विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कप खोटा नाही आहे म्हणुन जर आय सी सी सांगत आहे तर.......खरा कप कस्टम ड्युटी न भरता भारतात आलाच कसा........................??????????????????????????

वर्ल्ड कप जिंकला तर सचिन निवृत्ती जाहीर करेल की काय असं आत कुठेतरी १०-५ टक्के वाटत होतं. पण तसं नाही झालेलं. त्यामुळे आता पुन्हा आशा पल्लवित झाल्यात. पुढचा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया-न्यूझिलंडमध्ये आहे. वर कुणीतरी म्हटलंय त्याप्रमाणे, त्याने आता मोठा ब्रेक घ्यावा, पुढच्या वर्ल्ड कपमध्ये खेळावं, तिथे फायनलला भारत-ऑस्ट्रेलिया मॅच व्हावी आणि आपण ऑस्ट्रेलियाला हरवावं. हे सगळं सचिन संघात असतानाच घडावं. Proud (सचिनकडून क्रिकेटरसिकांना असणार्‍या अपेक्षा कधीच संपणार नाहीत हेच खरं !!)

त्याने काहीच जाहीर केले नाहीये. धावांची भूक शमली नाहीये असंच म्हणतोय तो.. Happy
त्यामुळे कुणी सांगावं खेळेलही.

तो खेळावा कि खेळू नये असे दडपण लादण्यापेक्षा 'उसी कि मर्जी ओर उसीका ताज' होऊन जाऊद्यात ना.

ह्यावेळेस 'विजयीयात्रा' नाही Uhoh आयपीएलचं कारण आडवं येणार. Sad

ह्यावेळेस 'विजयीयात्रा' नाही .आयपीएलचं कारण आडवं येणार. >>> हे जरा अती होतयं असं वाटतं नाही का ?, क्रिकेटर्स जरी असले तरी त्यांना घरदार , विश्रांतीची गरज नाही असं बीसीसीआय / आयपीएल वाल्यांना वाटतं का ?

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टिम इंडीया एकमेकांच्या विरूद्ध खेळताना बघायला मजाच येणार नाहीये. त्यात त्या बोरींग चिअरलीडर्स... की आता हाकललं त्यांना?
जिथे आख्खं स्टेडियम चीअर करत असतं तिथे त्यांची काय गरज आणि उपयोग ह्याचं उत्तर मला तरी मिळत नाही.

<< घे रे पराग झाल्या १००० पोष्टी , चल आता आयपीएल चा बाफ उघडं. >> वा:,वा:, असं कसं ! अजून आहे ना कप कंट्रोव्हर्सी, असली कीं नकली. चघळायला चांगली !! Wink

आणि आफ्रिदीची मुक्ताफळे.
आणि आयसीसी ने ओव्हर्स टाकायला उशीर केल्याबद्दल टिम इंडियाच्या खेळाडूंना केलेला दंड.
आणि आयसीसीच्या कुणा एका मेंबरकडे सापडलेली कॅश
आणि भज्जी व युवि दोघांच्या मातांनी केलेला आपापल्या पोरांना लगाम घालायचा बेत......
आणि................

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टिम इंडीया एकमेकांच्या विरूद्ध खेळताना बघायला मजाच येणार नाहीये. >>
१०० % अनुमोदन नीरजा.
वर्ल्ड कप चालू होता तेव्हा माबोवर जास्त येणं होत नव्हतं. कप जिंकल्यावर आनंद शेअर करायला इथे आले......आणि तेव्हा कळलं काय मिस केलं ते. ह्या बाफवर लिहिता लिहिता मॅच पाहणार्‍या सगळ्यांचा प्रचंड हेवा वाटतोय. कस्स्स्सलं एन्जॉय केलंय सगळं तुम्ही लोकांनी. मी काल बसून मागच्या पोस्टी वाचून काढल्या. धम्माल.
वाईट्ट परिस्थितीतही टीम इंडियाला सपोर्ट करणार्‍या सगळ्यांचं खूप कौतुक वाटतंय. ह्यामध्ये वैद्यबुवा,अंजली,दीपांजली...ही नावे ठळकपणे आठवताहेत.
भाऊंची व्यंगचित्रे अफलातून.
आणि लंकेश्वर :हाहा:... : ह्या डुआयडीमागचा खरा चेहरा कोण , ह्या विचारात पडलेली बाहुली :

अरे एक पांडे नामक स्त्री मॉडेलने भारत अंतिम सामना जिंकला तर सगळ्यांसमोर निर्वस्त्र (हा बरा शब्द आठवला ऐन वेळी) होण्याचं ठरवलं होतं. तीच ती पांडेबाई.

काल संध्याकाळी मरीन ड्राईव्हवर फिरायला गेलो होतो. रस्त्यावरून दिसणारे वानखेडेचे फ्लड-लाईट्सचे उंच खांब डोळे भरून पाहून घेतले. त्याच दिव्यांच्या लख्ख उजेडात अवघ्या ३६ तासांपूर्वी तिथे काय काय घडलं ते आठवून नव्याने उचंबळून आलं.
एअर-इंडियावाल्यांनी त्यांच्या टोलेजंग इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी भज्जी, युवराज, रैना आणि कोहली यांचे अभिनंदन करणारे एक मोठे पोस्टर लावले आहे. ते चौघं त्यांचे honoured employees आहेत ना!

रच्याकने, परवाच्या मॅचमधे ज्या पद्धतीने श्रीसांत खोर्‍याने धावा देत होता त्यावरून वाटत होतं की हरभजन भडकून त्याला (पुन्हा एकदा) थोबाडीत मारतो की काय? Proud सुदैवाने हरभजन बर्‍यापैकी फोकस्ड असल्याने असलं विनोदी दृश्य नाही बघायला मिळालं.

गणपती बाप्पा मोरया
मंगल मुर्ती मोरया

भारतीय संघाचे अभिनंदन.

This team will now destroy everybody, त्यांचा आत्मविश्वास तर कित्येक पटीने दुणावला असेल. (hope I'm using the right word)

माझ्या विश्वचषक विजेत्या मायबोलीकर मित्रांनो,
सर्व प्रथम आपणा सर्वांचे हार्दीक अभिनंदन.
मी तुम्हाला अगदी पहिल्या पासून सांगत होतो. आम्ही विश्वचषक जिंकणार आहोत. बाकी मंडळींना फक्त आमच्या करमणूकी साठी बोलावले आहे. एका पत्रकाराचे वाक्य बघा. Given the sense of entitlement of a billion people, the Lankan Lions could be excused for feeling like obligatory invitees to Tendulkar's party.

खूप लोकांचा विश्वास नव्हता. पण सर्व गणंगांचे झक्कपैकी चिमणे तोंड झाले. असो जिंकल्यामुळे सर्वांना माफ.
आपण ६ विकेटसने जिंकणार हा माझा अंदाज तंतोतंत खरा झाला. खूप मजा आली मॅच पाहताना. .

मला कुणीतरी विचारले ८३ ची टीम व आत्ताची यात फरक काय.
त्याला म्हणल. ८३ च्या टीम नी वेस्ट इंडिजला फायनल मधे मारल होत. त्यानंतर ६ महिन्याच्या आत त्याच वेस्ट इंडिजनी भारताला भारतात ५-० मारल होत. आपला ८३ चा विजय अगदी फ्लूक नसला तरी क्रिकेटमधील ग्लोरियस अनसर्टनीटीज मधे बसणारा होता. २०११ चा विजय तसा नाही.जबरदस्त आणि हक्काचा आहे.

२०१५ ला सुद्धा आता पासूनच आपण दावेदार असू असे म्हणायला खूपच वाव आहे.
जवळपास सगळी बॅटिंग तशीच राहू शकेल. Happy

<< २०११ चा विजय तसा नाही.जबरदस्त आणि हक्काचा आहे. >> विक्रमजी, खरंय. त्यावेळीं जिंकण्याचं दडपण, तेंही आपल्या देशांत, नव्हतं. पण आजच्या विजयाचं बीज त्याच विजयामुळे पेरलं गेलं , हेही खरंय !
<< जवळपास सगळी बॅटिंग तशीच राहू शकेल.>> आणि, बोलींग ? Wink

एक १६ मार्कांचा प्रश्न सर्वांसाठी...
श्रीलंकेचे नक्की काय चुकले की ज्यामुळे त्यांचा पराभव झाला? किंवा भारतानी नक्की काय काय केले की ज्यामुळे इतका सहज विजय मिळाला??

संगक्कारा नि शेवटी ला सांगितलं २७५ was a very small target to chase for the batting line up of India, they knew they had to take 7 wickets, which was not easy. भारतीयांनी जिद्द सोडली नाही, ते चिकाटी ने खेळले

श्रीलंकेचे नक्की काय चुकले की ज्यामुळे त्यांचा पराभव झाला?
--> आपल्या २ विकेट गेल्यानंतर श्रीलंकेचे क्षेत्ररक्षण थोडे ढिले झाल्या सारखे वाटत होते.ऊत्क्रुष्ट गोलंदाजी विकेट्स मध्ये परिवर्तित न करू शकल्यामुळे आणि नंतर आत्मविश्वास गमावल्यासारखे जाणवत होते.

भारतानी नक्की काय काय केले की ज्यामुळे इतका सहज विजय मिळाला??
-->एक संघ, प्रचंड आत्मविश्वास, करोडो भारतीयांचा पाठिंबा आणि प्रार्थना, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जिंकायचेच आहे ही विजीगूषू भावना.

हिरकू
तुम्ही खालील मुद्यांवर लघू निबंध लिहा. प्रत्येकी ४ मार्क. (असे १६/१६ मार्क माझे)
१. भारताची जबरदस्त बॅटींग स्ट्रेंग्थ
२. कॅप्टन कूल धोनी
३. गुरू गॅरी
४. आपल्या टीमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि श्रीलंकेच्या टीमचा आत्मविश्वासाचा अभाव आणि याचा टीम सिलेकशन आणि प्रत्यक्ष खेळावर झालेला परिणाम..

मॅचनंतर संगाकारा बोलला की आज आम्ही ३०० चा पल्ला ओलांडला असता तरी भारत जिंकला असता. माझ्या मते भारताची दुर्दम्य इच्छाशक्ती हीच विश्वचषक विजयासाठी कारणीभूत ठरली.

आपण जिंकलो हे एका कारणाने खूपच महत्वाचे आहे ते म्हणजे आपल्याकडे असलेला क्रीडा संस्कृतीचा संपूर्ण अभाव (आणि शासनाने आखलेल्या क्रीडा धोरणाचा सर्व पातळ्यांवर वाजलेला बोर्‍या). प्रत्येक क्रिकेटपटू किंवा इतर खेळतला खेळाडू हा एखाद्या दुसर्‍या खेळाडू कडून किंवा १९८३ सारख्या विश्वचषक विजयासारख्या मोठ्या घटनांतून स्फूर्ती घेऊनच पुढे येतो आणि स्वतःच्या कुवतीनुसार मोठा होतो - शासनाने आखलेल्या क्रीडा धोरणाचा परिपाक म्हणून नव्हे. म्हणूनच कदाचित म्हणतात की Kapil Dev was not born because of the system, he was born in spite of the system.

आपल्याकडे असलेला क्रीडा संस्कृतीचा संपूर्ण अभाव (आणि शासनाने आखलेल्या क्रीडा धोरणाचा सर्व पातळ्यांवर वाजलेला बोर्‍या) <<< संपूर्ण? म्हणजे काय?

Pages