अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रत्नाकर मतकरींची 'जेवणावळ' वाचा. खतरनाक!!! बहुतेक फँटास्टिक कथासंग्रहात असावी.
आउट्डोअर्स, कां त्या बिचार्‍या फडतरेच्या मागं लागलांयसा.. कोकणकड्यावरून आत्महत्या केलेला बर्वे होता, फडतरे नव्हे! ..तशी संगमरवरी स्मरणपाटी २ वर्षांपूर्वीपर्यंत तिथे होती.

.

हेम अनुमोदन...तो बर्वे होता...त्याला कोकणकड्याचे व्यसन लागल्यासारखे झाले होते. दिवसेंदिवस तिथे बसून असायचा आणि शेवटी त्याने तिथून उडी मारली...

गौतमलाही अनुमोदन..सर्व भुते आणि त्यांचे प्रकार कुणी विशद करू शकेल काय...

माझ्या माहीतीतले प्रकार म्हणजे...
भूत, समंध, पिशाच्च, ब्रम्हपिशाच्च, मुंजा, हडळ
अजुन आठवले की सांगतो..
यापैकी लहान मूल मुंजा होते असे म्हणतात
आणि ब्राम्हणापैकी कुणी मेला तर ब्रम्हपिशाच्च
समंध नक्की कशाला म्हणतात
स्त्री भुतांमध्ये पण बरेच प्रकार आहे...
कुमारिका मृत्यू पावली असेल तर, विवाहीत, गरोदर इइ.
जाखीण, डाकीण यापैकी नक्की कोण ते माहीती नाही...

झोटिंग म्हणजे एक ग्रामदैवत आहे >> ओह अस आहे का? बर्‍याच कथांमध्ये (हितोपदेश, वि.-वेताळ) याचा उल्लेख असायचा. तसच कासार समाजातपण झुटींग अस आडनाव असते.

आमच्या ईंग्रजीच्या बाई, ing प्रत्यय लावलेली क्रियापदे विचारत असत, e.g., cleaning, washing तसच आम्ही zuting म्हणत असु Happy

वेताळ, खोत, ईब्लिस असेही काही वाचल्यासारखे आठवतात...
______________________________

गावी आमराईमध्ये एक चिंचेचे झाड होते. त्या झाडाखाली कोणी पिवळ्या रंगाचे काही आणले कि त्याला विषबाधा व्हायची अस म्हणायचे. अंनिसच्या लोकांनी अमवस्येला पिवळे कपडे घालुन त्या झाडाखाली बसुन पिवळा भात खाल्ला आणि मस्त झोपहि काढली. पेपरमध्ये ही बातमी मिठमसाला लाऊन छापलेली Happy

अमानवीय मध्ये फक्त भुतांची माहिती न देता इतर पॅरॉनॉर्मल गोष्टींबद्दल माहिती दिली चालेल का Wink

http://www.youtube.com/watch?v=EsyJEipQnaE&p=5E25254309BD4F89

या विडीओमध्ये एक महाराज रॉकेटसारखे उडताना कॅच केलेत एकाने मोबाईलवर...बघा आणि सांगा काय वाटतय ते...

बाप रे.काय अनुभव आहेत एकेकाचे.

माझ्या गावी असे खूप जणांचे अनुभव आहेत.मला व्यक्तीशः अजून एकही अनुभव आला नाही.

समंध नक्की कशाला म्हणतात>>> आपण ज्या जागेवर वास्तवास असतो त्या जागेचा (घराचा,गावाचा,शहराचा) 'मानवयोनित' हयात नसलेला 'मालक'. [मी न पाहीलेला.]

तो सतत त्या आवारात फिरत असतो आणि जागेचे राखण करतो (असा समज आहे).अमावस्येला आपण जो 'नारळ' देतो तो त्याचाच मान असतो, साधारण भाषेत समंधाला 'जागेवाला' असं म्हणतात. समंध सहसा माणसांना त्रास देत नाही, पण त्याच्या जागेत जर काही अप्रिय घटना घडली की तो चांगलीच अद्द्ल घडवितो.

त्याच्या येण्या जाणार्‍या मार्गावर कुणी बसले असेल, झोपले असेल., तो दोन वेळा सांगेल की इथे नको झोपु तिसर्‍यावेळी झोपलेली व्यक्ती कुठ्ल्यातरी तिसर्‍याच ठीकाणी आढळेल.
सधारपणे त्याचा वेश ज्यांनी त्याला पाहिले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सफेद सदरा,पायजामा,उंचफेटा असा रुबाबी असतो. तर कुणी पाहुन सुध्दा त्यांना आठवत नाही 'तो' नक्की कसा दिसत होता.

माझं गाव कोकणातलं. तिथे अशा भुताखेतांच्या गोष्टी तर खूप ऐकायला मिळतात. गावातल्या आमच्या घराच्या गोठ्याजवळ वर्षातून एकदा नारळ ठेवावाच लागतो. आणखीन एक जागा आहे, तिथेही अमावस्येला की वर्षातून एकदा (?) नक्की लक्षात नाही, नारळ नाही ठेवला तर रडल्याचा आवाज वै येतो असं सगळे (बाबा वै) सांगतात.

माळावर भेटलेली भुते, मध्येच रस्त्यात उगवुन लगेच अंतर्धान होणारी भुते इ.इ. भुतांचा जन्म कसा होतो याबद्दल माहिती हवी असेल तर कृपया द मा मिरासदारांची 'भुताचा जन्म' ही गोष्ट वाचावी.

यापैकी लहान मूल मुंजा होते असे म्हणतात>> मुंज होण्यापूर्वी जो लहान मुलगा/तरूण मरतो तो मुंजा होतो... पिंपळावर असतो शक्यतो...

आजोळी एक विहीर होती २-४ घरांची मिळून कॉमन! तिथे एका तरूणीने (बहुदा प्रेमभंग्/फसवले गेल्यावरून ) उडी मारून आत्महत्या केली होती. पुढील बरेच वर्ष करकरीत संध्याकाळी ती झपाझप विहीरीकडे चालत जाऊन उडी मारताना बर्‍याचजणांनी पाहीली होती...!!! बाकी काही त्रास नसायचा... पण मामाने मागे धावत जाऊन कोण आहे असे हाक मारून थांबवायचा प्रयत्न केला होता... पण तिचा झपाटा एवढा होता की क्षणार्धात विहीरीजवळ पोहचून उडी मारली... मामाने धावत घरी येऊन सांगितल्यावर आजीने त्याला अंगारा वगैरे लावला होता... ते त्या मुलीचं भूत होतं हे समजल्यावर मामाने २ दिवस ताप घेतला होता.

विवाहाचे स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे हे होतंय असं सांगून दर कातरवेळी त्या विहीरीजवळ हळदीकुंकू वाहून तेलाचा दिवा लावून ठेवावा असे तिथल्या भगताने सुचवले होते... त्यानंतर हा प्रकार बंद झालेला...

गौतमलाही अनुमोदन..सर्व भुते आणि त्यांचे प्रकार कुणी विशद करू शकेल काय...

>>>>

परवा रात्रीच लिहायला घेतले होते. अपुर्‍या वेळामुळे अर्धवट झाले आहेत लिहून.

आशु, माझ्या माहितीतले सर्व भ्हुत पिशाच्च कार्य आणि स्थानासहित लिहितोय Wink
कृपया थोडी प्रतिक्षा करावी.

सांताक्रुझला माझ्या शेजारच्या इमारतीतील एका ११वीतल्या मुलीने घरच्या भांडणात स्वतःला जाळुन घेतले. तिला वाचवायच्या प्रयत्नात आईवडीलही जळाले. मुलगी तर ३-४ तासातच गेली, वडिल दोन दिवसांनी गेले आणि आई महिन्याने गेली. काही महिन्यांनी त्या बिल्डिंगमध्ये मोठी पुजा घातली गेली. आम्हाला तेव्हा कळले की त्या तिघांपैकी आई ब-याच लोकांना दिसायला लागलेली. दिवसा रात्री कधीही ती जिन्यावर बसलेली दिसायची. शेवटी योग्य सल्ला घेतला गेला आणि बिल्डींगची शांती केली गेली .

प्रिया टेंडुलकर चा एका शो मध्ये मी ऐकलं होतं :-

एक आजीबाई मृत्युशय्येवर होती व आपल्या मुला ला भेटायची तिला अतीव ईच्छा झाली होती, मुलगा अमेरिकेत होता आणि आजी भारतामध्ये.
दुसर्‍या दिवशी मुलाला त्याच्या आई चे निधनाचे वृत्त मिळाले, तो ओक्सा बोक्शी रडायला लागला आणि सांगत होता कालच त्याला त्याची आई दिसल्याचे भास झाले होते आणि स्वपनात ही आली होती, त्याच्या शी छान बोलली.

टीवी बघत होतो तेव्हा मन सुन्न झाले.

विषयांतर झाले असल्यास क्षमस्व.

आम्ही कधीही माथेरानच्या किंवा कर्नाळ्याच्या जंगलात गेलो आणि दुपारी जेवायला बसलो की आई ब्रेडचा एखादा छोटा तुकडा किंवा पुरीचा छोटा भाग बाजूला टाकते. मला हे अजिबात आवडत नाही कारण तुकडा जरी छोटासा असला तरी तिथे कचरा टाकल्यासारखंच आहे ना. पण आई अजिबात ऐकत नाही. आम्ही लहान असताना कारण विचारलं तर डोळे वटारायची. मग आम्ही डोळे वटारूनही न ऐकण्याच्या वयाचे झाल्यावर तिने एकदा (घरी परत आल्यावर!) सांगितलं की आसपास भूतं असतील तर त्यांच्यासाठी हा तुकडा असतो. मी आणि भाऊ चेष्टा करतो की भुतांना जास्त देऊ नकोस, नाहीतर आपल्याला काही खाऊ देणार नाहीत Happy पण हे असं का करायचं असतं हा प्रश्न रहातोच.

रच्याकने, हडळ आणि झोटिंग ह्यांचा उल्लेख परवा लोकसत्तातल्या अतुल परचुरेच्या क्रिकेटवरच्या लेखात वाचला. त्याचं शीर्षक "झोटिंगाला नाही बायको आणि हडळीला नाही नवरा" असं काहीसं होतं.

स्वप्ना_राज, भुतांच माहीत नाही, पण असा तुकडा ठेवण्या मागे माझ्या आईच लॉजिक अस की, आपण खात असलेल्या अन्नाच्या वासामुळे आजुबाजुला असलेली किटक, मुंग्या आपल्या पानात न येता त्या ठेवलेल्या तुकड्याकडे आकर्षित व्हाव्या. चित्राहूती घालण्यामागे सुध्दा असचं लॉजिक तीने आम्हाला सांगितल होत.

विषयांतरा करता क्षमस्व.

.

राजाला देण्यात येणारे अन्न, अन्न शिजवणार्‍याने राजासमोरच खान्याचीही प्रथा होती.
चिनुक्षच्या अन्न: वै प्राणा मध्येही याचे उल्लेख आहेत.

मी शाळेत असताना पिकनिकला जायचे तेव्हा काहीजणी नॉनवेज आणायच्या. मग इतर मुलींमध्ये कुजबुज चालायची की असे बाहेर नॉनवेज खाल्ले तर भुत मागे लागते म्हणुन.. Happy

अमानवीय
माझा पोस्ट गायबला...

अस म्हणतात की राजगडावर नॉनव्हेज खाऊ देत नाहीत तिथे एक ब्राह्मणाच भूत आहे.

चातकाने लिहीलेल वर्णन 'पीर' या जमातीशी जुळणार आहे. तो पांढ-या घोड्यावरून फिरतो अस म्हणतात. याची कबर असते आणि विषेश म्हणजे त्याची पूजा मुसलमानपद्धतीने चादर वगैरे घालून गुरूवारी करतात.

व्हॉटेवर इट इज.................
पण हे नक्की की माणसाला त्याच्या जाण्याची चाहूल लागतेच लागते..... थोडावेळ का होईना पण तो वेगळा भासतो त्या वेळेत....

उदा: कोणी आंघोळ करून येईल, पूजा करून येईल, आपल्या वस्तू एकत्र आणून ठेवेल.... इ.

गुगु अरे राजगडावर नाही काय ते तोरण्यावर...
तिथे दिवेकर नावाच्या ब्राम्हणाचे भूत आहे असे म्हणतात..
अनेक जणांनी ते पाहिल्याचे दाखले दिले आहेत...
यावर कहर म्हणजे काही वर्षापूर्वीपर्यंत त्या भुताला नैवेद्य दाखविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून खास तजविज केली जात असे...
विजय देशमुख यांच्या महारांजाच्या मुलुखात त्या भुताचा दाखला दिला आहे..

>>किंवा सरळ सरळ वातावरणातील अनाकलनीय बदल असेल. इंग्रजीत त्याला एक संज्ञा आहे
- atmospheric anomaly.

मंदार, अशी atmospheric anomaly समुद्रावर किंवा हवेत खूप उंचीवर असेल तर मी समजू शकते. पण घरातल्या खोलीतल्या एका भागात? अर्थात ह्या जगात काहीही होऊ शकतं म्हणा.

स्निग्धा,दिनेशदा, चित्राहुतीबद्दलचं स्पष्टीकरण मीही वाचलंय. तसंच असावं बहुतेक.

आणखी एक मजेशीर किस्सा सांगते. ह्यात अमानवी काही नाही पण एक अनुभव. काही दिवसांपूर्वी माथेरानला गेलो होतो. तिथे गेलो की बाजाराकडे जायची वाट सोडून आम्ही बाकीच्या वाटांवरून भटकतो. तिथे जास्त माणसं नसतात. असंच चालत चालत आम्ही बरंच दूरवर आलो. एका कड्यावरून खाली एक गाव दिसत होतं पण तिथे जायला एका अरुंद वाटेशिवाय दुसरी वाट नव्हती. शिवाय आमची परत निघायची वेळ झाली होती. त्यामुळे परत फिरलो. वाटेत बरोबरच्या थर्मासमधला चहा घ्यावा म्हणून थांबलो तर ६-७ बायका डोक्यावर मोठाले डबे (बहुतेक ह्यात रॉकेल होतं!) आणि काय काय सामान घेऊन त्याच वाटेने त्या गावाच्या दिशेने जाताना दिसल्या. म्हटलं बघून तर यावं ह्या बाया कोणत्या रस्त्याने खाली जातात ते. म्हणून जरा वेळाने त्यांच्या मागून मीही निघाले.

तशी मी भरभर चालते. आणि त्यात त्या बायांच्या डोक्यावर ओझी. त्यामुळे त्यांना सहज गाठू असा माझा अंदाज. त्यांचा आवाजही येत होता. आणि मग एकदम त्यांचा आवाज येईनासा झाला. रस्ता दगडाधोंड्यांनी भरलेला, पुढे एक वळण, पण निदान रांगेतली शेवटची बाई तरी दिसावी. तीही दिसेना तेव्हा मी हैराण झाले. त्या बाया होत्या की नाही असाच भ्रम झाला एकदम. जवळजवळ धावतच तो दगडाधोंड्यांचा रस्ता मी पार केला आणि वळणावर वळले तेव्हा त्या बाया पुन्हा दिसल्या. Happy त्या अरुंद वाटेवरून डोईवरचं ओझं सांभाळत भरभर उतरत होत्या. त्या दिसेनाश्या होईतो मी कौतुकाने पहात होते आणि ही मुलगी काय पहातेय म्हणून त्या हसून बघत होत्या.

तेव्हा पुढे जाऊन पाहिलं म्हणून नाहीतर माथेरानला मला कशी बायांची भुतं दिसली असा किस्सा मी इथे टाकला असता Happy

.

स्वप्ना, अग बरे झाले तु पुढे धावत गेलीस आणि त्यांना परत दिसलीस.. नाही तर एका मडमीण भुताने आमची पाठ धरली असा किस्सा त्या गावात पसरला असता.. Proud

चातक म्हणतोय तो 'जागेवाला' म्हणजेच क्षेत्रपाल असावा. काळसर्पासारख्या काही शुभाशुभाच्या पुजा करताना याला नैवेद्य ठेवतात.

माझा एक मित्र वास्तु तज्ञ आहे. आम्ही त्याला मांत्रिक म्हणतो.
त्याच्याकडे एका मोठ्या कंपनीच काम आलेल. मला काही त्याच्या सारख ज्ञान नाही तरीही त्याला हे काम करू नकोस अस सांगितलेल. कारण त्या कंपनीमुळे त्या गावात पाण्याच दुर्भिक्ष निर्माण झालेल. (काहीजण ओळखतील ही ती कंपनी)
पण त्याने ते घेतलच आणि तिथल्या क्षेत्रपालाला बंधन घातल.
झाल याची दोनही मुल अचानक आजारी पडली ती एकदम ICU मधेच. जातात की रहातात अशी अवस्था.
सुदैवाने वाचली.

Pages