Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वर्ल्ड कप खोटा
वर्ल्ड कप खोटा आहे..............????
हा खरा वर्ल्ड कप......ज्या वर सर्व देशांचे वर्तुळ आहे खालच्या बाजुला.......
आणि हा धोनी च्या हातातला........या वर देशांचे व्रर्तुळे गायब आहेत........

कोनी स्पष्टीकरण करु शकेल का या वर ?????????????
गरज वाटत नाही... कप धोणी च्या
गरज वाटत नाही... कप धोणी च्या हातात आहे हे पुरेसे आहे
enjoy.. (from: sport360)
enjoy.. (from: sport360)

या फोटोत धोनी नाहीये... एंजॉय
या फोटोत धोनी नाहीये... एंजॉय काय ? आँ?

मला सुरक्षा यंत्रणेचे कौतुक
मला सुरक्षा यंत्रणेचे कौतुक वाटते... मोहाली तसेच मुंबई या दोन्ही ठिकाणी अतिशय महत्वाच्या अनेक व्यक्तींची हजेरी अपेक्षीत होती. कुठेही एक छोटा फटाका फुटला असता तर आंतरराष्ट्रिय बातमी झाली असती. सुदैवाने तसे काहीही झाले नाही, सोहळा व्यावस्थित पार पडला.
दिवस रात्र राबणार्या त्या सुरक्षा यंत्रणेचे प्रथम अभिनंदन, तसेच धोनीच्या संघाचे विश्वचषक भारतासाठी फिक्स
केल्याबद्दल अभिनंदन.
seriously isn't it high time
seriously isn't it high time to move on ? >>>>
नक्किच time to move on . असामी. म्हणुन मग आता बास करा क्रिकेट जे फिक्स आहे ! आणी लागा आपल्या उद्योगाला असामी साहेब.
वर्ल्ड कप खोटा आहे..............???? >>>>
तुम्हाला एवढ्या उशीरा कळले ? आणी अजुनही शंका आहे ?
कप धोणी च्या हातात आहे हे पुरेसे आहे >>>
हे पुरेसे नाहि हो! certificate च खोटे तर पदवी असते का खरी ?
दिवस रात्र राबणार्या त्या
दिवस रात्र राबणार्या त्या सुरक्षा यंत्रणेचे प्रथम अभिनंदन, तसेच धोनीच्या संघाचे विश्वचषक भारतासाठी फिक्स केल्याबद्दल अभिनंदन. >>>>
>>>>>या फोटोत धोनी नाहीये...
>>>>>या फोटोत धोनी नाहीये... एंजॉय काय ? आँ?
लले, धोनी स्वतः फोटो काढतोय.
या फोटोत नेहरा उर्फ नेहरु
या फोटोत नेहरा उर्फ नेहरु विचार करतोय कि काय चुक झाली आपली आणि आपण जिंकलो?
वर्ल्डकपच्या यशानंतर केरळ
वर्ल्डकपच्या यशानंतर केरळ सरकारने श्रीशांतला जाहीर केलेले बक्षीसः One tight slap, to be delivered by Harbhajan.
या फोटोत धोनी नाहीये... एंजॉय
या फोटोत धोनी नाहीये... एंजॉय काय ? आँ? <<<
ल प्री,
शॅम्पेन उडवल्यानंतर ते सर्व धोनी च्या डोळ्यांत गेलं होतं, काही वेळा करिता तो ग्रूप बरोबर नव्हता, तेव्हाच हा फोटो काढलाय.
वरील फोटो crop केलेला दिसतोय.
वरील फोटो crop केलेला दिसतोय. मूळ फोटो हा आहे:
udayone | 6 April, 2011 -
udayone | 6 April, 2011 - 02:59
वर्ल्ड कप खोटा आहे..............????
हा खरा वर्ल्ड कप......ज्या वर सर्व देशांचे वर्तुळ आहे खालच्या बाजुला.......
आणि हा धोनी च्या हातातला........या वर देशांचे व्रर्तुळे गायब आहेत........
अरे जस जसे एकेक देश बाद होत गेले तस्तसे एकेक वर्तुळ काढुन टाकले.
निलिमा, एकदम सॉल्लिड
निलिमा, एकदम सॉल्लिड स्पष्टिकरण
लोळालोळी एकदम ...
<< निलिमा, एकदम सॉल्लिड
<< निलिमा, एकदम सॉल्लिड स्पष्टिकरण ... लोळालोळी एकदम ... >> १००% सहमत !!!
अरे जस जसे एकेक देश बाद होत
अरे जस जसे एकेक देश बाद होत गेले तस्तसे एकेक वर्तुळ काढुन टाकले. >>>
म्हणजे या वेळेस कोणीच विजेता नव्हता की काय ?
भारताला कसा दिला वर्ल्ड कप ? आता त्याच्यावर एकही वर्तुळ शिल्लक नाहिये!
<< म्हणजे या वेळेस कोणीच
<< म्हणजे या वेळेस कोणीच विजेता नव्हता की काय ?.........आता त्याच्यावर एकही वर्तुळ शिल्लक नाहिये! >> आख्खा कपच दिला ना भारताला; इतरांशी वाटून घ्यायचा असला , तरच त्यांचं नांव घालायला असतात ना तीं वर्तुळं !!!
भाऊ मस्त
भाऊ मस्त
आख्खा कपच दिला ना भारताला;
आख्खा कपच दिला ना भारताला; >>
अहो पण कप कोणालाही द्यायच्या आधीच वर्तुळ नाहिशी झालित. याचा अर्थ असा होतो की यावेळेस कोणीच लायक नव्हते कपाला फिकिसंग झाल्यामुळे!
आता वर्तुळे कोण नाहिशी करणार ? देवानेच केलेली दिसतायत! 
भाऊ का उगीच
भाऊ
का उगीच ग्रुहकर्त्व्यदक्ष माणसांची चेष्टा 
कप युएसए मेड होता हो (उल्हासनगर सिंधी असो.)
धागा आणि प्रतिसाद आवडले.
धागा आणि प्रतिसाद आवडले.
कप युएसए मेड होता हो >>>
कप युएसए मेड होता हो >>>
"सामना जिंकून हॉटेलवर परत जात
"सामना जिंकून हॉटेलवर परत जात असताना फुटपाथवर झोपणारे एक साधे गरीब कुटुंब बसच्या खिडकीतून मला दिसले. त्या दिवशी भारतीय संघ विश्वविजेता ठरल्यावर त्या कुटुंबाने हातातील तिरंगा फडकावून आमच्याकडे बघत, उड्या मारत आरोळ्या ठोकल्या व आपला आनंद साजरा केला. त्या कुटुंबातील कुणाच्या पोटात पुरेसे अन्न होते की नव्हते, याची मला खात्री नाही; परंतु उपाशीपोटी माणसांनाही पोटभर आनंद आम्ही देऊ शकलो, याचे समाधान मोठे होते."
- गौतम गंभीर (रविवार सकाळ मध्ये)
कोट्यावधी क्रिकेटरसिकांच्या मनातील भावनाच गंभीरने व्यक्त केल्या.
त्या कुटुंबातील कुणाच्या
त्या कुटुंबातील कुणाच्या पोटात पुरेसे अन्न होते की नव्हते, याची मला खात्री नाही; परंतु उपाशीपोटी माणसांनाही पोटभर आनंद आम्ही देऊ शकलो, याचे समाधान मोठे होते
कोट्यावधी क्रिकेटरसिकांच्या मनातील भावनाच गंभीरने व्यक्त केल्या. >>>
छान आहेत भावना. पुढच्या काळात अतीरेकी क्रिकेट्प्रेमामुळे रोजच पोटभर आनंद खाउनच गरिब लोकांना झोपावे लागणार आहे. म्हणुन मी आधीच म्हणले ते गरिब शेतकरी बिचारे उगाचच आत्महत्या करता. त्यांना टिकिटे द्या कोणीतरी क्रिकेटची! देशातील आत्महत्या तरी थांबतील!
इथे क्रिकेट बाफं वर येऊन
इथे क्रिकेट बाफं वर येऊन लोकांना नेमकं काय करायला पाहिजे किंवा कुठे लक्ष घालायला पाहिजे आणि कुठे नको हे सांगून कितपत लोकांच्या डोक्यात प्रकाश पडतो काय माहित. ते "लीड बाय एग्जांपल" म्हणतात त्या मार्गानी जात बरेच लोकं दुसर्यांना काही सांगण्यापेक्षा स्वतः काहीतरी करत आहेत आणि त्याच्यानी खरच गरीब लोकांना मदत होत आहे. इथे येऊन आपलं तत्वज्ञान झाडणे, दुसर्यांच्या कर्मणुकीत बाधा आणणे ह्यात फक्त स्वतःची फुशारकी मारणे हाच उद्देश जाणवतो. हे असलं फुशारकी मारणं म्हणजे आम्ही क्रिकेटप्रेमी क्रिकेट बघून स्वतःचं मनोरंजन करत वेळ वाया घालवतो त्या पेक्षा कैक पटीनी "युसलेस" काम आहे.
लोकांना नेमकं काय करायला
लोकांना नेमकं काय करायला पाहिजे किंवा कुठे लक्ष घालायला पाहिजे आणि कुठे नको हे सांगून कितपत लोकांच्या डोक्यात प्रकाश पडतो काय माहित>>
नेमकं काय करायला पाहिजे किंवा कुठे लक्ष घालायला पाहिजे याची जाणीव असणे जास्त महत्वाचे असते वैद्यबुवा! तुम्हितर वैद्य! तुम्हाला हे आधी कळायला हवे!
आता तरी लक्षात आले असेल. नीट लक्षात ठेवा यापुढे. नाहितर कोणाचा तरी जीव जायचा हकनाक !
असायचा कैन्सर आणी तुम्हि द्यायचा क्रोसिन!
इथे फ्री फोरम वर कितीही बडबडा
इथे फ्री फोरम वर कितीही बडबडा कोणी काही म्हणत नाही. वैयक्तिक आयुष्यात अशी हुशारी झोडून बघितली आहे का? कोणी ऐकून घेत नाही, सगळे दोन हात लांब उभे करतात आणि जवळचे लोकांना फक्त मनस्ताप होतो. की ते करुन झालय आणि तिकडे सगळ्यांनी हात टेकलेत म्हणून आता मायबोली हा नवीन मार्ग सापडला आहे?
असो, जसं तुम्हाला आम्ही अवॉईड नाही करु शकत तसं तुमची फालतू बडबड आम्हाला इथे क्रिकेटबद्द्ल हिरिरीनी बोलण्यापासून थांबवू नाही शकत.
इथे फ्री फोरम वर कितीही बडबडा
इथे फ्री फोरम वर कितीही बडबडा कोणी काही म्हणत नाही. वैयक्तिक आयुष्यात अशी हुशारी झोडून बघितली आहे का? कोणी ऐकून घेत नाही, सगळे दोन हात लांब उभे करतात आणि जवळचे लोकांना फक्त मनस्ताप होतो. की ते करुन झालय आणि तिकडे सगळ्यांनी हात टेकलेत म्हणून आता मायबोली हा नवीन मार्ग सापडला आहे >>>
तुम्हाला बराच स्वानुभव दिसतो आहे. अगदी विस्ताराने लिहिलेत !
स्वानुभव आहे आणि दुसर्यांचे
स्वानुभव आहे आणि दुसर्यांचे अनुभव सुद्धा पण त्यांच्याकडे दुर्लक्ष न करून मला फायदाच झालाय. Meddlesome नसलात तर लोकं तुमच्या शहाणपणाच्या चार गोष्टी नुसत्या ऐकणारच नाहीत तर आचरणात आणून तुमचे आभार मानतील. येवढं अवघड आहे का, फक्त वेळ काळ बघून तोंड उघडणे, दुसर्यांच्या मतांचा आदर करणे?
येवढं अवघड आहे का, फक्त वेळ
येवढं अवघड आहे का, फक्त वेळ काळ बघून तोंड उघडणे, दुसर्यांच्या मतांचा आदर करणे >>
तेच मी तुम्हाला विचारतोय वैद्यबुवा!
Pages