अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मावशीच्या गावात एका ज्योती नावाच्या मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या किली होती.
त्यानंतर अजूनही ती कित्येक जणांना विहिरीत उडी मारताना दिसते म्हणे (म्हणजे माझ्या मावशीला हि दिसली होती एकदा)
जर कोणाला या प्रकाराबद्दल माहिती असेल तर कृपया स्पष्टीकरण द्यावे
बाकी ; सर्वांचे प्रसंग भन्नाट आहेत

.

<<< एक ऑटोवाला म्हणे रात्री...१/१.३० च्या दरम्यान घरी चालला असता वाटेत त्याला एक माणुस भेटला, त्याच भागात जाय्चे म्हणुन ऑटोत बसला, मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असतांना तो माणुस ऑटोवाल्याला म्हणाला तुम्ही एवढ्या रात्री फिरता भुताखेताची भिती नाही वाटत का? ऑटोवाला म्हणाला नाही आमचे रोजचेच आहे कसले भुत अन कसले काय... त्यावर तो माणुस म्हणाला बर समजा तुम्हाला भुत दिसलेच तर कसे ओळखाल...तर ऑटोवाला म्हणाला सोप्पे आहे भुताचे पाय उलटे असतात....तर लगेच तो माणुस म्हणाला ...मागे वळुन पहा "माझे पाय का सरळ आहे का? आणि ते भुत गायब झाले... ऑटोवाल्याला हार्टअटॅक येऊन तो मेला म्हणतात.... >>>

मग हा किस्सा लोकांना कोणी सांगितला ? भूताने ? Happy

असुद्या Lol असु दे रे.. असु दे..अरे म्हणजे, जाउ दे...तुच भुत बनशील नाहीतर. स्मितेचा किस्सा आहे तो.

चातक, दुसर्‍याच्या नावाशी खेळणं थांबवाल प्लीज ?> असुदे.. Lol अरे मी भुत नाहीय. लागलं असल्यास हलके घ्या.याने आपले नाम बदनाम होत असल्यास किंवा संकोच असल्यास त्वरीत मी पोस्ट बदलतो. तुम्ही फक्त हो म्हणा. निळे नका होउ प्लिज.

भूत नाही ??? मग मेल्यावर माणुस संपतो की काय ?
मग या जन्मी च्या पुण्याचे काय करायचे ??

मग या जन्मी च्या पुण्याचे काय करायचे ?? >> अवधुत, गहन प्रश्न् आहे Happy मला वटतं या विषया वर तशीच 'गहन चर्चा' होउ शकते (झाली पाहीजे).

>>सगळी भूते रात्रीचीच का येतात ? दिवसाढवळ्या फिरण्याची भूतांना भीती वाटते का ?

ह्या बीबीवरच्या काही किश्श्यांत सकाळी दिसलेल्या भूतांचा उल्लेख आहे की. उदा. त्या बाईकवरून जाणार्‍या मुलीला दिसलेलं गुजराती बाईचं भूत.

स्मिता बिनिवाले, तुमची गोष्ट ऐकून रामगोपाल वर्माच्या "डरना मना है" किंवा "जरूरी है" मधल्या विवेक ऑबेरॉय आणि नाना पाटेकरच्या गोष्टीची आठवण झाली.

रच्याकने, देवचार काय असतं?

आता आईने सांगितलेला एक किस्सा. मागे एक पिक्चर पाहत असताना त्यात दाखवलेला प्रसंग पाहून मी "कैच्या कै दाखवतात" असा शेरा मारला तेव्हा आईने अशीच गोष्ट तिच्या माहेरच्या एका कुटुंबात घडल्याचं सांगितलं.

झालं असं की त्या कुटुंबातल्या बाई यात्रेला गेल्या होत्या. पण एके दिवशी अचानक त्या त्यांच्या सगळ्यात धाकट्या मुलीकडे आल्या. आईला अचानक आलेलं पाहून मुलीला आश्चर्य वाटलं. तिने तसं विचारलंही. आईने पाणी मागितलं म्हणून मुलगी स्वयंपाकघरात गेली आणि फोन वाजला. फोनवर तिचा भाऊ होता. त्याने आई यात्रेत असतानाच गेल्याचं सांगितलं. मुलीचा विश्वास बसेना. आई तर इथे आली आहे असं म्हणून तिने दिवाणखान्यात जाऊन पाहिलं तर आई नव्हतीच. मानो या ना मानो!

असं बर्‍याच जणांच्या बाबतीत होतं... गेलेला माणूस जवळचा असेल तर नक्कीच काही क्षणांत स्वप्नात वा प्रत्यक्ष जाऊन त्या व्यक्तीचा आत्मा भेटतो... याच्याशी साधर्म्य साधणार्‍या बर्‍याच गोष्टी ऐकल्या आहेत..

आशुचँप, आजच हा धागा बघितला. तुम्ही सुरुवात केलीत तेव्हा वाटलं की चकव्याचा अनुभव लिहिताय की काय, कारण ट्रेकला जाताना बर्‍याच जणांना त्याचा अनुभव येतो.

त्या 'फडतरे' व्यक्तिशी तुमचा काही संप र्क आहे का हो नंतर? विचारायचं कारण असं की, मागे कोणाकडून तरी ऐकलेलं, अगदी कोकण कड्याच्या टोकाशी असतानाच. की एका माणसाला हा कोकणकडा प्रचंड आवडायचा . तो खूपदा त्यासाठीच हरिश्चंद्रला जायचा. आणि केव्हातरी त्याने कोकणकड्यावरून जीव दिला. मला आठवतंय त्याप्रमाणे त्याचं नाव ' फडतरे' असंच सांगितलं होतं बहुधा.

नावासारखं नाव व हरिश्चंद्र हा योगायोगही असू शकेल कदाचित.

यु ट्यूबवर, अतुल कुलकर्णीचा, "चकवा" नावाचा सिनेमा आहे. या सिनेमाच्या शेवटी, या सिनेमाशी संबंधित कुणीही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, अशी पाटी आहे (पण पूर्ण कथा भूताच्या अस्तित्वावरच बेतलेली आहे.) जमला तर बघा.

भूताला काही टेरीटॉरियल मर्यादा असतात का ? या चित्रपटातले भूत त्याच्या प्रेयसीचा शोध का घेऊ शकत नाही ते कळत नाही. ते तिच्या बहिणीच्या मागे लागते, तसेच त्याच्या प्रेयसीने दिलेली, एक किचेन नायकाकडे असते, म्हणून त्याच्याही मागे लागते.

या चित्रपटातले भूत त्याच्या प्रेयसीचा शोध का घेऊ शकत नाही ते कळत नाही >> ती प्रेयसी काही कळण्याच्या अवस्थेत नसते असं दाखवलय ना त्यांनी त्यात..

या चित्रपटातले भूत त्याच्या प्रेयसीचा शोध का घेऊ शकत नाही ते कळत नाही. >>> तिचा देव गण असावा Lol

चित्रपटातल्या भुतांना स्टोरी रायटरच्या डोक्याचे बंधन असते. Happy

मी गेल्याच महिन्यात डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णींचे अज्ञातातले विज्ञान वाचत होते त्यात होते की आपल्याला अमानविय वाटणा-या ब-याच गोष्टी माणसातुन आणि इतर सगळ्याच घटकांतुन उत्सर्जीत होणा-या इलेक्ट्रोमेग्नेटिक किरणांमुळे होत असतात आणि त्यापलिकडेही काहीही स्पष्टीकरण देता येत नाही अशाही ब-याच घटना घडत असतात. यांचेही स्पष्टीकरण कालांतराने होईल, फक्त आज माणसाला तेवढे ज्ञान नाहीय.

रच्याकने, देवचार काय असतं?

ही कोकणातली स्पेशॅलिटी आहे. हे साध्या भुतांपेक्षा जरा वरच्या श्रेणीतले असतात. कायम प्रचंड मोठ्ठ्या वड, पिंपळ,आंबा इ. झाडांवर वास्तव्यास असतात. अमावस्येच्या संध्याकाळी असल्या झाडांखालुन जायचा गाढवपणा केला तर मग फुकट यांच्या तावडीत सापडुन माणसाचे हाल व्हायचे. बाकीचे ३० दिवस हे शांतपणे झाडांना लटकत असायचे. ही माहिती ३५-४० वर्षांपुर्वीची आहे. सध्याचे काही माहित नाही. लेटेस्ट न्युज हीच की आता कोकणच नामशेष व्हायच्या मार्गाला लागलेय Sad

ही सत्य घटना आहे चकावाची, भुताची नाही
अकोल्या पासुन ३० की.मी. वर पातुर गांव आहे
तीथे नानासाहेब यांचे मोठे पण खुपच पडीक १५०० व्या शतकातले देऊळ आहे
तीथे मदीरा १ विहीर आहे. १ दिवशी देशपाडे कोणी याला चकवा लागला अन त्यान त्याला सरळ त्या विहीरीत लोटुन दिले. हा गडी नशीबवान किंवा नानासाहेबाची कॄपा म्हणुन १० दिवस विहीरीत कपारीला धरुन होता. मग १ दिवशी बकर्‍या चारणार्‍याच्या कानी त्याचा आवाज गेला. बाहेर काढल्यावर तो अगदीच मृतप्राय होता. एकतर उपाशी विहीत अंधार.

>>लेटेस्ट न्युज हीच की आता कोकणच नामशेष व्हायच्या मार्गाला लागलेय

नुकत्याच बान्द्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधे झालेल्या कोकण महोत्सवात असं वाटलं की अर्ध्या कोकणात रिसॉर्ट्स आलेत आणि उरलेल्या कोकणातल्या जमिनी व्हिला, अपार्टमेन्ट्ससाठी विकल्या जाताहेत. Sad बाकी माहितीबद्दल धन्स Happy

माझा आणखी एक अनुभव. अमानवीय आहे असं मी नक्कीच म्हणणार नाही. फक्त वेगळा आहे एव्हढंच. काही स्पष्टीकरण मिळालं तर हवंच आहे. मागच्या वर्षीची गोष्ट आहे. आमच्या घरात बाल्कनी आणि हॉल ह्यांमध्ये काचेचे ४ दरवाजे आहेत. त्यातले एकदम डाविकडचा (नं१) आणि एकदम उजवीकडचा (नं ४) असे २ दरवाजे सोडून मधले २ दरवाजे उघड-बंद करता येतात. नं२ दरवाजा नं१ वर नेहमी फोल्ड केलेला असतो. तसंच नं. ३ दरवाजा हा नं४ वर फोल्ड केलेला असतो. त्यामुळे बाल्कनी आणि हॉल ह्यांमध्ये ये-जा करता येते.

एके संध्याकाळी त्या दरवाज्यातून बाल्कनी आणि हॉल ह्यामध्ये ये-जा करताना माझ्या असं लक्षात आलं की नं२ आणि नं. ३ ह्यामधल्या जागेतून pass झालं की एकदम थंड हवेच्या पट्ट्यातून गेल्यासारखं वाटतं. ते सुध्दा फक्त नं२ च्या दरवाज्याच्या बाजूने गेल्यावरच. ते दिवस पावसाळ्याचे किंवा हिवाळ्याचे (हा ऋतू मुंबईत नसतोच म्हणा!) नव्हते. बाल्कनी आणि हॉल मध्ये एसी नाहीये, पंखे बंद. वरच्या किंवा खालच्या मजल्यावर राहणार्‍यांकडेसुध्दा एसी नाही. बाल्कनीच्या खिडकीतून वार्‍याचा झोत येतोय म्हणावं तर बाल्कनीमध्ये गारवा येत नव्हता. हॉलला खिडक्या नाहीत.

मी आईला काहीच बोलले नाही. पण रात्रीचं जेवण झाल्यावर फेर्‍या मारताना तिच्याही लक्षात हा प्रकार आला. हा अनुभव त्या दिवसानंतर आम्हाला कधीच आलेला नाही. किंवा ह्या घरात काही जाणवलेलं नाही. काय असू शकेल?

स्वप्ना, काही आत्मे/भूत वगैरे तिथे असतील त्या दिवशी म्हणून तसा अनुभव आला असेल.
किंवा सरळ सरळ वातावरणातील अनाकलनीय बदल असेल. इंग्रजीत त्याला एक संज्ञा आहे
- atmospheric anomaly.

अरे असाच किस्सा अश्वत्थाम्याचाही आहे. तो दिसला त्याने महाभारत दाखवण कबूल केल अर्जुनाने शंख फुंकला आणि तो माणूस मेला.

अशात-हेच्या गूढ कथा माझ्याकडे आल्यात त्या इथेच टाकू एकेक करून की नवा टॉपिक

"आंबोलीला एका मित्राबरोबर गेलो होतो. त्याच्याबरोबर खूप पायी भटकलो होतो तिथे. त्या मित्राने काही महिन्यानी आत्महत्या केली""
म्हणजे दिनेशदा तू काय केलस .... खि!!!!खि!!!!खि!!!!

गुगु, नाही . त्याच्याबद्दल खुपच हळवा होतो मी. त्याला शेवटचा भेटलेला मी होतो आणि मला त्याने त्याच्या बेताचा पत्ता लागू दिला नाही.

खूप प्राचीन काळी, काही स्त्रिया विषिष्ठ रोगांवर औषध देत असत. त्यातून रोगी बरा झाला, कि त्या स्त्रीला धान्य द्यायची प्रथा पडली. अश्या स्त्रिया मग गावदेवीच्या प्रतिकात उरल्या. मुंबईतील शितलादेवी हे असेच एक प्रतीक आहे. आजही लहान मूलांना गवर येऊन गेल्यावर तिला दहिभात वाहतात.

तसेच जे पुरुष, इतरांना मदत करत असत. रात्री वाट दाखवत असत, नदी पार करायला मदत करत असत, ते देवाप्रमाणेच, म्हणून त्यांचे देवचार झाले. गोव्यात डिचोलीला, असेच एक देउळ आहे. मालवणला, राजकोट चढून गेल्यावर, देवचाराची घुमटी दिसत असे. (ती आहेच तिथे) पण त्यांची भिती वाटत नसे.

माझी काकी, खुप प्रवास करत असे. शिक्षकांचा पगार वाटायचे काम तिच्याकडे असे आणि त्यासाठी तिला कोकणातल्या खेड्यात फिरावे लागत असे (३० वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत त्या.) रात्री मिळेल त्या वाहनाने, होडीने तिला एकटीला ते गाव गाठावे लागत असे. तिला विचारले कि कधी देवचार वगैरे भेटला का, तर ती म्हणते, "पर्समधल्या रोख रकमेचे, एवढे टेंशन असायचे, कि होडी कोण चालवतोय, ते बघायचेही भान नसायचे. असेलही भेटला, पण मला कुणी त्रास दिल्याचे आठवत नाही."

भारीये धागा!
नेमका वर्ल्डकप सुरू आहे आणि त्याच्याशी संबधीत अनुभव.
२००३ चा वर्ल्डकपचा अंतीम सामना चालू होता. सुट्टी काढून कोकणात गावी गेलेलो.
ऑस्ट्रेलियाची इनींग झाल्यावर आपली बॅटींग सुरू झालेली. नेमकी लाईट गेली.
घरातले सगळे झोपलेले. त्यांना डिस्टर्ब नको म्हणून रेडियो घेऊन बाहेर अंगणात गेलो. अमावस्या होती की नाही माहीत नाही. आरामखुर्ची व स्टुल मांडून, स्टुलावर दोन पायांच्या मधे रेडिओ ठेऊन, मस्तपैकी आरामखुर्चीत रेलून आपल्या क्रिकेटविरांची हाराकिरी ऐकत होतो. वेळ लक्षात नाही, पण निम्म्याहून जास्त संघ गारद झालेला.
झोप येत नसल्याने शिव्यांची लाखोली वाहत तसाच पडून होतो.
एवढ्यात दुरवर नारळीच्या मुदात लघवी करण्याचा आवाज ऐकू आला. बॅटरी मारली तर शेजारच्या घरातला चुलत भाऊ ज्याला आम्ही बाबू म्हणतो.
मी काहीतरी बोलावं म्हणून म्हटलं, "हारतायत साले"
तो जवळ येत म्हटला, "नेहमीचंच"
नंतर खांद्यावर थोपटत बोलला "झोप जाऊन"
मी "ह्म्म"
त्यानंतर तो त्याच्या घरात गेला. काहीवेळाने मिही कंटाळून रेडियो बंद करून झोपायला गेलो.

सकाळी उठल्यावर अंगणात आलो तेव्हा बाबूची आई अंगण लोटत होती.
मी- "नानी, बाबू ऊठला नाही का अजून?"
नानी- "बाबू काल सकाळीच गेला मुंबईला, तुला भेटला नाय?"
"गंमत करतेस काय सकाळी-सकाळी? रात्री तर बोललो आम्ही"
"झोप नाय झाली वाटतं तूझी" असं म्हणत ती घरात निघून गेली.
मी हादरलोच! आई-वडीलांना सांगितलं, वडील म्हटले, असल आपलाच एखादा पुर्वज, तुला बघायला आला असेल!

हा अगदी खरा अनूभव. विश्वास ठेवा, नका ठेऊ! पण मी आजही कंन्फ्युज आहे. सगळं तर्क-वितर्कांच्या पलिकडचं. आपण अनूभव घ्यायचे, बाकी थिट्या बुध्दीचे प्रश्न असेच न सुटणारे!

ट्यागो, तो पुर्वज नसावा. मी एक alternate reality हा गाभा असणारी गोष्ट वाचली होती. त्यात एकच माणूस दोन वास्तवात वावरतो. तसंही असण्याची शक्यता आहे. अर्थात हा माझा कल्पनाविलास झाला!

हा धागा वाचतेच आहे.... जबरी मनोरंजन होते आहे... ट्यागोचा अनुभव पण लय भारी!

मंदार, नुकतीच मी alternate reality समजावून सांगणारी Documentary पाहिली. Parallel Universe ह्या संकल्पनेवर इतका कल्पनाविलास केलाय त्यात... पण धम्माल मनोरंजन झाले. ज्यांना ह्या विषयात रस आहे त्यांनी नक्की नक्की नक्कीच पहा... चुकवू नका. यु ट्युब लिंक देते आहे:
भाग १: http://www.youtube.com/watch?v=XmyrE9I8HNg
भाग २: http://www.youtube.com/watch?v=42-BpCivYJU&feature=related
भाग ३: http://www.youtube.com/watch?v=no_fOg9KNP4&feature=related

Invisible extra dimentions हा तर इतका भारी concept आहे. जो भाग ३ मध्ये विस्ताराने सांगितला आहे.

त्याच्याबद्दल खुपच हळवा होतो मी. त्याला शेवटचा भेटलेला मी होतो आणि मला त्याने त्याच्या बेताचा पत्ता लागू दिला नाही.
दिनेशदा,
अस काही घडलं की मनाला खुप चुटपुट लागुन राहते आणि तीही कायमचीच !

माझाही एक जवळचा मित्र तो आत्महत्या करण्यापुर्वी मला एक महिना अगोदर भेटला, मी त्यावेळी २ दिवसासाठी गावी गेलो होतो, तासभर बसुन बोललो आम्ही,शेवटी त्यांन कायमच घर सोडुन (भावी पत्नीच्या घरी,त्यांच्या मर्जी/आग्रहानुसार) जाण्याविषयी मला सल्ला विचारला, मी हे चुकीच आहे अस सांगीतल,(घरच्यांनी तर पुर्ण विरोध केला) पण मला अस काही करेल हे स्वप्नात देखील वाटल नव्हतं.
त्या मित्राने याच महिन्यात,याच आठवड्यात आत्महत्या केली होती, त्यापुर्वी १०-१२ दिवस अगोदर मी (एका भयंकर आणि वेगळ्या) स्वप्नात त्याचे अनेक दुरचे नातेवाईक गोळा झालेले, माझ्या घरासमोरुन (रस्ता असल्यामुळे) घराकडे जात असलेले पाहिले, माझे काही मित्र एकत्र आलेले, विशेष म्हणजे मी गटारीच पाणी त्याच्या घराकडे वाहत जात असलेलं पाहिलं..(तशी गटार घराजवळ नसताना)
मी हे स्वप्न माझ्या डायरीत दुसर्‍या दिवशी तारखेसह लिहिन ठेवल आहे ...
आतापर्यंत ५-६ लोकांच्या मृत्युची जवळपास पुर्वसुचना मला या स्वप्नातुन मिळाली आहे.
आणि धक्कादायक हे की कालच एक बायकोकडील नातेवाईक वारले, त्याच्या ४ दिवस अगोदर मला पडलेल्या स्वप्नात मी तिच्या सगळ्या नातेवाईकांना,भाऊबंध हे एकत्र गोळा झालेले पाहिले होते, याची शंका मला आली होतीच,दुसर्‍याच दिवशी ते मी बायकोला न विसरता,प्रत्यक्ष बोलुनही दाखवली होती..
हे का असं घडतयं हे मला तरी अजुन कळालेलं नाही ...
:दु:ख:

चातका, वन्स अगेन... तुझी स्मायली भारीच... तिला पाहून पाहून पण माझे मनोरंजन होतेय Proud

Pages