मग ते सांघिक खेळ खेळतात म्हणून त्यांची कामगिरी मोजायची नाही का.
क्रमांक ४ - सचिनने आपल्या खेळातून, आपल्या वागण्यातून एक आदर्श खेळाडू कसा असावा याचा एक पाठ घालून दिलाय. त्याची महानता केवळ मैदानापुरती मर्यादित नाही. त्याने अनेक समाजसेवी संस्थाना मदत केली आहे आणि त्याबद्दल कुठेही त्याने जाहीरात केलेली नाही बघा मी यांना अशी मदत करतो आहे ते. आणि या गोष्टीत त्याचे वेगळेपण उठून दिसते. सचिनलाच का हा प्रश्न विचारणार्यांनी एक आत्तापर्यंत होऊन गेलेले सर्व महान खेळाडू बाजूला काढावेत. त्यांची मैदानावरची कामगिरी, सातत्य, विक्रम याचबरोबर त्यांचे आचरण, त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतानाही पाय जमिनीवर असण्याची विचारसरणी या सर्व निकषांवर त्यांना तपासून पहावे. कारण इथे खेलरत्न साठी शिफारस नाही. सर्वोच्च नागरी सन्मानासाठी शिफारस आहे, त्यामुळे हे मुद्दे अनिर्वाय ठरतात.
जे काही ५००-६०० लोक आहेत ते जर या सगळ्यांची पूर्तता करत असतील तर मग फक्त सचिनला का हा प्रश्न विचारावा

>>ओहो बराच दंगा झालेला दिसतोय या बाफवर..

काही ठराविक लोकांचा तोच ऊद्देश दिसतोय... Happy अनुल्लेख केला तर बरे होईल!

सचिनच्या सर्व शुभचिंतकांसाठी खुषखबर:

महाराष्ट्र राज्य सरकारने सचिन ला "भारतरत्न" बहाल करण्याबद्दलचा शिफारस अर्ज एकमताने पास केला आहे:
http://timesofindia.indiatimes.com/india/Maharashtra-assembly-recommends...

वाजवा रे वाजवा... Happy

तुम्हाला भारतरत्न द्यायची मी नक्की शिफारस करणार. >>

अहो मास्तुरे कधी करणार ? करा की लवकर जरा! नाहितर मी मेल्यावर कराल! Proud

महाराष्ट्र राज्य सरकारने सचिन ला "भारतरत्न" बहाल करण्याबद्दलचा शिफारस अर्ज एकमताने पास केला आहे: >>>

सचिन कोणाचा यावर आता राजकारण्याच्या मारामार्या.

मी तर सचिनला नोबल मिळालाच पाहीजे या मागणीवर अडुन बसलोय ब्वा! >>>

मी तर भारताचे नाव बदलुन सचिन करा असे म्हणतोय. पण कोणी मला इमेल आयडीच देत नाहि. सगळेजण सचिनद्रोहिच आहेत. धिक्कार असो सर्वांचा! Proud

आपल्याला उभ्या आयुष्यात क्रिकेट प्रयत्न करुन सुध्दा खेळता आले नाही का >> तुम्हाला आले का ? तसे सांगा! तुम्हालाहि देउ भारतरत्न ! मी प्रयत्न करतो! Proud

झारखंड सरकार धोनीची पण शिफारस करणार आहे भारतरत्न साठी वाजवा रे वाजवा. >>>

त्या युवीचीहि करा रे कोणीतरि. नाहितर त्यावरुन परत!

नाहितर असे करा की आतापर्यतच्या सर्वच क्रिकेट खेळाडुंना भारतरत्न द्या!
विनोबा भावे, कर्वे, विश्वेश्वरय्या , वेंकटरमण यांची काढुन घ्या. नाहितरी आजकाल क्रिकेट्प्रेम म्हणजेच देशप्रेम आहे Proud

yaaa GANU SAHEB YAA....naak khupsayla yaa...deshprem utu jaat aahe na tumche...yaa...kharadaa je kharadayache te...jevan jaat nasel na aapalyala jo paryant ithe yeun cricket viruddha vaayfal badbad kelyashivaay...

chalaa jeun ghyaa 8 vaajalet...kharadun zalenaa....chalaa yaa aata.... Happy

Proud Biggrin

chalaa jeun ghyaa 8 vaajalet...kharadun zalenaa....chalaa yaa aata... >>

माझे तरी नाहि झाले अजुन!

तुम्हि जेवुन आलात का खरडायला ? Proud बाकी तुमचे लिखाण खरोखरच खरडणे आहे! Proud

mob var asalyane kaahi chuka zalya astil... Happy

baki mi aatach basalo jevayla.....yetaat kaa.....thambto have tar....?

baki mi aatach basalo jevayla.....yetaat kaa.....thambto have tar... >>>

जेउन घ्या तुम्ही आरामात. मग या नाक खुपसायला ! Wink

काही लोक काही हिडीस प्रतिक्रीया मुद्दाम् च देताहेत, जेणेकरूण त्यांच्या फालतू मत प्रदर्शनाला जणु काही महत्त्व प्राप्त होणार आहे. मूळ विषय बाजुला ठेवुन निव्वळ पांचटपणा चालवलाय

अश्या व्यक्तीनी क्रुपया भाषेचा वापर सुसंस्क्रूत व्यक्ती प्रमाणे करावा ही विनंती, अर्थात हे फक्त सुसंस्क्रूत व्यक्तींनाच लागु पडते. आणि सुसंस्क्रूत व्यक्ती च्या वागण्यात, बोलण्यात त्यांचे संस्कार दिसुन येतातच. आणि ह्या नंतर च्या पोस्ट मध्ये दिसतीलच ह्याची मला पुर्ण पणे खात्री आहेच Happy

आणि सुसंस्क्रूत व्यक्ती च्या वागण्यात, बोलण्यात त्यांचे संस्कार दिसुन येतातच >>>

धन्यवाद! तुम्हिच मला ब्ररोबर ओळखले!

वरचे सगळे मी वाचलेले नाहीये. पण माझे मत नोंदवतोय.

सचिन ला पुरस्कार देण्यात काही गैर नाही. पण आताच देऊ नये. नाहीतर एक भारतरत्न टीव्हीवर कसल्या कसल्या जाहिराती करताना दिसतोय असे चित्र दिसेल. त्यापेक्षा, तो निवृत्त झाला अन मग खेळासाठी तो जे विधायक काम करेल (जो कि तो नक्कीच करेल असा विश्वास मला आहे) त्याबद्द्ल त्याला पुरस्कार द्यावा. सध्या त्याची उमेदिची/व्यावसायीक यशाची काही वर्षे बाकी आहेत. ज्यात 'भारतरत्न' दिल्यास तांत्रिक अडचणी येउ शकतील. तो सध्या निवृत्त न होणे हे देखील त्यामागचे एक कारण आहेच अन तो हे अप्रत्यक्ष कबुलही करतो!

त्यापेक्षा, सचिन ५० चा झाला कि त्याला ही भेट द्यावी. Happy

सचिन सर्वश्रेष्ठ क्रिकेटरच नव्हे तर स्पोर्ट्स आयकॉन आहे. एखाद्या खेळावर अशाप्रकारे प्रभाव टाकणारा दुसरा खेळाडू आपल्याकडे झाला नाही. गेली कित्येक वर्षे तो अनेक भारतीयांचा रोल मॉडेल आहे..............
हे सर्व मान्य करुनही सध्याची 'सचिनला भारतरत्न द्या' ही मागणी केवळ राजकिय स्वार्थाने प्रेरित कांगावा आहे. नुकताच वर्ल्डकप जिंकला आहे, त्यात सचिनचा प्रचंड मोठा वाटा आहे, लोक त्याच्या मागे आहेत, आता जर त्याला भारतरत्न मिळाले तर ते आमच्या शिफारसीमुळे दिले अशा वल्गना करुन श्रेय लाटता येईल हा सरळ हिशेब आहे.
अब्जावधी भारतीयांच्या दृष्टीने तो कधीच भारतरत्न झाला आहे, त्याला सर्कारी चौकटीत बसवण्याने काही फरक पडणार नाही.

सचिनला भारतरत्न नक्कीच मिळायला पाहिजे .
पण बाकीचे जे पुरस्कार , पद्म्भुषण , पद्मविभुषण कुठल्या बेसवर दिले जातात? सैफ अली खान , काजोल असल्या लोकांना पद्मभुषण सहजासहजी मिळतो मात्र मराठीतील किती जेष्ठ / आदरणीय लेखकांना , कलाकारांना पद्म पुरस्कार मिळालाय ? सगळा वशिल्याचा बाजार आहे.

अरे त्यापेक्षा क्रिडाक्षेत्रातल्या १६ किंवा १९ वर्षाखालील वयोगटात विशेष योगदान करणार्‍या व्यक्तीस 'सचिन तेंडूलकर' च्या नावाने पुरस्कार द्या.राज्यशासनाने किंवा क्रेंदाने या पुरस्काराची क्रिडा समितीय अध्यक्षतेखाली याची जबाबदारी घ्यावी. यापेक्षा आणखी मोठा गौरव कुठला असेल सचिनच्या कारकिर्दितला आणि उभ्या आयुष्यातला.

तरूण वर्गाचा क्रिडाक्षेत्राचा बदलत जाणार दृष्टीकोन या निमित्ताने नक्कीच बदलला जाईल.

बाकी 'महारत्ना'ला आणखी कुठली रत्ने द्यावीत.

परवा बंगळूरविरूध्द्च्या सामन्यात सामनावीर सचिनने अंबाती रायडूला पुढे बोलवून व त्याला विजयाचे बरोबरीचे श्रेय देऊन बक्षिसाची रक्कम वाटून घेतली. हे सचिनच्या महानतेचे अजून एक उदाहरण!

त्या सामन्यात, रायडूचा स्ट्राईक रेट तसेच काढलेल्या धावा या सचिन पेक्षा चांगल्या होत्या. अर्थात सामनाविरच्या निवडीचे निकष Happy वेगळे असावेत.

आता परिस्थिती अशी आलेली आहे कि जर नजिकच्या भविष्यकाळात सचिनला भारतरत्न मिळाले नाही तर भारतरत्न या किताबाची शान जाणार आहे.

परवा बंगळूरविरूध्द्च्या सामन्यात सामनावीर सचिनने अंबाती रायडूला पुढे बोलवून व त्याला विजयाचे बरोबरीचे श्रेय देऊन बक्षिसाची रक्कम वाटून घेतली. हे सचिनच्या महानतेचे अजून एक उदाहरण! >>

यात सचिनची महानता काय आहे ? रायडुला सामनावीर द्यायलाच हवे होते.
बाकी सचिनला अशी महानतेची नाटके नेहमीच करता येतात. पहिल्यांदा फेरारीवर टैक्स नाहि भरायचा, मग वादविवाद सुरु झाले की महानतेने टैक्स भरायचा. पहिल्यांदा जीमकरता जागा मागायची मग वादविवाद सुरु झाले की महानतेने ती सोडायची. पहिल्यांदा सामनावीर म्हंणुन बहुमान घेयचा, मग महानतेने तो खरोहर लायक असलेल्या खेळाडुला द्यायचा. या महान माणसाला खरोखरच भारतरत्न देउन टाका आता.

आता परिस्थिती अशी आलेली आहे कि जर नजिकच्या भविष्यकाळात सचिनला भारतरत्न मिळाले नाही तर भारतरत्न या किताबाची शान जाणार आहे. >> Proud

त्या सामन्यात, रायडूचा स्ट्राईक रेट तसेच काढलेल्या धावा या सचिन पेक्षा चांगल्या होत्या. >>> सहमत नाही. दोघांना विभागूनच योग्य होता, तसा द्यायला हवा होता. दोघेही साधारण तितकेच चांगले खेळले. ११९ आणि १२६ या स्ट्राईक रेट मधे 'निर्विवाद फरक' नाही, तसेच त्यांच्या रन्स मधेही.

काय राव गणू. या पोस्ट च्या आधीपर्यंत याबद्दलची तुझी मते मी सिरीयसली घेतली होती Happy "सचिन च्या लायक असण्याबद्दल वाद नाही, पण इतर अनेक लायक लोक (ध्यानचंद ई) त्याच्या आधी आहेत" वगैरे मुद्दे मान्य होते. पण या वरच्या पोस्टशी अजिबात सहमत नाही.

खरं तर सचिनला "भारतरत्न" पुरस्कार देऊ केला तरी तो हा पुरस्कार इतक्यात स्वीकार करेल असे वाटत नाही. मध्यंतरी त्याला २-३ विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट देऊ केली होती. पण ती त्याने नम्रपणे नाकारली. निवृत्त होईपर्यंत आपण डॉक्टरेट स्वीकारणार नसल्याचे त्याने ठरविले आहे. तसेच तो "भारतरत्न" सुध्दा नम्रपणे नाकारेल असे वाटते.

कोट्यावधी चाहत्यांना आपल्या खेळाने २१ वर्षांहून अधिक काळ निर्भेळ आनंद देणार्‍या सचिनला "भारतरत्न" पुरस्कार दिला तर या पुरस्काराचीच शान वाढेल !

पण वरचे तीन प्रसंग तसेच घडलेले आहेत ना ?>>> मला असे वाटत नाही. आता मॅन ऑफ द मॅच आधी मला घोषित करा असे काय तो सांगायला गेला असेल का?

त्याच्या एकूण कर्तबगारीपुढे या गोष्टी म्हणजे प्रचंड गंभीर गुन्हे आहेत का? त्यातही आत्ता भारताने कप जिंकल्यावर सचिन च्या कौतुकाबद्दल चाललेल्या चर्चेत हे काढण्याचे औचित्य कळाले नाही. हे म्हणजे एखाद्याच्या साठीला त्याच्याबद्दल गौरवोद्गार चालू असताना ते मधेच थांबवून त्याचे एखादे माफक लफडे सांगण्यासारखे आहे Happy

मलाही सचिनचे फेरारीप्रकरण आवडले नव्हते, इव्हन मैदानावरचे त्याचे डावपेच एक दोन वेळा अनाकलनीय होते. पण गेली काही वर्षे भारतीय क्रिकेट चाहते ज्याची वाट पाहात होते ती गोष्ट घडल्यावर हे विषय काढणे मला बरोबर वाटत नाही. आणि खरे सांगायचे तर यावेळेस भारत जिंकावा असे नेहमीप्रमाणे वाटतानाच यात माझ्यासारख्या असंख्य लोकांना तो सचिन निवृत्त व्हायच्या आत जिंकावा असे मनापासून वाटत होते. त्यामुळे हा विजय आणि सचिन याचा संबंध आला. एखाद्या चित्रपटातील हीरोला शेवटी सर्व मिळावे असे आपल्याला वाटते तसे काहीतरी वाटत होते.

पी.टी.उषाचा थोडा काळ मी बघितलेला आहे, ध्यानचंद तर केवळ वाचूनच माहिती आहे. हे लोक लायक असतील यात वाद नाही.

आपला मुद्दा फक्त सचिनबद्दल आहे (आणि ते ही त्याच्या निवृत्तीनंतरच).

सचिनला भारतरत्न मिळेल याबाबत मला आता अजिबात शंका नाही...
खुद्द पवार साहेबांनी ते आता मनावर घेतले आहे. जो माणूस भारताला विश्वचषक मिळवून देऊ शकतो तो सचिनला भारतरत्न नाही देऊ शकणार...:)
हो की नाय गणू...
बाकी वरती कुणीतरी उल्लेख केलाय की सचिन तेंडूलकर पुरस्कार देण्यात यावा. ही कल्पना अतिशय चांगली आहे आणि त्याच्या निवृत्तीनंतर ती अंमलात आणायला हवी.
आणि इथे आधी ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार देण्यात यावा असा तिढा पण नाही. कारण ध्यानचंद क्रीडा पुरस्कार २००२ पासून क्रीडा क्षेत्रातील अत्युच्च कामगिरीबद्दल दिला जातोच. Happy

Pages