विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>श्रीलंकेचे नक्की काय चुकले की ज्यामुळे त्यांचा पराभव झाला?
त्यांच्याकडे रजनी, गझनी, धोनी नव्हते, तेही एकत्रीत उपस्थिती Happy

किंवा भारतानी नक्की काय काय केले की ज्यामुळे इतका सहज विजय मिळाला??
आपल्याकडे रजनी, गझनी, धोनी होते, तेही एकत्रीत उपस्थिती Happy

(रच्याकने: २७५ चा पाठलाग ला "ईतक्या सहज" असे म्हटलेले पाहून बरे वाटले!):)
~द

गुणवत्ता, सांघिक भावना, सुधारलेलं क्षेत्ररक्षण व आत्मविश्वास यामुळे भारत जिंकला; श्रीसंथला झहीर, युवी, तेंडुलकर व भज्जी इ. ज्या प्रकारे प्रोत्साहन देत होते त्यावरून सांघिक एकता तीव्रतेने जाणवत होती; क्षेत्ररक्षणामुळे कमीतकमी २५-३० धावा अडवल्या गेल्या व त्या निर्णायक ठरणार असं दडपण श्रीलंकेवर आधीच आलं.

श्रीलंका आत्मविश्वासात भारतापेक्षा कमी पडली म्हणून हरली; फायनलला भारत श्रीलंकेपेक्षा कठीण मार्गावरून आला [ ऑस्ट्रेलिया व पाकला हरवून] म्हणून हा फरक पडला.

बर बर्‍याच लोकांनी पॉझिटिव्ह पोस्टस विषयी लिहीलं आहे. मी यावेळेस सगळे सामने सुरवातीपासून पाहिले. मला किकेटच्या तांत्रिक बाजू फारशा समजत नाहीत. पण थोडीफार बेसिक माहिती करून घेतली होती. सगळ्यात प्रकर्षानं जाणवलेला बदल म्हणजे 'सांघिक' बाजू दिसली. कुठेही 'पाट्या' टाकण्याची वृत्ती दिसली नाही. चुका झाल्या - खूप झाल्या - पण त्या खरंच चुका होत्या. मॅच फिक्सिंगबद्दल लोक बोलत होते, ते मलातरी पटत नव्हतं. या खेळाडूंचं जाहिराती / IPL आणि इतर उत्पन्न बघता कोणी पैशासाठी वाईट खेळेल असं वाटलं नाही. आता काही जण 'वरूनच' सामना फिक्स आहे असं बोलत होते. ते 'वरून' म्हणजे कुठून हे मला अजूनही माहित नाही. ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यामधे बॉडी लँग्वेज जबरदस्त होती. खेळाडूंच्या मानसिकतेमधे टिच्चून खेळण्याचा बदल जाणवला. मला वाटतं तिथेच निम्मा गड सर झाला. आपले खेळाडू पाकिस्तानबरोबर अगदी आवेशाने खेळतात. पाकिस्तानविरुध्दचा सामन्यामधे त्यांच्या खेळाडूंनी चुका केल्या, पण फायदा आपल्याला झाला. शिवाय पाकिस्तानचा धावांचा पाठलाग करतानाचा इतिहास पहाता, आपण जिंकू याची खात्री वाटत होती. फायनलमधेही आपल्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास होता. निकाल काहीही लागू दे पण त्यांनी जिद्दीने खेळावं आणि जीव तोडून प्रयत्न करावेत असं वाटत होतं, जे त्यांनी केलं. सचिन बाद झाल्यावर त्याची बॉडीलँग्वेज बरंच काही बोलून गेली. थोडी काळजी वाटली पण आपले फलंदाज पहाता, विश्वासही वाटला. धोनीच्या कप्तानगिरी बद्दल बरेच प्रश्न उठले होते ते वाचत होते, पण त्याबरोबरच त्यानं खेळाडूंना दिलेल्या 'कुठल्याही तणावाखाली न खेळण्याच्या' सल्ल्याबद्दलही वाचलं होतं. आपल्या खेळाडूंमधे जिद्द दिसत होती. गरज होती ती त्यांना सपोर्ट करण्याची आणि त्यांच्याबद्दल विश्वास दाखवण्याची. इथे खरंच 'पाठिवरती हात ठेवूनी लढ नुसतं' म्हणायची गरज होती. एक दोन खेळाडू बाद झाल्याने सगळा संघच कसा काय कुचकामी ठरतो? इथे येऊन निळे चेहरे टाकण्यार्‍यांचा खरंच राग येत होता :राग:. आधी आपली मानसिकता बदला मग खेळाडूंकडून अपेक्षा करा :). पॉझिटिव्ह थिंकींगचा किती फायदा होतो हे आता मी तुम्हाला सांगायला नको ;). आता हाच आदर, प्रेम, आपुलकी, पाठिंबा सीमेवर जाऊन लढणार्‍या सैनिकांनाही द्या. तेच खरे देशाचे 'हिरो' आहेत. विजयरथ खरंतर कारगिल आणि २६/११ झाल्यानंतर काढण्याची गरज होती, पण तेव्हा त्या विजयाला दु:खाची किनार होती म्हणून काढला नसेल. मला उगाच उपदेशपर लिहायचं नाही, पण देशविदेशात झालेला जल्लोष पाहिल्यावर हे जाणवून गेलं ते लिहीलं.

आता हाच आदर, प्रेम, आपुलकी, पाठिंबा सीमेवर जाऊन लढणार्‍या सैनिकांनाही द्या. तेच खरे देशाचे 'हिरो' आहेत >>> अनुमोदन

मॅच फिक्सिंगबद्दल लोक बोलत होते, ते मलातरी पटत नव्हतं. या खेळाडूंचं जाहिराती / IPL आणि इतर उत्पन्न बघता कोणी पैशासाठी वाईट खेळेल असं वाटलं नाही. आता काही जण 'वरूनच' सामना फिक्स आहे असं बोलत होते. ते 'वरून' म्हणजे कुठून हे मला अजूनही माहित नाही >>>
खेळाडु केवळ पैशासाठी नाहि फिक्स करत, मर्जीत रहाण्यासाठी करतात. संघाबाहेर काढले तर कुठला पैसा , कुठल्या जाहिराती, आणी कुठले उत्पन्न! आणी लायकी दाखवत नसतानाही सामन्यामागुन सामने खेळायला मिळणारी उदाहरणे काय कमी आहेत!
वरुन म्हणजे - साहेब आणी दाउद . अजुन कोण असु शकते ? प्रत्येक वेळेस सामनाच फिक्स असतो असे नाहि! एखाद्याचे शतक, एखादी विकेट हे देखील फिक्स असते. शनिवारी सकाळी मला देखील sms आला होता! ६ पेकि ५ गोष्टी त्याचप्रमाणे घडंणे हा योगायोग असुच शकत नाहि. असो.
आपली अक्कल गहाण टाकुन आपलेच कष्टाचे पैसे डुबवणारे लोक - त्यांना कशाला बोलायचे? Proud

आपली अक्कल गहाण टाकुन आपलेच कष्टाचे पैसे डुबवणारे लोक - त्यांना कशाला बोलायचे?>> Angry आम्ही तिथे अकला गहाण टाकल्यात नि तुम्ही (तेच तेच उगाळून) इथे. दोन्हीकडे अकला गहाण पडल्या आहेत हे कळले. "सब घोडे बारा टक्के" गणूभाऊ. You are no different than us mortals.

आम्ही तिथे अकला गहाण टाकल्यात नि तुम्ही (तेच तेच उगाळून) इथे. दोन्हीकडे अकला गहाण पडल्या आहेत हे कळले. >>>

असामी एवढे कशाला चिडता ? मी तुम्हाला नव्हते म्हणले ते अहो! पण तुम्हि पण ना ............. Proud

अहो पण एकदा तुमची अक्कल गहाण पडल्यावर तुम्हाला जे कळते ते चुकिचे असते हो! Proud

मेरेकू लगताय कि फिक्सिंग ऐसा धागा निकालना मंगताय..
ये प्रॉब्लेम कायमका फिक्स हो जायेंगा!
क्यु गणू भाव, सही है ना? Proud

अहो पण एकदा तुमची अक्कल गहाण पडल्यावर तुम्हाला जे कळते ते चुकिचे असते हो!>>तुम्हाला नक्कीच माहित असणार. स्वानुभव दिसतोय. Lol

गणु पण seriously isn't it high time to move on ?

अंजली, छान लिहिलंयस आणि मुख्य म्हणजे मनापासून.

मला अजिबात पहिल्यापासून वाटत नव्हतं आपण जिंकू, कारण एकच मला आपल्या खेळाडूंबद्दल विश्वास नाही वाटत. विश्वास म्हणजे मॅच-फिक्सिंग वै नव्हे...एक-दोन चांगले खेळाडू आऊट झाले की गळती लागल्यासारखे एकामागोमाग एक सगळे ड्रेसिंग रूममध्ये परत जातात. त्या एका मॅचमध्ये २८ रन्समध्येच सगळे बाद झाल्यावर उरला-सुरला विश्वासही उडाला.

पण पाक बरोबरच्या मॅचमध्ये जे टेन्शन होतं ते फायनलला अजिबातच नव्हतं.

अंजली,
गुड वन :).
माझही आडो सारखच होतं, पण आपलीच टिम कुठुन कुठे गेली.. हॅट्स ऑफ.. !!
इथे अंजली-बुवा-पन्ना-मुकुन्द पॉझिटिव एनर्जी द्ययाचे आणि घेरी फोन केला कि आई दमच द्यायची कि अज्जिबात एकही शब्द निगेटिव बोलायचं नाही म्हणून :).

आडोला सेम पिंच.
त्यात मी नुकतीच क्रिकेटच्या नादाला लागलेले असल्याने (क्रिकेटमय माबो आणि माझा क्रिकेटमय नवरा यांच्यामुळे!) मला बारकावे बिरकावे कळत नाहीत अजून. मग नुसतीच आशा-निराशा... Happy
पण योग, भाउ, बुवा यांच्या पोस्टींमधून खेळ आणि आपली टीम समजायला मदत झाली नक्की.
बाकी मॅचेसच्या वेळेला मी बुप्रावादाला तिलांजली दिलेली असल्याने आधीच्या जिंकलेल्या मॅचची प्रत्येक गोष्ट रिपीट करत होते त्यात निराशावादही आलाच. Proud

खेलो खिलाडी वाहे! वाहे!

एक यादगार 'विश्वचषक' मिळवून दिल्याबद्दल संपुर्ण भारतीय संघाचे त्रिवार अभिनंदन!

मायबोलीकरां सोबत प्रत्येक सामना खूप njoy केला... भाऊंचे व्यंगचित्र खासच... प्रत्येक मॅच बघताना मायबोलीकर जाणकारांच्या मतमतांतराची आठवण येत असे... फार फार धम्माल आली Happy

१९८३ची सेमिफायनल आपण जिंकल्यावर आम्ही घरात एक १००ची फटाक्यांची माळ शिल्लक होती ती अत्यानंदाने मध्यरात्री उडवून टाकली. फायनल जिंकल्यावर मात्र त्या माळेतला एकतरी फटाका उरवायला हवा होता असं राहून राहून वाटत होतं. Lol

यावेळच्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुध्दच्या विजयानंतर फटाके उडवणार्‍या लोकांना हे जाऊन सांगावंसं वाटलं होतं. Proud

१९८३ त फटाके उडवण्या येवढं वय नव्हतं, म्हणून मग यावेळी फायनललाच (फक्त फटाके वाजवले.) टॉस आधी तिरंगा आणला. कॅमलिनचे रंगही आणले. चेह र्‍यावर तिरंगा काढला. मस्त मजा आली. मी सोडून बाकी सर्वांना आपण जिंकू ह्यावर विश्वास नव्हता. पण मी मॅच आधीच सांगितलं होतं की आपण चेस करू व पाच एक विकेट्स राखून जिंकू Happy

<<यावेळच्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुध्दच्या विजयानंतर फटाके उडवणार्‍या लोकांना हे जाऊन सांगावंसं वाटलं होतं>>
फायनलच्या आधी बाजारात नवीन फटाके आले होते की.

<< एक यादगार 'विश्वचषक' मिळवून दिल्याबद्दल संपुर्ण भारतीय संघाचे त्रिवार अभिनंदन! >> अगदी खरंय, इंद्रधनुष्यजी. यजमान देश म्हणून बांगलादेश, श्रीलंका व भारत यांचही इतकी सुनियोजित स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल अभिनंदन . आणि, आपल्या लहरीपणाला लगाम घातल्याबद्दल त्या वरुणराजालाही अभिवादन !
<< त्यात मी नुकतीच क्रिकेटच्या नादाला लागलेले असल्याने >> नीधप, जरा संभलके ! क्रिकेटमय नवरा हें तुम्ही घेतलेलं एकच रिस्क तुम्हाला जन्मभर पुरणारं आहे !! Wink

क्रिकेटमय नवरा हें तुम्ही घेतलेलं एकच रिस्क तुम्हाला जन्मभर पुरणारं आहे !<<< हा हा... तो एरवी चित्रपटमय इत्यादी असतो त्यामुळे इतपत रिस्क परवडते मला.. Happy

चिमणजी, नेमक्या बाबींवर बोट ठेवणार्‍या लेखाच्या लिंकबद्दल धन्यवाद.
" The Indian nursery is effectively the IPL. " हाच खरा धोका असावा. क्रिकेटच्या गुणवत्तेची खरी कसोटी लागते त्या रणजी, दुलीप, आंतरविद्यापीठ, अंडर १९ इ. पारंपारिक स्पर्धांकडे दुर्लक्ष होऊन फक्त आयपीएल हाच राष्ट्रीय संघात जाण्याचा राजमार्ग ठरला, तर खरी अस्सल गुणवत्ता मागे पडण्याचीच शक्यता अधिक ! "टाईट शेड्युल" बद्दल बोलणं म्हणजे 'पालथ्या घड्यावर पाणी' !!

भाऊ,
मला तसं वाटत नाही. अगदी अलिकडे कोहली, पुजारा, यांची निवड ipl मधून झालेली नाही तर स्थानिक व ईतर आंतरराष्ट्रीय (under 19 etc) सामन्यांच्या कामगिरीतून झालेली आहे.
अश्विन हा ipl मधून आलेला असला तरी मुळात त्याची गुणवत्ता निर्वीवाद आहे. कबूल आहे त्याने आयपिल पेक्षा ईतर बाहेर काऊंटी क्रिकेट खेळले तर त्याचा त्याला व भारताला प्रचंड मोठा फायदा होईल.
सद्य संघातील युसूफ पठाण हा बहुतांशी आयपिल कामगिरी मूळे संघात आहे हे खरे.
आयपिल ही दुधारी तलवार आहे: पाट्या खेळपट्ट्यांवर फलंदाजांना रोखणे, प्रेशर हँडल करणे या काही महत्वाच्या गोष्टी त्यातून खेळाडूंना शिकायला मिळतात. शिवाय फलंदाजांना "हाणामारी" शिकायला मिळते तेही विशेष (भज्जी-श्रीशांत एकमेकात करता ती नव्हे!). या खेरीज अनेक प्रकारच्या फलंदाज, गोलंदाज यांबरोबर खेळून ईतर अनेक वैविध्यपूर्ण बाबी शिकता येतात. जगातील महान खेळाडू या स्पर्धेतून खेळतात, निव्वळ त्यांच्या बरोबर संघात राहून आपले तरूण, नवोदीत खेळाडू खूप काही शिकतात.

हे खरे आहे की आयपिल मुळे नवोदीत खेळाडूंची मानसिकता राष्ट्रीय संघात खेळण्याच्या दृष्टिकोनातून आधीच तयार होते त्यामूळे ते संघात पटकन समावून जातात पण त्यांचे "तंत्र" सुधारायचे असेल तर अर्थातच आयपिल पेक्षा ईतर स्थानिक व आंतरराष्ट्रीय स्पर्धा जास्त ऊपयुक्त आहेत.

Pages